दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा (सन १९२२-१९८८)

जन्म: १९२२
कार्यकाळ: १९२२-१९८८
गुरु: पिठले महाराज
समाधी: १९८८ दिंडोरी येथे

मोरे दादा
तेजोनिधी दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा

सद्गुरू प.पू. मोरेदादांनी पूर्ण आयुष्याचा प्रत्येक क्षण परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ तत्व सर्वसामान्यांना कोणताच भेदभाव न करता अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात व्यतीत केला आहे. सद्गुरू प.पू.दादांनी १९७८ पर्यंत छत्रपती शिवरायांप्रमाणे निष्ठावान माणसे घडविली व परमात्म्याचे कार्य करण्याची योजना राबविली. १९७८ पासून पुढे महाराजांच्या आशीर्वादाने या गुरुप्रणीत मार्गासाठी वेगवान घोडदौड करून मानवी आवाक्याबाहेरचे कार्य उभे केले. सद्गुरू प.पू. मोरेदादा यांनी सेवामार्गात कुणाचेही गुरुपद न घेता थेट “श्री स्वामी समर्थ” महाराजांनाच गुरु करण्याची प्रथा रूढ केली. ही दादांच्या नीरअहंकाराची परमोच्च साक्ष आहे. सेवामार्गात मार्गदर्शन विनामुल्य ठेवल्यामुळे व संबधित वाङमयही माफक दरात ठेवल्यामुळे तळागाळातील लोकही सेवामार्गाचा लाभ मिळवू लागले. सर्व साहित्य व ज्ञानाच्या बाबतीत कोणतीही गोपनीयता न ठेवता पुढील पिढीसाठी सहज उपलब्ध करून ठेवल्यामुळे मार्गाच्या वाढत्या प्रचारासाठी त्यांच्या महानिर्वाणानंतरही अनेक सेवेकरी या कार्यासाठी क्रियाशील होवू लागले.

तथाकथित धर्ममार्तंडांनी महिला वर्गास हजारो वर्षे अध्यात्मिक ग्रंथ व ज्ञानपासून वंचित ठेवले. त्या महिलांनाच सद्गुरू मोरेदादांनी प्रचार-प्रसाराचे आधारस्तंभ बनविले. “श्रीगुरुचरित्रा” सारख्या वेद्तुल्य ग्रंथाचे पारायणे करण्यास महिलांना असलेली बंदी दादांनी दूर केली.

पुणे येथील सारसबागेशेजारी स्वामी समर्थांचा एक मठ आहे. त्याच्याशी संबंधीत असलेले मोरेदादा सर्वांच्या परिचयाचे आहेत. यांचे नाव खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा असे असून त्यांचा जन्म नाशिक येथील दिंडोरी येथे झाला. त्यांना त्यांच्या मातोश्रींनी लहानाचे मोठे केले. शैक्षणिक व आध्यात्मिक प्रगती त्यांची फार लहानपणापासून झाली.

वयाच्या आठव्या वर्षी कांची कामकोटीच्या शंकराचार्यांसमोर त्यांनी रामरक्षा म्हणून दाखवली. त्यांनी विष्णुसहस्त्रनाम, गीता, ज्ञानेश्वरी इत्यादींचा अभ्यास केला. घरातील शेती तेच सांभाळत होते.

दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा
प. पु. गुरुमाऊली, श्रीराम खंडेराव मोरे उर्फ अण्णासाहेब मोरे, सध्याचे पिठाधिश

सन १९८४ साली त्यांचा संबंध स्वामी समर्थांचे एक शिष्य पिठले महाराज यांच्याशी आला, यांचा अनुग्रह त्यांना मिळाला. मोरे दादांनी यानंतरचे सर्व आयुष्य स्वामींच्या कार्याचा प्रचार करण्यात घालविले. अनेक ठिकाणी हिंडून त्यांनी दु:खी, पिडित लोकांना उपाय सांगून त्यांचे क्लेश दूर केले. अनेकांच्यावर संस्कार करून त्यांनी स्वामी समर्थांच्या आध्यात्मिक विकासाची उभारणी केली.

एका शुभ दिनी दिंडोरी येथे त्यांनी स्वामींच्या चरणी देह अर्पण केला.

दिंडोरी येथे अनेक भक्तांना संकट व भयमूक्त  झाल्याचा अनुभव आहे.  मोरेदादा यांनी अनेकांना  मार्गास लावले. अनेक अंधश्रद्धा दूर केल्या. दिंडोरी येथे फार मोठ्या प्रमाणात स्वामींचा मठ व अध्यात्मीक केंद्र आहे. येथे निवास व भोजनाची व्यवस्था ही आहे. सर्व स्वामी भक्तांनी या मंदिरास अवश्य भेट द्यावी ! 

प. पू . गुरुमाऊलींचा भक्तांसाठी असामान्य उपदेश- सांसारिक भक्तांसाठी 

 • वेखंड दगडावर घासून तिचा गर गायीच्या गोमूञात उगाळून पोटातून घेतला अगर जिथे गाठ आहे तिथे लावला तर गाठीचा कॅन्सर पूर्णपणे बरा होतो.
 • नारळाची शेंडी जाळून त्याची रक्षा एका डब्यात ठेवावी व ती रक्ष चांगल्या मधाबरोबर अनाशापोटी घेतली तर पोटातला कसलाही कॅन्सर बरा होतो.
 • कोणत्याही मंदीरासमोर अगर मंदिराशेजारी राहू नये.
 • ग्रंथाच्या अंतरंगात जावून समजून घेवून लोकांना समजून सांगावे.
 • देवांची मिल्ट्री फोर्स म्हणजे नवनारायण आहेत.
 • प्रत्येक घरात एक नवनाथ पारायण झाले तर त्या मिल्ट्री फोर्स कडे आपल्या संरक्षणाची जबाबदारी असते.
 • स्वामी समर्थ पादुका, दिंडोरी
  स्वामी समर्थ पादुका, दिंडोरी 
  स्वयंपाक करताना अगर जेवताना श्री स्वामी समर्थ, गायञी मंञ, मृत्यूंजय मंञ म्हटला तर त्या मंञाचा प्रभाव अन्नावर होइल परिणामी घरात भांडणे होणार नाहीत.
 • टिव्ही समोर बसून तर जेवूच नये मंञाचा उपयोग होणार नाही.
 • "मनोवांछित संतती" हे पुस्तक प्रत्येक महिलांनी वाचावा व तसे संस्कार आपल्या पाल्याला द्यावेत.
 • आपण ३ अध्याय व ११ माळी जप करतो ते आपल्या स्वतःसाठी परंतु महाराजांसाठी काय करतो हे महत्वाच आहे.
 • आजपासून महाराजांना शरण जावून "फक्त महाराज तुमच्यासाठी एक माळ जप करु" असा निश्चय करा.
 • जो अभ्यासक आहे तो खरा सेवेकरी आहे.
 • ज्यावेळी संकट येईल त्याच वेळी स्वामींचे पाय धरु नका.
 • मनुष्य विद्यार्थी म्हणून राहीला विद्यार्थी म्हणून ज्ञान ग्रहण केले तर अहंकार होणार नाही.
 • २०२२ पर्यंत पावसाची स्थिती अशीच राहणार आहे आणि जो २०१२ पासून पाऊस झाला तो फक्त सेवेकर्यांच्या सेवेमुळेच!
 • समर्थ पादुका दिंडोरी
  श्री स्वामी समर्थ पादुका, दिंडोरी  मठ 
  प्रत्येकाने आपल्या नित्यसेवेत एकदा "पर्जन्य सुक्त" म्हणावे.
 • पाण्याचा वापर अगदी काटकसरीने करावा.
 • शिक्षकाने "जलसंपत्ती' या विषयावरच विद्यार्थ्यांना जास्त बोलावे.
 • ज्याची बोटे सरळ त्याचा स्वभाव सरळ ज्याची वाकडी त्याचा स्वभाव वाकडा.
 • तालुका प्रशासनावर १६ प्रतिनीधी आवश्यक.
 • जगात सर्वात मोठे हाॅस्पिटल हे सेवेकर्यांचे असेल.
 • नंदुरबार जिल्ह्यात एकही आत्महत्या झाली नाही स्वामींचा जन आत्महत्या करु देत नाही.
 • प्रश्नोत्तर करणार्यांनी शांतीकर्म वैगेरे असले कार्यक्रम देवू नका.
 • ज्यांच्या पञिकेत ग्रह स्थिती ठिक नाही त्यांनी रोज ९ वेळा "नवग्रह स्तोञ" ८१ दिवस वाचले तर कसलीही खराब पञिक ठिक होईल.
 • पंचमहायज्ञ करत असाल तर कुठलीच विधी करण्याची गरज बासणार नाही.
 • मुंगीच्या लाळेत असे काही औषध आहे की; मुंग्यांनी मळलेली माती (वारुळ) चिंचेचा पाला ओंजळभर, आणि गायीचे गोमुञ एकञ शिजवून त्याचे मलम करुन जिथे जिथे सांधेदुखी, गुडगेदुखी, पाठदुखी, फॅक्चर असेल तिथे लावावे ठणठणित बरे व्हाल कुठेही जायचि आवश्यकता नाही.
 • ज्या वास्तू भयानक ओस पडलेल्या आहेत , कारखाने इ. बंद पडलेले आहेत त्या वास्तुत चारी दिशेला श्रीयंञ लावले तर सकारात्मक उर्जा निर्माण होईल.
 • ज्या मुली हातात कंकण, बांगड्या घालतात त्यांना कधीही धोका होत नाही.
 • पुरुषांचे पोशाख मुलींनी, महिलांनी घालू नये.
 • कुठलेही काम करतांना बेशिस्त स्वैराचार येणार नाही याची काळजी घ्यावी.
 • पाश्चिमात्य संष्कृतीचे अनुकरण महिलांनी अगर पुरुषांनी करु नये.
 • भगवतीचे ११ अंलंकाराचे महत्व लोकांना महिलांना सांगावे.
 • ज्यांना स्वामींचे कार्य करायचे आहे त्यांनी जास्त मोठेपणाची अपेक्षा करु नये दाखवू नये.
 • रोज एक सेवेकरी घडवावा.
श्री मोरे दादा, दिंडोरी
श्री मोरे दादा, दिंडोरी 

श्री गुरु माउली उवाच

आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारची दु:खे येतात, क्लेश सहन करावे लागतात. काही वेळा दु:ख वाट्याला येत तेव्हा खरोखर आपली नेमकी चूक कळत नाही. वाटत, 'मी कुणाचंच वाईट करत नाही, मग माझ्याच वाट्याला हे का?' पण हे प्रारब्ध भोग असतात, ते भोगूनच संपवावे लागतात. परंतु बरीचशी दु:ख विनाकारण ओढवून घेतली जाताक, वाट्याला येणार्या दु:खाचा त्रास समोरचा सुखात आहे हे पाहून अधिक बळावतो. आर्थिक संकट, कर्ज, आजारपण, कौटुंबिक कलह, नोकरीत कटकटी, फसवणूक, व्यसनाधीनता, दारिद्र्य अशा गोष्टींना सामोर जाव लागलं की आपण अस्वस्थ होतो, शांत राहू शकत नाही.

