कुंडलिनी शक्ती जागृती  (शक्तिपात दीक्षा) 

कुंडलिनी
कुंडलिनी  शक्ती 

कुंडलिनी ही एक शरीरात वास करणारी शक्ती आहे. निरनिराळ्य़ा लोकांना तिचा साक्षात्कार निरनिराळ्या प्रकारे झाल्याने तिच्या व्याख्या नानाविध प्रकारांनी केल्या आहेत. तंत्रसाहित्यात कुल व अकुल हे शब्द शक्ती व शिव वाचक आहेत. कुलकुंडलिनी वा कुंडलिनी म्हणजे वेटोळ्या घातलेल्या स्वरूपातील शक्ती. या शक्तीचे चित् व अचित् असे दोन भेद आहेत. चित् शक्ती आत्म्याशी अभिन्न स्वरूपात राहते. अचित् शक्ती जगत प्रकाशित करते. ही कुलकुंडलिनी शरीरात सुप्त अवस्थेत असते. कुंडलिनी शरीरात मुलाधार चक्रात गहन निद्रेत असते. सहस्रारचक्रात वास करणार्या शिवापाशी मुलाधारचक्रात वास करणार्या निद्रित कुंडलिनीला जागृत करून नेणे हे योग्याचे ध्येय.

ही कुंडलिनी जप, तप, ध्यान, कीर्तन, भक्ती, ज्ञान, कर्म, मुद्रा, बंध, शक्तिचालन, प्राणायाम, शक्तिपात इ. प्रकारांनी जागृत होते. हठयोगातील प्राणायाम व बंध यांचा कसा उपयोग केला जातो याचा थोडासा विचार पुढे केला आहे.साधे एक, दोन, तीन शिकावयास गुरू लागतो. तेव्हा इथे गुरूची व कठोर परिश्रमाची नितांत गरज आहे. इथे आपण फक्त प्राथमिक माहिती बघणार असल्याने अत्यंत थोडक्यात काही गोष्टींची नोंद करू.

प्राणायाम

श्वासोच्छ्वासावर प्रभुत्व मिळवणे. पूरक (बाहेरचा वायू नासापुटाने उदरात भरून घेणे), कुंभक (पूरकाने आत घेतलेला वायू उदरात धारण करून ठेवणे) , रेचक (उदरातील वायूला नासापुटाने बाहेर सोडणे) व यांमधील विराम म्हणजे प्राणायाम. श्वास घ्या, थोडा वेळ थांबा, श्वास सोडा, थोडा वेळ थांबा, परत श्वास घ्या ही प्रक्रीया. यातील निरनिराळे प्रकार म्हणजे उदा. एका नाकपुडीने श्वास घ्रेऊन दुसर्या नाकपुडीने सोडणे. ही शारीरिक प्रक्रीया झाली. याला म्हणावयाचे अगर्भ प्राणायाम. जर आपण प्रणवाच्या मात्रांचे, पूरकाच्या वेळी "उ"चे कुंभकाचे वेळी "म्" चे व रेचकाचे वेळी "अ"चे ध्यान केले तर तो झाला सगर्भ प्राणायाम. प्राणायामाने आरोग्य सुधारते, अनेक रोग बरे होतात, आयुष्य वाढते असे शारीरिक फायदे होतात व वृतीला स्थिरपणा येतो,चांचल्य कमी होते, रज-तम वासना कमी होतात, सत्व गुणाचा प्रकाश पसरतो असे आध्यात्मिक लाभ होतात. हठयोगात नाडीशुद्धी हा एक मोठा फायदा. नाडीशुद्धी झाली व चित्ताची एकाग्रता साधता आली की साधकाला अनाहत नाद ऐकू येऊ लागतो. तबल्यावर थाप मारल्यावर जो आवाज येतो तो आहत, "ठोकल्याने", तार "छेडल्याने" आलेला नाद. अनाहत नाद अशा कोणत्याही आहताने निर्माण झालेला नसतो. हा अनाहत नाद तुम्हाला ऐकू येऊ लागला की तुम्ही तुमच्या लक्षाच्या जवळ आला आहात असे समजावे. अशी समाधी म्हणजे नादानुसंधानी समाधी. या मार्गावर पोचण्यास प्राणायामास यम-नियम-ध्यानादिंची जोड आवश्यक असते.

बंध

कुंभकाचे वेळी प्राणनिरोध करीत असतांना नवद्वारांपैकी काही द्वारे बंद करावयाची असतात. त्या वेळी या बंधांचा उपयोग होतो. शरीरातील एखाद्या विशिष्ट भागातून वायू खेचून दुसर्या एखाद्या भागात स्थिर करण्या साठी बंधांचा वापर होतो. हठयोगात "बंधां" ना फार महत्व आहे. प्राणायामाने प्रभुत्व मिळवलेला प्राणवायू आपल्याला पाहिजे तेथे, पाहिजे त्या नाडीत नेणे, तेथे तो थांबविणे हे या बंधांचे काम. निरनिराळ्या आसनांत हे करतात. शरीरातील वायूंवर विजय मिळवूवच त्यांच्या सहाय्याने कुंडलिनीला जागृत करावयाचे असल्याने बंधांचा अभ्यास अनिवार्य आहे.आपण तीन बंध बघणार आहोत

जालंधर बंध

कंठाचा संकोच करून हनुवटीला छातीच्या वरच्या बाजूस कंठाजवळ असलेल्या आडव्या दोन्ही हाडांच्या मध्यभागी दाबून धरावे म्हणजे जालंधर बंध होतो.कंठस्थानी असलेल्या शिरांचे जाळे बांधले जाते म्हणून याला जालंधर बंध म्हणतात.आणखी एक विचार. मूर्धस्थानी असलेल्या पूर्णचंद्रातून स्त्रवणारे अमृत देहाच्या मध्यभागी आले की जाठराग्नीने शुष्क होऊन जाते. याच कारणाने देह लवकर जीर्ण होतो. जालंधर बंधाने अमृत सरळ पचन मार्गात न उतरता सर्व शरीरभर पारते व योग्याचा देह लवकर जीर्ण होत नाही. (योगी काही शतके जगू शकतो याचे कारण?)

उड्डियान बंध

हा बंध उदरस्थानी करावयाचा असतो. नाभिस्थानाचा खालचा भाग व वरचा भाग अशा या दोनही भागांचा संकोच करून पोटाला पृष्ठ्वंशाकडे खेचून घ्यावे. पाठीला पोक येऊं न देता सर्व शरीर ताठ ठेवावे. यालाच उड्डियानबंध म्हणतात. या बंधाने पोट नेहमी साफ राहते. ज्याचे पोट साफ़ त्याचे आरोग्य उत्तम. याला "मृत्युमातंगकेसरी" म्हटले आहे व याच्या अभ्यासाने "वृद्धोsपि तरुणायते" वृद्धही तरुण होतो असे म्हटले आहे. उड्डियान बंधाने प्राण, अपान,व्यान,उदान व समान या पाचही वायूंची कार्ये सुव्यवस्थित होत असल्याने शरीराचे सर्वांगिण आरोग्य सुरक्षित रहाते म्हणून "सर्वेषामेव बंधानामुत्तमोह्युड्डियानक:" असा याचा गौरव केला आहे.

मूलबंध

सिद्धासनात सांगितल्याप्रमाणे डाव्या पायाची टाच सीवनीच्या (उपस्थ व गुदद्वार यांच्यामध्ये असलेली शीर) मध्यभागी दाबून बसवावी. गुदद्वाराचे अधिकात अधिक आकुंचन करूनपान वायूला वर खेचावे. शरीर ताठ ठेवावे. दृष्टि नासाग्री असावी. मूलबंधाने अपान वायू हा उर्ध्वगामी होत असतो. अनाहत ध्वनी अभिव्यक्त होण्यास मूलबंधाचा चांगलाच उपयोग होत असतो. आपण नेहमी श्वासोच्छ्वास करतो तेव्हा डाव्या व उजव्या नाकपुडीतून आत येणारा वायु ईडा व पिंगला नाडीतून प्रवास करत असतो. प्राणायामाच्या अभ्यासाने व बंधांच्या उपयोगाने आपण ही नैसर्गिक क्रिया बदलून टाकतो. आता ईडा व पिंगला यांचा वापर बंद करावयाचा आहे .त्या ऐवजी सुषुम्ना नाडीतून प्राणवायू न्यावयाचा आहे. पण सुषुम्नाचे तोंड तर बंद असते. ते उघडण्यासाठी प्रथम बंधांच्या सहाय्याने उर्ध्वगामी, वर जाणारा प्राणवायू खाली वळवावयाचा व मूलबंधच्या उपयोगाने खाली सरणारा अपान वायु उर्ध्वगामी करावयाचा. प्राणवायू व अपानवायू यांचा संगम नाभीच्या अधोभागी होतो. त्यांच्या समागामाने स्वाधिष्ठानचक्रातील व मणीपूरचक्रातील अग्नी प्रदिप्त होतो. ह्या अग्नीच्या तापाने कुंडलिनी जागृत होते व सुषुम्ना नाडीचे तोंड उघडते. प्राण व अपान सुषुम्ना नाडीतून वर जाऊ लागले की नाद उत्पन्न होतो. तोच अनाहत नाद. वर लिहले आहे की अनाहत नाद ऐकू येऊ लागला की समजावे की तुम्ही ध्येयाच्या जवळ पोचला अहात. तुम्ही त्यापासून मिळणार्या आनंदात बेहोष होता. अनेक संतांनी या अनाहत नादाबद्दल रम्य अभंग लिहले आहेत. आता सुषुम्ना नाडीचे तोंड उघडले आहे, कुंडलिनी जागृत झाली आहे व ती आता आपले मूलाधार चक्रातील स्थान सोडून वर सह्स्रारचक्राकडे निघाली आहे. पुढील भाग मी रुक्ष गद्यात सांगणार आहेच पण माझा आग्रह आहे की आपण तिच्या प्रवासाचे वर्णन श्री माउलींच्या शब्दात वाचावेच. गीतेत कुंडलिनीचा उल्लेखच नाही पण या बालयोग्याने अध्याय ६ मध्ये आपल्या नाथपंथातील विचार मोठ्या रसिकपणाने मांडले आहेत.

कुंडलिनी

मुलाधार चक्रात अचित् शक्ती सर्पासारखे साडेतीन वेटोळी घालून अधोमुख निजलेली असते. आता ती प्राण-अपान वायूंच्या संयोगाने निर्माण झालेल्या अग्नीच्या तापाने जागृत होते. सुषुम्ना नाडीचे तोंड उघडले गेलेले असल्याने ती त्या नाडीत प्रवेश करते व वर सहस्रारचक्रात जाण्यास प्रवृत्त होते. तिच्या बरोबर प्राणवायू व साधकाचे मनही असतात. तिचा मार्ग तेव्हढा सुकर नाही. तिला जातांना वाटेतील षटचक्रांमधून पुढे जावयाचे असते. ही महाकठीण क्रीया सद्गुरूच्या सहाय्यानेच शक्य होते. वर वर जातांना कुंडलिनी जे जे पार्थिव ते ते सर्व सर्व गिळंकृत करते. जेव्हा प्राण-मन यांच्यासह ती सहस्रारचक्रात वास करणार्या शिवाशी एकरूप होते तेव्हा साधकाला समाधीचा अनुभव प्राप्त होतो. साधकाचे मन ब्रह्मात लीन होते व विषयविचारापासून तो पूर्णत: अलिप्त होतो. समाधी बद्दल इथे लिहण्याचे कारण नाही. तो एक निराळाच विषय आहे. पण कुंडलिनी जागृतीमुळे होणारे परिणाम थोशक्यात बघू. प्राणवायू सुषुम्ना नाडीतून वाहू लागला की सहाजिकच तो ईडा- पिंगला मधून वाहणे कमी होते. साधकाचा श्वासोच्छ्वास कमी कमी होऊ लागतो. त्याची जीवनाला आवष्यक असलेली उर्जेची गरज कमी कमी होऊ लागते. अन्न-पाणी न घेता तो दीर्घ काळ राहू शकतो. (याला Hybernation म्हणावयाचे काय?) प्राणवायू मूर्धस्थानी स्थिरावला की त्याला केवलकुंभक म्हणतात. आचार्य म्हणतात "केवलकुंभकाचे वैभव प्रतीतीला येण्यासाठी चित्तची शुद्धी, सावधानता आणि अभ्यासाची धृढता यांची गरज आहे."

ही झाली कुंडलिनीची प्राथमिक माहिती. हिच्यावर प्रभुत्व मिळाले तर तुम्ही समाधी सुख मिळवू शकता. पण अपार कष्टाने मिळवलेल्या या सुखात विघ्नेही आहेत. तुम्हाला अनेक सिद्धीं प्राप्त होतात. त्यांची यादी देत नाही परंतु इहलोकातील नानाविध सुखे तुमच्या पायाशी लोलण घेतात व साधक त्यांतच गुरफटण्याचा संभव असतो. तंत्रग्रंथांत या विषयी धोक्याच्या सुचना दिलेल्या दिसतात.

गुरु परंपरा
गुरु परंपरा 

शक्तिपात दीक्षे विषयी प. पु. गुळवणी महाराजांना भक्तांनी विचारलेले प्रश्न व त्याची त्यांनी दिलेली उत्तरे.

