श्री आत्मतीर्थ पांचाळेश्र्वर

स्थान: आपेगाव औरंगाबाद बीड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरीचे किनारी गेवराई तालुका जि. बीड. (महाराष्ट्र) 
सत्पुरूष: श्री दत्तात्रय प्रभू
विशेष: श्री दत्तप्रभूंचे भोजन स्थान, महानुभाव पंथ पीठ 

श्री आत्मतीर्थ पांचाळेश्र्वर
श्री आत्मतीर्थ पांचाळेश्र्वर

हे स्थान पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ महानुभव पंथांचे पवित्र व श्रेष्ठ दत्तस्थान आहे. हे दत्तप्रभुंचे भोजन स्थान. हे स्थान परमपावन गोदावरी नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेले आहे. या ठिकाणी श्री दत्तप्रभूंची चरणकमले रोज नियमाने लागतात. तेच हे आत्मतीर्थ. येथील कणकण व अणुरेणु श्रीप्रभुंच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तुला पावित्र्य व इतिहास आहे.

आज गंगातीराच्या परिसरात मध्यभागी असलेल्या श्रीप्रभूंच्या भोजनस्थानी एक भव्य मंदीर बांधण्यात आलेले आहे. त्यामुळे या क्षेत्राचे महत्त्व द्विगुणीत झालेले आहे. हे आत्मतीर्थ स्वयंसिद्ध आहे.

कवि कृष्णदास म्हणतात,

या लागी परमेश्वर चरणांकित । तेमोक्षदायक तीर्थ ॥
तयामाजी आत्मतीर्थ । मुक्ती आणि भुक्तीचे दायक ॥
आत्मतीर्थासम नाही तीर्थ । जे स्मरणमात्रे सर्व पातक क्षयो करी ॥
चोरी, सुरापान मित्रद्रोह । ब्रह्महत्या गुरूद्रोह ॥
आणिक महापातके समूह । जाती आत्मतीर्थी स्नाने ॥
जरी आत्मतीर्थी स्नान घडे । तरी बहु जन्मार्जित पापसंग बिघडे ॥
पुण्यरूप जन्म होय रोकडे । जनामाजी ॥
जे दत्तात्रयांचे निरंतर क्रीडा स्थान । आत्मतीर्थ म्हणिजे महातीर्थ गहन ॥

श्री पांचाळेश्र्वरचे विशेष महत्त्व महानुभावीय दत्तभक्तांना आहे. 

श्री आत्मतीर्थ पांचाळेश्र्वर
श्री आत्मतीर्थ पांचाळेश्र्वर

पाचांळेश्वर या स्थानास आत्मतिर्थ का म्हणतात ?

जानोपाध्यांना स्वामी या तिर्थाचे महत्त्व सांगताना म्हणतात, "या स्थानाचे महत्त्व वेगळेच आहे. श्रीदत्तात्रय प्रभूचा नित्यसंबंध आहे. श्रीदत्तात्रय प्रभू रोज दुपारी प्रत्यक्ष भोजन स्वीकारण्यासाठी येत असतात. 

पूर्वी त्रेतायुगात कुसुमावती नगरीत देवश्रवा नावाचे ऋषी राहत होते. त्यांना आत्मऋषी नावाचा पुत्र होता. देवश्रव्यानेअतिशय भावपूर्वक उपासना करून श्रीदत्तात्रय प्रभूनां प्रसन्न केल्यामुळे ते त्याच्या घरी प्रगट झाले. देवश्रवा श्रीदत्तात्रय प्रभूच्या भजनपूजनात मग्न असताना त्याच्या शिष्य पाचांळराजा आपल्या गुरूच्या भेटीला आला असता त्याला तेथे श्रीदत्तात्रय प्रभूंचे दर्शन झाले.

देवश्रव्याने अतिशय भावपूर्वक उपासना करुन, विनवुन श्रीदत्तात्रेय प्रभूनां पंचाळेश्वरला आपल्या राजसदनी आणले. पाचांळराजाने श्रीदत्तात्रेय प्रभूनां राजसिहांसनी बसवून त्याचीं षोडशोपचारे पूजा केली. आणि अनेक प्रकारची स्तुतीस्तवन करुन त्यानीं श्रीदत्तात्रेय प्रभूनां विनंती केली, "हे आर्तदानी भक्तवत्सला माझी सगळी चितां नष्ट करुन माझा पुनर्जन्म चुकवावा."

