श्री रूद्र अभिषेक महत्त्व 

रुद्र
श्री रूद्र अभिषेक महत्त्व 

श्री महादेव रूद्राभिषेकाची महत्वपूर्ण माहिती 

कलीयुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच, आपल्या वास्तुतील दोष व कलह परिहार करण्यासाठी,
सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहिसे होऊन दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी, श्रीशिवाचे आशिर्वाद मिळविण्यासाठी आपल्याला ”रुद्र अभिषेक” हे प्रभावी अनुष्ठान आहे व रूद्राभिषेक अभिषेक आपल्या कुलदवी
अथवा श्री महादेवाला आपल्या घरीत वर्षातून एक तरी 
करावा अभिषेक करून अभिषेकाचे तीर्थ पुर्ण वास्तु मध्ये
शिपडावे. 

रुद्राभिषेकाचे महत्व

रुद्र ही एक वैदिक देवता आहे.
रुद्राचा अविष्कार हा ऋग्वेदापासून आहे, ऋग्वेदात रुद्राचे एकूण ७५ उल्लेख आहे ही देवता शंकरात नंतर विकसित झाली. रुद्र हा शब्द रोदीती अथवा रोदयति अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे. या देवतेचे वेद्पश्चात शंकर, शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे ते फार नंतरचे.
रुद्राचे मूलस्वरूप हे फार भीषण, हिंसक असे आहे, त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर, मला मारू नकोस, प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे.
रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे

म्हणून रुद्रसूक्त हे त्या भद्र रुपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नी स्वरुप आहे तसेच जल स्वरुप आहे. तो पंच महाभुतांचा अधिपति आहे. रुद्र हा नागर संस्कृतिच्या आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे.

रुद्रसूक्त हा यजुर्वेदाच्या तैतेरीय संहितेचा भाग आहे. आपल्या समाजात रुद्र सूक्ताच्या पठाणाची एकादशणी आणि लघुरुद्र ही दोन रूपे जास्त प्रचलित आहेत. याचीच विस्तरीत आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र होत. एकादशणी मध्ये रुद्र्सुक्ताच्या ११ आवृत्या करायची पद्धत आहे आणि पुढील रुपात आवर्तनाची संख्या ११ च्या पटीत वाढत जाते. लघुरुद्र करताना १२१ आवर्तने होणे आवश्यक असते म्हणून ११ पुरोहित असतात. ११ पुरोहित ११ वेळा पाठ करतात. रुद्र्सुक्तात रुद्राची १०० नावे आहेत म्हणून या सुक्ताला शतरुद्रीय असेही म्हणतात. 
श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात

रुद्र्सुक्ताचे दोन भाग आहेत:
१] अकरा नमके ज्यात रुद्राच्या नावामागे वंदन असो याअर्थी "नमः" असे पद येते. नमकात आधी देवतेची स्तुती केली जाते आणि त्या स्तुतीने ते अकरा रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्ध येतो.

२] अकरा चमके म्हणजे ज्यात "च मे" हे शब्द आहेत ज्याचा अर्थ हे मला हवे अथवा मला हे दे. चमकामध्ये स्तोत्रपठण करणारा किंवा करविणारा मग त्या रुद्रांकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागतो.
चमक आणि नमक ही नावे पुराणकाळात रूढ झाली, त्याचा व्याकरणाशी संबंध नाही.

याशिवाय रुद्रसुक्ताचा भाग नसलेला "ओम शान्तिः शान्तिः शान्तिः" हा शांतीमंत्र सुरुवातीला आणि शेवटी म्हणतात. घरात सर्वसाधारणपणे होम करतात आणि होमाला या सूत्राच्या आवर्तनाची जोड दिली जाते. ११ रुद्र असल्याने ११ या संख्येला महत्व आहे असे दिसते. सर्वसाधारणपणे लघुरुद्राला ११ ब्राह्मण असतात. 
एक ब्राह्मण एक नामक मोठ्याने म्हणतो आणि बाकीचे मनात म्हणतात, अश्या रीतीने नमकाची ११ आवर्तने झाली असे मानतात. ११ वेळा नमके झाली की एकदा चमकाचा पाठ केलाजातो. आपल्याकडे एक फार चुकीची समजूत आहे की श्लोकाचा अर्थ समजावून घेऊन पठण केले तर फळ कमी मिळते त्यामुळे बरेच याज्ञिकी करणारे अर्थ न समजता नुसताच मौखिक पाठ करतात.

