स्थान: श्री केशवानंद सरस्वती तांबे स्वामी महाराज कुटी व श्री दत्त मंदिर
स्थळ: इन्दूर येथील वैशाली नगर, इंदूर
सत्पुरुष: प. पु. केशवानंद सरस्वती व प. पु. वासुदेवानंद सरस्वती स्वामी.
इन्दूर येथील वैशाली नगर अन्नपूर्णा रोड मुख्य रस्त्यावर श्री तांबे स्वामी महाराज कुटी व श्री दत्त मंदिर स्थापित आहे. हीच ती जागरुत तपोभूमी जिथे श्री केशवानंद सरस्वती तांबे स्वामी महाराजां नी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजां ना आळवल अर्थात त्यांची निःस्वार्थ पणानी प्रेमाने भक्ति केली.
ही जागा जोशी परिवाराची आहे. १९४४ मधे जेव्हा श्री तांबे स्वामीं ना पळासा क्षेत्रा हुन आपल स्थान हलवाव लागलं तेव्हा आबा जोशीं च्या ह्या बागेत ते तिथुन इथे कुटीत राहण्यास आले. जेव्हा तांबे स्वामी इथे राहु लागले तसेच या भुमिस अतिशय उर्जित अवस्था आली. जोशी, भागवत, शिणोलीकर, करमळकर, भिसे परिवार, नाना दण्डे, आपटे, बाबुलाल असे असंख्य परिवार स्वामींच्या दर्शनास येत असत. ही सर्व मंडळी तर येत च असत पण इथे च इंदिरा माँ साहेब होळकर पण स्वामींचा दर्शनास येत असत. भजनी मंडळ येत असत. काही भक्त तर स्वामींन कडुन विविध विघा शिकण्यास येत असत.
१९४८ मधे स्वामींच्या निर्वाणा नंतर पण भक्त मंडळी चा इथे व्यवस्थित रित्या चालुच होता. ह्या कुटीतच एकदा शंकराचार्य आले व ह्या भक्तांना आशीर्वाद चन दिला की इथे असेच मिळुन मिसळुन निःस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करा.
स्वामींच्या निर्वाणा नंतर अण्णा भाट्यांना इथे दत्त मंदिरा ची उभारणी करा असे स्वप्नात येउन आज्ञा केली होती. थोडी फार मंदिराची उभारणी झाल्या वर १९९२ साली श्री अवधूत जोशी ह्यांच्या मुळे खरे सुंदर श्री दत्त मंदिरा ची उभारणी झाली. त्या साली श्री अवधूत जोशी ह्यांनी कुटीत बसुन सतत बावन वेळेस गुरुचरित्रा चे पारायण केले मगच मंदिरात श्री दत्तांच्या मूर्ति ची प्राण प्रतिष्ठा केली गेली.
मुख्य दारातुन आत गेल्यास समोर श्री दत्तां ची सुंदर पांढरी तेजस्वी संगमरवरी चकचकीत मूर्ति . मूर्ति पाहताच आपल भान च हरपत. मूर्ति काय म्हणायचे साक्षात श्री दत्त च उभे आहेत. आतल्या गाभार्यातून आपल्या भक्तांन करताच व भक्तांचे मनोरथ पुरविण्यास समोर उभे आहे.
बाहेर निघून दत्त मंदिरा च्या मागल्या बाजुस आहे श्री स्वामी महाराज कुटी. तांबे स्वामीं नी ह्याच जागेत आपले गुरु महाराज श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजां ची निव्वळ, स्वच्छंद, प्रेमळ भक्ति केली. कुटीत आत देवघरात श्री स्वामी महाराजां ची गरुडेश्वर हुन आलेली मूर्ति आहे व तांबे स्वामींचा मोठा फोटो आहे. अति श्रध्दे नी आत देवघरात कडक सोहळ्यात पूजा होते. कुटीतील श्री टेंबे स्वामीं च मोठ painting म्हणा, देव घरातील त्यांची मूर्ति म्हणा किंवा श्री तांबे स्वामीं चा मोठ्ठा फोठो म्हणा हे साक्षात दोघे समोर बसले आहे, हेच सारखे जाणवते. ह्या कुटीत ह्या दोघांन च्या सानिध्यात जणु मायेची सावली च लाभते. आपल्या ह्या मानवी जीवनाच्या प्रवासात किती ही संकटे असली तरी ही,ह्या कुटीत येउन बसल्यास स्वामी महाराज सर्व सहन करण्यास बळ देत असतात.
ह्या जागेत चहु दिशेस तांबे स्वामीं नी श्री शंकरा ची लिंगे स्थापित केली. ह्या लिंगाची ची त्यांनी नावे ठेवली होती. बिल्वेश्वर, गरुडेश्वर, विश्वेश्वर व नर्मदेश्वर. आवळे, औदुंबर, अश्वत्थ इत्यादी वृक्षे ही लावली. ह्या अश्वत्था ची तर मुंज देखील केली. स्वामी सतत ह्या औदुंबरा पाशी च बसत असत. त्यांनी ह्या कुटीत गणेशां ची पण भरपूर आराधना केली.
ह्या कुटी च्या बाहेर अश्वत्थ व औदुंबराची तर छटा च निराळी आहे. ह्या औदुंबरात तर साक्षात श्री दत्त वास करत आहे व आपल्या भक्तांना आपला सहवास व आपल्या अस्तित्वाची चाहुल देत असतात.
आज ही इथे सर्व नियंमाने व व्यवस्थित रित्या पालन होतं. गुरुपौर्णिमा, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजां ची पुण्यतिथी व तांबे स्वामी महाराजां ची पुण्यतिथी अति उत्साहाने साजरी केली जाते. दत्त जयंती चा उत्सव तर काय सांगावा. ७-८ दिवसांन चा मोठ्ठा उत्सव साजरा केला जातो. दुरुन मोठे कलावंत स्वामी महाराजां च्या चरणीं स्वराभिषेक करण्यास येतात. कुटी व मंदिर खुप सजवले जाते. फार चैतन्यमयी आगळी वेगळी छटा असते. अजून काय वर्णन करु मी ह्या पावन, शांत, रम्य स्थळाचे. किती ही लिहिलं तरी ह्या स्थळा च माहात्म्य सांगण्यास माझे हे शब्द कमीच पडणार.
श्री टेंबे स्वामी म्हणु किंवा श्री तांबे स्वामी म्हणु हे दोघे सतत ह्या कुटीत, ह्या मंदिरात, ह्या औदुंबरात, ह्या परिसरात सदैव आपल्या भक्तांन चा संभाळ करण्यास विराजमान आहेत. निखिल दृश्य सतत स्वामी दिसो.
शब्दांकन, श्री दत्त भाविक मंडळ तर्फे
वैशाली मुळे
इन्दूर