"हे धर्मशील राजा, आम्हाला तुझ्या हातून काही महत्वपूर्ण कार्य करवून घ्यायचे आहे. त्यानंतर मात्र आम्ही तुला चिरायुपद प्राप्त करुन देवू. तोपर्यंत राज्यवैभवाचा उपभोग घे" असे आश्वासन देवुन श्रीदत्तात्रेय प्रभू तेथून निघून गेले. त्याच काळात पुलस्ती ऋषींच्या कुभं आणि निकुभं या पुत्रद्वयानीं अतिशय धुमाकूळ घातला होता. ते कोणालाच जुमेनासे झाले. राजाचां पराभव करुन ते नगरेच्या नगरे उध्वस्त करीत होते. ऋषीमुनीचें तर ते जणु कर्दनकाळच होते. तेव्हा अंबानगरीत वासतव्यास असलेल्या देवश्रवापुत्र आत्मऋषीला कुभ-ंनिकुंभाची ही दुषकृत्ये पाहुन फार राग आला. ते पंचाळेश्वरास जाउन गाऱ्हाणे करीत पाचांळराजाला म्हणाले, "हे प्रतापसूर्या, तरी तू या राक्षसबंधूचा समाचार घे."

श्री क्षेत्र पांचाळेश्वर- दत्त महाराज रोज येथे मध्यांन भोजन करतात
श्री क्षेत्र पांचाळेश्वर- दत्त महाराज रोज येथे मध्यांन भोजन करतात

पाचांळराजाने आत्मऋषीच्यां निवेदनानुसार आणि श्रीदत्तात्रेय प्रभूच्यां आदेशानुसार कुभं-निकुंभाशी घनघोर युध्द करुन त्यानां ठार मारले. जनता व ऋषीमुनी भयमुक्त झाले. परंतु, कुभं-निकुभं दैत्य असले तरी पुलस्तीचे पुत्र असल्याने आपणास ब्रह्महत्येचे पातक लागले असे पाचांळराजाच्या मनात विकल्प उभा राहीला. तेव्हा आत्मऋषीने धावा करुन श्रीदत्तात्रेय प्रभूनां प्रसन्न केले. श्रीदतात्रेय प्रभू तेथे प्रगट झाल्यानंतर पाचांळराजा विनंती करीत म्हणाला, "हे प्रभो, पुलस्तकुलाचे नाश करण्याचे महापाप माझ्या हातून घडले आहे. तरी मला या ब्रह्महत्येच्या दुर्धर पापातून मुक्त करावे."

श्रीदत्तात्रेय प्रभू पाचांळराजाला अभय देत म्हणाले, "राजा, घाबरु नकोस. आम्ही तुला या पातकातुन मुक्त करुन आमचे अक्षयपद प्रदान करु. तरी धनुष्य सज्ज करुन पाताळातून अग्रोदक काढ." पाचांळराजाने बाण मारुन पाताळातून पाणी काढले. आत्मऋषीने त्या उदकाने श्रीदत्तात्रेय प्रभूचें श्रीचरण प्रक्षाळण केले व ते चरणोदक पाचांळराजास दिले. ते प्राशन केल्याने पाचांळराजा ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला त्यामुळे त्या तीर्थास आत्मतीर्थ असे म्हटले जाते.
                 
पाचांळराजाला पापमुक्त करुन श्रीदत्तात्रेय प्रभु प्रयाण करणार तितक्यात आत्मऋषींनी श्रीदत्तात्रेय प्रभूचें श्रीचरणकमल घट्ट धरुन विनंती केली. "देवाधिदेवा दयासागरा, आपण रोज दुपारचे भोजन आपण या आत्मतीर्थावर येऊन स्विकारावे .माझ्या लेकराचा एवढा लळा पुरवावाजी."
श्रीदत्तात्रेय प्रभु प्रसन्नतापूर्वक 'तथास्तु' म्हणूण निघून गेले. आत्मऋषींच्या विनंतीला मान देऊन श्रीदत्तात्रेय प्रभू तेव्हापासून आजतागायत रोज भोजनासाठी आत्मतीर्थी येत असतात. त्यामुळे त्याच्यां नित्यसंबंधाने ते स्थान विशेषच वंदनीय झाले आहे. 

श्री आत्मतीर्थ पांचाळेश्र्वर
श्री पांचाळेश्र्वर
श्री आत्मतीर्थ पांचाळेश्र्वर
श्री आत्मतीर्थ पांचाळेश्र्वर मंदिर