१. आपली दीक्षा हट योगाची आहे का?

हा हटयोग नाही हा असा योग आहे की ज्या मध्ये हट, राज, मंत्र, लय, अष्टांग या सर्वाचा समावेश असलेला सिद्धयोग आहे यालाच कुंडलिनी योग शक्तीपातयोग सहजयोग म्हणतात.

२. शक्तिपात म्हणजे काय?

शक्तिपात म्हणजे शक्तीचे संक्रमण प्रत्येक  माणसाच्या शरीरात चेतना म्हणजे प्राणशक्ती असते या चेतना शक्तीचे जागरण हा फार महत्वाचा टप्पा असतो महापुरुष अगर  सत्पुरुष यांची प्राणशक्ती शिष्याच्या शरीरातील प्राणशक्ती ला जागृत करून परत सद्गुरूजवळ जाऊन थांबते याला शक्तिपात म्हणतात, मराठी भाषेत जो रूढ अर्थाने शक्तीचा ह्रास याचा इथे सबंध नाही सूत संहितेत शक्तिपात हा शब्द आला आहे जेथे शक्ती जागृत होत नाही तेथे आत्म सिद्धी येऊ शकत नाही. सूत संहिते वरील भाष्यात माधव स्वामींनी पतन्ति, पात या शब्दाचा अर्थ जाणे किंवा देणे, प्रकट केला आहे. शक्ती नेहमी मोठ्यां कडून लहाना कडे, उंचावरून खाली जात असते. शक्ती संक्रमणात मनात हेच घडते म्हणूम शक्तिपात हा शब्द आला आहे.

३. शक्ती जागृत होते म्हणजे काय होते?

जागृत होते याचा अर्थ झोपलेली असते असा नव्हे चेतना ही चित्ताच्या म्हणजे मन बुद्धी इंद्रिय यांच्या माध्यमातून बहिर्मुखी किंवा जगदाभिमुखी असते तेव्हा ती निद्रिस्त असते असे म्हणतात व ती जेव्हा अंतर्मुख होऊन ऊर्ध्व गामी चेतन्य मुखी होते तेव्हा ती जागृत झाली असे म्हणतात.

४. कुंडलिनी जागृत नाही झाली तर काय बिघडते?

परमार्थ वाटचालीत असा एक टप्पा येतो जिथे स्वा नुभवाचे दालन उघडते भक्ती करणाऱ्या साधका ची परा भक्ती जो पर्यन्त निर्माण होत नाही तो पर्यंत खरा लाभ होत नाही मार्ग कोणताही असला तरी शक्ती जागृती ही घटना घडत असते स्वतःच्या प्रयत्नाने शक्ती जागृत झाली तर तिचे नियोजन साधने कठीण जाते पण गुरू कृपेने झाली तर नियोजन ती स्वतः करते.

५. शक्ती जागृत होण्यासाठी फक्त हाच मार्ग आहे कां? 

तसे नाही, मंत्र अनुष्ठान, प्राणायाम अथवा उत्कट सात्विक कर्म, भक्ती आणि पुर्व पुण्याई मुळे ती जागृत होते पण गुरू कृपेने जागृत शक्ती पुढे सुनियंत्रीत कार्य करते.

साधना करताना गुरू करून जर केली तर ती लवकर फलद्रुप होते. शिष्यानेही गुरू हा आपले सर्वस्व समजुन पुजा करावी. गुरूचा हात जर डोक्यावर असेल तर ईश्वराचा कोपसुध्दा शिष्याला लागत नाही. देव जर कोपला तर गुरू वाचवितो पण गुरू जर कोपला तर या समस्त ब्रह्मांडी तुम्हाला कोणी वाचवु शकत नाही.

सदगुरुरूपी भगवंतांकडून प्राप्त झालेले सर्वश्रेष्ठ वरदान म्हणजे साधना होय. शक्तिपात दीक्षेद्वारे आपल्या सदगुरुं कडून साधनेचे कृपादान होते. जेवढे आपले गुरुशक्तिप्रति समर्पण अधिक, तेवढी आपली साधना समृद्ध होत जाते व आपण प्रगतीपथावर पुढे पुढे जाऊ लागतो जस जसे आपणास साधनेत स्थिरत्व प्राप्त होते, तसतसे साधनेतून मिळणारा अत्युक्तट आनंद आपल्या व्यक्तिमत्वातुन जाणवू लागतो.

साधनेची स्थिती ही एक अशी स्थिती असते जिथे मन, बुद्धि, चित्त, अहंकार या सर्वांचा संचार संपतो, त्यांचा लय होतो व आपले संपूर्ण अस्तित्वच त्या शक्तीच्या अधीन होते. साधनेमुळे होणारा लाभ हा शब्दातीत असतो. त्याच्यापुढे इतर सर्व लाभ तुच्छ वाटू लागतात. साधनेमुळे लाभलेल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपले जीवन अधिक सुसंबद्ध होऊ लागते. म्हणूनच श्री गुरुने दिलेल्या साधनेत सर्वजण श्रध्देने सहभागी होतात.

६   महाराज साधनेच्या बाबतीत असा संशय येतो की, कुंडलिनी जागृती तर अतिदुर्लभ आहे, तेव्हा ही गोष्ट सहज साध्य कशी होऊ शकेल?

दुर्लभ वस्तू सहज साध्य झाली म्हणजे योगवासिष्ठात वर्णन केलेल्या ब्राम्हणाप्रमाणे स्थिती होते.

एकदा एका ब्राम्हणाने चिंतामणि प्राप्त करण्यासाठी तपश्चर्येला आरंभ केला. ईश्वरी कृपेने त्याला थोड्याच अवधीत चिंतामणि प्राप्त झाला. ब्राम्हणाने विचार केला, हा खरोखरीच चिंतामणि असेल का? मी अजून अशी किती तपश्चर्या केली आहे, की असा अलभ्य चिंतामणि मला प्राप्त व्हावा? हा नक्कीच चिंतामणि नसून, काचेचा तुकडा आपल्यापुढे टाकून ईश्वर आपली परीक्षा कशावरुन पाहात नसेल? मी तिकडे दुर्लक्षच करणे योग्य. असा तर्क वितर्क करीत त्याने निश्चय केला, की हा चिंतामणि असणेच शक्य नाही. समोर आलेला चिंतामणि न घेता ब्राम्हणाने पुन्हा तपश्चर्येस प्रारंभ केला. ईश्वराने कृपाळू होऊन दिलेला चिंतामणि ब्राम्हणाच्या संशयवृत्तीने अदृश्य केला. काही दिवसांनी काही मुलांनी खेळता खेळता, एक काचेचा तुकडा त्या ध्यानस्थ ब्राम्हणापुढे टाकला. ध्यान पूर्ण होताच डोळे उघडल्यावर समोर त्याला चकाकणारी वस्तू दिसली. यावेळी त्याला असे वाटले की आता आपली इतक्या काळाची तपस्या फलद्रुप झाली. समोर पडलेला तो काचेचा तुकडा चिंतामणि समजून त्याने उचलला आणि घरी निघून गेला.

दुर्लभ वस्तू सहज प्राप्त झाली की असा संशय निर्माण होतो. म्हणून ह्रदयरुपी कसोटीवर कसून पारखून हे बघावयास हवे की आपल्याला चिंतामणि मिळाला आहे की काच? सोने मिळाले आहे की पितळ? तसेच जी दुर्लभ साधना तुम्हाला मिळाली आहे, त्यानुसार साधना करुन साधनेचे अलौकिकत्व अनुभवास येते किंवा नाही हे पाहिले पाहिजे.

  • नुसता संशय घेऊन साधनशून्य रहाणे योग्य नाही. संशय घ्यायचा, साधन करायचे नाही म्हणजे अनुभव काहीच येणार नाही. उलट संशय पिशाच्च अधिक बलवान होत जाणार.
  • गुरुवाक्य, शास्त्रवाक्य आणि स्वानुभव हे तीनही मिळतील तर तत्वासंबंधी, गुरुसंबंधी आणि स्वत:संबंधी शंकाच राहणार नाही. अनुभवाशिवाय नुसत्या कल्पनेने, तर्काने, ज्ञानाने संशय दूर होत नाही. त्यासाठी साधनाच केली पाहिजे.
  • साधनेवर श्रद्धा, निष्ठा ठेवली की गुरुवर श्रद्धा, निष्ठा बसते. गुरुवर नि:संदिग्ध श्रद्धा असली की कल्याणच होते.
  • संशय हे पतनाचे मूळ आहे म्हणून संशयाच्या आहारी जाऊ नये. संशयाने फार मोठे अनर्थ ओढवतात.

कुंडलिनी जागृती बाबत काही शंकांना दिक्षधिकारी सत्पुरुषाने दिलेली उत्तरे

प्रश्न: आम्ही सामान्य माणसे आहोत आम्हाला शक्य आहे का? 
उत्तर:
कुंडलिनी जागृती अथवा गुरुकृपेने शक्तिपात दीक्षा मिळाली तर सहज शक्य आहे. किंबहुना कुंडलिनी जागृती हा माणसाच्या उद्धाराकरिता भागवंतांनीच खुला केलेला राजमार्ग आहे, सर्व सामान्य माणूस सुद्धा कुंडलिनी योग्य मार्गाने जागृत करून नराचा नारायण होऊ शकतो. सर्व मानवजातीच्या उध्दाराचा हा मार्ग असून मानवाने आपला उध्दार करून मोक्षप्राप्ती करून घ्यावी अशीच परमेश्वराची आत्म्याला मानवी जन्म देण्यामागे अथवा योनी देण्यासाठीची अपेक्षा असती. प्रत्येक मानवाचे हे अंतिम ध्येय असावे.

प्रश्न: कुंडलिनि आणि कुंडली म्हणजे एकच का? त्यात काय फरक आहे?
उत्तर:
कुंडलि शास्त्र हे भविष्य किंवा ज्योतिष मार्ग याबद्दल असून कुंडलिनी हा एक शाश्वत आणि परमेश्वराने दाखविलेला योगमार्ग आहे.

प्रश्न: मग कुंडलिनी म्हणजे नक्की काय आणि ती मानवी शरीरात कुठे असते? 
उत्तर:
कुंडली किंवा कुंडलिनी ही संज्ञा 'कुंडल' या मूळ संस्कृत शब्दापासून तयार झाली आहे. 'कुंडल' म्हणजे वर्तुळ. वर्तुळाकार असलेली ती कुंडलिनी. साडेतीन वेटोळे घालून पाठीच्या कण्याच्या तळाशी ती निद्रिस्त सर्पिणी सारखी वेटोळे घालून सुप्तावस्थेत (निद्रिस्त) वास्तव्य करून असते. जागृत झाली की ती पाठीच्या कण्यातून मेंदूच्या दिशेने जाऊ लागते. मेंदूत जाऊन ती स्थिरावली की, मोक्षप्राप्तीचे द्वार खुले झाले असे म्हणतात.

प्रश्न: माझी पात्रता आहे की नाही, किंवा त्यासाठी काय पात्रता लागते?
उत्तर:
कुंडलिनी दीक्षा घेण्याची बुद्धी होणे हीच पात्राता पुरेशी आहे. अर्थात साधकाने आपले आचार, विचार, शरीर शुद्ध ठेवणे तेवढेच आवश्यक आहे. नाहीतर गुरूंचा अनुग्रह मिळणं दुरापास्त असते. श्रेष्ठ दीक्षाधिकारींचे म्हणण्यानुसार तुमचे पूर्वसुकृत बलवत्तर असल्याशिवाय तुम्हाला दीक्षा घेण्याची बुद्धी होणे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. मग माध्यम कुठलेही असो. म्हणजे प्रवचन ऐकून, अथवा पुस्तके वाचून, अथवा भक्तिमार्गाला अनुसरून अथवा जिज्ञासेपोटी म्हणा, गुरू तुम्हाला भरभरून कृपादान करतो पण त्याचा विश्वास सार्थ ठरविणे हे साधकाचे काम आहे. गुरू आपले बीज हे शक्ती रूपाने साधकाच्या शरीरात पेरण्याचे काम करतो पण जर आपण त्याला गुरूंनी सांगितलेल्या साधनेचे खत पाणी घातले नाही तर ते निरुपयोगी ठरते म्हणजे जागृत झालेली कुंडलिनी ही परत सुप्तावस्थेत जाते.

प्रश्न: शक्तिपात दीक्षा म्हणजे काय.
उत्तर:
शक्तिपात म्हणजे शक्तीचे संक्रमण. गुरू आपल्या शिष्याला त्यांच्या मधील शक्तीचे संतुलित संक्रमण त्याच्या शरीरात करून देतो आणि त्या योगाद्वारे कुंडलिनीवर थेट आघात  होतो. त्यासाठी प्रत्यक्ष स्पर्शाने माध्यम वापरले जाते किंवा अन्य मार्गाचा वापर केला जातो. 
उदा. पत्रदीक्षा. परगावी असलेल्या शिष्याला गुरू पत्र पाठवतो. विशिष्ट वेळी ध्यानाला बसताना शिष्याने ते पत्र वाचले की त्याद्वारा त्याची कुंडलिनी जागृत होते. गुरुकडे गेलो की, त्याने दीक्षा दिलीच आणि आपली कुंडलिनी जागृत झालीच असे होत नाही. दीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या शिष्याची क्षमता किती आहे याचा अंदाज गुरू घेतो. कुंडलिनी शक्ती पेलण्याची त्याच्या मनाची आणि शरीराची क्षमता असायला हवी. एखाद्याची क्षमता नसेल तर गुरू त्याला "ध्यानाला बसत जा" असा सल्ला देईल.

