श्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती (जेरें स्वामी महाराज वाडीकर)

जन्म: नृसिंह वाडीत पुजारी कुळात, इ. स. १८९६ मध्ये 
वेष: संन्यासी 
संप्रदाय: दत्त संप्रदाय   

जेरें स्वामी महाराज वाडीकर
श्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती

श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य जेरें स्वामी महाराज वाडीकर, संकेश्वर मठ

श्री वाडीकर जगद्गुरूंचा जन्म श्रीक्षेत्र नृसिंह वाडी येथे पुजारी कुळात शके १८१८ मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अमरापूर येथे झाले. उपनयनानंतर त्यांचे उच्च शिक्षण (संस्कृत वेद शास्त्र) सांगली, नृसिंहवाडी, रामदुर्ग येथे झाले. न्याय-पूर्व-उत्तर मीमांसा यांचे अध्ययन श्रीक्षेत्र नृसिंह वाडीत यांनी श्रोताधान (अग्निहोत्र) ठेवले.

शके १८४८ मध्ये त्यांनी वाई येथे सोमयाग व कल्लोळ येथे चयन याग संपन्न केला त्यांनी स्थापन केलेल्या श्री दत्तावेद पाठशाळेतून अनेक विद्यार्थी विद्यासंपन्न झाले. शके१८५४ मध्ये आषाढ शु ५ रोजी श्री क्षेत्र माहुली येथे श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य शिरोलकर यांच्याकडून मठ संप्रदयाप्रमाणे विधि पूर्वक संन्यास दीक्षा देऊन संकेश्वर करवीर पिठाचे उत्तराधिकारी झाले. आचार्य पिठावर आरोहण झाल्यापासून ३८ वर्षे त्यांनी धर्मोपदेशद्वारे धर्माजागृतीचे कार्य केले.

त्यानी सातारा येथे श्रीमद आद्य शंकराचार्य पाठशाळा स्थापन केली. या वेद पाठशाळेतून अनेक विद्वान वैदिक, शास्त्री, पंडित निर्माण झाले. १९५७ साली श्रीक्षेत्र वाई येथे कोटीलिंग अर्चन महानुष्ठान व अनेक धर्मानुष्ठाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. त्यांनी धर्म प्रचारकाचे कार्य म्हणून वैदिक धर्म चंद्रिका, निवृत्ती धर्म, स्त्री धर्म, भारतीय राजनीती (अर्थशास्त्र) श्रीमद शंकराचार्य उपासना, अध्य।त्मविद्या प्रदीपिका तसेच दहा उपनिशीदांचा मराठी भाषेत अनुवाद असलेला १६०० पानांचा अनंदगिरी टीका तात्पर्य सहित'  दशोपनीषदभाष्य चंद्रिका हा मौलिक ग्रंथ लिहिला.

सनातन वैदिक हिंदू धर्माचा प्रसार करणारे श्रीमद वाडीकर जगद्गुरू पुजारी कुळाचे भूषण आहेत.

त्यांचे चरणी पवित्र अभिवादन.

|| मनीं आवडी गायनाची प्रभुला || || करी सुस्वरें नित्य जो गायनाला || || तयाच्या त्वरें संकटातें निवारी || || तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||९||  
|| श्री दत्तस्तुती ||