आयुष्यात आनंदी आनंद असेल तर आपली काहीच तक्रार नसते पण कोणतही दु:ख आलं की कधी यातून सुटका होते यासाठी त्या दु:खाला खंबीरपणे तोंड देण्याऐवजी इतर उपाय सुरु होतात. कोण सांगेल ते विधी, पूजा, व्रत, बुवाबाबा नवस, पोथ्या यांची पारायण होतात.
कसही करुन सुटका करुन घ्यायची असते. २६ जुलैची पूरस्थिती सर्वांना आठवतच असेल. सर्वत्र फक्त पाण्याचं साम्राज्य होत. वाटा दिसत नव्हत्या, तरीही डोळ्यांसमोर घरी पोहोचणं हेच ध्येय होत. त्यावेळी चालताना गटाराचं पाणी आहे, पायाखाली नेमकं काय येईल समजत नाही, पुढे येणारा मदतीचा हात तेवढा दिसत होता, कोणाचा हात धरतोय हा विचारही नव्हता, तहान भूकेला बकाल वस्तीतून मिळालेला वडापाव, पाणी कशाकशाचंच वावगं नव्हत. हे सर्व महत्त्वाच नाही तर यातून घरी पोहोचणं महत्त्वाचं, एवढाच ध्यास मनात होता. त्यामुळे कसलाच बाऊ झाला नाही.

आपल्या आयुष्यात येणारी सुखदु:ख सुद्धा अशीच असतात. त्यांचा बाऊ न करता त्यातून वाट काढत राहिलं पाहिजे, हे सर्व असणारच, ते सहन केलच पाहिजे असा विचार करत माझ्या मुक्कामी, माझ्या भगवंताकडे मला पोहोचायचं आहे, अशी भावना आपण मनात दृढ करु शकणार नाही का!

मुळात ही सुखदु:ख माझी आहेत, ह्या खोट्या भावनेत आपण पुरते गुंतून जातो. पण ही सुखदु:ख केवळ ह्या देहाची आहेत, आणि हा देह म्हणजे "मी" नाही. त्यामुळे मला त्याबद्दल काही वाटून घ्यायचं कारणच नाही. काठावर बसून पाहणार्याला बुडायची भिती नसते. ह्या आयुष्याकडे आपणही असच काठावरुन पहायला शिकलं पाहिजे. रोजच्या जीवनात अनेक प्रसंग. घटना, क्षण बरच काही देवून जातात. शिकवतात. कधी सुखावणारं कधी दुखावणारं, हवहवस वाटणारं, नकोसं झालेलं, अस बरच काही आपण अनुभवतो.

आयुष्याकडे स्वत:ला दूर करुन पहाण्याच्या खेळात किती मौज वाटेल पहा. कोवळ्या सूर्यकिरणांनी उजळणारं आयुष्य, कधी निराशेच्या मिट्ट काळोखाने काळवंडून जाणारं आयुष्य! ह्या जीवनात शीतल गारवा, बोचरी थंडी, उन्हाचा तप्तपणा कधी थंडगार जलधारांचा वर्षाव होतच रहातो. सुखाचा किंवा दु:खाचा वाटणारा प्रत्येक क्षण सेकंदासेकंदाला मागे पडत आयुष्य पुढेच सरकत असत. आपण मात्र त्या क्षणांमधेच कायम अडकून घेतो.

आरशात पाहून कसं स्वत:ला ठीकठाक करतो, तसंच आयुष्याकडे समोरुन पहाताना त्यातील बर्याच गोष्टी आपण सुधारु शकू. जीवन उजळवणं आपल्याच हाती आहे. असा जेव्हा आपण प्रयत्न अगदी तळमळीने करतो, तेव्हा मार्गातले अडसर स्वामीकृपेने दूर होवू लागतात. आयुष्यात नको त्या गोष्टींची चिंता करायचं सोडून आपण स्वामी नामाचं "चिंतन" करु या, चला स्वामीनाम मनोभावे जपू या.

दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा
दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा 

श्री गुरुमाऊलीं म्हणतात "श्री स्वामी समर्थ" या नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात!

१) श्री स्वामी समर्थ नामाने, निश्चित्तच चमत्कार म्हणु अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात. सर्वप्रथम आपण अबोल होतो. एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल. ते सुरुवातीला एकांतात होते. समाजापासुन अलिप्त रहात होते. साधना पुर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली.

२) श्री स्वामी समर्थ नामाने, सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खुप गर्दी होते. इतके दिवस षड्-रिपु आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात.मनात विचारांची गर्दी होणे, हे चांगले लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही. ते घाबरुन नामस्मरण करणे सोडून देतात.

३) श्री स्वामी समर्थ नामाने, काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो. जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे.

४) श्री स्वामी समर्थ नामाने, शांत झोप लागते. वेळेवर जागही येते.

५) श्री स्वामी समर्थ नामाने, पशु पक्षीही साधकांना घाबरत नाहीत. साधना योग्य दिशेने जाते, हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे.

६) श्री स्वामी समर्थ नामाने, स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत. नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते, त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही.

७) राग येत नाही. हे ही साधना व्यवस्थित चालल्याची खुण आहे. नामस्मरण करुनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतीनियम पाळण्यामध्ये कमी पडता, असाच त्याचा अर्थ होतो.

८) श्री स्वामी समर्थ नामाने, क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते. त्या अनुषंगाने घटना घडत जातात. नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे.

९) श्री स्वामी समर्थ नामाने, कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदा. प्रथम स्थान हे स्वभाव स्थान, द्वितिय स्थान हे धनस्थान, तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे. साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात.

१०) श्री स्वामी समर्थ नामाने, आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते, पण जशी साधना पुढे जात रहाते, तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते.

११) श्री स्वामी समर्थ नामाने, नामस्मरणावर खुप काही लिहिण्यासारखं आहे. जितके सांगावे, तितके कमीच!

जन्मो जन्मीचे सार्थक करणारा दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग. एक अद्भुत सेवा मार्ग.

 • श्री स्वामी समर्थ महाराज कलीयुगात लोकांना अनूभूती, अनूभव, प्रचिती व आशीर्वाद देण्यासाठी अवतरले आहेत.
 • ग्राम अभियानात, सप्ताहात मनोभावे सेवा केली. कित्येक लोकांना अनुभव आलेत.
 • श्री स्वामी समर्थ महाराज आज दिंडोरी दरबार व श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथून गुरुमाऊली प. पू. आण्णासाहेब मोरे यांच्या रुपात कार्य करत आहेत.
 • दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून सेवा घेऊन शेकडो-हजारो नाहीतर लाखो-करोडो लोकांना अनुभव आलेले आहेत.
 • करा सेवा मिळेल मेवा.
 • प. पू. गुरूमाऊलींच्या ग्रामअभियानातून १६ विभागातून सेवेकरी ग्रामअभियानात सेवा रूजू करतात.
 • किती विलक्षण अनुभवाची प्रचिती ग्रामअभियानात काम करणा-या सेवेक-यांना येत असते.
 • प. पू. गुरूमाऊली दिंडोरी येथे १८ तास अथक दुखीत, पिडीत, मुमूक्षीतांसाठी काम करतात, सर्वांना अगोदर मनाला धीर देतात त्यामुळे आजारी, पीडीत, समस्याग्रस्त, मनाने खचलेली व्यक्तीला मनाला उभारी येते.
 • दिंडोरीला रडत आलेली व्यक्ती दिंडोरीहून परत जातांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे व प. पू. गुरूमाऊलींचे आशिर्वाद, भक्कम मनोबल व आत्मविश्वास घेऊनच जाते.
 • संकटावर, आजारावर, समस्यांवर मात करून चेह-यावर स्मित हास्य, हदयात-मनात हाच आत्मविश्वास असतो की अशक्य ही शक्य करतील स्वामी गुरूमाऊली.
 • मग आपणही ग्रामअभियान आपल्या केंद्रात, परिसरात, गावात, शहरात, जिल्ह्यात, राज्यात, देशात व परदेशात राबवून प्रचिती व अनुभव घेवूया.
 • केवढे विशाल आहेत स्वामी, तसेच किती विशाल हदय आहे प. पू. गुरूमाऊलींचे. येणाऱ्या प्रत्येक दु:खीताचे, पिडीताचे, मुमूक्षीताचे, समस्याग्रस्त, व्याधीग्रस्ताला मनाला आधार देवून सेवा, कार्यक्रम देवून त्याला दु:खमुक्त करतात म्हणून श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात अनेक लोक येण्यामागची कारणे ग्रामअभियान व श्री स्वामी समर्थ महाराजांचे व प. पू. गुरूमाऊलींचे शुभआशिर्वाद.
 • चला तर वेळ वाया घालवू नका.
 • माणूस आपल्या बुध्दीप्रमाणे आपला, आपल्या कुटूंबाचा विचार करतो पण विशाल हदयी प. पू. गुरूमाऊली आपल्या ७ पिढ्यांचा विचार करतात. व लोक कसे सुखी हेतील याचाच विचार येणा-या प्रत्येक दिवसाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक मिनीटाला, प्रत्येक सेकंदाला यातच दिवसाचे १८ तास केव्हाच निघून गेलेले असतात.
 • अथक परिश्रम.
 • गुरुपुत्र आ. चंद्रकांत दादासाहेब मोरे  प्रशासकीय विभाग, आरोग्य व आयुर्वेद विभाग, प्रश्नोत्तरे विभाग, प्रशिक्षण विभाग, यादनिकी विभाग, कायदेशीर सल्लागार विभागाची अत्यंत मोठी जबाबदारी सांभाळत आहेत. प्रशासकीय अनेक प्रश्न सोडवतांना प्रत्येकाला तोंड देणे बापरे. खरच खुपच मोठे अवघड काम.
 • गुरुपुत्र आ. नितिन भाऊसाहेब मोरे बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग, देश-विदेश अभियान विभाग व वेद विज्ञान संशोधनाचे कार्य जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शिबीर, चर्चा घेऊन मोठी जबाबदारी सांभाळत आहेत.
 • गुरूपुत्र आ. गिरीश आबासाहेब मोरे कृषीशास्त्र विभाग, पशु-गौवंश विभाग, पर्यावरण प्रकृती विभाग, स्वयंरोजगा विभाग, भारतीय संस्कृती-अस्मिता विभाग, विवाह संस्कार विभाग, वास्तु शास्त्र विभाग व माहिती तंत्रज्ञान विभागाची धुरा अविश्रांत मेहनतीने सांभाळत आहेत.
 • विचार करा आपणही थोडे मुंगी सारखे का होईना ग्रामअभियानात काम करू या व हातभार लावू या.
 • ब-याच जणांच्या मनात काही शंका येत असेल तर ते साफ चुकीचे आहे.
 • पुंण्याचा बँलेन्स हा पैशाच्या (कँश) बँलेन्स पेक्षा महत्वाचा आहे.
 • प. पू. गुरूमाऊलींचा शुभआशिर्वाद हा ७ काय १४ पिढ्यांना नक्की लाभेल.
 • ग्रामअभियानला निघायची तयारी करा.
 • जीवनाचे सार्थक करण्याची अलौकिक संधी आहे.
 • तुम्हीच ठरवा काय करायचे ते?