यजुर्वेदकाळातही चोर, डाकू, दरोडेखोर होते आणि त्यांचे नियंत्रण त्यांच्यापासून संरक्षण करणे हे काम रुद्राला दिले आहे, फसविणाऱ्या, लबाड लोकांचे, तलवारी घेऊन हत्या करणाऱ्या चोराचे, वाटमाऱ्याचे इत्यादीचे पालकत्व रुद्राला दिले आहे. [नमक ३]

तसेच मर्दानी, घाव घालणाऱ्या स्त्रियांचे, विषयलंपट, टोळ्या आणि त्यांचे पुढारी, भूत आणि इतर गणांचा अधिपती ज्याचे अक्राळ विक्राळ आणि नानारुपधारी असे अनुयायी आहेत, कुंभार, लोहार, पारधी, कोळी, शिकारी इ. चा नायक अशीही स्तुती आहे. [नमक ४]

सृष्टीवर पूर्ण प्रभुत्व असणारा, वाळवांटात, बर्फात, धुळीत, खडकात, जमिनीवर आणि हिरवळीवर असणारा अशी पण स्तुती आहे [नमक ९]

त्याचे फार मोठे सैन्य आहे, आणि आळवणी जी केली जात आहे ती अश्या या सामर्थ्यवान देवाने आपल्याला त्रास देणार्या शक्तींपासून आपले रक्षण करावे, कृपा करावी म्हणून हे सुक्त आहे.

आता भक्त ज्या वस्तू त्या काळास अनुसरून मागतो आहे ती यादी बरीच लंबीचौडी आहे आणि एकदा नजरेखालून घालण्यासारखी आहे. त्यात तांदूळ, सातू, मका, उडीद, तील, मूग, हरभरे इ. इ. धान्य मागितली जात आहेत. सोने, लोखंड, शिसे, बीड, जस्त, कथील हे धातू मागितले जात आहेत. यावरून आपल्या पूर्वजांना हे धातू वेदकाळात माहिती होते हे सिद्ध होते. पूजेचे सामान, यज्ञाचे सामान मागतो आहे. सुक्तपठनकर्ता दूध, तूप, मध इ. मागतो आहे. दीर्घायुष्य, औषधे, सुंदर कांती, धनसंपदा, शेती हे पण मागतो आहे. तसेच आयुष्य, प्राण, अपान, चक्षु, कान, मन वाणी, आत्मा इत्यादींची पुष्टी मागतो आहे.

तसेच विषम संख्याची भाजणी, चारच्या पाढ्याची भाजणी हे मांडून याच्या पटीत सौख्य मागतो आहे. त्यावरून त्याकाळचे गणिताचे ज्ञान दिसते.

रुद्र्सुक्तात मागितलेल्या सर्व गोष्टी या ऐहिक जीवनात उपयोगी पडणाऱ्या आहेत, पारमार्थिक नाही. सुक्तकार हा धनधान्य, घरदार, बायकामुले, गुरेढोरे, शेती इ. सगळ्या गोष्टी मागतो आहे, द्युतासारखी क्रीडाही मागतो आहे. सुक्तकाराच्या पारलौकिक मागण्या या स्वर्गापर्यंत सीमित आहेत. रुद्राचे भयंकर सामर्थ्य आणि सैन्य हे आपल्या शत्रूवर वापरले जावे ही इच्छा तो व्यक्त करत आहे.

हा एक रुद्राचा साधासुधा भक्त आहे ज्याला जनावरे, रान, शत्रू, चोर, दरोडेखोर आणि रुद्रासारखे भीषण दैवत यांची भीती आहे. हे सुक्त हे रुद्राशी बोलणे आहे, ज्यात सुक्तकार आधी स्तुती, आळवणी करून मग आपल्याला काय पाहिजे त्याची यादी देत आहे. हा रुद्र्सुक्तातला लपवालपवी न करणारा साधेपणा फार लोभस आहे. रुद्रसुक्ताचे पठण हा एक अनुभव आहे जेंव्हा उपस्थित ब्रह्मवृंद जर तयारीचा असेल आणि त्यांनी सूर बरोबर लावला असेल तर घनगंभीर आवाजात हे सूत्र जरी बव्हंशी गद्य असले तरी कोसळत येते. त्यात होम, सोवळे आणि इतर वातवरण निर्मिती जर व्यवस्थित असली तर त्यानंतर कुठेतरी दैवी अनुभव येतो.

या सूक्ताचे पठन करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत, त्यामध्ये एकादशीनी, लघुरूद्र, महारुद्र, अतिरुद्र इत्यादि प्रयोग आहेत. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात.

अभिषेक
अभिषेक 

अभिषेक :

अभिषेकाचा अर्थ असतो स्नान करणे किंवा करविने. रुद्र अभिषेक पंचामृत पूजा मंत्र उच्चारणा बरोबर देवाला अर्पण करतात, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रद्र अभिषेकामुळे समृद्धी होते. सर्व इच्छा पूर्ण होण्याची ताकद मिळते, जीवनात आनंद प्राप्त होतो.