प्रश्न: कुंडलिनी जागृत झाली की काय अनुभव येतात? 
उत्तर: अनुभव हे प्रत्येक व्यक्तीला वेगळे येतात, उदा. काही साधकांना तात्काळ कुंडलिनी क्रिया चालू होतात, म्हणजे आपले आपल्या शरीरावरील संतुलन सुटते. काही विशिष्ट प्राणायाम, योग् आसने, बंध, मुद्रा या आपोआपाच घडू लागतात, काहींना देवतांची दिव्य दर्शने होतात.काहींना खूप प्रकाश दिसतो, काहींना पाठीच्या कण्यातून वीज सळसळत गेल्यासारखे जाणवते, तर काहींना अंगभर मुंग्या येतात. काहींचे दीर्घ श्वसन सुरू होते. तर काहींना काहीच अनुभव येत नाही. म्हणजे कुंडलिनी जागृत झाली नाही असे नाही, येणारे अनुभव हे पूर्णपणे तुमच्या पूर्व जन्मीच्या साधनेवर आणि आध्यात्मिक कमाई वर अवलंबून असतात.

दीक्षा घेतल्यावर सद्गुरूंजवळ कसे वागावे?

  • सद्गुरूंशी खोटे बोलू नये.
  • फार बोलू नये.
  • सद्गुरूंची निंदा करू नये.
  • आपले बोलणे बरोबर नाही, असत्य आहे, या स्वरूपाचे शब्द तोंडात येऊ नये.
  • गुरूंसमोर वेगळी पूजा करू नये.
  • मर्यादा सोडून वागू नये.
  • दीक्षा वगैरे विषयावर आपले प्रभुत्व दाखवणारे भाषण करू नये.
  • सद्गुरूंचे आसन, अंथरुण, वस्त्रादि-कपडे, अलंकार, पादुका, चित्र इ. ना स्पर्श करून वंदन करावे.
  • गुरू आज्ञा मोडू नये.
  • सद्गुरूंना प्रत्युत्तर देऊ नये.
  • दिवसा, रात्री, सदैव सेवकाप्रमाणे त्यांची आज्ञा पाळली पाहिजे.
  • असत्य, अशुभ, वादविवाद इ. टाळावे.
  • सद्गुरूंना न आवडेल असे करू नये.
  • सद्गुरूकार्यातआळस करू नये.
  • सद्गुरू कार्यात लौकिक इच्छा नसाव्यात.
  • सद्गुरू कार्यात राग नसावा.
  • सद्गुरूंच्या डोळ्याला डोळा भिडवून कधीही बोलू नये.
  • सद्गुरूंना नमस्कार केल्याशिवाय ओलांडून वा समोरून जाऊ नये.
  • संपत्ती, जात किंवा आश्रम इ. चा अभिमान नको.
  • सद्गुरूंसमोर अद्वैताची भाषा करू नये.
  • सद्गुरूंसमोर देपूजाही करू नये.
  • सद्गुरूंसमोर पलंगावर निजू नये व तसेच समोर हात पाय पसऱून बसू वये.
  • आळस, अंगविक्षेप समोर करू नये.
  • जाता-येता सद्गुरूंच्या पादुकांना वंदन करावे.
  • त्यांचे काम प्रसन्नतेने करावे.
  • सद्गुरूंची सावली ओलांडू नये.
  • त्यांचे पुढून तसेच जाऊ नये.
  • अनवाणी जाऊन आधी गुरुगृहाला वंदन करावे.
  • सद्गुरूंसमोर आपला शिष्य-संप्रदाय मिरवू नये.
  • अहंकार करू नये.
  • आपल्या गुरूंना त्यांच्या गुरूंसमोर नमस्कार करू नये.
  • सद्गुरूंशी 'तुम्ही' सर्वनामान न बोलता 'आपण' सर्वनाम वापरून बोलावे.
  • सद्गुरूंना वंदन करून त्यांचेजवळ बसावे.
  • सद्गुरूंच्या आज्ञा घेऊन त्यांच्या जवळून जावे.
  • सद्गुरूंसमोर काम, क्रोध, लोभ, मान घेणे, हसणे, स्तुती करणे, कुटिलता दाखविणे, ओरडणे, रडणे या गोष्टी करू नये.
  • सद्गुरूंना ऋण देणे किंवा त्यांच्याकडून ऋण घेणे, त्यांना वस्तू विकत देणे या गोष्टी करू नये.
  • सद्गुरूंच्या समाधानातून शिष्याला पूर्णत्व प्राप्त होते.
  • सद्गुरूंच्या आठवणीत सर्व देवतांचे स्मरण अंतर्भूत आहे.
  • गुरू, गुरू-मंत्र आणि इष्टदेवता या तीन वेगवेगळ्या गोष्टी नसून एकच आहे असे समजावे.

||'उलट पवन ठोकर मारे खोले दरवाजा'||

पूर्वेकडे तोंड करून ताठ बसावे. शरीर स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. शरीर स्थिर झाले म्हणजे मन आपोआप स्थिर होऊ लागते. आपल्या आवडत्या देवतेचा जप मनातल्या मनात करत राहावा. श्वासावर लक्ष केंद्रित करावे. वर्षभर अशी साधना केल्यानंतर आपल्या आवडत्या देवाचे रूप डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करावा. याला 'सगुण ध्यान' म्हणतात. निर्गुण ध्यानामध्ये वरीलप्रमाणे सर्व तयारी करावी व मनःचक्षुने आकाश, ज्योति पाहण्याचा प्रयत्न करावा. याला 'निर्गुण ध्यान' म्हणतात. आत्मध्यानामध्ये स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे व श्वासाने ब्रम्हरंध्राला धक्के द्यावेत. म्हणजे "उलट पवन ठोकर मारे खोले दरवाजा" याचा अनुभव येतो, प्रकाशमय परब्रम्हाचा अनुभव येतो, आत्मसाक्षात्काराचा अनुभव येतो. आत्मज्ञान होते. ब्रम्हज्ञान होते, प्रकाशब्रम्हाचा साक्षात्कार होतो. पुढील साधना कशा कराव्यात याचे मार्गदर्शन दिव्यलोकांतून प्राप्त होते. ही साधना करतांना ब्रम्हरंध्रावरही लक्ष केंद्रित करावे, म्हणजे फळ लवकर प्राप्त होते.

या  गोष्टी जीवनात आत्मसात केल्यास साधनेत खूप प्रगती करता येऊ शकेल

जन्म मिळाला आणि निघून गेला. सृष्टी बनली आणि नष्ट झाली तरीही जो नष्ट होत नाही तो आपला आत्मा आहे. त्याचा साक्षात्कार करण्यासाठी साधकाला सात गोष्टी आत्मसात कराव्या लागतील:

१) ब्राम्हमुहूर्तावर उठणे आणि शांत बसणे.

सूर्योदयाच्या सव्वा दोन तासांपूर्वी ब्राम्हमुर्हूर्त आरंभ होतो. सूर्योदयापूर्वी एक-दीड तास जरी अगोदर उठलात तरी तुम्ही ब्राम्हमुहूर्तावर उठलात असे समजा. उठताच काहीही न करता शांत बसा. ‘जो सुखाला, दु:खाला, जीवनाला, मृत्यूला जाणणारा आत्मदेव आहे, मी त्या सत-चित-आनंद्स्वरुपाच्या माधुर्यात शांत होत आहे. हे मायाविशिष्ट शरीर माझे नाही परंतु माय आणि मायेचे खेळ मज चैतन्यामुळे प्रकाशित होतात. ते चैतन्य मी आहे. सोsहम, या ब्रम्हभावात एक-दोन मिनिटे बसून रहा. भगवान श्रीकृष्णसुद्धा झोपेतून उठल्यावर काही वेळ शांत बसत असत. खूप लाभ होतो.

दिवसभर काम केल्याने जे मिळेल ते नश्वर मिळेल, सुटणारे, दु:ख देणारे मिळेल किंवा थोडेसे, मिटणारे, तुच्छ, किरकोळ सुख मिळेल; परंतु झोपेतून उठल्यानंतर काही न केल्याने सुख आणि दु:खाला थिटे करून परमात्म्याची भेट घालून देणारे पद (परमात्म-पद) मिळेल.दिवसा केलेल्या पूजा-आरतीने लाभ होतो पण याचा लाभ अनेक पटीने अधिक होतो. काशी आणि मक्केला जाणे सर्वांच्या हातची गोष्ट नाही. सकाळी झोपेतून उठताच काही वेळ शांत व्हा, मग हजारदा काशी वा मक्केला गेल्यानंतरही जो मिळेल कि नाही सांगता येत नाही त्या परमात्म्याला तुम्ही भेटू शकता.

२) प्रार्थना.

रोज प्रार्थना करा की ‘हे परमेश्वरा ! हे गुरुदेवा ! हे इष्टदेवा ! माझे ह्र्दय पवित्र होवो; पवित्र भाव आणि पवित्र ज्ञानाचा विकास होवो. सर्वामध्ये जी एक सत्ता वसलेली आहे, टी साक्षी, चैतन्य. सतस्वरूप आहे.

आदि सचु जुगादि सचु || है भी सचु नानक होसी भी सचु ||

त्या स्त्स्वरुपात माझी स्थिती व्हावी. असत शरीरात, असत सुख-दु:खात स्थिती झाल्याने माझा कित्येकदा जन्म-मृत्यू झाला. आता मी सतमध्ये स्थित व्हावे.’ ना साबणाने ह्र्दय पवित्र होईल ना पाण्याने.
प्रार्थनेनेच ह्र्दय पवित्र होईल.

३) प्रणवचा दीर्घ जप.

सकाळी गुरुमुर्तीला, इष्टमूर्तीला न्याहाळीत प्रणवचा दीर्घ जप करावा. ॐ कार सिद्धी, जीव आणि ईश्वरामधील एक सुंदर सेतू आहे. प्रणवचा दीर्घ जप एकाग्रतेची गुरुकिल्ली आहे. एकाग्रता शक्तीचा संचय करते. ‘ॐ’ बीजमंत्र भोग, मोक्ष, आरोग्य, आयुष्य आणि साफल्य देणारा आहे. त्याचबरोबर हा शांती, आत्मबळ आणि बुद्धीचाही विकास करतो. आजपासून याचा जप सुरु करा. आजच दिवसभरात तुम्हाला याच्या सुंदरतेचा, याच्या महानतेचा थोडासा अनुभव होईल, उद्या आणखी जास्त होईल. दहा-वीस दिवसांनी तर तुमच्या शरीरातील पेशीमध्ये व मनात बरेच परिवर्तन होईल.

४) ध्यान.

सकाळी ध्यानात वेळ व्यतीत केला पाहिजे. ध्यानासमान कोणतेही तीर्थ नाही, कोणताही यज्ञ नाही, कोणतेही तप नाही, कोणतेही दान नाही, कोणतेही स्नान नाही. कर्म करताना अधूनमधून एक-दोन मिनिटे ध्यान केल्याने तुमच्या कर्माची आणखी शोभा वाढेल आणि तुमच्या चित्तातही कर्म करण्याचा आनंद येईल.

५) प्राणायम.

दररोज प्राणायाम केले पाहिजेत. प्राणायाम केल्याने पापनाशिनी शक्ती, रोगप्रतिकारक शक्ती, अनुमान शक्ती, क्षमाशक्ती व शौर्यशक्ती विकसित होते तसेच स्मरणशक्तीसुद्धा वाढते. जे प्राणायामपरायण आहेत. अशा निष्पाप साधकांच्या ह्रदयात आत्मप्रकाश होतो.श्वास घेवून रोखून ठेवून भगवन्नाम-जप केल्यास त्याचा शतपटीने प्रभाव होतो. भगवान्नामासह केलेले प्राणायाम थोड्याच दिवसांत तुम्हाला प्रसन्नचित्त, मधुमय, मधुर स्वभावी आणि सदभावनेने संपन्न करू शकतात.

६) मौन.

मौन राहण्याचा अभ्यास (सराव) करा. मौनामुळे आंतरिक शक्तीचा विकास होतो, मनोबल व बुद्धीबळ वाढते. बोलल्याने शरीरातील मज्जा, ओज आणि जीवनशक्ती हे तिन्ही खर्च होतात. म्हणून सारगर्भित बोला, दहा शब्दांऐवजी सहातच काम निपटवा. रोज कमीतकमी तीन तास मौन राहण्याचा अभ्यास करा.

७) आपले दोष दूर करण्याचा दृढ संकल्प करा.

साधन केल्याने सदभाव तसेच बऱ्याच सिद्धी येतात. परंतु आपल्यात काही ना काही दोष असतात म्हणून परम सिद्धी- ब्रम्हज्ञान होत नाही. आपले दोष दूर करण्यासाठी सकाळी दृढ संकल्प करा आणि त्यातच संलग्न रहा. यासाठी जीवनात काही व्रत-नियम असले पाहिजे, दृढता असली पाहिजे. आपले जीवन उन्नत करण्यासाठी वरील सात महत्त्वाची कार्ये अवश्य केली पाहिजेत. साधकाने या सात गोष्टी आपल्या जीवनात आत्मसात केल्या तर थोड्याच दिवसांत त्याच्या जीवनात चमत्कारिक परिवर्तन होईल.

