उपयुक्त माहिती

देव पूजा
देव पूजा 

देवपूजा

देव पूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे. प्रातःकाली स्नानानंतर देवपूजा करावी. सर्व पूजा सामग्री एकत्र करून, देवासमोर बसावे. पाणी भरलेला पाण्याचा तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा. प्रथम कलशातील जलात पवित्र नद्यांचे आवाहन करावे. त्यातील जलाने प्रथम  शंखाची पूजा करावी, शंख जलाने भरावा. त्यातील पाण्याने आपले शरीर आणि सामुग्री यावर शंख जल प्रोक्षण करावे. भुशुद्धी, भूतशुद्धी यथायोग्य करून पूजा सुरवात करावी.

पुरुषसूक्ताने देवांच्या मूर्तीवर दोन हात, दोन पाय, गुडघे कंबर, बेंबी, हृदय, कंठ, मुख, नेत्र, मस्तक या स्थानी पुरुष सुक्ताच्या मंत्राने क्रम नसोडता न्यास करावा. मूर्तीला साक्षात देवरूप मानून नंतर पूजा करावी. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवित, गंध, फुल, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व पुष्पांजली हे १६ उपचार पुरुषसूक्ताचे एकेक ऋचेने देवाला द्यावे. गंधा नंतर अलंकार, चांगले भोग वाहावे. नैवेद्याला चार प्रकारचे अन्न द्यावे. श्रेष्ठ उपचार, विडा, दक्षिणा, आरती, फळे, स्तवन, गायन, नाच, वाद्ये, ब्राह्मणभोजन या उपचाराने देवाला संतुष्ट करावे. पूजेच्या आरंभी घंटानाद करावा, स्नान धूप, दीप देताना घंटा वाजवावी. स्नान, नैवेद्य, वस्त्र, यज्ञोपवित समर्पणानंतर आचमन देत जावे. प्रत्येक उपचाराला आचमन देत राहावे. देव पूजेच्यावेळी स्नान घालताना, महा्देवाशिवाय अन्य देवाला शंखाचे पाणी अर्पण करावे.

आपल्या घराच्या बागेतील आणलेली फुले उत्तम, अरण्यातून आणलेली फुले मध्यम, विकत आणलेली फुले कनिष्ठ होत. पांढरी फुले उत्तम, लाल फुले माध्यम, काळीं फुले कनिष्ठ होत. शीळी फुले वर्ज्य करावी. फुलास भोक पडले असेल, बारीक किडे फुलात असतील, आपोआप गाळून पडलेली फुले, मळ लागलेली फुले, डाव्या हाताच्या स्पर्श झालेली, पाण्यात घातलेली फुले, फुलांचे तुकडे देवाला वाहू नये. बकुळ,कमळ, अशोक, चमेली, दुर्वा, बेलपत्र, शमी, कुश, देवाला वाहावे. तुळस, कण्हेर, मोगरा, अशोक हि विष्णूला उत्तम होत. कांचन, आकाव (रुई) धोत्रा, सेमल कुडा हि विष्णूला वाहू नयेत. गणपतीला तुळशी, देवीला दुर्वा, महादेवाला काळी, लालफुले, केवडा, निंब, आदी वाहू नये. महादेवाला पांढरी फुले, बेलपत्र वाहावी गणपतीला दुर्वा व लाल फुले वाहावी. विष्णूस तुळशी व पीवळी फुले वहावित. दत्तात्रेयानां तुळस बेल व पिवळी व पांढरी फुले वाहावी.

देवपूजा
देवपूजा

देवपूजा न करिनर । पावे त्वरित यमपूर ।। नरक भोगी निरंतर । ऎक ब्राह्मणा एकचित्ते ।। (गुरुचरित्र अध्याय ३७). 
देव पूजेचे ६ विधी शास्त्रात सांगीतले आहेत
१) उदकनारायण
२) अग्निदेव पूजा
३) मानसपूजा
४) सूर्यपूजा
५) प्रतिमा पूजा
६) यज्ञपुरुष पूजा अथवा धेनु किंवा  ब्राम्हण पूजा. 

गुरुचरित्रात  उल्लेखल्या प्रमाणे "गुरु पूजा मनोभावेसी । प्रत्यक्ष तुष्टे श्रीगुरु मूर्ती ।।" "वेदोक्त मंत्र करोनि वाची । विधिपूर्वक पुजावे ।।" (गुरुचरित्र). 
निर्माल्य नैऋत्य दिशेस टाकावे. कपीत्य, केतकी, शशांक व श्याम पुष्पे वर्जावी. देवपूजा पूर्ण झाल्यावर धूप, दीप नैवेद्य अर्पण करावे. साष्टांग नमस्कार करावा. देवतांची पूजेत काही त्रुटी असल्यास माफी मागावी. सकल क्षेमसाठीही प्रार्थना करावी. 

येणे विधी पूजा करिता । काम्य होय तुम्हा त्वरिता । चातुर्वेद्ध पुरुषार्था । लढत तुम्ही अवधारा ।।

तिर्थ प्रसाद प्राशनाबाबत शास्त्रार्थ

१) तिर्थ घेताना उजव्या हाताची गोकर्ण मुद्रा (अंगठ्याजवळचे बोट वाकवून गायीच्या कानासारखी मुद्रा करावी.) करून त्यामध्ये तिर्थ घ्यावे.  
२) देवाचे तिर्थ अग्नितीर्थ (तळ हाताच्या खोलगट भागात घेऊन) ते आत्मतीर्थाने आवाज न करता प्राशन करावे. 
३) तिर्थ म्हणून घेतले ज।णारे उदक किंवा पंचामृत अत्यल्पच (उडीदाचे डाळी येव्हढे) असावे कारण तिर्थाचे रूपांतर लाळेत व्हावे. मलामध्ये होऊ नये असा शास्त्रसंकेत आहे. 
४) सामान्यतः देवपूजा केल्यानंतर दोनदा व उपवासदीका मूळे अन्न ग्रहण होणार नसेल तर तीनदा तिर्थ घ्यावे. 
५) मंदिरात गेल्यावर एकदाच तिर्थ घ्यावे.
६) शुद्धो दकाने तिर्थ ग्रहण केल्यावर हातावरील तिर्थलेश।चा मास्तकास स्पर्श केल्यास देवगौरवं साधला जातो. 
७) देवपूजा केल्यानंतर तिर्थ एखाद्या झारीत ठेवावे व ते परगावी जाताना, महत्वाच्या कामास जाताना, दिवसभरात कुटुंबियांकडून परपीडा, परनिंदा, पैशून्यदी पाप घडल्यास देव दर्शन घेऊन तिर्थ घ्यावे. 
८) काही ग्रंथांतून तिर्थ हे पात्रातून घ्यावे असे लिहिले आहे. 
९) तिर्थ घेताना उजव्या हातात तिर्थ व डाव्या हातात तिर्थ भरलेले पात्र असू नये. त्याने तिर्थ भरलेले पात्र उछिष्ठष्ट होते. अपवाद- झाकणी झाकलेली झारी. 
१०) तिर्थ प्रसाद शक्यतो पुरोहित किंवा जेष्ठ व्यक्तीकडून घ्यावा. अपवाद- आपण स्वतः पूजा केल्यास, सोवळ्यात असल्यास व दुसरे कोणी उपस्थित नसल्यास इ.
११) तिर्थ प्रसाद खाली बसून घ्यावा. 
१२) आपण बसलेल्या आसनावर (पूजा करताना) बसून तिर्थ प्रसाद ग्रहण करू नये. 
१३) पूजा समाप्त झाल्यावरच तिर्थ प्रसाद ग्रहण करावा. 
१४) देवाच्या गाभाऱ्यात तिर्थ घेऊ नये 
१५) तिर्थ घेताना ते जमिनीवर सांडू नये.
१६) तिर्थ प्रसाद ओलांडून जाऊ नये. 
१७) तिर्थ घेताना "अकाल मृत्यू हरणं सर्व व्याधी विनाशानं। दत्तपदोदकं तीर्थं जठरे ध।रय।म्याहं "।। हा मंत्र म्हणून तिर्थ घ्यावे.
१८) तिर्थ घेताना 'प्रथमं काय।शूध्यर्थ । द्वितीयं धर्मासाधनं त्रितीयम मोक्षमपनुयात' असे म्हणून ३ वेळा तिर्थ प्रश्न करतात. वरील विधी निषेधाचा अंगीकार करून गुरुतीर्थ ग्रहण केल्यास शरीर शुद्धी, धर्मसाधन व मोक्षप्राप्ती होते.

देवघर कसे असावे
देवघर कसे असावे?

देवघर कसे असावे?

