श्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिर

स्थान: इंटाली खेडा (राजस्थान राज्य)
सत्पुरूष: गुरुताई सुगंद्धेश्वर.
विशेष: गुरूंचे (श्री गुळवणी महाराज) नावाने वामन दत्त मंदिर म्हणूनओळख. अनेक सामाजिक उपक्रम. स्कुल, उद्योगभुवन, कार्यशाळा, हॉस्पिटल, इ.

गुरुताई सुगंधेश्वर यांनी शिवाची व दत्तात्रेयांची उपासना दृढ व्हावी म्हणून इंटाली खेडा (राजस्थान) येथे एक दत्तमंदिर बांधले.

१९८० साली हे सद्गुरु वामन-दत्तमंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. या मंदिरातील दत्तमूर्ती सुरेख आहे. दत्तमंदिरात पुढे अनेक सोयी निर्माण झाल्या. गुळवणी महाराजांचा आशीर्वाद पाठीशी होताच. एकलिंगजी व दत्तप्रभू यांच्या भक्तीचा प्रसार या स्थानातून सर्वत्र होत आहे. मंदिरात गुळवणी महाराजांची तसबीर आहे. सकाळ-संध्याकाळ पूजा, आरती, जप नित्यनेमाने होत असतो. प्रसंगी होमहवनही होते.

या मंदिराच्या शेजारी १९९२ साली अष्टभुजा अंबामातेची मूर्ती स्थापन झाली. अन्नपूर्णा नावाचे एक स्वयंपाकघरही तयार झाले. इंटाली खेडा येथील शिवपुरीचे महत्त्व सर्व राजस्थानात पसरले. या देवस्थानच्या काही योजना आहेत. भारत सरकारद्वारे मान्यता असलेले एक सेंटर पब्लिक स्कूल चालविण्याची योजना आहे. प्रसादेमामा यांचे एक हॉस्पिटल तयार होत आहे. उद्योगभुवन, कार्यशाळा यांचीही निर्मिती होणार आहे. शिवाय अध्यात्माचा एक महत्त्वाचा विभाग सुरू आहे. त्याशिवाय एक वृद्धाश्रम सुरू करण्याचा विचार आहे.

दत्तभक्तीमध्ये नुसती देवपूजा नसून लोकांचे आरोग्य व शिक्षण यांनाही महत्त्व या केंद्रामध्ये दिले जाते. गुजराथी भाषेत श्रीगुरुचरित्र एकनाथ ना. जोशी यांनी आणले आहे. वासुदेवानंदसरस्वती, रंगावधूत यांनी गुजराथमध्ये जसा दत्तभक्तीचा प्रसार केला त्याचप्रमाणे गुरुताई सुगंधेश्वर यांनी राजस्थानात हा प्रसार केला.