कदम कदम बढाये जा । ग्राम अभियान किये जा ।।
विश्व स्वामीमय बनाये जा । पुण्य पे पुण्य कमाये जा ।।

*सबसे बडा गुरू, गुरुसे बडा गुरुका ध्यास .

।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, एकमेवाद्वितीय सेवा संस्था

भारत हा कृषी प्रधान देश असुन, भारतात ग्रामिण भागात पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. परंतु, हा ग्रामिण भारत आज आपणास समस्याग्रस्त झालेला दिसुन येतात. हि समस्याग्रस्त गावे दुरूस्त करण्यासाठी आणि उध्वस्त झालेले ग्रामजीवन सुस्थितीत आणण्यासाठी प. पू. गुरूमाऊली, श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग प्रधान केंद्र दिंडोरी, यांनी अकरा तत्वांवर आधारीत ग्रामजीवन राबविण्यास सुरवात केली. ग्रामअभियानात सेवा मार्गातील बालसंस्कार, कृषी, याज्ञिकी, आयुर्वेद, मराठी अस्मिता,प्रश्नोत्तर,वास्तुशास्त्र, विवाह संस्कार, कायदेशिर सल्लागार, प्रशिक्षण शिबीरे, व स्वयंरोजगार इ. विषयांचा समावेश होतो. सेवा मार्गाद्वारे त्या- त्या गावात जाऊन त्या गावातील ग्रामजीवन सुसंस्कारीत करणे, गावातील भंगलेल्या मुर्तींची पुजा व मानसन्मान करूण त्यांचा आशिर्वाद मिळवून देणे, गावाची वास्तुशास्त्राप्रमाणे रचना करणे, गावातील शेतीची आध्यात्म व वास्तुशास्त्राच्या माध्यमातुन सुधारणा करणे, गावातील लोकांना आयुर्वेदाचे महत्व पटवून देणे, स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणे, यांसारखे उपक्रम राबवीले जातात. याप्रकारे गावांमध्ये ग्रामअभियान राबविल्यामुळे पावसाळा वेळेवर येऊन नुकसान न होता त्या-त्या गावातील ग्रामदैवतांचा मानसन्मान करूण व त्यांच्या आशिर्वादाने सुखी समृद्धी होऊन उन्नतीच्या दिशेने जात आहे.

बालसंस्कार

तेजोनिधी सदगुरु प. पू. मोरेदादांची बाल संस्काराबाबत अमृतवाणी:श्री स्वामी समर्थ महाराजांचे थोर परमशिष्य प.पू. खंडेराव आप्पाजी मोरे उर्फ मोरेदादांच्या अमृतवाणी नुसार प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास सांबाळून गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, सरस्वती स्तोत्र, मारुती स्तोत्र, रामरक्षा वगैरे स्तोत्र म्हणावीत. गायत्री, सरस्वती, सूर्यमंत्र, स्नानानंतर म्हणावे. स्तोत्र व मंत्र सहज पाठ होतील. वाणी व उच्चार स्वछ होतील. परमेश्वरी दिव्य अधीश्ठान तयार होइल. थोरा-मोठ्यांशी नम्रपणे वागावे. सायांकाळी मुलांकडून शुभम करोति.... तसेच प्रार्थना म्हणुन घ्यावी. मूल - मुलींना माता पित्याच्या पायावर डोके ठेउन नस्कार करण्याची सवय लावावी. मुलांनी मातेचे चरणतीर्थ घ्यावे, जे गंगाजला सामान पुण्यदायक असते. कुटुम्बात सदाचार राहावा म्हणुन रोज मुलांना १० ते १३ श्लोक म्हणावयास सांगावे. मुलांपुढे मात्रु देवो भवः पितृ देवो भवः असे आदर्श ठेवावेत.

सेवा मार्गात बाल संस्काराला नेहमीच प्राधान्य आहे कारण आपले ब्रिद आहे की - संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्मं टिकला तर राष्ट्र टिकेल. महानजेच संस्कार हां स्वतः पुरता महत्वाचा नसून राष्ट्राची जडनघडन संसकारावरच अवलम्बुन आहे. घराघरात संस्कृती टिकली तरच धर्म टिकणार आहे. मानव हा जन्मतःच ज्ञानी वा सुसंस्कारी नसतो. तो जन्म घेतो तेंव्हा मांसाचा गोळा असतो. त्या गोळया वर प्रयत्न पुर्वक संस्कार केल्यास तो मानव बनतो. माता-पिता-गुरु यांज कडून जे बारे वाईट संस्कार बाल मनावर घडतात त्यानुसार पीढी घडत असते. बालवय हे संस्कारक्षम व अनुकरणीय असते. म्हणुन बालपणातच संस्कार अधिक चांगल्या प्रकारे करता येतात. बाल संस्काराचे हे अनन्य साधारण महत्व ओळखूनच प्रत्येक श्री स्वामी समर्थ विकास केंद्रास जोडून बालसंस्कार केंद्रही कार्यरत आहे.

ग्रामविकास अभियानाताही बाल संस्कार विभाग आहे.या अभियानांतार्गत ग्रामविकास अभियानात काम करणार्या सेवेकर्यानातर भरपूर कामाची संधी आहे. हे त्यांचे काम म्हणजे राष्ट्र उभारणीचे, राष्ट्र घडन करणारे आहेच, पण संस्कृती व धर्माचे संवर्धन करणारे आहे. या कामासाठी गावत जानारया सेवेकरयाना ग्रामस्थान्प्रमाने गावातील शिक्षकांशी व महत्वाचे म्हणजे गावातील सर्व मुलांशी मैत्री करावी लागणार आहे. या कामाची सुरवात पालक शिक्षक विद्यार्थी मेलाव्यानी करता येइल. या मेलाव्यात मार्गदर्शक म्हणुन तज्ञ सेवेकरी, प्राध्यापक,ग्रामविकास अभियानाताही बाल संस्कार विभाग आहे. या अभियानांतार्गत ग्रामविकास अभियानात काम करणार्या सेवेकर्यानातर भरपूर कामाची संधी आहे. हे त्यांचे काम म्हणजे राष्ट्र उभारणीचे, राष्ट्र घडन करणारे आहेच, पण संस्कृती व धर्माचे संवर्धन करणारे आहे. या कामासाठी गावत जानारया सेवेकरयाना ग्रामस्थान्प्रमाने गावातील शिक्षकांशी व महत्वाचे म्हणजे गावातील सर्व मुलांशी मैत्री करावी लागणार आहे.

या कामाची सुरवात पालक शिक्षक विद्यार्थी मेलाव्यानी करता येइल. या मेलाव्यात मार्गदर्शक म्हणुन तज्ञ सेवेकरी, प्राध्यापक, प्राचार्य यांना बोलवावे. पालकांनी आदर्श पालक म्हणुन कसे वागावे, शिक्षकांची भूमिका काय असावी व विद्यार्थ्यानी आपल्या आचार विचारात कशी सुधारना घडवून आणावी याबाबत या मेळाव्यामधून मार्गदर्शन करता येइल. सुटयांमधे सुसंस्कार व यक्तिमत्वविकास शिबिराचे आयोजन करता येइल. जेथे केंद्र असेल तेथे तर बालसंस्कार कार्यात प्राधान्य द्यायचे आहेच पण जेथे श्री स्वामी समर्थ केंद्र नाही आशा गावाची जर आपण ग्रामअभियान कार्यासाठी निवड केली असेल तर गावातील शिक्षकांप्रमानेच हे कार्य करू शकनार्या विशेषत: महिलांची मदत घ्यावी. पुरुषांच्या तुलनेत भगिनी हे काम निशितच अधिक सरसपणे करू शकतात. सदगुरु मोरेदादा नेहमी म्हणत प्रत्येक शाळेत जाणार्या मुलामुलिने आपला अभ्यास सांभालूँ गणपति स्तोत्र गणपति अथर्वशीर्ष, सरस्वती मंत्र, सूर्य मंत्र, म्हणावा. वाणी स्वच्छ होइल, कोवळया स्वच्छ मनाच्या बल्कमागे परमेश्वराचे अधिष्ठान तयार होइल.

बालपण अबोध, निष्पाप, स्वच्छ व पारदर्शी असते असे हे बालक प्रखर राष्टभक्त, निडर, थोरामोठयांचा आदर करणारे, निरव्यसनी व ईशव्री अधिष्ठान असलेले बनावयाचे असतील तर त्यांच्या समोर श्रीराम, श्रीकृष्ण, एकलव्य, अर्जून, गोरक्षनाथ, धृ्रव, प्रल्हाद, सदगुरू मोरेदादा, गाडगेमहाराज, जिजामाता, छत्रपती शिवाजी, लोकमान्य टिळक, साने गुरूजी, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, चंद्रशेखर आझाद, सरदार भगतसिंग असे कितीतरी आदर्श गोष्टीरूपात ठेवता येतील.याचबरोबर मुलांना प्राचीन गुरूकुल शिक्षण पद्धती, प्राचीन वैज्ञानिक ऋषी-मुनींचे संशोधन, निसर्गापासून शिकवन, आपले आरोग्य, आहार, विहार, योगासने, खेळाचे महत्व, अध्यात्म,धर्म, स्वअध्ययन, स्चावलंबन, सदाचार, श्रद्धा अशा कितीतरी गोष्टींबाबतचे मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. ग्रामअभियानात या विभागात जे सेवेकरी काम करणार आहेत त्यांना अमृतकलशा हा ग्रंथ खूपच उपयोगी ठरणार आहे. बालसंस्कार कार्य सेवेक-यांनी कसे करावे ? या बाबत अत्यंत मुददेसुद मार्र्गदर्शन अमृतकलशमध्ये असुन त्यांचे काम खुपच सोपे होणार आहे. हे काम नुसते भाषणबाजी करून होणार नाही हे आपल्या लक्षात आलेच असेल. तुम्ही दोन दोन तास छान छान भाषण केले पण त्याला आचाराची जोड नसेल तर सारे मुसळ केरात असे होऊ शकते म्हणूनच विचारांना आचाराची जोड देऊन मुलांसमोर जो आदर्श ठेवायचा आहे, त्याची सुरवात हे काम करणा-या सेवेक-यांनी प्रथम स्वतः पासून केल्यास हे काम अधिक परीणामकारक होईल.

कृषी विभाग

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे जे ग्रामअभियान हाती घेण्यात आले आहे. त्यातील एक महत्वाचा विभाग कृषी हा आहे. शेतक-यास सुखी, समृद्ध करण्यासाठी सेवामार्गातर्फे आतापर्यंत महाराष्टाच्या प्रत्येक विभागान, जिल्हयांच्या ठिकाणी तसेच लहान मोठया गावांमध्ये शेतकरी मेळाव्यांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या मेळाव्यांच्या माध्यमातून लाखो शेतक-यांना त्यांच्या जिव्हाळयाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. अन्नाची म्हणजे ब्रम्हाची निर्मिती करणा-या या ख-या ब्राम्हणाची दैन्यावस्था दूर करून त्याला समृद्ध बनवीन्याचे हे अभियान अधिक गतीमान करण्याची जबाबदारी अर्थातच सर्व सेवेक-यांवर आहें. ग्रामअभियानाच्या माध्यमातून आपली सेवा रूजू करणा-या सेवेक-यांनी नेमके काय करावे? असा प्रश्न संबंधित सेवेक-यांसमोर उभा राहू शकतो.