श्री शंकराचे विविध संख्यावाचक अभिषेक 
रुद्र एकादशिनी अभिषेक :- (रुद्र -एकादशिनी ) - ११ आवर्तने
लघुरुद्र अभिषेक :- (लघुरुद्र ) -१२१ आवर्तने
महारुद्र अभिषेक:- (महारुद्र) - १३३१ आवर्तने
अतिरुद्र अभिषेक :- (अतीरुद्र) - १४६४१ आवर्तने
(नोट:- हे विधान आपल्या वास्तु मध्ये करावे)

श्री गुरूचरित्रा मध्ये रूद्र अभिषेकाचे महत्त्व सांगितले आहे 
आ. ३४ नुसार पुढील प्रमाणे,

श्री गुरुनृसिंहसरस्वती त्या ब्राम्हण पतिपत्नीला म्हणाले, "पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्षमहिमा सांगून त्याच्या पुत्राचे व प्रधानपुत्राचे पूर्वजन्माचे चरित्र सविस्तर सांगितले. ते ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. पराशारांच्या चरणांवर लोटांगण घालून तो म्हणाला, "मुनिवर्य, माझ्या पुत्राचा पूर्वजन्मवृत्तांत तुम्ही सांगितलात. गतजन्मी माझा पुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक हे दोघे कुक्कुट-मर्कट होते. त्या गणिकेने त्या दोघांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. त्या केवळ अजाणतेपणे घडलेल्या पुण्याईने या जन्मी ते आमचे पुत्र झाले आहेत. मुनिवर्य, आपण त्रिकालज्ञानी आहात, सर्वत्र आहात, तेव्हा माझ्या एकुलत्या एका पुत्राचे भविष्य सांगा. माझ्या पुत्राला किती आयुष्य आहे ते सांगण्याची कृपा करावी.
राजाने असे विचारले असता पराशरांनी क्षणभर मौन धारण केले, थोडा विचार केला. मग ते राजाला म्हणाले, "राजा, मी आता जे सांगतो ते अत्यंत कटू असले तरी सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व दुःखसागरात बुडून जाल, याची कल्पना आहे; परंतु सत्य काय आहे ते सांगितले पाहिजे. नाहीतर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल, माझ्या साधनेला दोष लागेल. तुझी ऐकण्याची तयारी आहे ना ?" राजा म्हणाला, "भावी घटनांची कल्पना आली तर काहीतरी उपाय करून अनिष्ट असेल ते टाळता येईल अशा आशेने मी विचारीत आहे. जे असेल ते सांगा." पराशर म्हणाले, "मग ऐक तर ! तुझा हा मुलगा अल्पायुषी आहे. तुझ्या पुत्राला बारा वर्षे झाली आहेत. आजपासून सातव्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल." पराशारांचे हे शब्द भद्र्सेनाला वज्रघातासारखे वाटले. तो एका-एकी बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडबडा लोळत शोक करू लागला. तो पराशारांचे पाय पाय धरून विनवण्या करू लागला, "मुनिवर्य, मला या दुःखापासून वाचवा. काहीही करून माझ्या मुलाचा अकाली मृत्यू टाळा."
राजाचा तो शोक पाहून पराशारांना त्याची दया आली. ते भद्र्सेनाला समजावीत म्हणाले, "राजा, असा धीर सोडू नकोस. या संकटावर मात करायची असेल, तर त्या शूलपाणि शिवशंकराला शरण जा.त्याची आराधना कर. त्या शिवाच्याच इच्छेने ही सृष्टी निर्माण झाली. ब्रम्हदेवांनी विश्व निर्माण करावे यासाठी स्वतःच शंकरांनी ब्रम्हदेवाला चारी वेदांचा उपदेश केला. या चारी वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय, हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे.असे स्वतःच शंकरांनीच सांगितले आहे. त्या शंकराच्या आराधनेचा उत्तम उपाय म्हणजे रुद्रध्यायी प्रार्थनेचा सतत पाठ करणे. या रुद्रध्यायाचे जे कोणी भक्तिभावाने, परमश्रद्धेने श्रवण-पठण करतील त्यांच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातील. हा रुद्राध्याय शंकरांनी ब्रम्हदेवांना सांगितला. ब्रम्हदेवांनी इतर ऋषींच्या मुखाने पृथ्वीवर आणला. त्या शतरुद्रियापेक्षा श्रेष्ठ मंत्र दुसरा नाही. सर्व पापे, अपमृत्यू आणि दुरिते नष्ट करणारा व चारी पुरुषार्थ प्राप्त करून देणारा हा रुद्राध्याय मंत्र आहे. कामक्रोधादी विकारांपासून घडणारी सर्वप्रकारची पापे रुद्राध्यायाच्या प्रभावाने नष्ट होतात. रुद्राचा पाठ करणाऱ्याच्या समोर येण्याससुद्धा यमदूत घाबरतात.