गुरु मंत्र व त्याचे साधनेतील महत्व व परमेश्वर प्राप्ती

अनंतकाळापासून आजपर्यंत अनेक गुरूंनी विशिष्ट देवतांचे पूजन करून व उग्र अध्यात्मसाधना करून काही विशिष्ट बीजमंत्रात नामाची अद्भुत शक्ती साररूपाने साठवून ठेवली आहे. असा हा सिध्दमंत्र म्हणजे मुमुक्षूंचे मोठेच आशास्थान असते. तोच त्यांचा एकमेव आधार बनतो. त्यांच्या इष्टदेवतेचे ते सजीव प्रतीकच बनते. मन एकाग्र करून त्या मंत्राचा सतत जप केल्यास त्याच्या महान सामर्थ्याची प्रत्यक्ष प्रतीति येऊ शकते. परंतु त्यासाठी, ज्यांनी गुरुपरंपरेने मंत्र प्राप्त केला आहे अशा पवित्र अंत:करणाच्या अधिकारी पुरुषांकडून शास्त्रविहित दीक्षाच घेतली पाहिजे. तदुपरान्त गुरूच्या उपदेशाचे योग्य पालन करून, गुरूच्या ठायीं पूर्ण श्रध्दा व आदर ठेवून साधना केली तरच लवकर परमेश्वर प्राप्ति होते.

कुंडलिनी शक्ती व शक्तिपात दीक्षा, एक दिक्षधिकारी

कुंडलिनी ही एक शरीरात वास करणारी शक्ती आहे. निरनिराळ्य़ा लोकांना तिचा साक्षात्कार निरनिराळ्या प्रकारे झाल्याने तिच्या व्याख्या नानाविध प्रकारांनी केल्या आहेत. तंत्रसाहित्यात कुल व अकुल हे शब्द शक्ती व शिव वाचक आहेत. कुलकुंडलिनी वा कुंडलिनी म्हणजे वेटोळ्या घातलेल्या स्वरूपातील शक्ती. या शक्तीचे चित् व अचित् असे दोन भेद आहेत. चित् शक्ती आत्म्याशी अभिन्न स्वरूपात राहते. अचित् शक्ती जगत प्रकाशित करते. ही कुलकुंडलिनी शरीरात सुप्त अवस्थेत असते. कुंडलिनी शरीरात मुलाधार चक्रात गहन निद्रेत असते. सहस्रारचक्रात वास करणार्या शिवापाशी मुलाधारचक्रात वास करणार्या निद्रित कुंडलिनीला जागृत करून नेणे हे योग्याचे ध्येय.ही कुंडलिनी जप, तप, ध्यान, कीर्तन, भक्ती, ज्ञान, कर्म, मुद्रा, बंध, शक्तिचालन, प्राणायाम, शक्तिपात इ. प्रकारांनी जागृत होते. हठयोगातील प्राणायाम व बंध यांचा कसा उपयोग केला जातो याचा थोडासा विचार पुढे केला आहे.साधे एक, दोन, तीन शिकावयास गुरू लागतो. तेव्हा इथे गुरूची व कठोर परिश्रमाची नितांत गरज आहे. इथे आपण फक्त प्राथमिक माहिती बघणार असल्याने अत्यंत थोडक्यात काही गोष्टींची नोंद करू.

प्राणायाम

श्वासोच्छ्वासावर प्रभुत्व मिळवणे. पूरक (बाहेरचा वायू नासापुटाने उदरात भरून घेणे), कुंभक (पूरकाने आत घेतलेला वायू उदरात धारण करून ठेवणे), रेचक (उदरातील वायूला नासापुटाने बाहेर सोडणे) व यांमधीलविराम म्हणजे प्राणायाम. श्वास घ्या, थोडा वेळ थांबा, श्वास सोडा, थोडा वेळ थांबा, परत श्वास घ्या ही प्रक्रीया. यातील निरनिराळे प्रकार म्हणजे उदा. एका नाकपुडीने श्वास घ्रेऊन दुसर्या नाकपुडीने सोडणे. ही शारीरिक प्रक्रीया झाली. याला म्हणावयाचे अगर्भ प्राणायाम. जर आपण प्रणवाच्या मात्रांचे, पूरकाच्या वेळी "उ"चे कुंभकाचे वेळी "म्" चे व रेचकाचे वेळी "अ"चे ध्यान केले तर तो झाला सगर्भ प्राणायाम. प्राणायामाने आरोग्य सुधारते, अनेक रोग बरे होतात, आयुष्य वाढते असे शारीरिक फायदे होतात व वृतीला स्थिरपणा येतो,चांचल्य कमी होते, रज-तम वासनाकमी होतात, सत्व गुणाचा प्रकाश पसरतो असे आध्यात्मिक लाभ होतात. हठयोगात नाडीशुद्धी हा एक मोठा फायदा. नाडीशुद्धी झाली व चित्ताची एकाग्रता साधता आली की साधकाला अनाहत नाद ऐकू येऊ लागतो. तबल्यावर थाप मारल्यावर जो आवाज येतो तो आहत, "ठोकल्याने", तार "छेडल्याने" आलेला नाद. अनाहत नाद अशा कोणत्याही आहताने निर्माण झालेला नसतो. हा अनाहत नाद तुम्हाला ऐकू येऊ लागला की तुम्ही तुमच्या लक्षाच्या जवळ आला आहात असे समजावे. अशी समाधी म्हणजे नादानुसंधानी समाधी. या मार्गावर पोचण्यास प्राणायामास यम-नियम-ध्यानादिंची जोड आवश्यक असते.

मुलाधार चक्रात अचित् शक्ती सर्पासारखे साडेतीन वेटोळी घालून अधोमुख निजलेली असते. आता ती प्राण-अपान वायूंच्या संयोगाने निर्माण झालेल्या अग्नीच्या तापाने जागृत होते. सुषुम्ना नाडीचे तोंड उघडले गेलेले असल्याने ती त्या नाडीत प्रवेश करते व वर सहस्रारचक्रात जाण्यास प्रवृत्त होते. तिच्या बरोबर प्राणवायू व साधकाचे मनही असतात. तिचा मार्ग तेव्हढा सुकर नाही. तिला जातांना वाटेतील षटचक्रांमधून पुढे जावयाचे असते. ही महाकठीण क्रीया सद्गुरूच्या सहाय्यानेच शक्य होते. वर वर जातांना कुंडलिनी जे जे पार्थिव ते ते सर्व सर्व गिळंकृत करते. जेव्हा प्राण-मन यांच्यासह ती सहस्रारचक्रात वास करणार्या शिवाशी एकरूप होते तेव्हा साधकाला समाधीचा अनुभव प्राप्त होतो. साधकाचे मन ब्रह्मात लीन होते व विषयविचारापासून तो पूर्णत: अलिप्त होतो. समाधी बद्दल इथे लिहण्याचे कारण नाही. तो एक निराळाच विषय आहे. पण कुंडलिनी जागृतीमुळे होणारे परिणाम थोडक्यात बघू. प्राणवायू सुषुम्ना नाडीतून वाहू लागला की सहाजिकच तो ईडा- पिंगला मधून वाहणे कमी होते. साधकाचा श्वासोच्छ्वास कमी कमी होऊ लागतो. त्याची जीवनाला आवष्यक असलेली उर्जेची गरज कमी कमी होऊ लागते. अन्न-पाणी न घेता तो दीर्घ काळ राहू शकतो. प्राणवायू मूर्धस्थानी स्थिरावला की त्याला केवलकुंभक म्हणतात. "केवलकुंभकाचे वैभव प्रतीतीला येण्यासाठी चित्तची शुद्धी, सावधानता आणि अभ्यासाची धृढता यांची गरज आहे." ही झाली कुंडलिनीची प्राथमिक माहिती. हिच्यावर प्रभुत्व मिळाले तर तुम्ही समाधी सुख मिळवू शकता. पण अपार कष्टाने मिळवलेल्या या सुखात विघ्नेही आहेत. तुम्हाला अनेक सिद्धीं प्राप्त होतात. त्यांची यादी देत नाही परंतु इहलोकातील नानाविध सुखे तुमच्या पायाशी लोळण घेतात व साधक त्यांतच गुरफटण्याचा संभवअसतो. तंत्रग्रंथांत या विषयी धोक्याच्या सुचना दिलेल्या दिसतात.

ध्यान (Meditation) कसे करावे?

१. शांत, निवांत खोली निवडावी.
२. मंद प्रकाश योजना असल्यास उत्तम. भगभगीत प्रकाश नसावा. मंद वासाची उदबत्ती लावल्यास वातावरणनिर्मिती उत्तम होते. परंतु धुराची एलर्जी असल्यास वा अस्थमा त्रास असल्यास उदबत्ती टाळणे योग्य.
३. सुखासन वा स्वस्तिकासनासारख्या सुखकारक आसनात बसावे. आरामखुर्चीत बसले तरी चालेल. १० ते १५ मिनिटे बसता येणे हीच आवश्यकता आहे. सुखासन वा स्वस्तिकासनात बसल्यास हात गुढघ्यावर सैल ठेवावेत.
पद्ममुद्रेप्रमाणे एका हाताचा तळवा दुसऱ्या हाताच्या ओंजळीत, अग्रबाहू मांडीवर स्थित (आधारासाठी) व अकृत्रिमपणे सरळ बसावे. हे शक्य नसेल तर आराम खुर्चीत बसले तरी चालेल. हात खुर्चीच्या हातावर सैलसर ठेवावेत. शरीराची थोडीफार हालचाल चालते, पण मध्येच उठावयास लागल्यास मेडीटेशनचा भंग होतो, म्हणून खबरदारी घ्यावी. 
४. शवासनात आपण पायाकडून डोक्यापर्यंत शरीर शिथिल करतो. इथे मात्रत्याविरुद्ध म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक असे शिथिल करीत जावे.
५. सुखेनैव आसनस्थित झाल्यावर डोळे मिटून घेऊन वर सांगितल्याप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक अवयव आठवून क्रमाने शिथिल करीत जावे. कपाळ, कान, गाल, मान, पाठ ते नितंबापर्यंत, त्यानंतर गळ्यापासून ते पोटापर्यंत, नंतर हात व पाय असा क्रम ठेवावा. पोटाचा विचार करताना श्वासाचा विचार अवश्य करावा. ह्या सर्व प्रकाराला एक ते दीड वा जास्तीत ज्यास्त दोन मिनिटे पुरे होतात.
६. आता आपण बीज मंत्र मनातल्या मनात म्हणावा, ज्या योगे मनातील विचार बाजूस सारता येतील. बीज मंत्र म्हणावयाचा नसेल तर साक्षीभवना (Witnessing the mind) अभ्यास करावा. या योगे मन शांत रहाते त्याचा अनुभव घ्यावा.
७. साक्षीभावनाही कठीण वाटत असेल तर हिमालायाच्या शिखरासारख्या निर्मळ गोष्टीचा विचार करावा.
८. आपण सुखकारक स्थितीत असलो तरी शावासनस्थ नसल्यामुळे झोप लागण्याची शक्यता कमी असते. परंतु सवयीच्या अभावामुळे १५ मिनिटात चुळबुळ होतेच वा पायांना मुंग्या आल्यासारखे वाटते. अन्यथा वेळ समजण्यासाठी घड्याळाचा गजर लावण्यास हरकत नाही.
९. सावकाश डोळे उघडावे. हातापायाची जाणीवपूर्वक हालचाल करावी. उत्तम मेडीटेशन जमल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते व हृदयाचे ठोकेही मंद होतात. म्हणून मेडीटेशन मधून सावकाश बाहेर येत उभे रहाणे श्रेयस्कर होय.
ध्यान का करावे? ध्यानामध्ये काय ताकद आहे?सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?

जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात. आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो. हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.

जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे. महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले. ध्यानामधील ही ताकद आहे. आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमातjसाधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.

अनुग्रह का घ्यावा

अनुग्रह हा आत्मज्ञान व सत्य दर्शन होण्यासाठी घ्यावा. जन्मोजन्मीचे विकार क्षीण करण्यासाठी, विश्वस्वप्नातुन जागे होण्यासाठी अनुग्रह घ्यावा. बऱ्याच जणांना वाटते की, अनुग्रह घेतला तर प्रपंच सुरळीत चालतो, पैसा हातात खेळु लागतो, प्रसिद्धीला येतो व सर्व सुखे प्राप्त होतात. पण मित्रांनो, वरीलपैकी काहीच होत नाही. पण वरील सुखे ज्याच्या अधिष्ठानावर भासतात ते मन शुद्ध होऊ लागते. अंतर्मन जागृत होऊ लागते. एकदाचे अंतर्मन जागृत झाले की, वरील सुखे विनासायास मिळतात हे ही तितकेच सत्य आहे. पण पैसा मिळावा, सुख मिळावे, आपली प्रसिद्धि व्हावी, चार लोकांत मानसन्मान मिळावा, अशा हेतुने प्रेरित होऊन अनुग्रह घेऊ नये. कारण या गोष्टी चंचल व क्षणभंगुर अशा आहेत. ते सुख आज आहे उद्या नाही. मन हे अतिशुद्ध व पवित्र व्हावे. मनातील संकल्प शुद्ध व्हावेत, स्वधर्म कळावा अशा उदात्त हेतुंनी प्रेरित होऊनच अनुग्रह घ्यावा. असा अनुग्रह घेण्यासाठी सद्गुरुंची कृपा संपादन केली पाहीजे हे ओघानेच आले.