ग्रामअभियानांतर्गत काम करीत असतांना कृषी विभागाशी संबंधीत खालीलप्रमाणे कामाची दिशा ठरवून काम केल्यास ते अधिक उपयुक्त ठरेल.

ग्रामअभियानासाठी आपण ज्या गावाची निवड केली आहे त्या गावातील शेतीची माहिती प्रथम एकत्रित करावी.एकंदरीत गावाची आर्थिक परिस्थिती कशी आहे ? गावातील शेतकरी, शेतमजूर, व्यापरी, नोकरदार वर्ग, गावातून स्थलांतरीत झालेले मजूर, शेतिशिवाय इतर छोटे- मोठे धंदे करणारे नागरीक यांची माहिती मिळवावी.गावाचे एकुण क्षेत्र, पिकाखालील क्षेत्र, पावसाचे प्रमाण, शेतीची प्रतवार वर्गवारी, पाण्याची उपलब्धता, पशूधन ही सर्व माहिती मिळवील्यास त्या दृष्टिने नियोजन करणे सोपे होईल. ही माहिती एकत्रीत केल्यावर मार्गदर्शन करणे सोपे होईल.शेतक-यांना मातीचे प्रकार समजावून सांगावेत. त्यानुसार पिकांचे, पाण्याचे नियोजनाबाबत मार्गदर्शन.बागायती व कोरडवाहू जमिनीत कोणती पिके घ्यावीत हे समजावून सांगणे, विशेषतः कोरडवाहू शेतक-यांना अधिक मार्गदर्शनाची गरज ओळखून ते देणे.नापीक जमिनीत वनशेती, औषधी वनस्पतींची लागवड, पशूपालन, पशूनिगा याबददल माहिती, जोडधंदे व शेतक-यांच्या तरूण मुलांसाठी रोजगाराचे मार्गदर्शन.उत्पन्न वाढीसाठी सेवा, विहिरीचे पाणी वाढण्यासाठी सेवा, वास्तुशास्त्रानुसार शेती रचना, श्रमदानातून बंधारे, तळे निर्मिती करणे.ग्रामअभियान अंतर्गत काम करणा-या सेवेक-यांनी हे पक्के लक्षात ठेवावे की, गावातील सर्वांच्या सहभागानेच हे अभियान यशस्वी होणार असल्याने सर्वांना सोबत घेऊनच काम करावे लागणार आहे. असे झाल्यास प्रत्येक गावक-यास हे अभियान आपले वाटेल. शेतक-यांचे शेतीविषयक ज्ञान वाढावे, त्यांनी शास्त्रशुद्ध शेती करून आपले व आपल्या मुलाबाळांचे पोट भरून त्यांचे व्यवस्थित संगोपण, शिक्षण करावे याच हेतूने सेवामार्र्गाच्या वतीने आतापर्यंत भारतीय कृषीशास्त्र या ग्रंथाचे दोन भाग प्रकाशित करण्यात आले आहे. शेती क्षेत्राची वाटचाल, अडथळे, विकास, कृषी क्षेत्राचे जागतिकीकरण, आध्यात्मिक शेती, शेतीविषयक मुहूर्त, वास्तुशास्त्रानुसार शेतीची रचना, यज्ञ व पर्जन्यमान, मेघ लक्षण,पर्जन्य देवता उपासना, शिवकालीन पाणी साठवण, जमिनीतील पाणी, पाणी टंचाई, पाणी प्रश्न, जलसाक्षरता, वनराई बंधारे, मृदासंधारण आयुर्वेदिक खते, गोमुत्र, शेण, गांडुळ खत, सेंद्रिय शेती, पीक संरक्षण, औषधी वनस्पतींची लागवड, फुलशेती, वनीकरण, वनौषधी, गोमाता, जनावरांची निवड, संगोपण, दग्ध व्यवसाय, मधमाशीपालन, रेशीम उदयोग, जमीन महसूल, तलाठी कार्यालय अशा शेतक-यांच्या जिव्हाळयांचे अनेक विषयांवर दिेंडारी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे भारतीय कृषीशास्त्र ग्रंथांमधून सखोल मार्गदर्शन करण्यात आले आहे. हे ग्रंथ शेतक-यांना मार्गदर्शक आहेतच पण ग्रामअभियानात काम करणा-या सेवेक-यांना सुद्धा मार्गदर्शक आहेत.

याज्ञिकी विभाग

काही वर्षांपूर्वी आपल्या गावातील वातावरण कसे निकोप, निरागी होते. शरीराप्रमाणे मनानेही निरागी असल्याने गावातील वातावरणच अत्यंत प्रसन्न असायचे, ग्रामस्थ, स्त्री पुरूष एकमेकांच्या दुःखाच्या प्रसंगी मनःपूर्वक सहभागी व्हायचे. जातपात कोठेही आड येत नव्हती. गावागावात किर्तन, भजन, हरिनाम सप्ताह, सण वाराच्या निमित्ताने सर्व स्त्री पुरूष, मुलीबाळी एकत्र येऊन मनसोक्त आनंद लूटायचे पण आज गावागावात काय परिस्थिती आहे? वर वर्णन केलेले वातावरण आज स्वप्न बनले आहे.

आज मानवातील घराघरातील दरी वाढतच आहे. गावातील ते एकीचे, निकोप, प्रसन्नतेचे वातावरण कोठेही दिसत नाही. गावात गटातटाचे, जातीपातीचे राजकारण आज चालू आहे. ग्रामपंचायती तसेच विविध कार्यकारी सोसायटी, मार्केट कमेटी, साखरकारखान्यांच्या निवडनुकांमुळे माणसामाणतील अंतर इतके वाढले आहे की, ही माणसे आता कधीच एकत्र येणार नाहीत का ? असा प्रश्न कायम मनाला भेडसावतो.

गावागावात असे रोगट वातावरण का निर्माण झाले या मागची अदृष्य कारणे मात्र कुणाच्याही लक्षात येत नाहीत आणि ती शोधण्याचा कुणी प्रयत्नही करीत नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ग्रामअभियानातील याज्ञिकी विभागाला खूपच महत्वाचे काम करायचे आहे.

गावागावात हे जे उदासीन वातावरण तयार झाले आहे, त्या मागील प्रमुख कारण म्हणजे गावागावातील ग्रामदैवतांची दुरावस्था. गावाचे संरक्षण करणा-या देवतांची दुरावस्था झाल्याने ही संरक्षक देवता गावाचे रक्षण कसे करणार ? गावातील मंदिरांना भेटी दिल्या तर लक्षात येईल की मंदिरे जीर्ण होऊन त्यांची पडझड झाली आहे. मंदिरातील देवांच्या मूर्ती भग्र पावल्या आहेत, त्यांना तडे गेले आहे, मूर्तीचे हात, पाय, कान, नाक खराब झाले आहेत. भग्र मूर्तीचे विसर्जन करून नव्या मूर्तीची स्थापणा करणे, शक्य झाल्यास मंदिराचा जीर्णोद्धार करणे ही प्रमुख जबाबदारी याज्ञिकी सेवेक-यांवर आहे. अर्थात ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. यासाठी प्रथम सर्व गावक-यांची मनाची तयारी करून घेणे गरजेचे आहे व यानंतर आर्थिक नियोजन करावे लागेल. अर्थात सेवेकरी हा विधी जरी मोफत करणार असेल तरी लागणारा थोडाफार खर्च हा गावक-यांमधूनच उभा राहिल्यास या निमित्ताने प्रत्येक ग्रामस्थाचा सहयोग या अभियानास लागणार आहे.

अभियान राबविणा-या या याज्ञिकी सेवेक-यांनी प्रथम सरपंच व प्रमुख नागरिकांना या गोष्टीचे महत्व समजावून सांगावे व त्यांच्या माध्यमातून सर्व गावक-यांना अभियानात सामावून घ्यावे. ज्या ज्या गावात हा प्रयोग राबविण्यात आला तेथे खूपच चांगला परिणाम दिसुन आला आहे.ज्या ज्या गावात मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच भग्न मूर्तींचे विसर्जन करून नव्या मूर्तींची स्थापना करण्यात आली त्या त्या गावातील एकोपा वाढून नागरीक पुन्हा झाले गेले विसरून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. गावातील हे वातावरण कायम टिकावे म्हणून तेथे ग्रामस्थांना श्रीस्वामी समर्थ महाराजांची सेवा समजावून सांगणे, ती सेवा त्यांच्या कडून करून घेणे याबरोबरच कुलधर्म, कुलाचार यांची माहिती देणे, गावातील इतर अडचणी संकट यावर सेवा देणे, पंचमहायज्ञा सारख्या छोटया छोटया गोष्टी ग्रामस्थांना समजावून सांगणे, त्या केल्यानंतर त्यापासून मिळणा-या फायदयांची माहिती देणे, यज्ञ- याज्ञिकी पूजापाठ, याबाबत माहिती देणे, तसेच घरातील देव, देव्हारा याबाबत सुद्धा माहिती देणे अशा गोष्टी याज्ञिकी सेवेक-यांकडून अपक्षित आहेत.

घरातील देव, देव्हारा याबाबत सुद्धा गावक-यांमध्ये प्रचंड अज्ञान आहे. या साध्या सोप्या पण अत्यंत महत्वाच्या बाबी कुणीही सांगणार नसल्याने ते काम सुद्धा आपल्यालाच करावे लागणार आहे. अर्थात या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवामार्ग, श्री गुरूपीठाचे कार्य जनतेपर्यंत पोहचविण्याची संधी सुद्धा आपल्याला मिळणार असल्याने या संधीचा जास्तीत जास्त लाभ आपण घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ सेवामार्ग जे मानवकल्याण व राष्टकल्याणाचे कार्य करीत आहे ते या निमित्ताने जनतेपर्यंत पाहचवून जास्तीत जास्त लोकांना सुखी करायचे आहे, ही गोष्ट लक्षात ठेवावी. अधिक माहितीसाठी दिंडोरी दरबारशी संपर्क साधावा

आयुर्वेद विभाग

ग्राम अभियानातील हा एक विभाग आहे. या विभागात आयुर्वेद व आरोग्य असे दोन उपविभाग करता येतील. ५००० वर्षांपासुन आयुर्वेद हा भारतीय जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. परंतू मध्यंतरी परदेशी वैकाच्या मागे आम्ही धावलो आणि आमच्याच या प्राचिन शास्त्राचा आम्हाला विसर पडला. आम्ही इकडे ऍलोपॅथीच्या मागे धावत होतो तेव्हा अमेरिकेसारख्या प्रगत राष्टांनी आयुर्वेदावर वेगाने संशोधन करून त्याचा उपयोग आपल्या जनतेच्या स्वास्थ्य रक्षणासाठी कसा करता येईल याबाबत गांभिर्याने विचार करून या विचाराची अंमलबजावणी सुरू केली.