मात्र हा रुद्राचा जप, गर्वाने, उभे राहून, निजून, अपवित्रपणे श्रद्धेशिवाय करू नये. रुद्राभिषेकाचे जल जे तीर्थ म्हणून प्राशन करतात त्यांना पापे शिवत नाहीत.रुद्र म्हणून शिवपूजन करणारा शतायुषी होतो. मी तुला एक उपाय सांगतो, तो केल्यास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल. गंडांतर टळेल. यासाठी भगवान शंकरांवर दहा हजार रुद्रावर्तनांनी अभिषेक कर, शंभर घटांची स्थापना कर. त्यात दिव्यवृक्षांची पाने ठेव व ते जल अभिमंत्रित करून त्याने मुलावर सिंचन कर. नित्य दहा हजार रुद्रावर्तने कर. त्याला तीर्थ प्राशन करू दे म्हणजे तुझा मुलगा दहा हजार वर्षे जगेल."
पराशरांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राम्हणांना बोलावून रुद्रानुष्ठान सुरु केले. शंकरावर अभिषेक सुरु केला. त्या अभिषेक जलाने राजपुत्राला स्नान घातले. हे रुद्रानुष्ठान अखंड सात दिवस चालू होते. सातव्या दिवशी राजपुत्र अचानक बेशुध्द पडला. ते पाहताच पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले. ब्राम्हणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्याच्यावर टाकल्या. त्यावेळी सूक्ष्मरूपाने तेथे आलेले यमदूत राजपुत्राच्या जवळ येऊ शकले नाहीत. त्यांनी यमपाश टाकून प्राण खेचण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यावेळी दंडधारी शिवदूत तेथे आले. त्यांनी यमदूतांना झोडपून काढून पळवून लावले. त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आला. ते पाहून भद्रसेनच्या डोळ्यांतून आनादाश्रू वाहू लागले. पराशारांना आनंद झाला. ते राजाला म्हणाले, "राजा, आपण जिंकलो. तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे गंडांतर गेले. " मग त्यांनी सुधार्माला विचारले, "बाळा, जे काही झाले त्यातले तुला काही आठवते का ? " सुधर्म म्हणाला, "एक महाभयंकर काळपुरुष मला पकडून नेण्याच्या बेतात होता. त्याचवेळी चार दिव्य पुरुष धावत आले. ते दोघेही शिवशंकरासारखे दिसत होते. त्यांनी त्या काळपुरुषापासून माझी सुटका केली." हे ऐकताच राजा भद्रसेन भगवान शंकरांचा जयजयकार करू लागला.
नगरात सगळीकडे आनंदोत्सव सुरु झाला. राजाने भरपूर दानधर्म केला. सर्व ब्राम्हणांना भोजन व दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पराशारांना महासनावर बसवून त्यांचा मोठा सन्मान केला. त्याचवेळी नारदमुनी तेथे आले. राजाने त्यांचा सन्मान करून विचारले. "मुनिवर्य, आपण अवघ्या त्रैलोक्यात संचार करता, तेव्हा आपणास काही अपूर्व असे आढळले का ?"
नारदमुनी म्हणाले, "मी कैलासलोकी गेलो होतो. त्यावेळी यम वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता. "माझ्या दूतांना शिवदूतांनी पिटाळून का लावले ?" असे यमाने विचारले असता वीरभद्र त्याला म्हणाला, "तू भद्रसेनच्या मुलाला कोणाच्या आज्ञेने नेत होतास ? त्याला दहा हजार वर्षांचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे. हे तुला माहित नाही का ? तू आपल्या मर्यादा का सोडल्यास ? चित्रगुप्ताकडे काय नोंद आहे ती पहा. " मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला , तेव्हा चित्रगुप्त सुधर्माची पत्रिका पाहून म्हणाला, 'येथे या राजपुत्राला बारा वर्षे आयुष्य आहे असे लिहिले आहे हे खरे. मोठेच गंडांतर आहे, पण नंतर तेथेच 'मोठ्या पुण्याईने व रुद्रानुष्ठानाने ते गंडांतर चुकवून हा दहा हजार वर्षे राज्य करील असे लिहिले आहे." हे ऐकताच यम वीरभद्राला नमस्कार करून निघून गेला. या पराशरांच्या सामर्थ्याने व रुद्रानुष्ठानाने तुझ्या पुत्राने मृत्यूलाही किंकले आहे." असे सांगून नारदमुनी 'नारायण नारायण' म्हणत आकाशमार्गाने निघून गेले. पराशरांनीही राजाचा निरोप घेतला.
त्या ब्राम्हण पतिपत्नीला हि कथा सांगून श्रीगुरू नृसिंहसरस्वती म्हणाले, "रुद्रानुष्ठानाचे व रुद्राक्ष धारण केल्याचे माहात्म्य असे मोठे अद्भुत आहे. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, म्हणून तर श्रीगुरुंचे रुद्रावर फार प्रेम आहे. श्रीगुरू रुद्रस्वरूप आहेत म्हणून रुद्रध्यायाने त्यांची पूजा करावी."
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'रुद्राध्याय माहात्म्य' नावाचा अध्याय चौतिसावा समाप्त असे महत्त्व रूद्राभिषेका चे आहेत.