देवघरासंबधित काही महत्वाचे नियम 

  • देवघरात फरशी बसवायची असेल तर पांढरा किंवा पिवळा मार्बल चालेल.
  • देवघर लाकडाचे किंवा पांढऱ्या मार्बलचे चालेल स्टील किंवा लोखंडाचे नको.
  • देवघराच्या भिंतींना हल्का नारंगी, केसरिया या भगवा रंग लावावा नाहीतर एखादी भिंत या रंगाची करावी.
  • देवघरात अभिमंत्रित श्री यंत्र जरूर ठेवावे ठेवताना त्याची स्थती योग्य असणे गरजेचे आहे.
  • देवघरात देवघर झाडण्यासाठी एक झाडू जरूर ठेवावा कुंचा शक्यतो नको.
  • देवघरात बसायला दर्भाचे आसन जरुर घ्यावेत कोणत्याही पुजेचा दुकानात दर्भ आसन मिळते.
  • देवघरात रोज तेलाचा आणि एक तुपाचा दिवा जरूर लावावा.
  • देवघरात रोज एक सुंगधी अगरबत्ती आणि एक लोभान ची उदबत्ती जरूर लावावी.
  • देवघरात एकाच देवतेच्या एकपेक्षा जास्त मूर्ती नसाव्यात.
  • देवांचे आसन नेहमीच आपल्या आसनपेक्षा उंच असावे.
  • देवघरात वरूण कलश ठेवावा हा कलश आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने स्थापन करावा. कलशात नारळ 5 पाने पाणी पैसा सुपारी टाकावी त्याला हळदी कुंकवाचा प्रत्येकी ३ किंवा ५ रेषा ओढाव्यात.
  • देवघरात गणपती अन्नपूर्णा बाळकृष्ण श्रीयंत्र आणि आपल्या गुरूंची मूर्ती जरूर असावी.
  • देवघरात जिवंत गुरूंची मूर्ती ठेऊ नये किंवा फोटो पण लावू नये. 
  • देवघरात मृत व्यक्तींचे फोटो देवताबरोबर ठेऊ  नयेत.
  • देवघरात रोज कपूर जाळून एक तरी मंत्र आगर स्तोत्र जरूर म्हणावे आणि घंटी वाजवावी.
  • देवघरात एक वितापेक्षा जास्त उंच मूर्ती नसावी.
  • देवघरात झोपणे जेवणे टाळावे.
  • देवघरात देवाला सणावारी आपण जे जेवण करता ते नैवेद्य म्हणून दाखवावे. 
  • देवघरात पूजा करताना भांडणे ओरडणे अपशब्द बोलणे टाळावे.

स्वस्तिक

स्वस्तिक
स्वस्तिक  शुभचिन्ह

स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभप्रतीक आहे. स्वस्तिकचा सुचक अर्थ 'कल्याण असो' असा आहे. स्वस्तिक मध्ये  सूर्य, इंद्र, वायु, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णु, ब्रम्हदेव, शिवपार्वती, श्रीगणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो. शांती, समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. कोणत्याही अग्रपूजेचा मान या चिन्हास आहे. स्वस्तिक गतीचे द्योतक आहे.त्याचे चार बाहू म्हणजे अनुक्रमे धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे आहेत आणि ते श्री विष्णुंचे हात असून त्या चार हातांनी ते चारही दिशांचे पालन व रक्षण करतात. स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे. शोभा, सुसंवाद, उल्हास, प्रिती, सौंदर्य, आशिर्वाद, कल्याण, शांती हे गुण स्वस्तिक या शुभचिन्हात समाविष्ट आहेत. स्वस्तिकाची आडवी रेघ म्हणजे विश्वाचा विस्तार, आणि उभी रेघ म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण. स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णुंचे नाभिकमळ असून श्री ब्रम्हाचे उत्त्पत्ती स्थान आहे. देवाजवळ स्वस्तिक काढल्यास स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही असे पद्मपुराणात म्हटले आहे. भारतीय नारींच्या मंगल भावनांचे प्रतिक म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिक म्हणजे कल्याणाचे काव्य, सर्व दिशांचा सौरभ, मानवी पुरूषार्थाचे प्रेरणाबळ, निर्मितीच्या सहाय्याची सूचना आणि देश, काळ यांचे मिलन आहे. अश्या विविध अंगांनी नटलेल्या स्वस्तिक या शुभचिन्हास नमस्कार.

हे लक्षात ठेवा!

१) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ?
उत्तर- ती यमाची मृत्यू ची दिशा आहे. यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.

२) स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये?
उत्तर- ही सौभाग्य देणारी आहे म्हणून.

३) देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ?
उत्तर-
 ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी.

४) शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी.
उत्तर-
 शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात. त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून.

५) एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत ?
उत्तर-
 प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून.

६) गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये ?
उत्तर-
 हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना बीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून.

७) शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत ?
उत्तर-
शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून.

८) निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये ?
उत्तर:
 तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे . म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही . नाहीतर तम तत्व वाढेल . राक्षसी संकटे येतील म्हणून.

९) देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत ?
उत्तर-
 त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून.

१०) विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये ? 
उत्तर-
 फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून.

११) शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये ?
उत्तर-

  • शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून.
  • सर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनादही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते. सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन.
  • देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो. शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही. ती हिरण्यगर्भा आहे. ती प्रसूति वैराग्य आहे.

१२) आपली जपमाळ व आसन कधीही दुस-यास वापरण्यास का देवू नये ?
उत्तर-
 त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते . ते दुस-यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो.

१३) देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे.
उत्तर-
 हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत. अंगठा -आत्मा, तर्जनी -पितर, मध्यमा-स्वतः, अनामिका -देव, करंगळी -ऋषी. म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे.

१४) समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत.
उत्तर-
विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून.

१५) एका हाताने देवाला नमस्कार का करू नये. 
उत्तर-
 दश इन्द्रियाचा नमस्कार मह्त्वाचा असतो. पंचतत्त्वाचा नाही.

मंत्रपुष्पांजली
मंत्रपुष्पांजली

देव कर्माबाबत विशेष काळजी

१) गुरु, देवता व अग्निसमोर पाय पसरून बसू नये.
२) देवयात्रा, विवाह, उत्सव, यज्ञ, पूर, वनांमध्ये कधीही स्पर्शदोष लागत नाही.
३) विष्णू मंदिरास चारवेळा, शंकरास अर्धी, देवीच्या मंदिरास एकदा, सूर्यमंदिरास सात वेळा व गणपतीस तीन प्रदक्षिणा कराव्यात.
४) देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा दिवा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा ठेवावा.
५) परमेश्वराची पूजा करताना दिव्यास स्पर्श केल्यास हात धुतले पाहिजेत.
६) घरामध्ये दोन शिवलिंगे, तीन गणेश मूर्ती, दोन शंख, दोन सूर्यप्रतिमा, तीन देवीच्या प्रतिमा किंवा मूर्ती, दोन गोमती चक्रे व दोन शाळीग्राम यांची पूजा करू नये. पूजा केल्यास घर मालकास अशांती प्राप्त होते.
७) दुसऱ्यांनी वापरलेले यज्ञोपवित, अलंकार, माळा, छत्री, कपडे, कमंडलू इत्यादी वापरू नयेत.
८) आचार हा धर्मास सफल बनवतो. सदाचाराने मनुष्य धनवान होतो. आचारवान मनुष्य सदा पवित्र, सुखी व धन्य आहे.

देवळं आणि दर्शनामागचं विज्ञान

देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रह्मांडाचा भवतालाचा पंचमहाभूतांसहित असलेला छोटासा तुकडाच जणू.

  • सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ ऊर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज व चुंबकीय ऊर्जेचे उत्तम वाहक (good conductors) आहेत हे आपल्याला माहीत आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकीय वैश्विक ऊर्जा स्वत:त सामावून घेऊन नंतर ती भवतालात रेडिएट करणे हा तांब्याचा तुकडा मूर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश. त्यानंतर विधीपूर्वक मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.
  • आता देवळात जाताना काय करावे, कसे दर्शन घ्यावे याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही १००% विज्ञान कसे आहे ते पाहू.
  • देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो. यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला, बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दूषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे.
  • मंदिराच्या मध्य भागातील फरशी अशी निवडलेली असे (उदा. संगमरवर) की ती मंदिरातील शुभ ऊर्जेची ती उत्तम वाहक असेलच; पण आपण जेव्हा तिच्यावरून अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पॉइंट्समधून ती आपल्या शरीरात प्रवेश करेल.
  • जर तुमची पंच ज्ञानेंद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मंदिरातील शुभ ऊर्जा तुम्ही स्वत:मध्ये सामावून घेऊ शकाल, तेव्हा पुढचे नियम त्याकरिता.
  • मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वाराशी असलेली घंटा वाजवणे.
    • यामागेही दोन उद्देश आहेत.
      • या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजवल्यानंतर ती तीव्र परंतु किमान सात सेकंद राहणारा प्रतिध्वनीत नाद निर्माण करतील अशा बनवल्या जातात.
      • घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वत:मध्ये सामावून घेणे. यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दिपित होतातच, पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने (in co-ordination) काम करू लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.
  • आपले पाच ज्ञानेंद्रिये म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, गंध घेणे या पुढील रूढी हे पाच सेन्सेस उद्दिपित करतात.
    • कापूर जाळणे – दृष्टी
    • कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्यांना लावणे – स्पर्श
    • मूर्तीवर फुले वाहणे – फुलांच्या अरोमामुळे वास.
    • कापूर व तुळशीपत्र घातलेले तीर्थ प्राशन करणे -चव. हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांडय़ात ८ तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ-ताप असे आजारही जातात.
    • घंटानाद व मंत्रोच्चारण – ऐकणे.
      अशा प्रकारे उद्दिपित अवस्थेत व receiving modeमध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ ऊर्जा स्वत:त सामावून घ्यायची असते.
  • मूर्तीच्या मागील बाजूस व भवतालात पसरलेली ऊर्जाही मिळावी म्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन.
  • पूर्वसुरी म्हणतात,
    • हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका.
    • मंदिरात जरा वेळ टेका.
    • शरीरात ऊर्जेला समावायला, स्थिर व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, ऊर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.

मित्र-मैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात का जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हीच अपेक्षा.