जेव्हा आयुर्वेदाच्या उपयुक्ततेबाबत पाश्चात्य राष्टे आम्हाला सांगू लागली तेव्हा मात्र आम्ही थोडेफार जागे झालो आणि पुन्हा आयुर्वेदाकडे वळू लागलो. आयुर्वेदास पुन्हा ते सुवर्ण युग प्राप्त व्हावे म्हणून श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातात. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून सेवा मार्गाच्या वतीने धन्वंतरी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले श्री गुरूकुल पीठात अनेक दर्जेदार व अल्पावधीत लोकप्रिय झालेली आयुर्वेदिक औषधींची निर्मिती केली जाते. श्री गुरूपीठाच्या आवारातच औषधी वनस्पतींची लागवड केली जाते तसेच येथे भव्य अशा पंचकर्म चिकित्सालयाची निर्मितीही केली जाणार आहे.

ग्रामअभियानात जे सेवेकरी सक्रीय होवून गावागावात जाणार आहेत प्रथम त्यांनी सेवामार्गातर्फे आयुर्वेद-आरोग्य विभाग काय करीत आहे याची माहिती गावक-यांना दयावी. श्री स्वामी समर्थ गुरूकुल पीठावर तयार होणा-या सर्व आयुर्वेदिक औषधाची माहिती गावक-यांना दयावी. स्वास्थ्यरक्षण व आजारापासून मुक्ति मिळविण्यासाठी या औषधांची उपयुक्तता सांगावी हे सांगत असतांनाच धन्वंतरी ग्रंथातील सर्व माहिती ग्रामस्थांना दयावी. सहज व अगदी स्वस्तात मिळणा-या या वनस्पतींमध्ये मोठमोठे आजार पळवून लावण्याची ताकद आहे, हे अनुभवावरून सिद्ध झाले आहे. घराघरात मिळणा-या हळद, ओवा, चंदन, तुळस, आवळा, हिरडा, बेहडा, सुंठ अशा शेकडो घरगुती औषधांचे औषधी गुणधर्म सागून त्यांचा वापर के ल्यास आयुर्वेदाचे महत्व आपोआपच जनतेच्या लक्षात येईल. आयुर्वेद व अध्यात्माचा संबंध समजावून सांगावा. लक्ष्मीकारक वनस्पती अनिष्ट झाडे, शुभ झाडे या बाबत माहिती देणे. शेतक-यांना आयुर्वेदिक वनस्पती तसेच वनौषधींची लागवड करण्यास तयार करावे.

आयुर्वेदास जोडूनच आपला आरोग्य विभाग काम करीत आहे या विभागाने आतापर्यंत अत्यंत चांगले काम केले आहे. खेडयापाडयात तर या विभागाशी संबंधीत सेवेकरी भरीव काम करू शकतात. गावातील स्वच्छतेपासून ते वैयक्तिक स्वच्छतेपर्यंत ग्रामस्थांना आरोग्याचे शिक्षण देणे गरजेचे आहे गावाची स्वच्छता पाण्याची स्वच्छता आहार विहार या सह प्रत्येकाची वैयक्तिक शारीरीक स्वच्छता या बाबत मार्गदर्शनाची गरज ओळखून ते देणे. यासाठी गरज पडल्यास तज्ञांना बोलावून त्यांचे व्याख्यान आयोजित करता येईल. गावात कायमस्वरूपी, साप्ताहीक किंवा दैनिक आरोग्य तपासणी (मोफत) ची सुविधा स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने देण्याचा प्रयत्न करणे, याबरोबरच सातत्याने रक्तदान शिबीरे आयोजित करून ग्रामस्थांना तज्ञांची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे. आरोग्य विषयक विविध शासकीय योजना राबविल्या जातात पण जनसहभागावाचून या योजनांना अपेक्षित यश लाभत नाही. ग्रामअभियानातील सेवेक-यांनी अशा योजनांची माहिती घेवून त्याचा उपयोग आपल्या अभियानासाठी होवू शकतो का ? हे सुद्धा पडताळून पहावे.

मराठी संस्कृती मराठी अस्मिता

आपल्या ग्रामअभियानातील मराठी अस्मिता, मराठी संस्कृती हा ग्रामीण भागाच्या दृष्टीने एक महत्चाचा विभाग आहे. आज मराठी अस्मिता, मराठी संस्कृती जी काही थोडयाफार प्रमाणात टिकून आहे ती ग्र्रामीण भागामुळेच, ही गोष्ट या विभागात काम करणा-या सेवेक-यांनी लक्षात घ्यायला हवी. आजच्या अत्यंत विपरीत निराशाजनक परिस्थितीत सुद्धा तमाम मानव जातीला मार्गदर्शन करण्याची ताकद, समर्थता फक्त भारतीय संत, महात्मे,थोर पुरूषांच्या कार्यातच आहे. हे समर्थ आदर्श कार्य मराठी भूमीतच घडले आहे. परंतू अध्यात्मास फक्त सोवळयापूरतेच मर्यादित केल्याने अम्हाला अध्यात्म, हिंदु संस्कृतीचा विसर पडून धर्माविषयी अज्ञान वाढले आणि अंधश्रद्धा फोफावत गेल्या. कुलधर्म, कुलाचाराचाही आम्हास पुर्णपणे विसर पडला त्यातच मोगल, इंग्रजांच्या सत्तेमुळे विचारहीनता वाढली यातून काही स्वयंघोषीत विदवान तयार झाले आणि त्यांनी स्वतःला विज्ञानाचे पाइक म्हणत अध्यात्म, धर्मावर टिकास्त्र सोडले. विज्ञानयुग आले, माणुस स्वतःला भौतीक सुखात हरवून बसला, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, कुलधर्म, कुलाचार सण- वार व्रत वैकल्याशी आमचा जणू काही संबंधच उरला नाही. ही भयानक परिस्थिती सदगुरू मोरेदादांच्या लक्षात आली. सदगुरू पिठले महाराजांच्या आशीर्वादाने मराठी अस्मिता व हिंदु धर्मास नवचैतन्य देण्याची अवघड जबाबदारी प. पू. दादांनी आपल्या शिरावर घेतली.

सण- वार- व्रत- वैकल्य हे मराठी संस्कृतीचे महत्वाचे अंग आहे. ग्रामअभियानासाठी आपण ज्या गावात जाल तेथे या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील हजारो केंद्रावर व जेथे श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे कार्यक्रम असतील तेथे आमच्या महिला सेवेकरी या प्रदर्शन मांडून सर्वांना या विषयाची माहिती देतात. या प्रदर्शनात गुढीपाडवा ते होळीपर्यंत सर्व सण-वार-व्रत-वैकल्याची प्रात्यक्षिकासह मांढडणी असतेच पण देव्हारा कसा असावा? कुलदेवी, कुलाचार, नैवे, रांगोळी,आर्थिकप्राप्तीसाठी काय करावे ? अशा छोटया माठया गोष्टींबाबत मार्गदर्शन केले जाते. आतापर्यंत भगिनिंनी जेथै जेथे हा उपक्रम राबवला तेथे तेथे उत्साहवर्धक प्रतिसाद जनतेकडून लाभला. या विभागात काम करणा-या महिला सेवेक-यांनी सणवार व्रत वैकल्याबरोबर इतर अनेक विषयांवर मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

मराठी अस्मिता आणि शिवराय, जिजाऊ या एकाच नाण्याच्या दोन बाजू ग्रामअभियानात, या विभागातील कार्यरत सेवेक-यांनी छत्रपती शिवरायाच्या जीवनकार्याचा अभ्यास करून तो गावक-यांपूढे ठेवावा. महिलांनी जिजाऊनी शिवरायांची केलेली जडणघडण गावातील महिलांना सांगावी.

प्रश्नोत्तरे

श्री स्वामी समर्थ सेवामार्ग वेगाने प्रसार पावत आहे. दररोज देशभरातून हजारो नवे सेवकरी नव्याने महाराजांच्या चरणी लीन होत आहेत. सेवामार्गाच्या प्रसाराचा हा जो वेग आहे. तो टिकून राहण्यामागील व वाढण्यामागील जी कारणे आहेत त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे प्रश्नोत्तरे, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून रोज हजारोंच्या समस्या सुटत असून रोज हजारो नवे लोक प्रश्न, समस्या घेवून सर्व केंद्रांवर येत आहेत. ग्रामअभियानात या विभागाचा अर्थातच समावेश आहेच. लोकांचे प्रश्न सुटले तर ते आपोआपच अभियानात व सेवामार्गात स्थिरावणार आहेत. हे पक्के लक्षात ठेवावे.

आपल्याकडे येणारा माणूस नवीन आहे. त्याला पेलवेल तो सहजपणे करू शकेल अशा सेवेने सुरूवात करा, त्याला खूप सेवा दिली तर त्याच्या मनात गोंधळ होतो व त्याच्याकडून सेवा होणार नाही. श्री स्वामी चरित्र सारामृत रोज ३ अध्याय, ११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्रजप, गायत्री, नवार्णव, महामृत्यंजय मंत्र, शिवमहिम्न, कालभैरवाष्टक अशी सेवा देवून त्याची मनस्थिती ओळखून श्री गुरूचरित्राबाबत सांगावे, कुलदेवी, कुलदेवतेबाबत सांगावे. आज सर्वांसमोर पुत्रप्राप्ती,संतती, विवाह, आरोग्य शिक्षण रोजगार, शेती, व्यापार, मनःशांती, कर्ज, व्यसने, पतीपत्नीतील वाद, बडतर्फी, प्रमोशन, कोर्ट कचेरी, वृद्धापकाळ, अध्यात्मात प्रगती, परदेश गमन, गंभीर संकटे, शत्रुंपासून पीडा, अशा विविध समस्या प्रश्न आहेत या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून प्रश्नोत्तर करणा-या सेवेक-याने प्रश्नोत्तर करावेत.

ग्रामअभियानात प्रश्नोत्तरे करणा-या सेवेक-यांनी लक्षात ठेवावे की महाराज तुमच्या नेहमी पाठिशी असतात. महाराजच हे कार्य करीत असतात. याची जाणीवही सारखी ठेवावी, ज्यावेळी प्रश्नोत्तर करणारा एखादा सेवेकरी प्रश्न विचारणा-याच्या एखाा जटील प्रश्नाने गोंधळून जातो त्यावेळी त्या सेवेक-याची महाराजांचे चरणी पूर्ण शरणागती व श्रद्धा असेल तर महाराजांचे स्मरण करताच कार्यक्रम सुचतो. सेवेकरी फक्त निष्ठावान सदाचारी असावा. थोडक्यात मी नाही हे काम महाराजच करतात अशी भूमीका सेवेक-याची असेल तर सेवेकरीही सेवामार्गात प्रगती करतो आणि जनतेचे प्रश्नही सुटतात. ग्रामअभियानासाठी आपण जेव्हा गावात जावू तेव्हा एखाा मंदिरात वा सार्वजनिक ठिकाणी प्रश्नोत्तरे करावीत. पुढील मार्गदर्र्शनासाठी दिंडोरी दरबारात बोलवावे.