लघुरुद्र आणि अतिरुद्र 

अनेक ठिकाणी शंकराच्या देवळांतून लघुरुद्र केलें जातात व अभिषेक केलें जातात. अभिषेक हे प्रतिक आहे. अभिषेक पात्रातून पाण्याची धार जशी सतत परमेश्वरावर पडत असते, तसे आपले मन सतत परमेश्वरचरणी असले पाहिजे.
रुद्र हे शंकराचे एक स्तोत्र आहे. ते अकरा वेळा म्हटले की एक एकदष्णी होते. अकरा एकदष्णीचा एक लघुरुद्र. अकरा लघुरुद्रांचा एक महारुद्र आणि अकरा महारुद्र केलें की एक अतिरुद्र होतो.
अशा प्रकारे अभिषेक करणे ही अभिषेक भक्तीची, उपासनेची एक पद्धत आहे.

ॐ नमः शिवायेति बीजम् ।
ॐ शिवतरायेति शक्तिः ।
ॐ महादेवायेति कीलकम् ।
श्री सांबसदाशिव प्रसादसिद्ध्यर्थे जपे विनियोगः ॥

रुद्र ही एक वैदिक देवता आहे. रुद्राचा अविष्कार हा ऋग्वेदापासून आहे, ऋग्वेदात रुद्राचे एकूण ७५ उल्लेख आहे ही देवता शंकरात नंतर विकसित झाली.
रुद्र हा शब्द रोदीती अथवा रोदयति अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे. या देवतेचे वेद-पश्चात शंकर, शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे, ते फार नंतरचे. रुद्राचे मूळ स्वरूप हे फार भीषण, हिंसक असे आहे, त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर, मला मारू नकोस, प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे.
रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे म्हणून रुद्रसूक्त हे त्या भद्र रुपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नी स्वरुप आहे तसेच जल स्वरुप आहे. तो पंच महाभुतांचा अधिपति आहे. रुद्र हा नागर संस्कृतिच्या आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे.
रुद्रसूक्त हा यजुर्वेदाच्या तैतेरीय संहितेचा भाग आहे. आपल्या समाजात रुद्र सूक्ताच्या पठाणाची एकादशणी आणि लघुरुद्र ही दोन रूपे जास्त प्रचलित आहेत. याचीच विस्तरीत आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र होत. एकादशणी मध्ये रुद्र्सुक्ताच्या ११ आवृत्या करायची पद्धत आहे आणि पुढील रुपात आवर्तनाची संख्या ११ च्या पटीत वाढत जाते. लघुरुद्र करताना १२१ आवर्तने होणे आवश्यक असते म्हणून ११ पुरोहित असतात. ११ पुरोहित ११ वेळा पाठ करतात. रुद्र-सुक्तात रुद्राची १०० नावे आहेत म्हणून या सुक्ताला शतरुद्रीय असेही म्हणतात. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात. रुद्र्सुक्ताचे दोन भाग आहेत:

१)अकरा नमके ज्यात रुद्राच्या नावामागे वंदन असो याअर्थी “नमः”असे पद येते. नमकात आधी देवतेची स्तुती केली जाते आणि त्या स्तुतीने ते अकरा रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्ध येतो.
 २) अकरा चमके म्हणजे ज्यात “च मे” हे शब्द आहेत ज्याचा अर्थ “हे मला हवे अथवा मला हे दे”. चमकामध्ये स्तोत्रपठण करणारा किंवा करविणारा मग त्या रुद्रांकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागतो. चमक आणि नमक ही नावे पुराणकाळात रूढ झाली, त्याचा व्याकरणाशी संबंध नाही.

