औदुंबरचे श्री नारायणानंद स्वामी

औदुंबरचे नारायणानंद स्वामी
औदुंबरचे श्री नारायणानंद स्वामी

जन्म: अणेकाई, जि. कारवार (मुळ नाव- महाबलेश्वर उर्फ तिमण्णा)
आई/वडिल: गंगाबाई/वेदभूषण नरसिंह भट्ट उपाध्ये
मुंज: ८ व्या वर्षी /अग्नीहोत्र उपासना
लग्न: यमुना (ओनेकाई)
कार्यकाळ: सन १९६०-१९०५
सप्रदाय: अवधूत संप्रदाय
समाधी: १९०५

कारवार जिल्ह्यातील ओणेकई या लहानशा गावात स्वामींचा जन्म झाला. त्यावेळी त्यांचे नाव महाबलेश्र्वर अथवा तिमण्णा असे होते. त्यांना बालपणापासून आध्यात्माची ओढ होती. हे जन्माने गुजराथी असले तरी मराठवाड्यात गुंज येथे राहून त्यांनी दत्तसंप्रदाय वाढविला. ईश्र्वरीकृपा व संतसंगत यांच्या आधाराने त्यांनी अनेकांना सन्मार्ग दाखविला.

ज्ञान, कर्म, उपासना या तीनही मार्गांत ते निष्णात होते. ज्योतिषशास्त्र आणि मंत्रशास्त्र यात ते सिद्धहस्त होते. निरहंकारी मन व प्रेमळ वृत्तीने त्यांनी लोकांना जवळ केले. त्यानंतर त्यांनी औदुंबर येथे वास्तव्य केले. एकांत आणि अल्प आहार त्यांना प्रिय होता. या स्वामींचे चरित्र सुधांशु यांनी ‘श्रीसद्गुरु नारायणानंद चरित्रामृत’ या नावाने प्रसिद्ध केले आहे. मृत्यूपूर्वी स्वामींनी आपल्या आश्रमात श्रीगुरू शिवशंकरानंद दत्तमंदिर बांधून घेतले. मंदिरासमोर त्यांची समाधी आहे. 

 

औदुंबरचे नारायणानंद स्वामी
औदुंबरचे श्री नारायणानंद स्वामी