जपमाळेतले १०८ मणी

उपासनेमध्ये जपाचे महत्व अत्युच्च आहे. रामनामपासून ते गायत्री मंत्रापर्यंत सर्व मंत्रांचा जप मण्यांच्या माळेतून केले जातो. मण्यांच्या माळेत १०८ मणी असतात. या संबंधी सहज विचार येऊन जातो कि माळेत १०८ मणीच का ? यात कमी जास्त का नसावेत? आपल्या ऋषीवर्यांनी प्रत्येक गोष्टी बाबत फारच मंथन करून त्याची संख्या निश्चित केली आहे. मण्यांच्या माळेविना जप आणि पाण्याच्या स्पर्शाविना दान हे निष्फळ आहे, असे समजले जाते. यातली पहिली गोष्ट म्हणजे  माळेच्या मण्यांनी जप केला असता जप किती झाला आहे याचा साधारण हिशोब लक्षात येतो व दुसरे म्हणजे अंगठा व बोट यांचा मण्यांशी होणाऱ्या स्पर्शाने एक विलक्षण विद्युत तयार होते त्यामुळे हृदयचक्र प्रभावी होऊन चंचल मन एका ठिकाणी स्थिर होते.

जगात प्रमुख २७ नक्षत्रांना मानले जाते. प्रत्येक नक्षत्राचे ४ चरण व यांचा गुणाकार १०८ ही संख्या येते. सर्व नक्षत्रांच्या एकूण चरणांची ही १०८ संख्या संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करणारे आहे. ब्रह्मांडात सुमेरुची स्थिती ऋषीवर्यांनी देखील मान्य केली आहे तसेच माळेत देखील सुमेरुचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. दिवस व रात्र यातील मनुष्याची श्वासोच्छवासांची संख्या २१६०० आहे अशी वेद शास्त्र मध्ये निश्चित केली आहे. या हिशोबाने दिवसा भरात झालेल्या श्वासांची संख्या १०८०० होते. जप मुख्यतः उपासना म्हणून केला जातो. जपाची फळे सामान्य रुपात १०० गुणांत दाखविली आहे तर या १०० गुणांनी १०८०० ला भागल्यास १०८ हि संख्या मिळते. जोतिष्यशास्र मध्ये ब्रह्मांडाची १२ भागात विभागणी केली आहे, त्याला राशी असे नाव दिले आहे. तथापि १२ राशी, ९ ग्रह यांचा गुणाकार १०८ येतो. उपनिषदांची संख्या १०८ आहे. अशा प्रकारे अवघे विश्व १०८ संख्येत सिमीत असल्याने माळेतील मण्यांची संख्या १०८ असते.

देवपूजेत देवघर कसे असावे 

वास्तशास्त्रानुसार घराच्या ईशान कोपऱ्यात देवघर प्रतिष्ठित केले पाहिजे. देव्हाऱ्यात प्रतिष्ठित केले जाणाऱ्या मूर्तींचा जीवनावर प्रभाव पडतो तर जाणून घ्या कोणत्या मुर्ती देवघरात ठेवू नये.

देवी लक्ष्मीची उभी मूर्ती किंवा चित्र

देवी लक्ष्मी नेहमी विराजमान स्वरूपात असली पाहिजे. लक्ष्मीची उभी मुद्रा असलेली मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने घरात धन टिकून राहत नाही.

दुर्गादेवीची विध्वंसकारी स्वरूप

दुर्गा देवी साक्षात शक्ती स्वरूप आहे. देवीने अनेक राक्षसांचे वध केले आहे म्हणून संहारक स्वरूपातही देवीची पूजा केली जाते.
परंतू देवघरात विध्वंसकारी स्वरूपात असलेली देवीचे फोटो लावू नये. 

नटराज मूर्ती

नटराजची मूर्ती वास्तवमध्ये महादेवाच्या तांडव स्वरूपाची मूर्ती आहे. महादेव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा तांडव करतात. यामुळे घरात नटराजची मूर्ती ठेवल्याने क्रोध आणि आवेशची भावना वाढते. घरात सुख-शांती हवी असल्यास नटराजची मूर्ती ठेवू नये.

भैरवनाथ मूर्ती

भैरवनाथ महादेवाचे स्वरूप आहे. त्यांचे वाहन कुत्रा आहे. भैरवनाथाची पूजा विधी सोपी नाही. भैरवनाथांना प्रसन्न करण्यासाठी स्मशानातील राख आणि तंत्र-मंत्राची आवश्यकता असते. 

शनीदेवाची मूर्ती

शनीदेवाची मूर्ती घरातील देव्हाऱ्यात ठेवू नये. शनीदेवाची पूजा नेहमी शनी मंदिरात जाऊन केली पाहिजे कारण शनीदेवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात.

एकाच देवाच्या दोन मुर्ती घरातील देव्हाऱ्यात ठेवू नये. अशामुळे नात्यांमधील ताण वाढतो.    

अन्नदानाचे महत्व

१. अन्नदान करणाऱ्याच्या २१ पिढ्यांचा उद्धार होतो.
२. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रती देवास स्वर्गलोकाची प्राप्ती झाली.
३. जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते.
४. अन्नदान करणारा शिवलोकात जातो तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही.
५. अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो.
६. अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता-भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते.
७. जो पर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुखेच्या भावनेचा अनुभव येत आहे तो पर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही.
८. लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल, हे सांगता येणार नाही म्हणून दान तात्काळ करावे. यथाशक्ती, यथासामर्थ्य दान देत राहावे.
९. अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते, जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वछ होऊन पाण्याचा साठाही वाढतो.
१०. संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल. अन्नामुळेच शरीराचे बल वाढते. अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात म्हणून 
अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समाजाला जातो.
११. न्यायिक मार्गाने मिळविलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते.
१२. अन्नदाता परमाता आहे त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता, जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव `सात्विक आहार' होय.
१३. शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो, हजारात एखादा पंडित असतो, लाखात एखादा वक्ता असतो, परंतु या सर्वात एखादाच दाता असतो किंवा नसतो.
१४. अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही.
१५. भुकेलेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात.

आरतीचे महत्त्व

आरती म्हणजे देवतेला आर्ततेने (आतून) हाक मारणे. एखाद्या मानवाने आरतीद्वारे जर अशी हाक मारली,तर देवता त्या मानवाला स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये दर्शन देतील.उपासकाला हृदयातील भक्तीदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे ‘आरती’. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निःसंशय सफल होतात, पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून, म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य रीतीने म्हटली जाते.एखादी गोष्ट आपल्याकडून आर्ततेने, म्हणजे अंतःकरणपूर्वक तेव्हाच होते, जेव्हा तिचे महत्त्व आपल्या मनावर बिंबते. त्या गोष्टीमागील शास्त्र वा सिद्धान्त सांगितल्यास तिचे महत्त्व लवकर पटते. याच उद्देशाने या लेखात आरती करतांना करावयाच्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र दिले आहे.
उपासना करतांना कोणतीही कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य करणे अत्यावश्यक असते; कारण अशा कृतीचेच परिपूर्ण फळ मिळते. आरती कशी म्हणावी, कशी ओवाळावी, आरती पूर्वी अन् नंतर काय करावे आदींविषयी बहुतेकांना ज्ञान नसते किंवा त्यांच्याकडून अयोग्यरित्या कृती होत असतात.

आरती कशी म्हणावी

आरती करताना जोरजोराने ओरडणे, टाळ, घंटी वाजविणे म्हणजे आरती नव्हे. आरती म्हणण्याचे काही नियम आहेत. भक्ताच्या हृदयातील भक्तिदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे 'आरती'. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश नि:संशय सफल होतो,पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून, म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य रीतीने म्हटली जाते. एखादी गोष्ट आपल्याकडून आर्ततेने म्हणजे अंत:करणपूर्वक तेव्हाच होते, जेव्हा तिचे महत्त्व आपल्या मनावर बिंबते. त्यासाठी आरती कशी म्हणावी, कशी ओवाळावी, आरतीपूर्वी आणि नंतर काय करावे, काय आवश्यक आहे?

देव प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहोत या भावाने आरती म्हणावी. आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी. आरती म्हणताना शब्दोच्चार स्पष्ट आणि योग्य असावा. आरती म्हणत असताना टाळ्या वाजवाव्यात. ताल धरण्यासाठी त्या हळुवारपणे वाजवाव्यात. टाळ्यांच्या जोडीला घंटा मंजूळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे. असल्यास टाळ, झांज, पेटी आणि तबला या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावी.आरती म्हणत असताना देवाला ओवाळताना तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वतरुळाकृती फिरवावे.आरती ओवाळताना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये.आरती झाल्यानंतर 'घालीन लोटांगण.' ही प्रार्थना म्हणावी.यानंतर ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी. कापूर-आरती ग्रहण करावी. कापूर-आरती ग्रहण करावी, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा. काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी. देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा. त्यानंतर देवाला प्रदक्षिणा घालावी. ते सोयीचे नसल्यास स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात. यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी. मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर देवतेच्या चरणांवर फूल आणि अक्षता वहाव्यात. नंतर पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी.

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।
अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ।।

अर्थ: मला तुझे आवाहन आणि अर्चन, तसेच तुझी पूजा कशी करावी, हेही ज्ञात नाही. पूजा करतांना काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर. हे देवा, मी मंत्रहीन, क्रियाहीन आणि भक्तीहीन आहे. मी तुझी आरती / पूजा केली आहे, ती तू परिपूर्ण करवून घे. दिवस-रात्र माझ्याकडून कळत नकळत सहस्रो अपराध घडतात. ‘मी तुझा दास आहे’, असे समजून मला क्षमा कर.नंतर देवतांच्या नावांचा जयघोष करावा.त्यानंतर तीर्थ प्राशन करून विभूती (उदबत्तीची राख) भ्रूमध्यावर लावावी.