याशिवाय रुद्रसुक्ताचा भाग नसलेला “ओम शान्तिः शान्तिः शान्तिः” हा शांतीमंत्र सुरुवातीला आणि शेवटी म्हणतात. घरात सर्वसाधारणपणे होम करतात आणि होमाला या सूत्राच्या आवर्तनाची जोड दिली जाते. ११ रुद्र असल्याने ११ या संख्येला महत्व आहे. सर्वसाधारणपणे लघुरुद्राला ११ ब्राह्मण असतात (अर्थात हे आवश्यक नाही पण तसा रिवाज आहे) एक ब्राह्मण एक नमक मोठ्याने म्हणतो आणि बाकीचे मनात म्हणतात, अर्थात हि तजवीजाच, खरे तर सर्वांनी मोठ्याने म्हंटले तर त्याचा प्रभाव जास्त. अश्या रीतीने नमकाची ११ आवर्तने झाली असे मानतात. ११ वेळा नमके झाली की एकदा चमकाचा पाठ केला जातो.
आपल्याकडे एक फार चुकीची समजूत आहे की श्लोकाचा अर्थ समजावून घेऊन पठण केले तर फळ कमी मिळते त्यामुळे बरेच याज्ञिकी करणारे अर्थ न समजता नुसताच मौखिक पाठ करतात. जे  चुकीचे आहे.
यजुर्वेदकाळातही चोर, डाकू, दरोडेखोर होते आणि त्यांचे नियंत्रण / त्यांच्यापासून संरक्षण करणे हे काम रुद्राला दिले आहे, फसविणाऱ्या, लबाड लोकांचे, तलवारी घेऊन हत्या करणाऱ्या चोराचे, वाटमाऱ्याचे इत्यादीचे पालकत्व रुद्राला दिले आहे. (नमक ३)
तसेच मर्दानी, घाव घालणाऱ्या स्त्रियांचे, विषयलंपट, टोळ्या आणि त्यांचे पुढारी, भूत आणि इतर गणांचा अधिपती ज्याचे अक्राळ विक्राळ आणि नानारुपधारी असे अनुयायी आहेत, कुंभार, लोहार, पारधी, कोळी, शिकारी इ. चा नायक अशीही स्तुती आहे. (नमक ४)
सृष्टीवर पूर्ण प्रभुत्व असणारा, वाळवांटात, बर्फात, धुळीत, खडकात, जमिनीवर आणि हिरवळीवर असणारा अशी पण स्तुती आहे (नमक ९)
त्याचे फार मोठे सैन्य आहे, आणि आळवणी जी केली जात आहे ती अश्या या सामर्थ्यवान देवाने आपल्याला त्रास देणाऱ्या शक्तींपासून आपले रक्षण करावे, कृपा करावी म्हणून हे सुक्त आहे.
आता भक्त ज्या वस्तू त्या काळास अनुसरून मागतो आहे ती यादी बरीच लंबीचौडी आहे आणि एकदा नजरेखालून घालण्यासारखी आहे. त्यात तांदूळ, सातू, मका, उडीद, तील, मूग, हरभरे इ.इ. धान्य मागितली जात आहेत. सोने, लोखंड, शिसे, बीड, जस्त, कथील हे धातू मागितले जात आहेत. यावरून आपल्या पूर्वजांना हे धातू वेदकाळात माहिती होते हे सिद्ध होते. पूजेचे सामान, यज्ञाचे सामान मागतो आहे. सुक्तपठनकर्ता दूध, तूप, मध इ. मागतो आहे. दीर्घायुष्य, औषधे, सुंदर कांती, धनसंपदा, शेती हे पण मागतो आहे. तसेच आयुष्य, प्राण, अपान, चक्षु, कान, मन, वाणी, आत्मा इत्यादींची पुष्टी मागतो आहे.
तसेच विषम संख्याची भाजणी, चारच्या पाढ्याची भाजणी हे मांडून याच्या पटीत सौख्य मागतो आहे. त्यावरून त्याकाळचे गणिताचे ज्ञान दिसते.
रुद्र्सुक्तात मागितलेल्या सर्व गोष्टी या ऐहिक जीवनात उपयोगी पडणाऱ्या आहेत, पारमार्थिक नाही. सुक्तकार हा धनधान्य, घरदार, बायकामुले, गुरेढोरे, शेती, इ. सगळ्या गोष्टी मागतो आहे, द्युतासारखी क्रीडाही मागतो आहे. सुक्तकाराच्या पारलौकिक मागण्या या स्वर्गापर्यंत सीमित आहेत. रुद्राचे भयंकर सामर्थ्य आणि सैन्य हे आपल्या शत्रूवर वापरले जावे ही इच्छा तो व्यक्त करत आहे.
हा एक रुद्राचा साधासुधा भक्त आहे ज्याला जनावरे, रान, शत्रू,चोर, दरोडेखोर आणि रुद्रासारखे भीषण दैवत यांची भीती आहे. हे सुक्त हे रुद्राशी बोलणे आहे, ज्यात सुक्तकार आधी स्तुती, आळवणी करून मागणी करत आहे. हा रुद्र्सुक्तातला लपवालपवी न करणारा साधेपणा फार लोभस आहे. रुद्रसुक्ताचे पठण हा एक अनुभव आहे. जेंव्हा उपस्थित ब्रह्मवृंद जर तयारीचा असेल आणि त्यांनी सूर बरोबर लावला असेल, तर घनगंभीर आवाजात हे सूत्र जरी बव्हंशी गद्य असले तरी कोसळत येते. त्यात होम, सोवळे आणि इतर वातवरण निर्मिती जर व्यवस्थित असली तर त्यानंतर कुठेतरी दैवी अनुभव येतो.
या सूक्ताचे पठन करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत, त्यामध्ये एकादशीनी, लघुरूद्र, महारुद्र,अतिरुद्र इत्यादि प्रयोग आहेत. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात.
.
ॐ त्र्यं॑बकं यजामहे सुग॒न्धिं पु॑ष्टि॒वर्ध॑नम् ।
उ॒र्वा॒रु॒कमि॑व॒ बन्ध॑नान्मृ॒त्यो-र्मु॑क्षीय॒ माऽमृता॓त् ||१||