संदर्भ- गुरुकृपेची पहाट

‘शक्तिपात वा दैवी शक्तीचे संक्रमण’

लेखन प.पू योगीराज गुळवणी महाराज, संदर्भ- कल्याण मासिक गोरखपूर

(प्रस्तुत लेख आजपासून किमान ६५ वर्षांपूर्वी योगीराज गुळवणी महाराजांनी आपले गुरू प. प. प. लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांच्या आदेशावरून इंग्रजी भाषेत लिहिला व गोरखपूर येथून निघणार्‍या ‘कल्याण’ या मासिकाने तो प्रसिद्ध केला.  वास्तविक, ‘शक्तिपात दीक्षा’ चे संपादक श्री. त्र्यंबक भास्कर खरे यांनी इ.स. १९३४ मधे कुंडलिनी महायोगावर एक लेख दिला होता, ज्यात स्वामी लोकनाथ तीर्थांचा उल्लेख होता आणि श्री. वामनराव गुळवणी, २०, नारायण पेठ असा पूर्ण पत्ता दिला होता. हा लेख स्वामीजींनी काशी येथे वाचला आणि अपुरा वाटून त्यांनी आपले शिष्य श्री. वामनराव गुळवणी, पुणे यांना योग्य लेख लिहून कल्याण मासिकास पाठवण्यासंबंधी सूचना केली.)

श्रेष्ठ आध्यात्मिक गुरू आपल्या शिष्याकडे जे दैवी शक्तीचे संक्रमण करतो, त्या विशिष्ट प्रक्रियेला ‘शक्तिपात वा दैवी शक्तीचे संक्रमण’ असे म्हणतात. असा शक्तिपात करण्याचे सामर्थ्य असलेले सद्गुरू सत्याचे ज्ञान, परमात्म्याशी एकरूप होण्याचे ज्ञान, सुयोग्य शिष्याला विनासायास, क्षणार्धात देऊ शकतात. इतकेच नाही तर ते आपल्या शिष्याला आपल्यासारखेच करू शकतात. ‘स्वीयं साम्यं विधत्ते।‘ अशी घोषणा श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी आपल्या ‘वेदान्त केसरी’ या महान ग्रंथाच्या पहिल्या श्लोकातच केली आहे. महाराष्ट्रातील महान संत श्री. तुकाराम महाराज यांनी देखील आपल्या एका अभंगात याच विचारांची पुनरावृत्ती केली आहे. त्यांनी सांगितले आहे- “आपुल्यासारिखे करिती तात्काळ, नाही काळ-वेळ तयां लागीं.” अशा सद्गुरुंचे वर्णन करण्यासाठी परीसाची उपमा देखील कमीच पडते, किंबहुना त्या गुरूची महती अवर्णनीय आहे. ’भावार्थदीपिका’ या भगवद्गीतेवरील टीकेमधे संतांचे मुकुटमणी संत ज्ञानेश्वर महाराज स्वत:च्या शब्दात सांगतात, “श्रेष्ठ गुरूचे मोठेपण एवढे आहे की, ज्या व्यक्तीवर त्यांचा दृष्टिकटाक्ष पडतो वा ज्याच्या मस्तकावर ते आपला कमलहस्त ठेवतात, ती व्यक्ती कितीही क्षुद्र वा निकृष्ट असली तरीही तात्काळ तिला परमेश्वराचा दर्जा प्राप्त होतो. ज्या कुणाला अशी सद्गुरूकृपा प्राप्त होण्याचे सद्भाग्य मिळते तो सार्‍या द्वंद्वांपासून मुक्त होतो आणि त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. गुरू शिष्याला ‘महावाक्यं’ (औपनिषदिक वाक्यं वा मंत्र) देतात आणि शिष्य लगेचच त्याचा स्वीकार करतात. त्याच क्षणी त्या मंत्राचा प्रत्यक्ष अनुभव देखील शिष्याला मिळतो. श्रीकृष्णाने आपल्या परमभक्त अर्जुनास दिव्य शक्ती संक्रमित करून त्याला स्वत:सारखे कसे बनविले याचे वर्णन पुढे श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी  केले आहे, “भगवंतांनी आपला नीलश्यामल, तेजस्वी मणिकंकणाने विभूषित दक्षिणहस्त पुढे केला आणि आपल्या प्रिय शिष्याला आलिंगन दिले. बुद्धी वा वाचागम्य नसलेला हा अनुभव भगवंतांना आपल्या प्रियशिष्याला द्यायचा होता, त्यासाठी हे आलिंगन! द्वैताचा भेद न करता दोन मनांचे मीलन झाले. एकातले ज्ञान दुसर्‍याच्या ठिकाणी संक्रमित झाले. अर्जुन कृष्णाशी एकरूप झाले.”
ब्रह्माची प्राप्ती शास्त्राभ्यासाने होत नाही तर केवळ सद्गुरूकृपेमुळेच ते प्राप्त करता येते. श्री. समर्थ रामदास स्वामींनी उच्चरवाने सांगितले आहे, "सद्गुरूशिवाय खरे ज्ञान प्राप्त होणे असंभव आहे.” शास्त्र देखील त्याच्याशी सहमत आहे. “केवळ शब्द, बुद्धी वा औपनिषदिक ज्ञान वा त्यांवरील चर्चा ऐकून आत्मज्ञान होऊच शकत नाही“. ते केवळ सद्गुरुंच्या कृपाप्रसादामुळेच होऊ शकते. श्रीमद् शंकराचार्यांनी एका सुंदर श्लोकात सद्गुरुंच्या अमृतमय दृष्टिकटाक्षामुळे निर्माण होणार्‍या शक्तीचे वर्णन केले आहे, जे अतुलनीय आहे.

तद् ब्रह्मैवाहमस्मीत्यनुभव उदितो यस्य कस्यापि चेद्वै ।                                                              
पुंस: श्रीसद्गुरूणामतुलितकरुणापूर्णपीयूषदृष्ट्या ।                                                                      
जीवन्मुक्त: स एव भ्रमविधुरमना निर्गते नाद्युपधौ ।                                                      
नित्यानन्दैकधाम प्रविशति परमं नष्टसंदेहवृत्ति: ॥

अहं ब्रह्मास्मि। मीच ब्रह्म आहे या सत्याची जाणीव सद्गुरुंच्या अतुलनीय कृपादृष्टिमुळे ज्याला प्राप्त होते तो या देहात राहून देखील मनातील सारे संशय तसेच मोह यांपासून मुक्त होतो. आणि तो चिरंतन आनंदधामी प्रवेश करतो.
अशा प्रकारे वेद, पुराणे, तंत्र, आणि सर्व काळांतील संतांनी शक्तिसंक्रमण मार्गातील स्वानुभव लिहून ठेवले आहेत. ’योगवासिष्ठ’ या ग्रंथात वसिष्ठ ऋषींनी स्वत: श्री रामचंद्रांना दिलेल्या शक्तिपाताच्या सत्याचे वर्णन केले आहे. ज्यामुळे असंप्रज्ञात समाधी वा पूर्ण ब्रह्माप्रत रामचंद्रांची गती संभव झाली. या संदर्भात स्वत: विश्वामित्रांनी वसिष्ठांना असे सांगितले आहे,”हे महात्मा, ब्रह्मपुत्र, वसिष्ठ मुनी ! आपण खरोखर श्रेष्ठ आहात. आपले श्रेष्ठत्व आपण क्षणभरात शक्तिसंक्रमणाद्वारे सिद्ध करून दाखविले.”
योगवासिष्ठ्यामध्ये शिष्यांत शक्तिसंक्रमण करण्याच्या पद्धतींचे वर्णन केले आहे.

“दर्शनात्स्पर्शनाच्छब्दात्कृपया शिष्यदेहके” (सद्गुरुंच्या कृपायुक्त दृष्टिकटाक्षाद्वारे, स्पर्शाने, प्रेमपूर्ण शब्दांनी शक्तिसंक्रमण घडून येते.) स्कंद पुराणातील सूतसंहितेत शक्तिसंक्रमणाच्या पद्धतीची विस्तृतपणे माहिती दिली आहे. तंत्रग्रंथांमध्ये देखील शक्तिसंक्रमणाद्वारे कुण्डलिनी जागृत करण्याबद्दलची विस्तृत माहिती दिली आहे. शक्तिसंक्रमणाद्वारे शिष्यांमध्ये सुप्त शक्ती जागृत करण्याबाबत उपलब्ध ग्रंथांमधील नाथसंप्रदायाचे साहित्य अधिक प्रसिद्ध आहे. आत्मविद्या,योगशास्त्र यांच्याइतकाच हा पंथदेखील प्राचीन आहे. सांप्रत काळी या प्रबळ आणि प्रभावी  शक्तीचे संक्रमण घडवून आणणारे सद्गुरू अत्यंत दुर्मिळ आहेत. परंतु ते अगदीच उपलब्ध नाहीत असे नाही. अशा प्रकारचे काही महात्मे या जगात गुप्त रूपाने (वेषांतर करून) संचार करीत असतात. जेव्हा त्यांची भेट सत्पात्र शिष्याशी होते तेव्हा ते आपली शक्ती त्या शिष्याच्या ठिकाणी संक्रमित करतात. अशा प्रकारे ज्ञान व शक्तीचे संक्रमण करून शिष्याची कुण्डलिनी जागृत करण्याचे सामर्थ्य असलेले गुरू कधीतरी कुठेतरी भेटतात. अशाच एका महात्म्याशी माझी घडलेली भेट आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेला अनुभव हेच माझ्या या लेखाचे मूळ कारण आहे.

१. सामान्य वाचकांना कदाचित् या लेखाच्या वाचनाचा व्यावहारिकदृष्ट्या काही उपयोग होणार नाही. परंतु असे महात्मे पूर्णत्व संपादित केलेले देखील असू शकतात. त्यांच्याकडून शक्तिसंक्रमणाद्वारे कृपा प्राप्त करून शिष्याला आपले कल्याण करून घेता येऊ शकते. शिष्याला एवढा विश्वास वाटला तरीही मी म्हणेन, माझे प्रयत्न सफ़ळ झाले. कारण कोण्या साधकाची अशा पूर्ण महात्म्याशी भेट घडली आणि त्याने कृपा संपादित केली तर त्या साधकाच्या मनुष्यजन्माचे अक्षरश: सार्थक होईल.

२. योगदर्शनाचा मुख्य हेतू समाधी अवस्थेप्रत पोहोचणे हा आहे. ज्या स्थितीमध्ये मनाच्या सर्व अवस्था व भाव लय पावतात, ती स्थिती साध्य होण्यासाठी शिष्याला अनुभवी सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली कठीण अशा अष्टांगयोगमार्गाची  साधना करावी लागते. या अभ्यासात जराही त्रुटी राहिली तर ही साधना शिष्यासाठी त्रासदायक ठरू शकते. या शक्यतेमुळे घाबरून पुष्कळसे शिष्य या मार्गाचा स्वीकारच करीत नाहीत. कारण या मार्गामध्ये आसन, प्राणायाम, मुद्रांचा अभ्यास, कुण्डलिनी शक्तीची जागृती यांचा  समावेश होऊन त्यानंतर पृष्ठवंशरज्जुतंतू (पाठीच्या कण्यातून जाणारा रज्जुतंतू) मध्ये जाणाऱ्या मध्यवर्ती नाडीचे प्रवेशद्वार उघडते. परंतु शक्तिपात मार्गाने उपरोल्लेखित सगळ्याच गोष्टी विनासायास, शीघ्र प्राप्त करता येतात.

जो शिष्य निरोगी, तरुण आहे आणि ज्याचे मन तसेच इंद्रिये ताब्यात आहे आणि जो वर्णाश्रमधर्माचे पालन करणारा आहे, ज्याची देव व सद्गुरुंवर पूर्ण श्रद्धा आहे अशा साधकांवर शक्तिसंक्रमणाचे परिणाम लगेचच होतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती ही की सद्गुरूंची प्रामाणिक सेवा करून त्यांची कृपा संपादन करणे हे आहे. निम्नलिखित श्लोकात शक्तिसंक्रमणाच्या चार पद्धती सांगितल्या गेल्या आहेत.

विद्धि स्थूलं सूक्ष्मं सूक्ष्मतरं सूक्ष्मतममपि क्रमत: |                                                                
स्पर्शन- भाषण – दर्शन- संकल्पजने त्वतश्चतुर्धा तत् ||

अशा प्रकारे १) स्पर्शाद्वारे २) शब्दोच्चाराद्वारे ३) दृष्टिकटाक्षाद्वारे ४) संकल्पाद्वारे संक्रमित केली गेलेली शक्ती क्रमश: स्थूल. सूक्ष्म, सूक्ष्मतर तसेच सूक्ष्मतम असते.