आरती झाल्यावर स्वत:भोवतीच का फिरायचे?

एकतर त्यात आत्मसन्मान आहे. पूजनाचे, दर्शनाचे, श्रीसेवेचे हे भाग्य आपल्याला लाभलेयासाठी स्वत:चाच तो गौरव आहे. दुसरी अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आत्मप्रदक्षिणा आरतीनंतर केली जाते.पूजा, आरती झाल्यावर श्रींचे मूतींत झालेले दर्शनच आता सर्वत्र पाहण्याकरिता गोल फिरणे आहे. सगळीकडे तोच नटला आहे, हे जाणणे आहे. श्रींच्या सर्वांगीण आणि सर्वत्र विद्यमान रूपाच्या दर्शनाचा सोहळा आहे प्रदक्षिणा.

काय वैशिष्ट्य आहे या प्रदक्षिणेचे?

प्रदक्षिणा म्हणजे श्रीविग्रहाच्या भोवती केवळ गोल फेरी मारणे इतकाच सामान्य अर्थ नाही. ती झाली कृती. पण, कोणतीही कृती नेमकी समजून घ्यायची असेल, तर अनिवार्य असते त्यामागील हेतू समजून घेणे, हेतू खरा महत्त्वाचा असतो. त्यासाठी कृती असते.

प्रदक्षिणेचा हेतू काय?

प्रदक्षिणा ही सगळ्या पूजेच्या नंतर केली जाते. पूजा नेहमी श्रींच्या त्या विलोभनीय रूपाकडे पाहत पाहत केली जाते. यात श्रींचे फक्त सन्मुख दर्शन घडत आहे. श्रीतत्त्वाच्या सर्वांगीण आकलनाचा परिपूर्ण रसास्वाद त्यात नाही. तो घेण्याचा मार्ग आहे प्रदक्षिणा.सर्वांगपरिपूर्ण दर्शनाची रीती आहे प्रदक्षिणा. प्रदक्षिणा शब्दात दक्षिण शब्द आहे. दक्षिण म्हणजे उजवा. श्रीमूर्तीला कायम उजवीकडे ठेवत प्रदक्षिणा केली जाते. उजवीकडे ठेवणे हा सन्मान देण्याचा एक शास्त्रीय प्रकार आहे. श्रींना सातत्यपूर्ण सन्मान देण्याची पद्धती आहे प्रदक्षिणा. प्रदक्षिणा करताना श्रींचे वेगवेगळ्या अंगाने दर्शन घडते आणि ही सगळीच रूपे ‘उजवीच’ आहेत, हे मनोमन निश्चित करण्याचा मार्ग आहे प्रदक्षिणा.

नैवेद्य  भगवंताला अर्पण  करणे....

देवाला “निवेदनीय” असे जे द्रव्य ते द्रव्य म्हणजे नैवेद्य होय. म्हणजे ईश्वराला अर्पण करता येण्यासारखी, त्याला देता येण्यासारखी खाद्य वस्तू, खाद्य पदार्थ म्हणजे नैवेद्य असे आपण म्हणू या. तंत्रसार या ग्रंथात पुढे दिल्याप्रमाणे नैवेद्य हा पाच प्रकारचा असावा किंवा असू शकतो. त्यात म्हंटले आहे की “जे निवेदनीय असेल ते प्रशस्त आणि पवित्र असावे.  ते भक्षणाला योग्य असावे आणि पाच प्रकारचे असावे.  त्यालाच “नैवेद्य” म्हणतात. 

१) भक्ष्य- गिळता येण्यासारखे, 

२) भोज्य- चावून खाता येईल असे, 

३) लेह्य- चाटता येईल असे, 

४) पेय- पिता येईल असे आणि 

५) चुष्य- चोखता येईल .....

असे ते पाच प्रकार आहेत. 

असा हा पंचविध नैवेद्य देवाची पूजा करून त्याला समर्पावा.” 

*तंत्रासारातील मूळ श्लोक पुढील प्रमाणे-*

निवेदनीय यद द्रव्यं, प्रशस्तं प्रयतं तथा | 

तद भक्ष्यार्हम पंचविधं नैवेद्यमिति कथ्यते |

भक्ष्यं, भोज्यं च लेह्यं च, पेयं चुष्यं च पंचमम | 

सर्वत्र चैतनैवेद्यमाराध्यास्यै निवेदयेत ||

  • विष्णूला दुधभात, 
  • शिवाला दहीभात, 
  • गणपतीला मोदक अथवा गूळखोबरे, 
  • सूर्याला गूळभात आणि 
  • देवीला सांजा [तिखट सांजा नाही. गोडाचा सांजा म्हणजेच शिरा. - पहा सांज्याच्या साटोऱ्या ] किंवा श्रीखंड प्रिय आहे. दुध आणि फळे सर्व देवांना प्रिय आहेत.

नैवेद्य दाखवताना देवापुढे चौकोनी मंडळ करून त्यात पुन्हा X असे चिन्ह करून मग त्याच्या वर नैवेद्याचे ताट, भांडे, पात्र ठेऊन मग नैवेद्य दाखवावा. 

या पात्रावर तुलसीपत्र ठेऊन मगच तो नैवेद्य देवाला अर्पण करावा. 

तुलसीपत्र ठेवले की माझा यावरचा अधिकार संपला आहे आणि आता हे पूर्णत: तुझे आहे हा भाव व्यक्त होतो आणि आपला अधिकार संपतो. 

सोने, रूपे, तांबे, दगड, कमलपत्र आणि यज्ञीय लाकूड यापैकी एका पात्रात ठेऊन नैवेद्य दाखवावा असे सांगितले गेलेले आहे. 

नैवेद्य देवाच्या उजव्या हाताला ठेवावा. 

डाव्या हाताला ठेवल्यास तो अभक्ष्य म्हणजे खाण्यास अयोग्य होतो. 

तुलसीपत्र, दुर्वा किंवा पुष्प यांनी नैवेद्याचे प्रोक्षण करावे. 

म्हणजे यांनी नैवेद्यावर पाणी शिंपडावे म्हणजे नैवेद्य शुद्ध आणि दाखवण्यास, अर्पण करण्यास योग्य होतो.

मग नैवेद्याचे पात्रा भोवती डावीकडून उजवी कडे असे आपल्या उजव्या हाताने पाणी सोडत मंडल करत यावे. 

नंतर “प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा” असे म्हणत म्हणत नैवेद्याचा घास देवाच्या मुखाकडे न्यावा. 

त्यावेळी आपला दावा हात आपल्या हृदया जवळ असावा, मान झुकलेली असावी. 

असे करून झाले की “मध्ये पानीयं समर्पयामि” असे म्हणून उदक द्यावे.

म्हणजे पाणी द्यावे म्हणजे पाणी जवळ न्यावे अथवा ताम्हनात सोडावे. 

मग पुन्हा वरचा हा स्वाहा मंत्र म्हणत म्हणत ज्या देवतेला तो नैवेद्य दाखवायचा असेल त्या देवतेचे नाव घेत { इथे विशिष्ट देवतेचे नाव घेत नसल्याने मी “अमुकदेवताभ्यो” म्हणत आहे} “अमुकदेवताभ्यो नम: नैवेद्यं समर्पयामि” असे म्हणावे आणि ताम्हनात उदक सोडावे.

[ उदक म्हणजे पाणी] महानैवेद्य हा पुरण, वरण, पक्वान्न, भाज्या, कोशिंबिरी इत्यादी षड्रस अन्नाचा असावा. 

नैवेद्य दाखवून झाल्यावर देवाची आरती करावी.

नैवेद्य दाखवून झाला की जो पदार्थ असेल त्याचे “प्रसादात” रुपांतर होते. 

त्यामुळे मी देवाला प्रसाद दाखवतो आहे असे म्हणता येत नाही तर मी देवाला नैवेद्य दाखवतो आणि तुला त्याचा “प्रसाद” देतो हे योग्य आहे.

देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर आपण तो लगेच स्वत:ही खाऊ नये आणि इतरांना लगेच वाटू सुद्धा नये. 

थोडावेळ तो देवापुढे तसाच ठेवा. हां, पण झुरळे, पाली, उंदीर, माशा, मुंग्या यांचा त्याला उपद्रव होत नाही ना हे पाहणे अगत्याचे आहे हे सांगायला नकोच.

आपल्याला जर प्रत्यक्ष नैवेद्य दाखवता येत नसेल तर आपण मानस पूजा करून त्यामध्ये आपल्याला हवा तो नैवेद्य प्रभूला अर्पण करू शकतो. 

आणि या मानस पूजेमध्ये प्रचंड शक्ती आहे. 

अगदी प्रत्यक्ष पूजेपेक्षाही. 

कारण आपण त्यावेळेला देवाशी पूर्णत: एकरूप होऊन जातो. 

मनाला प्रयत्न करून मानस पूजेचे चित्र रंगवावे लागते. 

आणि मनाला मग हळूहळू असा हा शांतीरूप आकार यायला लागतो. 

आणि मग आपले जीवनच पवित्र, सुगंधी बनून जाते. 

आपला देह हा देवाचे मंदिर होतो आणि आत आत्मा परमेश्वर आहे हे कळायला लागते

घरात गोमूत्र का शिंपडावे?