|| ॐ शान्तिः॒ शान्तिः॒ शान्तिः॑ ||

रुद्राभिषेक एक अद्वितीय साधन, प. पु क्षीरसागर महाराज, नगर

परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज, वेदांत नगर, अ. नगर यांनी *शिवोपासना आणि रुद्राभिषेक* यावर केलेले मार्गदर्शन-

भगवान शंकर व त्यांचे स्वरूप- भग म्हणजे ऐश्वर्य; भगवान म्हणजे ऐश्वर्यवान ! *शं करोति इति शंकरः।* शं  म्हणजे कल्याण. कल्याण करणारे शंकर भगवान असा खरा शंकर शब्दाचा अर्थ आहे. देवदेवतांमध्ये भगवान शंकर ही मुख्य देवता आहे. प्रत्यक्ष शिवाचे रूप हे निर्गुण स्वरूपाचे आहे. परंतु उपासनेसाठी त्याचे रूप लिंगस्वरूपाचे आहे. भगवान शिव हे आपल्याला लिंगरूपाने दर्शन देत असतात. शिवोपासना करण्य्याचे विविध मार्ग आहेत. रुद्राभिषेक करणे, शिवलीलामृताचे पठण करणे. “नमःशिवाय” हा जप करणे, श्रावणी सोमवारचा, महाशिवरात्रीचा उपवास करणे इत्यादी. 

ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी भगवान शंकर ज्योतीच्या तेजोमय रुपात शिवलिंगात प्रगट झाले आहेत. ज्योतिर्लिंग याचा अर्थ आत्मज्योत असा आहे. ही उपासनेसाठी आहेत. शिवलिंगाची उपासना म्हणजे लिंगावर रुद्राभिषेक करणे.
भगवान शंकराला अभिषेक अतिशय प्रिय आहे. सतत अभिषेकाने तो लवकर प्रसन्न होतो. म्हणून जेथे जेथे शंकराची पिंडी असेल तेथे पाण्याची संतत धार पडावी अशी व्यवस्था केलेली असते. शिवलिंगाच्या अभिषेकाचे पाणी जाण्याचे टोक उत्तरेकडे असते. कारण ते उत्तरेकडे असणाऱ्या गंगानदीकडे जाते, ही भावना असते.

रुद्र हा वेदमंत्र आहे. रुद्र म्हणजे द्रवणे. स्तुती मनुष्याप्रमाणे ईश्वरालाही प्रिय आहे. आपल्या स्तुतीने भगवंताला पाझर फुटला पाहिजे. एकदा त्याचे मन द्रवले की आपण संकटातून वाचतो. त्याचा आपल्याला आधार मिळतो. पुष्कळ लोकांच्या जीवनात अडथळे येतात व प्रगती होत नाही. अशा वेळेला रुद्राभिषेक केला की अडचणीतून मार्ग निघतो.

रुद्र आवर्तनातील सर्व श्लोक संस्कृतमध्ये आहेत. रुद्र म्हणण्याची विशिष्ट लय व पद्धती आहे. त्याचप्रमाणे त्याचे उच्चार करावे लागतात. म्हणून रुद्राभिषेक हा जाणकार ब्राह्मणांकडून करून घ्यावा लागतो. ते वेदमंत्र असल्याने त्यात शक्ती आहे. योग्य पद्धतीने उच्चार झाल्यावर ती शक्ती कार्यरत होते व अनुभवाला येते.
रुद्राभिषेक घरात, बाहेर कोठेही, क्षेत्राचे ठिकाणी केव्हाही केला तरी चालतो. हा अगोदर ठरवून करावा. विशेषतः प्रदोष, सोमवार, एकादशी अशा दिवशी केलेला उत्तम. तुमच्या सवडीने महिन्यातून वरीलपैकी कोणताही एक दिवस ठरवा व रुद्राभिषेक करा. त्याचा तुम्हाला हमखास फायदा मिळेल.