वास्तुशास्त्र विभाग

कुटुंबातील वा घरातील सुख, समाधान हे त्या घराच्या रचनेवर अवलंबून असते. गावाची संपन्नता, सुख, समाधान हे सुद्धा गावाच्या रचनेवर अवलंबून असते. गावाची रचना वास्तुशास्त्रानुसार असेल तर ते गाव निश्चित सर्वदृष्टीने संपन्न असते.ग्रामअभियानात वास्तुशास्त्र विभागात काम करणा-या वास्तुतज्ञांनी गावात जावून गावातील प्रमूख नागरिकांना विश्वासात घेवून ग्रामरचना, मंदिरे, ग्रामपंचायत कार्यालय, सहकारी संस्था कार्यालय, शाळा, विहिरी पाणवठा, समाज मंदिरे, गावातील खळी अशा गोष्टींची पाहणी करावी. शेतक-यांना विशेषतः शेतीबाबत वास्तुशास्त्रदृष्टयाही मार्गदर्शनाची अत्यंत गरज असल्याचे लक्षात ठेवून ते करावे. अर्थात चुकीच्या वास्तुबाबत पर्याय सूचवावेत. गावक-यांना वैयक्तिकरित्या म्हणजे त्यांच्या घराची रचना कशी असावी याबाबत ढोबळमानाने मार्गदर्शन करावे. आपण सुरवातीसच वास्तुशास्त्राबाबत विस्तृत चर्चा केली किंवा बारीक सारीक माहिती देण्याचा प्रयत्न केला तर या बाबत आतापर्यंत अनभिज्ञ असणा-या गावक-यांच्या मनात गोंधळ होवू शकतो.

पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व ईशान्य, आग्रेय, वायव्य, नैऋत्य या दिशांना कोठे काय असावे. हे सांगा उदा. आग्रेयेस स्वयंपाकघर, ईशान्येस देवघर, वायव्येस बैठक, नैऋत्येस मालकाचे शयनगृह असावे. आग्रेय व नैऋत्य यांच्या मध्यभागी म्हणजेच दक्षिणेस संडास पूर्वेच्या भिंतीस स्नानगृह, उत्तरेस तिजोरी, पश्चिमेस हवा असल्यास ओटा अशी ढोबळ माहिती हवी. पूर्व ही इंद्राची, आग्नेय ही दिशा अग्रीची, दक्षिण यमराजाची, नैर्ऋत्य निर्ऋतिची पश्चिम वरूणाची वायव्य वायुदेवाची, उत्तर कुबेराची तर ईशान्य ही दिशा साक्षात भगवान शिवाची दिशा आहे. या प्रमाणे त्या त्या दिशेवर त्या देवांचे अधिपत्य असते. वास्तु बांधतांना ही गोष्ट लक्षात घेवूनच रचना करावी.

शेतीचे उत्पन्न वाढीसाठी, जनावरे उत्तम रहावीत म्हणून शेतीची, गोठयांची वास्तुशास्त्राप्रमाणे रचना कशी करावी हे मार्गदर्शन ग्रामअभियानांतर्गत वास्तुतज्ञांनी करणे अपेक्षित आहे. खेडयात शेतीप्रमाणेच छोटे-मोठे उदयोग करणारे अनेक व्यापारी असतात. त्यांनाही अनेक अडचणी असतात. त्यांना आपल्या दुकानाची, व्यापाराची जागा याची रचना कशी करावी याबाबत मार्गदर्शन करावे लागणार आहे. अर्थातच श्री स्वामी समर्थ महाराजांचे अधिष्ठान असल्याशिवाय अपेक्षित यश लाभणार कसे म्हणूनच अध्यात्मिक सेवेची जोड असायलाच हवी.

विवाह संस्कार विभाग

१३ एप्रिल ते १५ एप्रिल २००२ या कालावधीत नाशिकमध्ये श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने भव्य मानवकल्याण व राष्टहीत मेळावा संपन्न झाला होता. या तीन दिवसांच्या मेळाव्यात सेवामार्गाच्या वतीने अनेक तज्ञांनी विविध विषयांवर नागरीकांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याच्या निमित्ताने काही नवे प्रयोग सुद्धा करण्यात आले. लोकांच्या त्या उपक्रमाला प्रचंड उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे विवाह नोंदणी. विवाहेच्छुक मुलामुलींच्या नाव नोंदणीच्या विभागास प्रचंड प्रतिसाद लाभला व त्यापैकी अनेक विवाह संपन्नही झाले. तेव्हापासून नावारूपास आले आहे. येथे विविध विषयांवर सातत्याने संशोधन चालू असते व या संशोधनातूून त्या त्या गोष्टीचा समाजाच्या उद्धारासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. वर उल्लेख केलेल्या विषयांपुरताच हा विभाग नसून श्री गुरूपीठावर शेती, आयुर्वेद, आरोग्य, याज्ञिकी, बालसंस्कार, विवाह मंडळ, कायदेशीर सल्लामसलत, मराठी अस्मिता, स्वयंरोजगार अशा विविध विषयांवर सातत्याने प्रशिक्षण शिबिरे, चर्चासत्र, प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. या सर्व गोष्टींमुळे श्री गुरूपीठ सातत्याने गजबजलेले असते.

दिवाळी वउन्हाळयाच्या सुटटयांमध्ये बाल व युवासंस्कार शिबीराचे आयोजन न चुकता श्री गुरूपीठात होत आहे. ग्राम अभियानातील गावातील विार्थ्यांचा, पालकांचा शिक्षकांचा सहभाग मिळवायचा असेल तर या सर्वांना श्री गुरूपीठावरील शिबिरात सहभागी करून घ्यावे. संख्या मोठी असल्यास त्या गावातील श्री स्वामी समर्थ केंद्रात अथवा परिसरातील केंद्रात शिबिराचे आयोजन करता येईल. अशाच प्रकारे शेती, आरोग्य, आयुर्वेद, याज्ञिकी, विवाह मंडळ, मराठी अस्मिता, स्वयंरोजगार ज्या ज्या विषयात ज्यांना ज्यांना रस असेल अशा सेवेकरी व नागरीकांची वेगवेगळी यादी बनवून त्यांना प्रशिक्षण देता येईल.

आपण ज्या गावात हे अभिनव अभियान राबवीत आहोत त्या गावातील सरपंच, उपसरपंच प्रमुख नागरिकांना सेवामार्गाच्या मासिक बैठकीच्या निमित्ताने श्री गुरूपीठावर बोलावले तर त्यांना कार्याची व्यापकता व दिशा कळेल आणि ते दुप्पट वेगाने कामाला लागतील व आपले काम सोपे होईल. प्रशिक्षण विभाग म्हणजे ज्ञानदाना बरोबरच प्रात्यक्षिकांसह विषयाची सखोल माहिती देणारा विभाग आहे म्हणूनच हा एक महत्वाचा विभाग असून त्यांसमोर आव्हात्मक काम आहे.

कायदेविषयक सल्लागार विभाग

कायदा व सुव्यवस्था व कौटुंबिक जीवन यांचे मेळ घालणे, तसेच भगवद गितेचा अभ्यास करून भारतीय राज्यघटना सोप्या पद्धतीत समजावून सांगणे. ग्रामअभियानाअंतर्गत संबंधीत गावात काम सुरू झाले की तेथे निश्चितच अपेक्षित बदल जाणवू लागतील. असे झाल्यास तेथीत ग्रामस्थांना निश्चितच स्वामी सेवेची गोडी लागेल. ही ग्रामस्थ मंडळी आपल्या गावात श्री स्वामी समर्थ केंद्र स्थापण्याच्या दृष्टीने विचार करू शकतात. असा विचार त्यांनी केल्यास त्यांना कायदेविषयक सल्ल्याची गरज पडेल. मार्गाचा व्याप दिवसेदिवस वाढत दिवसेंदिवस केंद्रांची संख्या वाढतच आहे. राज्य राज्याबाहेर व देशाबाहेर केंद्रांची उभारणी होत आहे. केंद्राची जागा वा इतर गोष्टींबाबत नंतर काही कायदेशीर अडचणी उभ्या राहण्याएवजी केंद्र उभारणीच्या अगोदरच या अडचणी, अडथळे दूर करणे गरजेचे आहे. यासाठी दिंडोरी दरबारतर्फे तज्ञ वकीलांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हे तज्ञ आपल्याला येणा-या अडचणी दूर करून केंद्र उभारणीसाठी मदत करतील. सेवामार्गातील काम कायाच्या चौकटीतच व्हावे म्हणून हा विभाग प्रयत्नशील आहे.

ग्रामअभियानात सहभागी झालेल्या गावात केंद्र उभे करण्याचा विचार ग्रामस्थ करीत असतील तर त्या गावात आपल्या वकीलांना घेवून जावे वा तेथील प्रमुख नागरिकांसह सेवेक-यांना दिंडोरी दरबारात आणावे व पुढील नियोजन करावे.

स्वयंरोजगार विभाग

स्वयंरोजगाराद्वारे शासनाचे सोपे विचार सामान्य माणसांपर्यंत पोहचविणे तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून अत्यावश्यक गरजांना प्राधान्य देवून कमीत कमी खर्चात उदरनिर्वाह करणे याबाबत मार्गदर्शन करणे.

गाव हा विश्वाचा नकाशा । गावाहून देशाची परिक्षा । गावाची भंगता अवदशा । येईल देशा ॥

ही ओवी आहे राष्टसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील. गावाचे महत्व आपल्या साध्यासोप्या भाषेत वर्णन करतांना तुकडोजी महाराज म्हणतात की गाव ही देशाची छोटी आवृत्ती असते. म्हणजे तो देशाचा आरसाच म्हणायला हवा. गावाच्या एकंदरीत परिस्थितीवरून देशाच्या परिस्थितीबाबत अंदाज बांधता येतो. गावाची अवदशा झाली तर देशाची अवदशा झालीच म्हणून समजा. गाव भंगू दयायचे नसेल तर पर्यायाने गावाचा सर्व प्रकारे विकास घडवून आणण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.

आज गावांची स्थिती काय आहे, याबाबत आपणासर्वांनाच पुरेशी कल्पना आहे व त्याबाबत अधूनमधून चर्चाही होत असते. ज्यांना रोजगार नाही, शेतीवाडी नाही त्यांचे एकवेळ समजू शकते पण वडिलांची सुपीक शेती सोडून खेडयातील युवकवर्ग शहरांकडे, महानगरांकडे धाव घेत आहेत. शहरात येवूनही त्यांचे जीवनमान फार सुधारते असे नाही. तरीही शहराकडे धाव घेण्याच्या मानसिकतेमुळे खेडी ओस पडत आहेत. गावात शेतमजूरीच्या माध्यमातून काही प्रमाणात निश्चितच रोजगार उपलब्ध होतो पण हा रोजगार स्विकारण्याची तरूणांची तयारी नाही. शहरांकडे माणसांचे लोंढे धावत असले तरी आजही निम्याहून अधिक लोकसंख्येचे वास्तव्य खेडयातच आहे. या खेडयांच्या विकासावरच तेथील लोकांचा उत्कर्ष अवलंबून आहे अर्थात निरक्षरता, अडाणीपणा खेडयांच्या अवकळेमागील एक कारण प्रमुख आहे. श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे ग्रामअभियान या पार्श्वभूमीवर आगळेवेगळे व महत्वपूर्ण वाटत आहे. या विभागात स्वयंरोजगार हा एक विभाग कार्यरत आहे. विविध महानगरात सेवामार्र्गाच्या वतीने स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मिळालेल्या प्रचंड प्रतिसादावरूनच बेरोजगारीच्या प्रश्नाची तीव्रता जानवते. आज बेरोजगार तरूणांचे तांडे रोजगार, नोकरी मिळेल अशा अपेक्षेने पायपीट करीत आहेत. पालकांच्या मनातली घालमेल तर विचारायलाच नको.