आपल्या हिंदू संस्कृतित गोमुत्राला महत्वाचे स्थान आहे. शुभ कार्यात अशुभ  काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पुजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमुत्र शिंपडले जाते. तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तू दोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो, अशी धारणा आहे.

सगळ्या परंपरांच्या मागे मनोवेज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशीही आहे. घर-परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र  शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे. जुन्या काळापासून गोमुत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे. शास्त्रात गाईला पूजनीय आणि पवित्र मानले आहे. गाईला माता असे संबांधले आहे. त्यामुळे गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. वास्तुनुसार गायीचे गोमूत्र घरातील सग़ळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते. गायीची पुजा केल्याने आपले पाप नष्ट होते, अशी धारणा आहे.

काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल, घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत. वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात. त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र का शिंपडावे? गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्रविकार बरे करता येतात. अन्नातून युरिया, कीटकनाशके शरीरात जातात. पाणी आणि हवेतूनही दूषित घटक रीरात जातात. त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात. गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे.

आता गोमुत्राचे फायदे लक्षाते घेतले पाहिजेत. यात घरातील वास्तूदोष मिटण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे. गोमुत्रामुळे वातावरणातील सुक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते. तर ज्या घरात गोमुत्र रोज शिंपडले जाते तिथे सगळ्या देव-देवतांचे कृपादृष्टी प्राप्त होते, अशी समजूत  आहे. गोमूत्र  शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही.

नामस्मरण

देवपूजेनंतर नामस्मरण करावे.

१) नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे, म्हणजे हृदयातील आत्मा साक्षीरूपाने प्रकटतो. हीच दिवाळी होय.  
२) नामस्मरण करण्याची वेळ झाली की अध्यात्मिक भूक जागी होते. ती वेळ सहसा टाळू नये. म्हणजे हळू हळू ती भूक जीवनाला व्यापून राहते. अखंड नामस्मरणाचे मर्म यात साठवले आहे. 
३) नामस्मरण चालू झाले की भगवंताचे (किंवा सद्गुरूचे) सान्निध्य भासले पाहिजे. ते लाभले नाही तर त्याची तीव्र खंत वाटली पाहिजे. 
४) नामस्मरण करता करता इंद्रियांची धडपड व धाव नकळत क्षीण होते; पण नामाची धारा चालते. हीच गुरुकृपेची प्रचीती होय. 
५) नामस्मरणाने भगवंत (अथवा सद्गुरू) जवळ आहे हा भरवसा नकळत निर्माण होतो. त्यामुळे डोळ्यांना जग तर दिसतेच पण त्याच्या पलीकडे देखील दिसते. 8
६) नामस्मरण मनात स्थिर झाले की देहाचा मधून मधून विसर पडतो. त्या विस्मरणाच्या अवस्थेमध्ये स्थलकालाचे भान उरत नाही. 
७) सद्गुरूकडून आलेले नाम भगवंताकडून आलेले असते. त्या नामानेच भगवंताचे दर्शन घडते. देहस्वभाव मुळापासून बदलणे हा त्या दर्शनाचा दृश्य परिणाम घडून येतो. 
८) नामस्मरणाने नकळत भगवंताचे (अथवा सद्गुरूचे) एक रूप मनात तयार होते. पुढे ते रूपच मनाला व्यापून राहते. नाम घेणारा मधून मधून त्या रूपाशी समरस होतो. 
९) नामस्मरणाचा अनुभव लवकर पाहिजे का? मग रोज रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत एकांतात बसून नामस्मरण करावे. देवाच्या दर्शनाशिवाय मला काही नको हा विचार घट्ट धरून ठेवावा. तेथे तल्लीनता आली की भगवंताचा प्रकाश झळकतो. 
१०) नामस्मरण करणा-याने एक नियम पाळावा. तो हा की, नाम घेण्याची उर्मी आली म्हणजे सारी कामे बाजूला सारावी आणि आसनस्थ होऊन नामस्मरण करावे. अशा उर्मीच्या पालनातूनच नामाची उर्मी हा स्वभाव बनतो. 
११) नामाच्या उर्मीला बाधक किंवा मारक तर्क, वातावरण किंवा व्यक्ती कुशलपणे बाजूला कराव्या, त्याने फारसे नुकसान होणार नाही; झाले तरी सद्गुरू भरून काढतील.
१२) नामाला नित्याचे मोजमाप असावे. पण नामाला आरंभ केल्यावर मनाला भगवंताच्या दर्शनात, पूजनात, संभाषणात व प्रार्थनेत गुंतून ठेवावे. अंतकाळी ही सवय अतिशय उपयोगी पडते. अंतकाळी जीव भगवंताला बरोबर घेऊनच जातो. 
१३) एक वर्ष मौन पाळून नामस्मरण केले, तर वाणी पवित्र होऊन वाचासिद्धी प्राप्त होते. 
१४) या जगात नामाशिवाय दुसरे काही सत्य नाही या भावनेने कायम मौन पाळून नामात राहणारा माणूस महापुरुष समजावा. त्याला हृदयातील अंगुष्टमात्र ज्योतीचे अखंड दर्शन घडते. 
१५) नामस्मरणाचा छंदच लावून घ्यावा. म्हणजे वायफळ व बाधक बोलण्याला अपोआप खंड पडतो. इंद्रियांची बाहेर धावण्याची धडपड नकळत क्षीण होते. म्हणजे मग आत नामाची धारा अनुभवास येते. 
१६) नामाचे अनुभव ज्याचे त्याला. ते सांगू नये हे खरे. पण नामस्मरण करणा-या माणसाची नामावरील श्रद्धा घट्ट व्हावी या शुद्ध हेतूने नामाचे अनुभव सांगायला सद्गुरू परवानगी देतात. म्हणून प्रचीती सांगण्याला दोष नाही. 
१७) थोड्या अभ्यासाने नामस्मरण पचनी पडते. नाम पचनी पडल्यावर मग नामस्मरण ही एक अध्यात्मिक प्रक्रिया माणसाच्या अंतर्यामी आरंभ पावते. 
१८) या प्रक्रियेच्या दोन खुणा आहेत. खूण पहिली- आतमध्ये चालणारे नाम मी घेत नसून ते एका निराळ्या शक्तीने चालते हे स्वच्छपणे कळते. दुसरी खूण- हृदयातील “मी” च्या असण्याची भावना (म्हणजेच अहंकार) क्षीण होत जाऊन त्याची जागा भगवंत (अथवा सद्गुरू) घेतात. अशा रीतीने भगवंत हृदयात अवतरतो. 
१९) ज्याच्या हृदयात सतत नाम घेणारा मी आहे आणि त्याच्या शेजारी भगवंत विराजमान आहे, तो पुरुष खरोखर धन्य होय. 
२०) नामस्मरण करता करता त्याचा नाद आत निनादू लागतो. तो अधिकाधिक सूक्ष्म होऊन स्थिरावतो. अखेर त्याचे पर्यवसान अनाहत नादामध्ये घडून येते. 
२१) नाम पचनी पडणे ही नामस्मरणाची पहिली पायरी आहे. या पायरीची खूण अशी- दिवसाच्या चोवीस तासात आपण देहाच्या आत बाहेर कितीतरी वेळा जातो येतो. ती आतबाहेर जाण्याची क्रिया नामाच्या संगतीत होऊ लागते. 
२२) नाम घेता घेता आजूबाजूच्या जगाची संवेदना लटकी पडू लागते. मग आत भरलेल्या जगाची कल्पना येते. 
२३) नामस्मरणाने आतील जगाचा लोप झाला की देह स्वभाव पालटतो. जीवनात एक ईश्वरकेंद्रित नवीन लय निर्माण होते. त्यामुळे जीवनाकडे समग्रपणे पाहण्याची कला साध्य होते. 
२४) नाम घेणारा एकदा का ईश्वरकेंद्रित झाला की मग भगवंताकडे लक्ष देण्याचा प्रश्न उरतच नाही. त्याच्याकडे लक्ष असो वा नसो, तो सतत दिसतच राहतो. 
२५) सामान्य माणूस नाम घेतल्यानंतर सद्गुरूंना न आवडणा-या व नामाला बाधणा-या गोष्टी करतो, त्यांचा परिणाम धुवून काढण्यास अखेर नामच उपयोगी पडते. 
२६) मौज अशी आहे की श्रीसद्गुरूंचे अंतर्याम नामाने काठोकाठ भरलेले असते. शिष्य नामस्मरण करता करता नामाने भरत जातो. तो जसजसा नामाने भरत जाईल, तसतसा तो गुरूच्या अंतर्यामाशी समरस होतो. म्हणून गुरूला आलेले सर्व अनुभव त्याला विनायास प्राप्त होतात. 
२७) नाम घेणा-याने तक्रार न करता प्रपंचात राहावे. त्याने चिकाटीने नामाचा अभ्यास करावा. गुरूला दया येते व तो ‘Special कृपा’ करून भगवंताची म्हणजे स्वस्वरूपाची गाठ घालून देतो. 
२८) कंटाळवाणेपणाने, नाराजीने, कष्टाने नामस्मरण करू नये. नाम सहज व प्रयत्नाशिवाय चालावे. नामाचे बंधन वाटू नये. नामातून आनंद निर्माण व्हावा. 
२९) ईश्वरातून ॐकार रूपी नामगंगा सूक्ष्मपणे प्रकटली. पुढे ती दृश्य जगाचे रूप घेऊन विलसू लागली. तसेच सद्गुरूने दिलेले नाम प्रथम एकेकपणे घ्यावे लागते. पुढे त्या नामांची माला बनते, नंतर त्यांची धारा होते. त्या नामधारेमध्ये डुंबणे म्हणजे मोठाच अनुभव असतो. त्या अनुभवत जो लीन होऊन राहतो, त्याला विलक्षण शांती लाभते. 