रुद्र हा एकदा ऐकून भागत नाही. तो पुन्हा पुन्हा ऐकावा लागतो. म्हणजे अडथळे दूर होऊन प्रगती साधली जाते. रुद्र हे वेदमंत्र असल्याने त्याचे जसजसे उच्चारण होते तसतशा देवता तिथे उत्पन्न होतात व लोककल्याण करतात.
रुद्राभिषेकाचे फायदे -

*अ)घराण्याचे दोष कमी होणे-* कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी सर्व इच्छा पूर्ण होतातच असे नाही. त्यातूनच पितृदोष निर्माण होतात. पितृदोषांमुळे घराणीच्या घराणी नाहीशी झाल्याची उदाहरणे आहेत. कुंडलीत पितृदोष हे राहूचे दोष या नावाने दर्शवले जातात. राहूचे दोष इतके वाईट असतात की, जगणे मुश्किल करतात. काही घरात सर्व सुखसोई असूनही अस्वस्थता असते. काही घरात काही कारण नसताना सतत भांडणे होतात. काही घरात जेवण तयार असून शांत रितीने खायला मिळत नाही. यासर्वांवर उपाय म्हणजे "शिवोपासना" करणे.

*ब)मनोविकार कमी होणे-* रुद्र आवर्तने ऐकल्यावर कालांतराने मनोविकार कमी होतात. काही कारण नसताना हातवारे करणे, मनाशी पुटपुटणे, आॅफिसमध्ये बसल्याबसल्या दातावर पेन्सिल आपटणे, चटईवर बसल्याबसल्या काड्या काढणे, पुडीचा फेकून दिलेला वर्तमानपत्राचा कागद वाचत बसणे, एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करणे किंवा पुन्हा पुन्हा उच्चार करणे हे सर्व सूक्ष्म मनोविकारांचे प्रकार आहेत. ह्या सूक्ष्म मनोविकारांची योग्य दखल घेतली नाही तर ते विकार पुढे पुढे वाढत जातात. तुमच्याकडे जेव्हा लघुरुद्र/ महारुद्र करता, तेव्हा तुम्हाला समजत जरी नसले तरी ते ऐकावे, श्रवण करावे. यामुळे हे सूक्ष्म मनोविकार वाढत नाहीत व असतील तर पुढे नाहीसे होतात.

*क)पाऊस पडणे-* पाऊस पडत नसेल तर सामूदायिक प्रार्थनेचा जरुर उपयोग होतो व ईश्वरी शक्ती आपले कार्य करते. पूर्वीच्या काळी पावसासाठी यज्ञही करीत असत. शिवलिंगावर अभिषेक करत असत. तसा अभिषेक म्हणजे पाण्याची संततधार आपण ठेवली तरी पाऊस पडण्यास मदत होते. परंतु अशी पाण्याची संततधार पाऊस पडेपर्यंत ठेवायला लागते.

*ड)भूकंपापासून रक्षण होणे-* सध्या लहान मोठे भूकंप सतत खुप ठिकाणी होत आहेत. जेथे जमीन पोकळ असते तेथे असे भूकंप होत असतात. पोकळ जमिनीतून स्वयंभू शिवलिंगे बाहेर येत असतात. म्हणून ती पोकळ जमीन टणक होण्यासाठी आपल्याकडे रुद्राभिषेक करुन शिवाला शांत करण्याची पद्धत आहे. तेव्हा, तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी अथवा देवदेवळातून रुद्राभिषेक जरुर करावेत. त्यामुळे तुमच्या सर्वांचे भूकंपापासून रक्षण होईल. भूकंपासारख्या संकटातून वाचण्यासाठी रुद्राभिषेक हा एक उपाय आहे. स्वयंभू शिवाचा विचार केला तर त्याच्या लिंगाचे एक टोक जरी वर दिसत असले तरी दुसरे टोक थेट भूगर्भात शेवटपर्यंत असते. त्यामुळे सतत शिवावर धार करुन लघुरुद्र केल्यास व शिवोपासना केल्यास जमिनीला टणकपणा येतो व भूकंपाचा त्रास कमी होतो. ज्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंगे आहेत त्या ठिकाणी ही उपासना केल्यास ह्याचा अनुभव आल्याशिवाय रहात नाही. स्वयंभू याचा अर्थ जमिनीतून आपोआप वर आलेले . आपल्या स्तुतीने त्याला पाझर फुटला पाहिजे. एकदा त्याचे मन द्रवले की, आपण संकटातून वाचतो, याबाबत श्रद्धाही बाळगली पाहिजे. व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत येणा-या अघटित संकटावर रुद्राभिषेक हा खात्रीचा उपाय आहे.