घरात दोनं-दोन, तीन-तीन तरूण मुल, मुली कामधंदा न करता बसुन आहेत. या मुलांचे काय होणार ? या काळजी, चिंतेपाटी पालकवर्ग अस्वस्थ आहे. ही समस्या एका कुटुंबाची नाही तर ती समाजीची, गावाची व देशाची बनली आहे. राघरात अशी अस्वस्थता वाढली तर देशाचे काय होणार ? अशी भिती मनात उभी राहणे अगदी स्वाभावीक आहे. या समस्येची तिव्रता शहरे, महानगरांप्रमाणेच, गावातही सारखीच आहे.

गावातील श्रीमंत, गरीब, नोकरदार, कलावंत, शेतकरी, शेतमजूर, महिला, पुरूष या सर्वांनी ग्रामाोेगाच्या माध्यमातून ग्रामोद्धाराचे कार्य हाती घ्यायला हवे. गाव सर्वतोपरी समृद्ध सुखसोयीयुक्त झाले तर गावातील माणसे शहराकडे का जातील ? महात्मा गांधीनी सुद्धा अशाच समृद्ध खेडयाचे स्वप्न व त्या माध्यमातून समृद्ध भारताचे स्वप्न पाहिले होते.

५०-६० वर्षांपूर्वी व आजची परिस्थिती खुपच वेगळी आहे. त्यावेळी गावातील चांभार, कुंभार, न्हावी, लोहार, विणकाम करणारा, सुतार आपल्या मुलांचे पोट भरून समाधानी होता पण आज काय परिस्थिती आहे ? गावातील चांभाराकडून आज त्या गावातील कुणि चप्पल घ्यायला तयार नाही, शहरातील शू मार्ट मध्ये मिळणारी आकर्षक भपकेबाज चप्पल बूट सर्वांना हवे आहेत. परिणामी खेडयातील चांभारास पोट भरणे अवघड बनले आहे. आता या उदाहरणातील दान्ही बाजुंचा विचार आपण करू.

गावात आकर्षक,रंगीबेरगी व त्यामानाने स्वस्त मिळणारी चप्पल मिळत नाही म्हणून गावातील माणूस शहरात येवून चप्पल विकत घेतो. जर गावातील चांभाराच्या मुलाने थोडे धाडस करून थोडेफार कर्ज घेवून आपल्या धांत आधुनिकता आणली तर त्याला स्वतःला रोजगार मिळेल व त्याच्या कुटुंबाचे पोट भरेल आणि त्याला पोट भरण्यासाठी शहराकडे धावावे लागणार नाही. बी-बीयाणे, शेती उदयोगाचे सामान, खेळणी, शिवणकाम, लाकुडकाम, फळे विक्री, भाजीपाला विक्री , दूध संकलन विक्री, गांडुळखत निर्मिती, विटा बनवीणे, लोखंडी खिडक्या दरवाजे बनवणे, बेदाणे, मनुके तयार करणे, मसाला धान्य दळण, मिनी ऑईल मील, पशूखा, तेलाची घाणी, शेवया पापड तयार करणे, खारे शेंगदाणे तयार करणे, पोहे, चिक्की असे कितीतरी उदयोग तरूण मुल करू शकतात.

यातून उत्पादित माल गावात अथवा शहरातही आपण विक्री करू शकतो. येथे उदाहरणादाखल फक्त काही उदयोगांचा उल्लेख केला आहे. गावातील गरज ओळखून आपण स्वतःसुद्धा काही उदयोग करू शकतो पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आळस झटकून कामाला लागावे तरच उत्कर्ष होईल. आज सरकार कुणाकुणाला नोकरी देणार ? आणि प्रत्येकाने नोकरीमागे का धावावे ? स्वयंरोजगारासाठी सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न किती तरूण करतात ? अविश्रांत श्रमाची तयारी असेल तर गावाचे नंदनवन का होणार नाही ?

श्रीमंत-गरीब, सुशिक्षित-अशिक्षित, मालक-नोकर, शेतकरी-मजूर प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार काम केले तर गावाचा, देशाचा विकास उन्नती का होणार नाही ? मजूरांवर तर गावाची आर्थिक बाजू अवलंबून असते. मजूरांनी कामचुकारपणा केला आणि मालकांनी आळशीपणा केला तर देशाची अवस्थासुद्धा दयनीय होईल. सेवामार्गाच्या ग्रामअभियानात म्हणूनच श्रमनिष्ठा व श्रमप्रतिष्ठा वाढवण्यासाठी जनजागरण करण्याचाही प्रयत्न आहेच. ग्रामअभियानात स्वयंरोजगार विभागाचे काम जे सेवेकरी करीत असतील त्यांनी गावातील बेरोजगार युवकांची एक यादि बनवावीत्यात शिक्षण त्याची कामाबददलची अपेक्षा अशा सर्व गोष्टींची नोंद असावी. या युवकांनी दिंडोरी दरबार व श्री गुरूपीठातील स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे व त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.

श्री मोरे दादा समर्थ गुरू परंपरा

पूर्ण परब्रम्ह श्री गुरुराज दत्तांचा अवतार हा सत्ययुगातला. तिथून पुढे गुरुशिष्य परंपरा सुरु झाली. कोणतीही व्यक्ती जेव्हा एखाद्याला गुरु करते तेव्हा ती साक्षात दत्तगुरूंचीच शिष्य/भक्त झालेली असते. गुरु आपली ऊर्जा शिष्याला देतात आणि शिष्य ही ऊर्जा त्यांच्या शिष्याला. ही परंपरा अनादिकालापासून चालु आहे.

गुरू परंपरा

प पु श्री पिठले महाराज
    ।
प पु मोरे दादा
    ।
प पु गुरुमाउली

पिठले महाराजांनी गायत्रीची ३ पुरश्चरने म्हणजेच ३६ वर्षे तपश्चर्या केली..आणि आपल्या उभ्या आयुष्यात फक्त १ शिष्य घडवला. ते म्हणजे आपले परमगुरु प पु श्री मोरे दादा. आपले पूर्ण तेज आणि पूर्ण शक्ती मोरे दादांना दिली. दादांनी श्री दत्तवतारी सद्गुरु श्री स्वामी महाराजांची ध्वजपताका हातात घेतली आणि दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ ऊर्जा केंद्रांचा प्रवास श्री दत्तकृपेने सुरु झाला..या धर्मकार्यास सुरुवात दादांनी मोठ्या कष्टाने केली..दत्तशक्ती सहाय्य होतीच. त्यांनी रुजवलेल्या या वटवृक्षाचा आजचा विस्तार हा त्यांच्या परिश्रमांचा परिणाम आहे. तदनंतर परमगुरु श्री मोरे दादांनी ही पताका? प. पु. श्री श्रीराम (अण्णासाहेब) मोरे (प. पु. गुरुमाउली) यांच्या हातात दिली.
गुरुने आपली ऊर्जा शिष्याकडे दिली आणि शक्तिप्रवास अगणित प्रमाणात वेगवान झाला. कल्पना करा की हा मार्ग आणि महाराज तुमच्या आयुष्यात नसते तर काय असत तुमच आयुष्य? अगणित अनंत उपकार आहेत या 'देहरूपी दैवतांचे' संपूर्ण समाजावर..

प. पु. गुरुमाऊली सांगतात; 
"एक गोष्ट आपल्या नेहमी सांगतात व ती आपण आपल्या मनाला विचारा की आपले गुरु जे सांगतात ती आज्ञा प्रमाण समजून आपण गुरुआज्ञेच पालन करतो का खरच माउलिंवर प्रेम श्रद्धा असणे ठीक आहे पण त्यांच्या आज्ञेच नकळतपणे आपण पालन करत नाही याला काय म्हणावे. माउली साक्षात महाराज आहेत हे नक्की पण मग जर आपण त्यांचे शिष्य आहात तर त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण रोज ११ माळी जप श्री स्वामी समर्थ आणि ३ अध्याय श्री स्वामी चरितामृताचे वाचतो का? याचे अवलोकन करण्याची गरज आहे. माऊली आपल्याला आध्यात्मिक भौतिक सर्वकाही द्यायला तयार आहेत. पण ते घेण्याइतपत आपण आपली पात्रता बनवली आहे काय? महाराजांना माउलिंना भूषणावह होईल असे आपण वागतो काय? समर्थांच्या इच्छेत इच्छा मिळवून आपण जगतो काय? कोणत्याही सेवेकर्याची कळत / नकळतपणे "निंदा" करणार नाही. माझ्या वातावरणातल्या सज्जन दुःखिताची मी आर्ततेने सेवा करेन. जस माझ स्वामीमार्गामुळ कल्याण झाल तस समाजतल्या विविध घटकांना मी हा मार्ग दाखवेन."

सद्गुरू ब्र. भू. नारायणदास पिठले महाराज यांनी घडविले शिष्योत्तम, प. पु. सद्गुरू मोरे दादां