शंख पूजा कशी व का करावी

  • शंखाचा निमुळता चोचीसारखा / पन्हळीसारखा भाग उत्तर दिशेला करावा. 
  • शंख अर्थातच पोकळ बाजू वर करुन ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील. 
  • वाजण्याकरता तोंड फोडलेला शंख पाणी भरुन ठेवुनच्या देवपुजेकरता घेऊ नये. तो निव्वळ "शंखध्वनी" करताच वापरावा. 

त्याची पूजा करणे झाल्यास स्वतंत्र करावी. शंखाला हळदकुंकू वहात नाहीत, तसेच गंधाक्षतफूल न वाहता, निव्वळ गंधफुल वहावे, शक्यतो पांढरे फूल वहावे.

पूर्वी गंध म्हणल्यावर, चंदनाचे उगाळून केलेले गंधच असायचे, हल्ली नसते. (वेळ अन ताकद कुणालाय उगाळत बसायची? शिवाय चंदनही किति महाग आहे?) तर हल्ली निरनिराळ्या रंगांची /मातीची गंधे मिळतात. त्यातिल शक्यतो पांढरे/वा पिवळट गंध वापरावे. कुंकू कालवून केलेले गंध शंखासाठी वापरू नये.

शंख पूजा चे फळ

साक्षात लक्ष्मीचा सहोदर असणार्‍या दक्षिणावर्ती शंखाची पूजा ज्या घरात होते, तेथे कायम मंगलमय वातावरण राहते.

देवपूजेपूर्वी शंखाची पूजा करण्याचा प्रघात आहे. देवपूजेकरिता लागणारे सर्व साहित्य शुद्ध करण्यासाठीदेखील शंखातील पाणी सिंचन केले जाते. दीर्घकाळ शंखात राहिलेले पाणी पूजेच्या समाप्तीनंतर विष्णूवर शिंपडल्यास त्या पाण्याच्या स्पर्शाने पूजकाच्या अंगाला चिकटलेली ब्रह्महत्येसारखी घोर पातकेसुद्धा नाहीशी होतात.

  • पांढाराशुभ्र, कांतिमान, गुळगुळीत असा दक्षिणावर्ती शंख ‘अष्टमी’ किंवा ‘चतुर्दशीस’ विधिवत पूजनाने आपल्या देव्हार्‍यात किंवा तिजोरीत स्थापन करावा. 
  • राज्य, धन, कीर्ती, आयुष्य, शत्रूवर जय, कोर्टकचेर्‍यांमध्ये यश, पती-पत्नी नातेसंबंध यापैकी अपेक्षित फलप्राप्तीकरिता दिवसाच्या विशिष्ट नियोजित प्रहरामध्ये शंखपूजन करण्यास सांगितले आहे.

‘ॐ सर्वतोभद्राय सर्वाभीष्टफलप्रदाय सर्वारिष्ट-दुष्ट-कष्ट-विषारथ कामितार्थप्रदाय शंखाय स्वाधिष्ठायकाय भास्करा क्ली श्रीं ?? क्रौं नम: स्वाहा।’

या प्रतिष्ठा मंत्राने शंखाची स्थापना करून पुढीलपैकी एका मंत्राचा १०८ वेळा स्फटिकाच्या माळेवर जप करावा. 

ॐ श्री लक्ष्मीसहोदराय नम:।, ॐ श्रीं पयोनिधी जाताय नम:।, ॐ श्रीं दक्षिणावर्तशंखाय नम:। 

  • शंखोदकाने अनेक व्याधी नाहीशा होतात, आयुर्वेदात अनेक व्याधींवर शंखभस्माचा उपयोग सांगितला आहे.
  • दक्षिणावर्ती शंख धान्य भांडारमध्ये ठेवल्याने धान्य, धन भांडारमध्ये ठेवल्याने धन, वस्त्र भांडारमध्ये ठेवल्याने वस्त्रांची कमतरता भासत नाही. 
  • शयन कक्षामध्ये (झोपण्याच्या खोलीत) ठेवल्यास शांततेचा अनुभव होतो.
  • यामध्ये शुद्ध, पवित्र पाणी भरून व्यक्ती, वस्तूवर शिंपडल्याने दुर्भाग्य, अभिशाप, तंत्र-मंत्र इत्यादींचा प्रभाव समाप्त होतो. कोणत्याही प्रकारचे वाईट तांत्रिक प्रयोग या शंखाच्या प्रभावासमोर निष्फळ होतात.
  • दक्षिणावर्ती शंख असेलेल्या ठिकाणी धनाची कमतरता राहत नाही. 
  • दक्षिणावर्ती शंख घरामध्ये ठेवल्याने सर्व प्रकारची नकारात्मक उर्जा स्वतः नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?

गणपति हा दहा दिशांचा स्वामी आहे. त्याच्या अनुमतीविना इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते; म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतीचे पूजन करतात. गणपति वाईट शक्तींना पाशाने बांधून ठेवत असल्याने त्याच्या पूजनामुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात. गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाशभाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।
याचा अर्थ आहे, वाकडी सोंड असलेला, मोठ्या देहाचा, कोटीसूर्याप्रमाणे कांती असलेला, अशा हे देवा, तू मला सर्वदा सर्व कार्यांत निर्विघ्न कर.

श्री गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे. गणपति हे श्री गणेशाचे एक नाव आहे. ‘गणपति’ हा शब्द ‘गण’ आणि ‘पति’ या दोन शब्दांनी बनला आहे. ‘गण’ याचा अर्थ पवित्रक. ‘पति’ म्हणजे पालन करणारा. गणपति सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणार्‍या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो, तसेच लवकर प्रसन्न होतो.

देवपूजेची फलप्राप्ती, देवाला काय दिले म्हणजे काय मिळते!

१) आवाहन केले = दर्शन लाभते
२) आसन = सुखासन मिळते
३) पाद्य (पाय धूणे) = यश प्राप्ती
४) अर्घ्य (सुगंधीत पाणी) = समाधान प्राप्ती
५) आचमन (गंगाजल) = आनंद मिळतो
६) स्नान घालणे = जिवनात सुख मिळते
७) पंचामृत दिले = माधुर्य व स्नेहप्राप्ती
८) अभिषेक केला = शांतता स्थैर्यप्राप्ती
९) वस्त्र=लाज राखली जाते, अपकीर्ती होत नाही.
१०) यज्ञोपवित (जानवे) = मोक्षप्राप्ती(भवसागरातून सुटका)
११) गंध = ज्ञानप्राप्ति
१२) फुले = सर्वसुखप्राप्ती
१३) हळद पिंजर = सौभाग्यप्राप्ती
१४) अलंकार = श्रीमंती प्राप्त होते
१५) धूप = कीर्ती प्राप्त होते
१६) दीपदान = ज्ञान व वैराग्यप्राप्ती
१७) नैवेद्य = अन्नाची चणचण कधीच भासत नाही
१८) आरती = प्रसन्नता प्राप्त होते
१९) प्रदक्षणा केली = स्वामित्व लाभते
२०) नमस्कार = विनयशिलता प्राप्त होते(वागण्यात)
२१) प्रार्थना = दुर्भाग्य बदलण्याचे सामर्थ्य प्राप्त होते 

परमेश्वराला सर्व उपचार मनापासुन समर्पण केले तर अहंकार मनात राहत नाही.

मंत्र पुष्पांजली
मंत्र पुष्पांजली 

१. मंत्रपुष्पांजली शब्दार्थ

मंत्रपुष्पांजली कुबेरला उद्देशून आहे. महाराष्ट्रात जास्त प्रचलित असलेली, आरति नंतर मंत्रपुष्पांजलीची प्रथा जाणीवपूर्वक आणली असावी. ही प्रथा कुणी, कशासाठी कधी सुरु केली हे प्रश्न अनुत्तरीच राहिले असले तरी, सर्वांसाठी सुशासित राज्याची प्रार्थना या मंत्रपुष्पांजलीतून व्यक्त होते. आपण मंत्रपुष्पांजलीची मूळ ऋचा आणि तिचा शब्दार्थ
पहाण्याचा प्रयत्न करु.

मूळ ऋचा -
यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् | ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा: |
(ऋग्वेद मंडल १. ऋचा१६४)

ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महे | स मे कामान्कामकामाय मह्यम् | कामेश्वरो वैश्रवणो ददातु | कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम: |
(तैत्तरीय आरण्यक अनुवाक ३१ मंत्र ६)

ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी | स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या
एकराळिति |
(ऐतरेय ब्राह्मण पंचिका कांड ११)

तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे | आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति |
(ऐतरेय ब्राह्मण पंचिका ८ कांड २९)

२. मंत्रपुष्पांजली शब्दार्थ 

देवांनी यज्ञाद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ व तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधि होते. जिथे पूर्वी देवता निवास करीत असत (स्वर्ग) ते स्थान, महानता, (गौरव) यज्ञ करुन साधकांनी प्राप्त करुन घेतले. आम्हाला सर्व काही अनुकूल (प्रसह्य) घडवून आणणा-या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आमचा नमस्कार असो. तो कामेश्वर कुबेर माझ्या सर्व कामना पूर्ण करो. आमचे राज्य सर्वार्थाने कल्याणकारी असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तूंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्ति, लोभ रहित असावे.अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी. आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असावे.समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्धवर्ष पर्यंत सुरक्षित राहो. याकारणास्तव अशा राजाच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवना साठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र, मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुत गणांनी परिवेष्टीत केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.