यथा पक्षी स्वपक्षाभ्यां शिशून् संवर्धयेच्छनै: ।                                                               
स्पर्शदीक्षोपदेशस्तु तादृश: कथित: प्रिये ॥                                                                            
स्वापत्यानि यथा कूर्मी वीक्षणेनैव पोषयेत् ।                                                               
दृग्दीक्षाख्योपदेशस्तु तादृश: कथित: प्रिये ॥
यथा मत्स्यी स्वतनयान् ध्यानमात्रेण पोषयेत् ।                                                           
वेधदीक्षोपदेशस्तु मनस: स्यात्तथाविध: ॥

वर दिलेल्या श्लोकांत दीक्षेच्या तीन पद्धतींचे वर्णन केले गेले आहे.
१) स्पर्शदीक्षा- एखादा पक्षी ज्याप्रमाणे आपल्या पंखांच्या उबेत पिलांना वाढवतो त्याप्रमाणे स्पर्शाद्वारे दिली जाणारी दीक्षा.
२) दृष्टिदीक्षा- कासवीण ज्याप्रमाणे सतत निरीक्षण करीत आपल्या पिलांना मोठे करते त्याप्रमाणे नजरेने दिली जाणारी दीक्षा.
३) वेध दीक्षा- ज्याप्रमाणे मासोळी केवळ चिंतनाने आपल्या पिलांचे भरण पोषण करते त्याप्रमाणे केवळ ध्यानातून दिली जाणारी दीक्षा.
या पद्धतींमध्ये शब्ददीक्षेचा उल्लेख नाही. (शब्ददीक्षा ही दोन प्रकारची असू शकते- मंत्रोच्चाराद्वारे वा केवळ आशीर्वचनाचे उच्चारण करून यौगिक शक्ती जागृत करणे.)
यापुढील श्लोकात शक्तिसंक्रमण घडून आल्यावर शिष्यामध्ये जे बदल दिसतात त्या लक्षणांचे वर्णन केले आहे.

देहपातस्तथा कम्प: परमानन्दहर्षणे ।                                                                                     
स्वेदो रोमाञ्च इत्येच्छक्तिपातस्य लक्षणम् ॥

देहपात (शरीर कोसळणे), कंपन, अतिशय आनंद, घाम फ़ुटणे (स्वेदबिंदू), रोमांच उभे रहाणे इत्यादी शक्तिपाताची लक्षणे आहेत. कालांतराने प्रकाश दिसणे, आतून आवाज ऐकू येणे, आसनावरून शरीर वर उचलले जाणे इत्यादी तसेच प्राणायामाच्या वेगवेगळ्या अवस्था बंधांसहित आपोआप सुरू होतात. साधकांना शक्ती मूलाधार चक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत जात असल्याचा अनुभव लगेचच होतो. आणि मनाला पूर्ण शांती मिळते. तसेच साधकाला त्याच्या शरीरात मोठा फ़रक घडल्याचे जाणवते. पहिल्या दिवशी आलेले सगळे अनुभव पुढे कितीही तास तसेच राहू शकतात. कुणाला केवळ अर्धा तासपर्यंत तर कुणाला तीन तासांपर्यंत देखील हे अनुभव येत राहून मग थांबतात.  जोपर्यंत शक्ती कार्यरत असते तोवर साधकाचे डोळे बंदच रहातात आणि त्याला डोळे उघडण्याची इच्छाच होत नाही. जर स्वप्रयत्नांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तर त्रास होऊ शकतो. परंतु शक्तीचे कार्य थांबले की डोळे आपोआप उघडतात. डोळ्यांची उघडझाप ही शक्तीचे कार्य चालू आहे वा थांबले आहे याची द्योतक आहे. साधकाचे डोळे बंद झाले की त्याला आपल्या शरीरात वेगवेगळ्या हालचाली सुरु झाल्याची जाणीव होऊ लागते. आपोआप होणाऱ्या या हालचालींना त्याने विरोध करता कामा नये. किंवा त्यांच्या मार्गामध्ये बाधा आणू नये. केवळ निरीक्षकाप्रमाणे बसून क्रियांना नियंत्रित करण्याच्या जबाबदारीपासून दूर राहिले पाहिजे. अशा स्थितीत त्याला आध्यात्मिक समाधान मिळेल आणि त्याचा विश्वास स्थिर, दृढ होईल.

एकदा गुरुकृपेमुळे शिष्याची योगशक्ती जागृत झाली की त्या साधकासाठी आसन, प्राणायाम, मुद्रा इत्यादी योगदर्शनाशी संबंधित साधनांचे फ़ारसे महत्त्व उरत नाही. ही आसने, प्राणायाम व मुद्रा इत्यादी क्रिया जागृत शक्तीला ब्रह्मरंध्राकडे जाण्यास मदत करतात, यासाठीच त्यांची साधना व सराव केला जातो. ऊर्ध्वगामी शक्तीचा एकदा ब्रह्मरंध्राकडे जाण्याचा मार्ग उघडला की मग तिला क्रियांची जरूर रहात नाही आणि मन हळू हळू शांत होत जाते.

काही प्रसंगी असे दृष्टोत्पत्तीस आले आहे की अशिक्षित आणि ज्याला आसन, प्राणायाम इत्यादी गोष्टींची काहीही माहिती नाही असा साधक देखील या शक्तीच्या प्रभावाखाली सर्व क्रिया शास्त्रोक्त पद्धतीने करू लागतो. जणू काही अनेक वर्षे योगमार्गाचे प्रशिक्षण घेतलेला, सराव  केलेला एखादा योगीच असावा. किंबहुना सत्य परिस्थिती अशी आहे की उपरोक्त सर्वच गोष्टी ज्या साधकाच्या प्रगतीला पूरक असतील त्या कुण्डलिनी शक्ती स्वत:च साधकाकडून आवश्यकतेप्रमाणे आपोआप करून घेत असते,

योगातील अनेक अवघड क्रिया विनासायास आपोआप होतात. पूरक, रेचक आणि कुंभक इत्यादी प्राणायामातील क्रियादेखील आपोआप होतात. दोन मिनिटांचा कुंभक एक दोन आठवड्यांतच साध्य होतो. या साऱ्या गोष्टी साधकांना कोणत्याही प्रकारे अडथळा न आणता घडत असतात. कारण जागृत झालेली शक्ती साधकाला कोणत्याही प्रकारचे कष्ट  होणार नाहीत याची काळजी स्वत: घेत असते. आपोआप होणाऱ्या क्रियांमुळे साधक निर्धोकपणे साधना करीत रहातो.

सद्गुरूद्वारे शिष्यामध्ये शक्तिपात घडवून आणला गेल्यावर कुण्डलिनी शक्ती जागृत झाल्यावर शिष्याच्या ठिकाणी शक्तिपाताचे सामर्थ्य वृद्धिंगत होते. कारण तो देखील गुरुसारखा बनत जातो. अशा प्रकारे शक्तिपात करण्याची परंपरा गुरुपासून शिष्यापर्यंत अखंड चालू रहाते. शक्तीचे बीज गुरू शिष्यामध्ये पेरत असतात. त्यामुळे गुरूची आज्ञा झाली की शिष्य देखील शक्तिपाताद्वारे दुसरे शिष्य तयार करू शकतो. आणि अशा प्रकारे हा क्रम अखंड चालू रहातो. अर्थात प्रत्येक शिष्याला ही मुभा मिळतेच असे नाही. काही शिष्य स्वत: या शक्तीचा अनुभव घेऊ शकतात परंतु पुढे दिलेल्या श्लोकात सांगितले आहे त्यानुसार दुसऱ्यामध्ये शक्तिसंक्रमण करू शकत नाही.

स्थूलं ज्ञानं द्विविधं  गुरुसाम्यासाम्यतत्त्वभेदेन ।                                                               
दीपप्रस्तरयोरिव संस्पर्शास्निग्धवर्त्ययसो: ॥

शक्तिपातदीक्षेची स्थूल पद्धती (स्पर्शाद्वारे दीक्षा देणे) ही दोन प्रकारची असून संपूर्णत: गुरूसारखेच होणे व न होणे या तत्त्वातील भेदावर ती आधारित आहे. एक पद्धत अशी आहे की जसा दिवा त्याच्या संपर्कात येणाऱ्या दुसऱ्या दिव्याला तत्काळ प्रज्वलित करतो. आणि त्या दिव्याला देखील ही पात्रता मिळते की तो दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करण्याची शक्ती देतो आणि ही परंपरा अखंड चालू रहाते. दुसरी पद्धती लोखंड आणि परीस यांच्यासारखी आहे. यात परीस लोखंडाला स्पर्श करतो तेव्हा लगेच लोखंडाला सोन्यात परिवर्तित करतो आणि त्या लोखंडाचा (नवीन सोन्याचा) जर दुसऱ्या लोखंडाला स्पर्श झाला तर त्याचे सोने नाही होत. दुसऱ्या पद्धतीत परंपरा कायम रहात नाही हीच कमतरता आहे.

पहिल्या प्रकारात गुरूचा शिष्य स्वत:चे जीवन सार्थक तर करतोच परंतु दुसऱ्याचे जीवन सार्थक व्हावे यासाठी कारणीभूत देखील होतो. परंतु दुसऱ्या प्रकारच्या गुरूचा शिष्य केवळ स्वत:चा उद्धार करू शकतो परंतु दुसऱ्याचा उद्धार करू शकत नाही. शब्द दीक्षेचे दोन प्रकार आहेत.

तद्वद् द्विविधं सूक्ष्मं शब्दश्रवणेन कोकिलाभ्युदययो: |                                                          
तत्सुतमयूरयोरिव तद्विज्ञेयं यथासंख्यम् ॥

ज्याप्रमाणे कावळ्याच्या घरट्यात वाढलेले कोकिळेचे पिल्लू, कोकिळेचा स्वर ऐकल्यावर तसेच गाऊ लागते ज्या स्वरात कालांतराने स्वतःच्या पिलांना स्वराची जाणीव जागृत करून देण्याचे सामर्थ्य असते.  शब्दांच्या माध्यमातून हा क्रम चालू रहातो. परंतु जो मोर मेघगर्जनेमुळे आनंदित होतो तो मोर आपल्या आवाजाने दुसऱ्या मोरांना आनंदित करू शकत नाही. आणि अशा प्रकारे हा क्रम पुढे अखंड रहात नाही. दृक् दीक्षेच्या बाबतीत देखील हा फ़रक आहे.

इत्थं सूक्ष्मतरमपि द्विविधं कूर्म्या निरीक्षणात्तस्या:।                                                        
पुत्र्यास्तथैव सवितुर्निरीक्षणात् कोकमिथुनस्य ॥

सूक्ष्मतर दीक्षा जी दृष्टिक्षेपाद्वारे दिली जाते त्याचेही दोन प्रकार आहेत. एका पद्धतीत जसे कासवीण आपल्या पिलांवर सतत लक्ष ठेवून त्यांचे भरण पोषण करते आणि त्या पिलामध्ये देखील तशीच शक्ती निर्माण होते. परंतु त्या पिलांना स्वत:ला पिले होईपर्यंत या अंगभूत  शक्तीची जाणीव नसते. तसेच शिष्य देखील गुरूकडून मिळालेल्या शक्तीबाबत जागरूक नसतो आणि जोपर्यंत तो  शिष्य स्वत:च्या शिष्याच्या संपर्कात नसतो. चक्रवाक पक्षी देखील सूर्यदर्शनाने आनंदित होतात पण अन्य चक्रवाकांना आनंदित करू शकत नाहीत ही दुसरी पद्धती. आता संकल्प दीक्षेच्या बाबतीत विचार करू:

सूक्ष्मतममपि द्विविधं मत्स्या: संकल्पतस्तु तद्दहितु: |                               
तृप्तिर्नगरादिजनिर्मान्त्रिकसंकल्पतश्च भुवि तद्वत् ॥

सूक्ष्मतम दीक्षेच्या प्रकारांमध्ये संकल्प दीक्षा देखील येते जिचे दोन प्रकार आहेत.  ज्याप्रमाणे मासोळी आपले मन एकाग्र करून, आपल्या बाळाचा विचार करून ध्यानाद्वारे पिलांचे लालन पालन करते हा एक  व दुसरा प्रकार म्हणजे जसा मायावी (जादूगार) मायेने शहर वा गाव तयार करून दाखवितो. पहिल्या प्रकारात मासोळीकडून तिच्या पिलांना शक्ती मिळते परंतु दुसऱ्या प्रकारात उत्पन्न होणारा आभास नवीन आभासास जन्म नाही देऊ शकत. वर दिलेल्या उदाहरणांद्वारे स्पष्ट होते की शक्ती संक्रमण करण्याची परंपरा चालू ठेवण्याची शक्ती निसर्गाने गुरुमातेलाच प्रदान केली आहे. म्हणूनच गुरूला ’गुरुमाऊली ’असे नाव प्राप्त झाले आहे.

एकदा गुरूने आपल्या शिष्यावर शक्तिपात वा दैवी शक्तीचे संक्रमण घडविले , मग तो शिष्य आपोआपच आसन, प्राणायाम, मुद्रा, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान या गोष्टी सहज आत्मसात करतो. हे करताना फ़ारसे प्रयत्न वा धडपड करावी लागत नाही, सतत कोणाचे तरी मार्गदर्शन हवे असे नाही. कारण शक्ती स्वत: साधकास वर दिलेल्या गोष्टी करण्यास सहायता तसेच मार्गदर्शन करते.