प. पू. सद्गुरू वाट पाहत होते, या मोरेदादा या आम्ही आपलीच वाट पाहत होतो, दैवीयोजनेप्रमाणे सद्गुरू मोरे दादांनी,पिठले महाराजांचे आज्ञेप्रमाणे, पंचायतन दरबार दिंडोरीला आणला, रक्ताचे पाणी करून, गाव, तालुका, शहर, जिल्हा, मिळेल त्या वाहनाने, मग गाडी, बैलगाडी, रेतीचा ट्रक असोत, 300 वर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू करून खऱ्या अर्थाने दुखीत, पीडित, मुमुशीत, अधिव्याधिग्रस्त, समस्याग्रस्त लोकांना स्वामी समजावून, त्यांची सेवा कशी करावी, योग्य मार्गदर्शन करून, मनाला धीर देऊन, भिऊ नकोस स्वामी पाठीशी आहेत, हा आत्मविश्वास सद्गुरू मोरेदादानी दिला, व सर्वसामान्य लोकांना स्वामी सेवेची परिणीती, अनुभव येउन लोकांची श्रद्धा, व निस्टां दृढ झाली, सद्गुरू मोरेदादानी दुरदृष्टीकोणातून सर्वसामान्य माणसाला स्तोत्र, मंत्र, अभिषेक, मग ते मृत्यू मार्गातून बाहेर काढून आणणारे तीर्थ कसे करावे, भगवान शिवाची उच्चकोटीची रुद्राची सेवा, त्रंबकेश्वर येथील गुरुजी कडून एका सामान्य सेवेकरीला शिकवून, सद्गुरू मोरेदादानी गुरुजींची दक्षिणा आपल्या हातातील आंगठी मोडून, दक्षिणा दिली, व उरलेल्या पैशातून मुद्रन साहित्य तयार केले, केवडेमोठे औदार्य सद्गुरू मोरेदादांचे, आज आपण जे पाचवे वेद श्री गुरुचरित्र, नवनाथ, स्वामी चारित्रासारमृत, नित्यसेवा वाचतो, केंद्रात पाच वर्षांचा मुलगी, मुलगा कालभैरवास्टक कंठस्ट करून न चुकता खड्या आवाजात म्हणतो, सद्गुरू मोरेदादानी माता, भगिनींना १०० टक्के आरक्षण देऊन, सर्व सेवा कारवी, मग ते श्री गुरुचरित्र असोत, कि मग आई भगवतीची सेवा श्री दुर्गा सप्तशती पाठ, ते सर्व श्रेय सद्गुरू मोरेदादाचे आहे, सदगुरु मोरेदादांचे अनेकोअनेक उपकार, या कोट्यवधी सेवेकरींवर आहेत, हे त्रिवार सत्य आहे, सद्गुरू मोरेदादांचे पुण्यतिथी गुरुवारी २६ एप्रिलला आहे, प्. पु. गुरुमाऊलीचे स्वप्न सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल १००० बेडचे सर्व सुविदानी परिपूर्ण असे हॉस्पिटल तेही सेवेकरींच्या कष्टाच्या एक एक रुपया जमा करून, सद्गुरू मोरेदादांचे खऱ्या अर्थाने सेवेकरींवर अनेक उपकार आहेत, अनेक जन्म घेऊन सुद्धा हे उपकार फेडता येणार नाहीत, खारीचा वाटा घेऊन सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल साठी आपली मेहनतिची कमाई एक सत्पात्री दान म्हणून या उपक्रमाला द्यावी, आमच्या सारखे करंटे फक्त घेत असतो, हि ती योग्य वेळ आहे, मनातील आत्मारामला साक्षी ठेऊन विचार करा, जर आपण सद्गुरू मोरेदादानी रक्ताचे पाणी करून हा सुवर्ण मार्ग दाखविला, व आपण ह्या मार्गात नसतो, तर आपण कुठे असतो एक क्षण विचार केला तर हात, पाय लटपट कारायला लागतात, ज्या दिवसाला, ज्या तारखेला, ज्या वर्षाला आपण ह्या सुवर्ण मार्गात आलोत, व आजच्या दिवसाला, आजच्या तारखेला, ह्या वर्षाला आपली प्रगतीचा आलेख बघा, आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती, आपल्या मुलं, मुलींची प्रगती, खऱ्या अर्थाने अनेको अनेक उपकार सद्गुरू मोरेदादांचे, प् पु गुरुमाऊलीचे आहेत, अनेक जन्म घेऊन सुद्धा कमी करू शकणार नाही, एवढ्यावर नाहीतर प् पु गुरुमाऊलींनी पुढील अनेक पिढ्याचा विचार करून आपले तेजोमय रूप आदरणीय गुरुपुत्र चंद्रकांत दादा, आदरणीय गुरुपुत्र नितीन भाऊ, आदरणीय गुरुपुत्र आबासाहेब याचे कडून सेवेकरींच्या ग्राम, नागरी अभियानातून सेवेकरींची प्रश्न सोडवत आहेत, केवडेमोठे दातृत्व, मातृत्व फक्त प् पु गुरुमाऊली करू शकतात, सेवेकरींसाठी किडनी, हृदय, मेंदू, नेत्र या मोठ्या आजाराचे उपचार ह्या सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल मध्ये व्हावेत, केवढे विशाल दृष्टीकोन, माझ्या सेवेकरी चे आरोग्य कसे चांगले राहील, व हॉस्पिटल मध्ये दवा व दुवा  माध्यमातून उपचार घेऊन, रडत आलेला सेवेकरी स्वामींच्या कृपेने निरोगी होऊन, हसत मुखाने या सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल मधून जाईल, तेजोनिधी सद्गुरू मोरेदादा व प् प् गुरुमाऊलीचे चिंतन करून आपापल्या परीने योगदान करून त्यांचा वरद हस्त असाच राहू द्या हि नम्र विनंती करूया.

जनसामान्यांना, सेवेकरी, कुटुंबियांना उत्कर्षाकडे, समृध्दीकडे, मोक्षाकडे नेणारे पुण्यपुरुष, प्रचंड सामर्थ्यवान, अपरंपार कर्तृत्वाचे आदर्श असे शिवतेज. श्री स्वामी समर्थांचेच तेजोवलय स्वरुप अर्थात सद्गुरु प. पू. मोरेदादा! ‘भक्त जन हृदयनिवासा श्री सद्गुरु प. पू. मोरेदादा’ स्वत:कडे कुणाचेही गुरुपद न घेता श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरुपदी मानायला शिकविले नव्हे तसा संस्कारच सेवेकरी बालकांवर केला.

आपल्या यशस्वी कृतीतूनच श्री गुरुप्रणीत मार्गाची संस्थापना केली. त्यांचे हे अनंत ऋणच समस्त मानव जातीवर असून, त्यांच्या निष्काम व नि:स्वार्थ कर्माची स्मृती चिरंतन प्रज्ज्वलीत राहून त्यांच्या शुभाशिर्वादाने, स्फुर्तीने, प्रेरणेने प्रेरीत होऊन आयुष्याची वाटचाल करावी.

सद्गुरु प. पू. मोरेदादांच्या चिरंजीव स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा दिवस विशेष उत्सवाच्या रुपात साजरा करावा. तेजोभारीत सद्गुरु प. पू. मोरेदादांचे चरित्र म्हणून साकारलेला ‘तेजोनिधी’ व ‘श्री गुरुगीता’ इ. ग्रंथांचे पठण करुन, सद्गुरुचरणी सेवेची पुष्पांजली समर्पित !

श्री स्वामी समर्थ महाराज केन्द्र यांचा जन सामान्यांना उपयुक्त  मार्गदर्शन.

१) घरात अधूनमधून गोमूत्र शिंपडा. 
गोमूत्र शिंपडताना 'अपवित्रा: पवित्रोवा सर्वावस्था गतोपिवा, यः स्मरेत्पुण्डरिकाक्षं सः बाह्याभन्तरः शुचि' या मंत्राचा मोठ्याने उच्चार करावा.फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ घाला. घराच्या कोपर्‍यात काचेच्या किंवा मातीच्या वाड्ग्यात खडेमीठ भरुन ठेवा. खराब झाल्यावर लगेच बदला.
२) घरात अपशब्द उच्चारु नका. सजीवांप्रमाणेच वास्तूला पण चेतना असते. घरात उचारल्या जाणार्‍या सर्व इच्छांना वास्तू तथास्तु म्हणत असते. अगदी रागाच्या भरातही लहान मुलांसाठीही घरात अपशब्द वापरु नका.
३) दरवाज्यासमोर दररोज रांगोळी काढा. पांढरी रांगोळी घालणार असेल तर त्यावर हळद कुंकू टाका. किंवा रांगोळीत आधीच हळद कुंकू मिसळून त्याने रांगोळी काढा. रांगोळी काढायचा कंटाळा आला असेल तर ऑईलपेंटने रांगोळी काढणे किंवा ओल्या कुंकवाने रांगोळी काढणे ई. प्रकार अज्जिबात करु नका. 
४) दररोज सकाळी उंबरठा धुवावा. शक्य झाल्यास त्यावरही गोमूत्र शिंपडावे. त्यावेळीही वर दिलेल्या मंत्राचा मोठ्या आवाजात उच्चार करावा. उंबरठ्यावर हळद कुंकू वहावे.
५) महत्वाच्या कामाला जाताना घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ओल्या कापडाने पुसावा.
६) दारासमोर सणासुदीला कल्याणकारी स्वास्तिके काढावीत. उंबरठ्यावर विड्याच्या पानाव्र अक्षता, नाणं व सुपारी ठेवावी.
७) घरात दररोज किमान दोन वेळा धूप जाळावा. उदबत्ती आणि कापूरही पेटवावे.
८) घरात पाटावर मंगल कलशाची स्थापना करावी.
९) संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही वेळ महत्वाची आहे. तिचे पावित्र्य राखा. शास्त्रकारांनी ही वेळ दिवाबत्तीची सांगितली आहे. विद्यार्थांनी या वेळेत संध्या करावी. संध्या जमत नसेल तर प्राणायम करावे. जेणेकरुन एकाग्रशक्ती वाढेल. आयुर्वेदात या वेळेचा उल्लेख 'प्रज्ञापराध' असा करण्यात आला आहे. या वेळेत शक्यतो अभ्यास करणं टाळावं. घन पदार्थ खाणे शक्यतो टाळावं. या वेळेत रडारडीची सिरीअल्स लावू नये.
१०) निरुपयोगी वस्तूंचा संचय करु नये. घरातील अडगळ ताबडतोब फेकून द्या.
११) काही दिवस घराबाहेर जाणार असाल तर घरात झिरोचा बल्ब पेटता ठेवावा.
१२) घरात 'रत्नाध्याय' करुन घ्या. यात नऊ रत्नं आणि स्वस्तिक यंत्र घरात निरनिराळ्या ठिकाणी विधीवत निक्षेप केली जातात. ग्रहांच्या शुभ लहरी घरात खेचून वैश्विक उर्जेचे संतुलन आणि संवहन करणारा आणि त्वरित्च फलदायी ठरणारा याच्यासारखा अन्य उपाय नाही. मात्र हा वास्तुशास्त्राच्या निष्णात अभ्यासकाकडूनच घेतला पाहिजे.
१३) चांदीचं निरांजन लावून (गाईच्या तुपाचे) घराच्या आग्नेय कोपऱ्यात दररोज सकाळी  ९ते ११ या वेळात ठेवत जावे. सकाळी साडेसहाच्या सुमारास पूर्वेला उगवणारा सूर्य साधारणपणे नऊच्या सुमारास पूर्व आग्नेयेला पोहचतो. यावेळात चांदीचे निरांजन तेथे ठेवल्यास चंद्रप्रवाहाचं(चांदीचं) संस्करण झालेल्या, आणि गायीच्या तूपामुळे शीतल अश्या प्रकाश लहरी, त्यानंतर यमस्वरुपात जाणार्‍या सूर्यकिरणांना नियंत्रित ठेवतात. घरातील ब्रम्हांड लहरी तप्त होऊ न देणं गरजेचं आहे. ते काम हे चांदीच उजळलेलं निरांजन करते.
१४) घरात फारच कटकटी होत असतील तर समईच्या तळाच्या गोलात शुभे छोटे शंख ठेवा. साजुक तुपाची निवळी व राईचे तेल याने समई प्रज्वलित करा. शंखातून प्रस्फुटित होणारा शंखाच नाद आणि समईच्या प्रकाश लहरी यांच्या संयोगाने ब्रम्हांड्लहरींना चालना मिळेल.
१५) पूजेच्या वेळी घंटानाद करा. घराच्या प्रत्येक कोपर्‍यात घंटानाद करणं गरजेचं आहे. अडगळीच्या ठिकाणी अधिक वेळ घंटानाद करा. घंटा वाजवताना "आगमनार्थ तू देवानाम् गमनार्थ तू राक्षसम्, कुर्वे घण्टारव तत्र देवता आल्हादकारम्" हा मंत्र मोठ्या आवाजात म्हणा. 
घंटानाद आणि शंखनाद यांचा त्रास अशुभ उर्जेला होतो. शंखनाद हा मंगलध्वनी आहे. जमल्यास दररोज शंखनादही करावा.
१६) घरात अपमृत्यू झाल्यास उदकशांती किंवा अपमार्जन विधी करुन घ्यावा.