अर्चा

"द्रव्यरहित अर्चा कर्त्याचा नाश करिते, मंत्रहीन अर्चा ऋत्विजाचा नाश करिते, लक्षणहीन अर्चा स्त्रियेचा नाश करिते, यावरून लक्षणहीन अर्चेसारखा दुसरा शत्रु नाही. गायत्रीसहित ब्रह्मवेदाची स्थापना ब्राह्मणांनी करावी. सुखाची इच्छा करणार्या सर्व वर्णांनी विष्णूची स्थापना करावी." "मातृका, भैरव इत्यादि देवतांची स्थापना सर्वांनी करावी. शिवलिंगाची स्थापना संन्याशानेही करावी. पुराणप्रसिद्ध अशा प्राचीन लिंगाची पूजा स्त्रिया व अन्य यांनीही करावी. नवीन स्थापिलेल्या लिंगास स्त्रिया अथवा पतित यांनी स्पर्श करू नये." शिव इत्यादि देवतांची स्थापना करण्याचा अधिकार स्त्रिया अथवा पतित यास नाही. "मौजी न झालेला, स्त्रिया अथवा पतित यापैकी कोणीही विष्णु किंवा शिव यांस स्पर्श करील तर त्याला नरकवास भोगावा लागेल. पूर्वाभिमुख स्थिर मूर्तीची पूजा उत्तराभिमुख होऊन करावी. चल मूर्तीची पूजा पूर्वाभिमुख होऊन करावी. सोने, रुपे, तांबे अथवा मृत्तिका यांची मूर्ति करावी. अथवा पाषाण, धातु, मौक्तिक, कांसे व पितळ यापैकी कोणत्याही धातूची मूर्ति करावी. घरामध्ये पूजेसाठी मूर्ति करावयाची ती अंगुष्ठापासून एक वीत उंचीची करावी. एक वितीपेक्षा अधिक उंचीची मूर्ति करणे प्रशस्त नाही असे ज्ञाते सांगतात. मृत्तिका, काष्ठ, लाख, गोमेद मणि अथवा मेण यांची मूर्ति करावी असे कित्येक ग्रंथात सांगितले आहे. पाषाणमयी, दारुमयी, लौही, लेप्या (मृन्मयी) लेख्या (रंगाने काढलेली), वालुकामयी, मनोमयी व मणिमयी अशा आठ प्रकारच्या मुर्ति कराव्यात असे श्रीमद्भागवतात सांगितले आहे. लौही म्हणजे सौवर्णमयी. दारू (काष्ठ) घेणे ते मधुक (मोह) वृक्षाचेच घ्यावे. घरात पूजेला मूर्ति करणे ती सात अंगुळाहून अधिक-बारा अंगुळांइतक्या उंचीची करावी असे देवीपुराणात सांगितले आहे. "पूजा करणाराचे तप, पूजेचा भक्तिविशेष व मूर्तीचे सौंदर्य या तीन कारणांनी देवतेचे पूजाकाली सान्निध्य असते. मूर्ति, पट्ट व यंत्रे यांस नित्य स्नान घालू नये. पर्वणीच्या दिवशी किंवा मूर्ति मलिन झाल्या असता स्नान घालावे.

नित्यकर्म- भोजनविधि

अ) चौकोनी मंडल करुन त्यावर धुतलेलें पात्र ठेवावें व पंचमहायज्ञ करुन शेष राहिलेलें घृतासहित पात्रावर वाढलेलें अन्न आम्हांस निरंतर प्राप्त होवो असें म्हणून नमस्कार करावा व ग्रंथिरहित दर्भ पवित्र उजव्या हातांत घेऊन दोन्ही पायांनीं अथवा एका पायानें भूमीला स्पर्श करीत असतां व्याहृति व गायत्री या मंत्रांनीं पात्रावरील अन्नाचें अभिमंत्रन करावें आणि "सत्यंत्वर्तेन परिषिंचामि" ह्या मंत्रानें दिवसा व "ऋतंत्वासत्येन परिषिंचामि" ह्या मंत्रानें रात्रौ पात्राच्या भोंवतीं जलाचें सिंचन करावें. नंतर 
"अंतश्चरति भूतेषु गुहायां विश्वतोमुखः । त्वं यज्ञसत्वं वषट्कारस्त्वं विष्णुः पुरुषः परः ॥" हा मंत्र म्हणून पात्राच्या उजव्या बाजूस भूमीवर "भूपतये नमः भुवनपतये नमः" व "भूतानां पतये नमः" असें म्हणून तीन आहुती द्याव्या. 
अथवा "चित्राय०, चित्रगुप्ताय०, यमाय० यमधर्माय०, सर्वभूतेभ्य०" या मंत्रांनीं पांच आहुती द्याव्यात. 
अथवा व्यस्तसमस्त व्याहृति मंत्रांनीं चार आहुती द्याव्या. 
किंवा "धर्मराजाय०, चित्रगुप्ताय० अशा दोन आहुती द्याव्या. 
किंवा ’भूपत्यादि’ तीन आहुती व ’धर्मराजायनमः व चित्रगुप्तायनमः’

ह्या दोन आहुती मिळून पांच आहुती द्याव्या. नंतर हात, पाय व मुख हीं आर्द्र (भिजलेलीं) असतां आपोशनाकरितां हातांत उदक घ्यावें व "अन्नंब्रह्मरसो विष्णुर्भोक्ता०", "अहं वैश्वानरो भूत्वा०"
हे मंत्र म्हणून त्यांचा अर्थ मनांत आणावा व डाव्या हातानें पात्र धरुन "अमृतोपस्तरणमसि" असें म्हणून उदक प्राशन करावें. यावर मौन धारण करुन "ॐ प्राणायस्वाहा, ॐ अपानायस्वा०, ॐ व्यानायस्वा०, ॐ उदानायस्वा, ॐ समानायस्वा०, असें म्हणून प्रत्येक मंत्रानें एकेक अशा पांच घृतयुक्त किंवा दुग्धयुक्त आहुती सर्व अंगुलींनीं, सर्व ग्रास भक्षण करणार्या मुखांत हवन कराव्या. "ब्रह्मणेस्वाहा" ही सहावी आहुति कित्येक ग्रंथांत सांगितली आहे. प्राणाहुतीपर्यंत हातानें पात्र धरणें व मौन स्वीकारणें नित्य आहेत. प्राणाहुतीनंतर या दोन्ही गोष्टी ऐच्छिक आहेत. पूर्वाभिमुख किंवा पश्चिमाभिमुख भोजन करणें प्रशस्त आहे. दक्षिणाभिमुख भोजन करणें काम्य आहे. त्याचें फल यश. उत्तराभिमुख भोजन करणें निंद्य आहे. विदिशांस मुख करुन भोजन करणें निषिद्ध आहे. संपूर्ण ग्रासाचें भक्षण करीत असतां नियमित असे बत्तीस ग्रास अथवा यथेच्छ ग्रास भोजन करुन "अमृतापिधानमसि" असें म्हणून अर्धे उदक प्राशन करावें व बाकीचें शेष उदक भूमीवर टाकावें. नंतर हातांतील पवित्रकें टाकून तोंड व हात चांगले धुवावे तर्जनीनें तोंड धुवूं नये. कांहीं चुळा भरुन टाकल्यावर हात धुवावे. सोळा चुळी भरुन टाकल्यावर दोनदां आचमन करावें. पण भोजनगृहांत आचमन करुं नये. आचमन केल्याशिवाय मूत्रपुरीप कर्में करुं नये. उत्तरापोशन घेतल्याशिवाय उठल्यास स्नानावांचून शुद्धि नाहीं. हातांत पाणी घेऊन तें खालीं पाघळवावें व त्या पाण्यानें अंगुष्ठमात्रानें नेत्रांचें सिंचन करुन इष्ट देवतेचें स्मरण करावें. ओंजळीनें पाणी पिऊं नये. पळसाचा, दग्ध झालेला व लोखंडाच्या खिळ्यांचा पाट बसावयास घेऊं नये. बाल व वृद्ध यांना भोजन घातल्याशिवाय जेऊं नये. मांडीवर पाय चढवून, पायावर पाय ठेवून, पाय पसरुन अथवा विदिशेला तोंड करुन भोजन करुं नये. दुष्टाच्या पंक्तीला भोजन करुं नये. अग्निशून्य व पाकनिप्पत्तिशून्य गृहांत अथवा देवालयांत भोजन करुं नये. दिवस व रात्रि यांचे संध्यासमयीं व मध्य रात्रीं भोजन करुं नये. यज्ञोपवीत विरहित भोजन करुं नये. डाव्या हातानें भोजन करुं नये. आरंभीं मधुर पदार्थ मध्यें खारट व आंबट पदार्थ व शेवटीं कटु इत्यादि पदार्थांचें सेवन करावें. आरंभीं पातळ पदार्थ, मध्यें कठीण पदार्थ व शेवटीं पातळ पदार्थ यांचें सेवन करावें. संन्याशानें आठ ग्रास, गृहस्थाश्रमी पुरुषानें सोळा किंवा बत्तीस ग्रास, वानप्रस्थानें सोळा ग्रस व ब्रह्मचारी पुरुषानें यथेच्छ भोजन करावें. सर्व पदार्थांचा थोडा थोडा शेष ठेवून मग ते भक्षण करावे. पण तूप व दुधाचें पदार्थ निःशेष भक्षावेत. भोजनांत दूध, दहीं व मध हे पदार्थ सेवावेत. दिवसा व रात्रीं मिळून दोनच वेळ भोजन करावें. मध्यंतरीं तिसर्यादा भोजन करुं नये.