या साधनेचे वैशिष्ट्य हे की या मार्गात साधकास कोणत्याही प्रकारे इजा वा त्रास होण्याचे भय नसते. हठयोगप्रदीपिकेत निर्दिष्ट केल्याप्रमाणे सामान्य योगाभ्यास, जसे आसन, प्राणायाम इत्यादींचा सराव करताना काही छोटीशी जरी चूक झाली तर शारीरिक इजेला तोंड द्यावे लागते. ’अयुक्ताभ्यासयोगेन सर्वरोगसमुद्भव:।’ परंतु येथे निर्दिष्ट केलेले साधन हे अत्यंत नैसर्गिक स्वरूपाचे आहे. ते शरीराला सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्त करते. इतकेच नव्हे तर बहुतांश असाध्य व्याधींना देखील शरीरात उपटून काढते. सामान्य मनुष्य़ देखील यापासून अनेक प्रकारचे लाभ घेऊ शकतो. योगशास्त्राच्या कठीण, खडतर अभ्यासाने प्राप्त व्हावा असा आत्मानंद, मन:शांती देणारी, वरप्रदायी अशी ही साधना आहे. जो साधक अन्य कोणत्याही प्रकारच्या साधनेने योगशास्त्राचा अभ्यास करतो त्याला वेगवेगळ्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आणि शेवटी स्वत:चे परम कल्याण व्हावे या आशेने फ़ारच कठोर नियमांचे अनुसरण करीत जीवन व्यतीत करावे लागते. परंतु या साधनेद्वारे परमानंद प्राप्त होतोच, इतकेच नव्हे तर साधकामध्ये कुण्डलिनी शक्ती जागृत होताच ती साधकाला आत्मप्रचीती करून देते. साधकाला परमोच्च ब्राह्मी स्थिती मध्ये घेऊन जाण्याच्या दृष्टीने शक्तीचे कार्य चालूच रहाते. मध्येच साधकाला अपवादात्मक परिस्थितीत अनेक जन्म घ्यावे लागले तर ही शक्ती जागृत अवस्थेतच रहाते, आपले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत कधी निद्रित होत नाही. उपरिनिर्दिष्ट सर्वच मुद्दे वाचकांना कुण्डलिनी जागृतीचे महत्त्व पटवून देतील, अशी आशा वाटते.

शक्तिपात मार्गाद्वारे साधकाला एकदा योग्य दिशा मिळाली की तो स्वत: योगदर्शनाच्या कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकत नाही किंबहुना असे केल्याने त्याला आनंदही प्राप्त होत नाही. तो फ़क्त आतून येणार्‍या शक्तीच्या आदेशांचेच पालन करू शकतो. अशा आदेशांचे त्याने उल्लंघन केले तर त्याच्यावर संकट आल्याखेरीज रहाणार नाही. जसे माणसाला झोप येत असेल तर, त्याला न झोपून चालत नाही. नैसर्गिक ऊर्मीच्या विरोधात गेल्यास तो अस्वस्थ आणि कष्टी होईल. झोपल्यानेच त्याला शांती आणि सुख प्राप्त होईल. त्याचप्रमाणे जेव्हा साधक आसनावर बसतात तेव्हा त्याना आंतरिक शक्तीकडून आदेश मिळू लागतात की त्याने काय काय करावे वा अमुक प्रकारची क्रिया करावी आणि त्याप्रकारची क्रिया त्याला करावी लागते. त्याने तसे केले नाही तर त्याला अस्वस्थता वाटेल आणि त्रास होईल. पण जर मोकळ्या मनाने आंतरिक शक्तीद्वारे मिळणाऱ्या आदेशांचे पालन केले तर मन:शांती आणि सुखप्राप्ती होईल. स्वत:च्या प्रयत्नांवर ज्यांचा विश्वास आहे असे साधक या प्रकारच्या साधनेवर फ़ारसा विश्वास ठेवत नाहीत आणि ते आंतरिक शक्तीवर अवलंबून रहाण्याऐवजी स्वत: पलीकडील बाह्यशक्ती वर विसंबून रहातात. शक्तिसंक्रमणाचा मार्ग  मात्र पूर्ण समर्पण तसेच शक्तीवर आधारित रहाण्याचा आहे. ज्याला या प्रकारे दीक्षा मिळाली आहे त्याने या जन्मी माझी किती प्रगती होईल याचा विचार करता कामा नये. शक्ती जिकडे घेऊन जाईल त्या दिशेने आनंदाने मार्गाक्रमण करण्याची त्याची तयारी असायला हवी आणि शक्ती सर्व प्रकारच्या संकटांपासून त्याचे रक्षण करीत असते. तीच त्याला परमोच्च पदी घेऊन जाईल. आधुनिक काळात ज्या कोणाला योगदर्शनाबाबत उत्सुकता असेल त्याला शक्तिपातासारखा सरळ साधा मार्ग नाही. शक्ती-संक्रमण करणारे अधिकारी महात्मा -त्यांच्या सान्निध्यात जो कोणी येईल, त्याला त्यांची मर्जी संपादन करून आपले जीवन सार्थक करण्याच्या संधीला हातून घालवता कामा नये. या कलियुगात ही परंपरा म्हणजे मृत्युलोकात स्वर्गातून आणलेल्या अमृताप्रमाणे आहे. याच्याशिवाय सोपे आणि अधिक परिणामकारक दुसरे कुठले साधन नाही. या मार्गाने साधकाची दु:खापासून, दूषित विचारांतून, दुष्प्रवृत्तींपासून, दुष्कृत्यांपासून मुक्तता होते आणि त्याला परमशांतीचा अनुभव मिळतो. आपण सर्वांनीच शंकराचार्यांच्या ‘शिवानंदलहरी’तील या श्लोकाचे पठन करून परमेश्वराकडे प्रार्थना करू या-

त्वत्पादाम्बुजमर्चयामि परमं त्वां चिन्तयाम्यन्वहम् ।                                                               
त्वामीशं शरणं व्रजामि वचसा त्वामेव याचे विभो ॥                                                                      
दीक्षां मे दिश चाक्षुषीं सकरुणां दिव्यश्चिरं
प्रार्थिताम् |                                                                    
शम्भो लोकगुरो मदीयमनस: सौख्योपदेशं कुरु ॥

हे सर्वश्रेष्ठा, मी तुझ्या चरणकमळांची पूजा करतो आहे आणि तुझे ध्यान करीत आहे, मी तुला शरण आलो आहे आणि हे परमेश्वरा, मधुर शब्दांत प्रार्थना करतो की तू माझा स्वीकार करून करुणापूर्ण दृष्टीने माझ्यावर शक्तिपात करून मला अशी दीक्षा दे की ज्याचा ध्यास देवलोकांतही लागलेला असेल. हे शंभो, जगद्गुरो, माझ्या मनाला खर्‍या सुखाचा उपदेश कर.

*ॐ शांति: शांति: शांति: ।*

कुंडलिनीचे स्वरूप 

(संदर्भ- ओंकार महाराज लिखित ‘महायोग विज्ञान)

कुंडलिनी म्हणजे चितशक्ती पराशक्ती शब्दब्रम्हाची स्फूर्ती होय. योगवसिष्ठ ग्रंथामध्ये निर्वाण प्रकरणाच्या पूर्वार्धातील ८० व्या सर्गात कुंडलिनी शक्तीचे स्वरूप विवेचन करताना वसिष्ठ म्हणतात शरीरात सुषुन्मा म्हणून एक नाडी आहे ती सभोवार पसरलेल्या तंतूंनी वेष्टित असल्यामुळे परिमंडलातिकार आहे. तिच्यापासून शंभर नाड्या निघाल्या आहेत. कुंडलाच्या आवर्ताखाली तिची रचना आहे. थंडीने व्याकूळ होऊन पडलेल्या मोठ्या सर्पाच्या वेटोळ्याप्रमाणे तिने मंडल केले आहे.

ती शुभ्र आहे. प्राणवायूच्या योगाने एकसारखी स्पंदन पावणारी अशी ती सुषुन्मा नाडी आहे. तिच्या मुळाशी आत कुंडलाच्या आकाराची कुंडलिनी या नावाची चितशक्ती आहे. विणेमधून जशी तार झंकारते त्याप्रमाणे मुळाधारातून अत्यंत सूक्ष्म असा नाद तिच्यातून अनहत ध्वनीच्या रूपाने झंकारत असतो. केळीच्या गाभ्याप्रमाणे कोमल असलेल्या त्या मुलाधारातील ती पराशक्ती कुंडलिनी या नावाने प्रसिद्ध आहे. कारण ती कुंडलाकार धारण करून आहे ती प्राण इंद्रिये मन बुद्धी इत्यादी सर्वांच्या शक्तींना स्फूर्ती देणारी आहे.

अतिशय रागावलेल्या नागिनीप्रमाणे ती एकसारखी आपल्या तोंडाने प्राणाला वर फेकते व अपानाला खाली ओढते. याप्रमाणे ती सदा श्वासोच्छवास प्रक्रियेत निःश्वासरूप होऊन राहिली आहे. कुंडलिनी शक्ती सर्व वृत्तीचे बीज असल्यामुळे प्राणामध्ये क्रियाशक्ती व बुद्धीमध्ये ज्ञानशक्ती उत्पन्न करते. महासागरात जशा नदया विलय पावतात. त्याप्रमाणे तिच्यामध्ये सर्व नाड्या विलय पावतात. प्राणशक्तीस्वरूप मुलाधारस्य कुंडलीनी पासून प्रणवादी सर्व मंत्रांची उत्पत्ती होते. गायत्री मंत्राची उत्पत्ती कुंडलीनी पासून होते हे सांगताना योगचुडामणी उपनिषदांत असे म्हटले आहे की, कुंडलिनी शक्ती हि प्राणशक्तीयुक्त अशा गायत्रीचे उत्पत्तीस्थान आहे. प्राण विद्यारुपाने ज्या गायत्रीची उपासना केली जाते ती खरोखर कुंडलिनीच्या रूपाने साकार झालेली महाविद्याच होय. जो या महाविद्येला जाणतो तोच खरा वेदविद्येचे रहस्य जाणतो.

सर्पाला जशी दोन तोंडे असतात त्याप्रमाणे कुंडलिनीला अंतर्मुख व बहिर्मुख अशी दोन मुखे असतात. ती एका मुखाने ब्रम्हव्दार अडवून निद्रा घेते व दुसऱ्या मुखाने ती श्वास-प्रश्वास करते. हाच जीवाचा श्वासोच्छ्वास होय. एका मुखाने ही शक्ती नेहमी जागृत असते. या जागृतीमुळेच जीवाला बाह्य ज्ञान किंवा चेतना चांगल्या रीतीने होते. कुंडलिनीच्या या बहिर्मुख गतीमुळेच जीवाला एकत्वाची जाणीव न होता भिन्नतेची जाणीव होते. कुंडलिनी शक्तीचे अंतर्मुख हे सुप्त किंवा बंद असल्यामुळे जीवाला आपण कोण आहोत हे कळत नाही. त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा कायम अभाव असतो.

अद्वयतापोनिषदात कुंडलिनीचे वर्णन करताना ऋषींनी म्हटले आहे कि देहामध्ये सूर्यासारखी तेजस्वी रूप असलेली व पोर्णीमेच्या चंद्राप्रमाणे शितल असलेली सुषुन्मा नावाची नाडी आहे तिचा आरंभ मुलाधारापासून होऊन ती ब्रम्हरंध्रापर्यंत जाते. या नाडीमध्ये कोटीकोटी विजेप्रमाणे तेजस्वी व कमळाच्या तंतूप्रमाणे सूक्ष्म असलेली कुंडलिनी नावाची प्रसिद्ध शक्ती वास करते. महानारायण उपनिषदांमध्ये कुंडलिनीचे फार सुंदर वर्णन आले आहे ही कुंडलिनी शक्ती दोन ढगांमध्ये प्रकट होणाऱ्या विद्यूतलतेप्रमाणे तेजस्वी आहे. विजेपेक्षाही चपळ व अत्यंत बलवान आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात कुंडलिनी शक्तीचे जे अपूर्व वर्णन केले आहे. ते कुंडलिनीचे स्वरूप समजून घेण्यास अतिशय उपयुक्त असे आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-

नागिणीचे पिले| कुंकुमे नाहले| वळण घेऊन आले| शेजे जैसे ||

कुंकवाने किंवा केशराने न्हालेले नागिणीचे पिल्लू वेटोळे घालून निजलेले असावे त्याप्रमाणे मुळाधारात ती लहानशी सर्पासारखी कुंडलिनी शक्ती साडेतीन वेढे घालून खाली तोंड करून निजलेली असते. ती विजेच्या कंकणाप्रमाणे किंवा अग्निज्वालेच्या घडीप्रमाणे अथवा घोटून चकचकीत केलेल्या सोन्याच्या वेढ्याप्रमाणे नाभीस्कंदात नीट घट्ट व संकोचून बसलेली असते. ती कुंडलिनी जगदंबा आहे. जगाची माता आहे. सार्वभौम चैतन्याची ती ऐश्वर्यरूप शोभा आहे. ती जगद बीजाचा अंकुर जो जीव त्याच्यावर सावली धरते. ती निराकार ब्रह्माची साकार मूर्ती परमात्मा शिवाची संबळी व ओंकाराची जन्मभूमी आहे.

