नेपाळातील भटगाव येथील दत्तमंदिर

नेपाळातील भटगाव येथील दत्तमंदिर
भटगाव दत्तमंदिर

जगातील एकमेव हिंदुराष्ट्र म्हणून नेपाळची प्रसिद्धी आहे. राजधानी खाटमांडू भोवती अनेक हिंदू व बौद्ध देवतांचे दर्शन होते. मत्स्येन्द्राचे मंदिर, भैरवाचे मंदिर, कृष्णमंदिर, स्वयंभूनाथमंदिर इत्यादी देवतांचे दर्शन या नेपाळमध्ये होते. 

भटगाव म्हणजे भक्तपूर. मध्ययुगीन स्थापत्याचे आणि कलाकुसरीचे दर्शन येथे होते. येथील दत्तमंदिर एका झाडाच्या मुळाशी आहे. सन १४२७ मध्ये राजा यक्षमल्ल याच्या कारकीर्दीत हे मंदिर तयार झाले. पुढे पंचवीस, तीस वर्षांनी विश्वमल्ल या राजाने याची दुरुस्ती केली. मंदिराजवळ पुजाऱ्यांचा मठ आहे. जवळच गणपतीचे मंदिर आहे. 

खाटमांडू या राजधानीपासून पूर्वेस नऊ मैलावर भटगाव आहे. आनंदमय या राजाने हे गाव वसविले. येथील दत्तमूर्ती एकमुखी आणि द्विभुज आहे. नेपाळमधील अत्यंत जागृत असे हे स्थान आहे. भटगाव येथील दत्तात्रेयांमुळे या स्थानास महत्त्व आले आहे. दलादन ऋषींनी या ठिकाणी तपस्या केली आहे. एकदा गोरक्षनाथ येथे येऊन गेले. त्यांचा अनादर गावच्या लोकांनी केली. म्हणून त्यांनी अखंड जलवृष्टी केली. सर्वत्र पाणीच पाणी झाले. लोकांनी दलादनांना प्रार्थना केली. त्यांनी दत्तात्रेयांना विनंती केली, हीच ‘दत्तलहरी’ या नावाने प्रसिद्ध आहे. दत्तांच्या कृपेने येथील जलवृष्टी कमी झाली आणि पीकपाणी चांगले आले. याची आठवण म्हणून भटगाव येथे ‘दत्तात्रेयांचे’ स्थान निर्माण झाले. 

भक्तापुर, नेपाळ येथे असलेलं दत्तमंदिर
भक्तापुर, नेपाळ येथे असलेलं हे दत्तमंदिर

भक्तापुर, नेपाळ येथे असलेलं हे दत्तमंदिर १५ व्या शतकात बांधले आहे. या मंदिराचे वैशिष्ठ्य असे की, ते एकाच झाडाच्या लाकडात बांधले आहे. मंदिराच्या भव्यतेवरुन ते झाड किती अवाढव्य असेल याची कल्पना करणं अशक्य आहे.