ब) "रविवार, पौर्णिमा व अमावस्या या दिवशीं रात्रीं भोजन करुं नये, चतुर्दशी व अष्टमी या दिवशीं दिवसा भोजन करुं नये, एकादशीचे दिवशीं अहोरात्र भोजन करुं नये. कारण या दिवशीं असें केलें असतां चांद्रायण करावें असें सांगितलें आहे. जो कोणी हातावर अन्न घेऊन भोजन करितो, जो कोणी उष्ण अन्न फुंकर घालून सेवितो व जो पसरलेल्या अंगुलींनीं भोजन करितो त्याचें ते भोजन गोमांसभक्षण केल्यासारखें होतें. अजीर्ण झालें असतां किंवा अतिशय भूक लागली असतां तत्काल भोजन करुं नये. ओलें वस्त्र नेसून, मस्तक ओलें ठेवून अथवा पायांवर हात ठेवून भोजन करुं नये. भक्षण करुन राहिलेला शेष ग्रास भक्षूं नये व पाणी पिऊन झाल्यावर भांडयांत राहिलेलें शेष पाणी पिऊं नये. शाक, मूल व फलें इत्यादि पदार्थ दांतांनीं तोडून खाऊं नये. उच्छिष्ट असतां तूप घेऊं नये. पायानें भांडयाला स्पर्श करुं नये. पाणी पीत असतां जर तोंडांतून पात्रांत पाणी पडेल तर तें पात्रांतील अन्न भक्षूं नये. असें अन्न भक्षण केल्यास चांद्रायण प्रायश्चित्त करावें. हाताच्या नखाचा स्पर्श झालेलें व डाव्या हातानें उचललेलें उदक प्राशन केलें असतां सुरापानासारखें आहे. एका पंक्तींत बसून ब्राह्मण भोजन करीत असतां पंक्तींतून जर एखादा उठेल किंवा उतरापोशन घेईल तर इतरांनीं शेष राहिलेलें अन्न भक्षूं नये. या प्रकरणीं उठणारा व भोजन करणारा या दोघांसही दोष आहे. गुरु असेल तर त्याला दोष नाहीं. लवण, (खारट) व्यंजन (चटण्या वगैरे), धृत, तेल (तेलकट), लेह्य (चाटून खाण्याचे), पेय (पिण्याचे), इत्यादि नाना प्रकारचे पदार्थ हातानें दिलेले भक्षण करुं नयेत. तांब्याच्या भांडयांत गाईचें दूध, कांस्याच्या भांडयांत नारळाचें पाणी व उंसाचा रस, गुळ मिसळलेलें दहीं व गुडयुक्त आलें हीं मद्यासारखीं आहेत. सैंधव व समुद्रांत उत्पन्न झालेल्या मिठाशिवाय दुसरें प्रत्यक्ष लवण भक्षण करणें व मृत्तिका भक्षण करणें गोमांसासारखें आहे. भोजन करीत असतां रजस्वला, कुत्रा व कोंबडा हे दृष्टीस पडतील तर तें अन्न टाकावें. भोजन करणाराचा गुदस्त्राव होईल तर त्यानें उपोषण करुन पंचगव्य घ्यावें. आपोशन घेतल्यावर प्राणाहुती घेण्यापूर्वी गुद्स्त्राव झाला तर स्नान करुन सहा प्राणायाम करावेत. भोजन करीत असतां अशौच प्राप्त होईल तर तोंडांतील घांस टाकून देऊन स्नान करावें. तोंडातील घांस भक्षिल्यास स्नान करुन उपवास करावा. सर्व अन्न भक्षण केल्यास त्रिरात्र उपोषण करावें. भोजन करित असतां विष्ठा इत्यादिकांचा स्पर्श झाल्यास स्नान करुन तीन प्राणायम करावे. पतित व रजस्वला यांचा शब्द ऐकून भोजन केलें असतां एक उपवास करावा किंवा स्नान करुन शंभर गायत्रीजप करावा. कलह, घरट, उखळ व मुसळ यांचा शब्द होत आहे तोंपर्यंत भोजन करुं नये. "आपल्या आप्त जनांच्या बरोबर सुद्धां एका पंक्तीला बसून ब्राह्मणांनीं भोजन करुं नये. कारण कोणाचें काय गुप्त पातक असेल तें कोणाला माहीत असणार? म्हणून शहाण्या पुरुषानें अग्नि, भस्म, स्तंभ, उदक, दरवाजा किंवा मार्ग यांतून कोणत्या तरी एका मार्गानें पंक्तिभेद करावा." केस, मुंग्या व माशा यासहित शिजलेले अन्न टाकूनच द्यावे. पाक झाल्यावर जर केस, मुंग्या, माशा व इतर किडे यांचा स्पर्श अन्नाला होईल अथवा अन्न जर गाय हुंगील तर ते शुद्ध करण्यासाठी उदक, भस्म अथवा मृत्तिका त्यावर टाकावी असे विज्ञानेश्वर म्हणतो.  रात्रीचे शिळे अन्न, रजस्वला, व पतित इत्यादिकांनी पाहिलेले अन्न, व कावळे इत्यादि पक्ष्यांचे उच्छिष्ट अन्न भोजन करण्यास अयोग्य आहे. पण तूप व तेल यात तळलेले मांडे, घीवर इत्यादि पदार्थ शिळे असले तरी ग्रहण करावेत. वासरू नसलेली गाय, व्याल्यास दहा दिवस झाले नसलेल्या गाई, म्हशी व शेळी, गर्भिणी, एकांत्रा आड दूध देणारी, जुळे विणारी, स्तनांतून नित्य दूध स्त्रवणारी, बकरी शिवाय द्विस्तनी, उंटीण, घोडी, रानातील हरिणी इत्यादि आणि एडकी यांचे दूध वर्ज्य आहे. शेवगा व हिंग खेरीज करून झाडाचा तांबडा चीक, विष्ठेच्या जागी उगवलेले माठ, तांदुळजा इत्यादि व देवादिकांच्या उद्देशावाचून केलेले मोहनभोग, पायस, अपूप, करंज्या व खिचडी आणि तिलमिश्र ओदन हे पदार्थ वर्ज्य करावे. ताग, कर्डई, दुध्या भोपळा, वांगे, कोरळ, वट इत्यादि फले व माहळुंगे भक्षण करू नयेत. कांदा, लसूण आणि गाजरे भक्षिली असता चांद्रायण करावे. भोजन करीत असता एकमेकांस स्पर्श झाला असता त्या अन्नाचा त्याग करावा. तसे न करिता पात्रातील अन्न भक्षिल्यास स्नान करून एकशे आठ गायत्रीजप करावा. पात्रातील अन्न भक्षून आणखी अन्न भक्षिल्यास स्नान करून हजार गायत्रीजप करावा. भोजन करीत असता अशुचि ब्राह्मणाचा स्पर्श झाल्यास अन्न टाकून द्यावे. भोजनोत्तर उच्छिष्टावस्थेत स्पर्श झाल्यास स्पर्श करणारा आपल्या वर्णातला असेल तर स्नान किंवा जप करावा; पण तो आपल्या वर्णातला नसेल तर उपवास करावा. भोजनोत्तर उच्छिष्टावस्थेत कुत्रा इत्यादिकांचा स्पर्श झाला तर उपोषण करून पंचगव्य प्राशन करावे.  पात्रावर पदार्थ वाढीत असता उच्छिष्टाचा स्पर्श झाला तर दूध, दही, घृत इत्यादि हलके पदार्थ टाकू नयेत. हातपाय धुवून आचमन केल्याने शुद्ध होतो. भक्ष्य व भोज्य अन्नाचा त्यागच करावा. वस्त्राविषयी विकल्प असे म्हणजे ते टाकावे किंवा टाकू नये. पात्र वाढीत असता स्त्री रजस्वला झाली तर तिचा स्पर्श झालेले अन्न टाकून द्यावे.

क) भोजन करीत असता दिवा विझला तर:-

भोजन करीत असता दिवा विझला तर भोजनपात्र हातात घेऊन सूर्याचे स्मरण करावे व पुनः दिवा लागला म्हणजे तो पाहून पानावरील अन्न भक्षावे; दुसरे अन्न भक्षू नये. श्राद्धदिन व श्राद्धदिनाच्या पूर्वीचा दिवस, व्यतीपात, वैधृति, व संक्रांत इत्यादि दिवशी रात्री भोजन करू नये. रात्रीचा चवथा व पहिला प्रहर विद्याभ्यासात घालवावा. मधल्या दोन प्रहरपर्यंत निद्रा करणारा ब्रह्मत्वाला योग्य होतो. पूर्व, पश्चिम किंवा दक्षिण यापैकी कोणत्याहि दिशेस उसे करून निजावे; उत्तरेस उसे करून कधीही निजू नये. रात्रिसूक्ताचा जप केल्यावर सुखशायीचे स्मरण करावे व विष्णूला नमस्कार करून निद्रा करावी. "अगस्ति, माधव, मुचुकुंद, महामुनि कपिल, अस्तिक हे पाच मुनि सुखशायी होत." निजतेवेळी यांचे स्मरण केल्यास निद्रा सुखकारक होते.