कुंडलिनी शक्ती जेव्हा हृदयापाशी येते. तेव्हा ती आपल्या तेजाची शिदोरी चैतन्याला अर्पण करते म्हणजे ती हृदयस्थ प्राणरूप आत्म्याशी आपल्या तेजासकट एकरूप होते. अर्थात कुंडलिनी आपली तेजरूप कांती टाकून जेव्हा प्राणरूप धारण करते त्यावेळी तिचे स्वरूप पुढील प्रमाणे दिसते. एखाद्या वाळूच्या बाहुलीला सोन्याचा पितांबर पांघरावा व तो सोडून मग तिला वेगळे करून ठेवावे त्याप्रमाणे ती दिसते. वाऱ्याची झुळूक लागून दिव्याची ज्योत विझावी किंवा वीज चमकून एकदम आकाशात नाहीशी व्हावी त्याप्रमाणे हृदय कमळापर्यंत जाऊन ती सोन्याच्या सरीसारखी किंवा प्रकाशाचा तेजोमय झरा वाहत असल्याप्रमाणे दिसते. तो शरीररूप तेजाचा झरा हृदयरुपी भूमीच्या पोकळीत एकदम जिरतो व शक्तीचे रूप शक्तीतच विरते. शिवाशी एकरूप झाल्याने ती फक्त प्राणरूपाने जाणली जाते. साऱ्या भौतिकाचा आधार असणारी ही शक्ती अनिर्वचनीय आहे. हीच तिची खरी ओळख आहे. हेच हिचं खर स्वरूप आहे.

कुंडलिनी जागृतीची आवश्यकता

वास्तविक शक्ती एकच आहे. ‘एकोSहं बहुस्यामि’ मी एक आहे मी बहु व्हावं या स्फूर्तीने ती सृष्टीच्या विविध कोटीत रुपांतरीत होते. आधुनिक विज्ञान म्हणत आहे कि उष्णता, विद्युत, चुंबक, गुरुत्वाकर्षण, आकर्षण, अपसारण ह्या एकाच शक्तीची विविधरूपे आहेत. शास्त्रज्ञांनी उर्जा अविनाशाचा सिद्धांत मांडून ही गोष्ट स्पष्ट केली आहे. ते म्हणतात उर्जा निर्माण करता येत नाही तसेच तिचा नाशसुद्धा करता येत नाही. फक्त उर्जेचं रुपांतर करता येत. जे आपल्या इंद्रियांना प्रत्यक्ष जाणवतं ते जडद्रव्य वस्तूतः ते जडद्रव्य नाही तर त्याचे स्वरूप उर्जेचे आहे. या संदर्भात ‘मॅक्स फ़ॅक्स’ या शास्त्रज्ञाची  क्रांतिकारक मानली जाते. जडवस्तू  व उर्जा यांचे परस्परांत परिवर्तन होऊ शकते. यापैकी जडवस्तू हे उर्जेचे स्थूल स्वरूप आहे. उर्जा ही अत्यंत सूक्ष्म व अनिर्वचनीय आहे. रेडीओ लहरी, दूरदर्शन लहरी व प्रकाशलहरी यांत मुलतःच कोणताही भेद नाही. या सर्व लहरींना  असे सामुदायीक नाव आहे. अशाप्रकारे ती एकच शक्ती सृष्टीच्या विविध कोटीत कशी रुपांतरीत होते हे आपण पाहिलं.

ही शक्ती अमर्याद अनंत असल्यामुळे सृष्टीचा पूर्ण पसारा उभारूनही शेष म्हणजे शिल्लक राहते. ही शेष राहिलेली शक्ती म्हणजे मुलाधारातील कुंडलिनी शक्ती होय. ही जेव्हा उर्ध्वभिमुख होते तेव्हा उत्क्रांतीला सुरुवात होते. उत्क्रांती शिखरावरील मानवदेह हे आत्मसाक्षात्काराचे उत्कृष्ट साधन आहे. आत्मा नित्य शुद्ध मुक्त असल्यामुळे तो मूलतःच पूर्ण आहे. सूर्यामुळे उत्पन्न होणारे ढग ज्याप्रमाणे सूर्यालाच झाकतात व काही काळ आपल्याला सूर्यदर्शन होत नाही. त्याप्रमाणे शुद्ध चैत्यन्यरूप असलेल्या आत्म्याच्या ठिकाणी ‘अहं’ ही स्फूर्ती होते व या स्फुर्तीज्ञानामुळे मनुष्य स्वतःला देह समजतो व काही काळ आपल्याला आत्मदर्शन होत नाही. परंतु ज्याप्रमाणे सोसाट्याचा वारा यावा आणि सर्व ढग उडून जावे त्याप्रमाणे सदगुरु कृपारूपी वारा वाहू लागला कि अज्ञानाचे ढग नाहीसे होतात व स्वयंप्रकाशरुपी आत्मा स्वतेजाने तळपू लागतो. त्यावेळेला मी देह म्हणजे जड आहे ही भावना नाहीसी होऊन मी ब्रम्ह म्हणजे चैतन्य आहे ही अनुभूती येते. ही अनुभूती प्राप्त होण्यासाठी कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची आवश्यकता असते. कारण कुंडलिनी म्हणजे चैतन्यशक्ती. ही शक्ती मूलाधारात वास करते. तिच्या अस्तित्वामुळेच सृष्टीचा आधार मूलाधार आहे. या आधाराच्या ठिकाणीच सर्व देवता वास करतात. या आधाराच्या पश्चिम भागात इडा पिंगळा व सुषुन्ना यांचा संगम होतो. ज्यावेळी गुरुकृपेने शक्ती जागृत होते. त्यावेळी मन व प्राण यांचा संयोग होऊन साधकाला दिव्य स्नान घडते. तेव्हा केवळ तेव्हाच तो साधक सर्व पापांतून मुक्त होतो. एरव्ही कुंभ मेळ्यात कितीही डुबक्या मारल्या तरी त्याला काही अर्थ नाही. ते फक्त भौतिक स्नान आहे. मन धुवायचं असेल तर इडा पिंगळा व सुषुन्नेच्या संगमातच स्नान घडलं पाहिजे आणि हे स्नान सदगुरुकृपेने कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर उपभोगाला भेटत. एरव्ही हे कदापीही शक्य नाही. मुलाधाराच्या पश्चिम भागामध्ये स्वयंभू लिंग असून तेथेच सुषुन्नेचा प्रवेशद्वार म्हणजे ब्रम्हद्वार आहे. हा मार्ग जेव्हा मोकळा होतो तेव्हा साधक सर्व प्रकारच्या संसार बंधनातून मोकळा होतो.

आपण मागे पाहिलेच आहे कि कुंडलिनी शक्ती ही द्विमुख शक्ती आहे. म्हणजेच कुंडलिनी शक्तीला दोन मुखे आहेत. ती एका मुखाने ब्रम्हद्वार अडवून निद्रा करते व दुसऱ्या मुखाने जागृत असते. त्यामुळेच जीवाला बह्यज्ञान किंवा चेतना प्राप्त होते परंतु फक्त चेतनेने चैतन्याची अनुभूती कशी येणार. चैतन्याची अनुभूती येण्यासाठी ही निद्रिस्त शक्ती जागृत होणे आवश्यक आहे. चितशक्ती ज्यावेळेला जागृत होते त्यावेळी शरीरातील प्रत्येक कणातून रक्तवाहिन्यातून चैतन्याचा प्रवाह प्रवाहित होतो. त्यामुळे शक्तीचे कार्य सुरु होऊन शरीराची जडता कमी होते व ही शक्ती क्रमाक्रमाने मनुष्याचे चैतन्यरूप प्रकट करते. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर त्याच्या देहाची जशी स्थिती असेल व मनाची जशी धारणा असेल त्याप्रमाणे शक्ती जागृत होऊन विकास होतो. अज्ञान जावून ज्ञान प्रकट होऊ लागते. कुंडलिनीच्या जागृतीमुळे हा विकास व ज्ञानप्राप्ती आपोआप घडून येते व शेवटी मनुष्याचा उद्धार होतो. ‘उत’ म्हणजे वरच्या दिशेने व ‘धार’ म्हणजे चैतन्याचा प्रवाह. कुंडलिनी ही चैतन्यमयी असल्यामुळे ती जागृत झाल्यावर ऊर्ध्वमुखाने म्हणजे वरच्या दिशेने चैतन्याचा प्रवाह प्रवाहित होऊन शेवटी संपूर्ण चैतन्याची प्रचीती येते. ही प्रचीती येण्यासाठी कुंडलिनी जागृती अत्यंत आवश्यकता आहे. किंबहुना कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याशिवाय ही अनुभूती येणे कदापीही शक्य नाही. सात्विकभाव जागृत होतात.

ही शक्ती दैवी ज्ञानाने युक्त असल्यामुळे प्रज्ञा जागृती, प्रतिभाशक्ती, कवित्व, ग्रंथनिर्मिती, असामान्य वक्तृत्व, नेतृत्व, शास्त्रामधील गूढ सिद्धांताची फोड, अतींद्रिय शक्ती जागृती, नवनवीन सिद्धांताची निर्मिती, प्रचंड आत्मविश्वास निडरपणा, कालबाह्य झालेल्या रुढी नियम तोडून सामाजिक विकासासाठी नवीन मूल्यांच्या निर्मिती इत्यादी गोष्टी आपोआप घडू लागतात. सरतेशेवटी मायेच्या यच्चयावत् बंधाचा पूर्ण निरास होऊन आत्मा स्वतेजाच्या प्रकाशाने चमकू लागतो. व्यक्ती स्वतःच शिवरूप होऊन जागृत कुंडली बनून ज्याप्रमाणे एका दिव्याने अनेक दिवे पेटवावे त्याप्रमाणे तो लोकांचा अज्ञानरूपी अंधकार दूर करून लक्ष लक्ष ज्ञानदीप प्रज्वलित करतो.

शंका व समाधान

वरील सर्व विवेचन वाचल्यानंतर कदाचित कुणी अशी शंका घेईल की आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी नावाची शक्ती जर अस्तित्वात आहे तर आतापर्यंत एकाही शरीरशास्त्रज्ञाला ती कशी दिसली नाही. आज विज्ञान एवढ प्रचंड प्रगत झालं आहे. कितीतरी प्रकारच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ अशा फोटोग्राफी व एक्स-रे मशिन्स निघाल्या आहेत. मग तरी सुद्धा अजूनपर्यंत ह्या कुंडलिनीच दर्शन एकाही शरीर शास्त्रज्ञाला कसं झालं नाही. ज्या गोष्टी आधुनिक प्रगत विज्ञानाला माहित नाही त्या गोष्टी प्राचीन ऋषीमुनींनी कशा जाणल्या. खरोखर हे सत्य आहे कि थोतांड? कुंडलिनी शक्ती ही कपोलकल्पित गोष्ट तर नाही ना? आपल्या सर्व शंका रास्त आहेत. बरोबर आहेत. आधुनिक विज्ञान प्रगत जरूर झालं आहे परंतु विज्ञानाला सुद्धा काही मर्यादा आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विज्ञान दृश्यावर प्रयोग करत आहे. विविध प्रयोगशाळा, विशिष्ट उपकरणे, अत्याधुनिक यंत्रे हि विज्ञानाची साधने आहेत. वैज्ञानिक ज्ञान हे सापेक्ष आहे. कारण ते शरीर मन बुद्धीच्या कक्षेत आकलन करता येत. अध्यात्मिक ज्ञान मात्र आपली इंद्रिये मन बुद्धी यांच्या कक्षेत आकलन करता येत नाही. ‘यतो वाच्यो निर्वतन्ते अप्राप्य मनसा सह:’ येथे वाचा खुंटीत होते. मन उन्मन होऊन बुद्धीची मर्यादा संपते.

अध्यात्म ज्ञान हे निरपेक्ष आहे. त्यामुळे ते विज्ञानाच्या कक्षेत येत नाही. आधुनिक विज्ञानाने हि गोष्ट मान्य केली आहे. भौतिक शास्त्रज्ञ भौतिक वस्तूचे पृथक्करण करून मानवी सुखात भर टाकत होते. तोपर्यंत सर्वकाही ठिक चाललं होत. परंतु ज्यावेळी ते प्राण, मन, बुद्धी, आत्मा ह्या चैत्यन्यशक्तीच्या उंबरठ्यावर येऊन पोहचले त्यावेळी त्यांची सृष्टी संशोधनाची आधुनिक साधने तेथे तोकडी पडू लागली आणि मग विज्ञानशास्त्रातले प्रकांड पंडित आईनस्टाईन, मिलीकन, एडिसन म्हणू लागले की आधुनिक विज्ञानाची सृष्टी संशोधनाची पद्धती तिच्या पलीकडे असणाऱ्या अदृश्य शक्तीला लागणे शक्य नाही. एन. वासुदेवन या विचारवंतानेही अणुमधील अधिष्टात्री देवता ही शास्त्रीय ज्ञानाच्या पलीकडे आहे अस म्हटलं आहे.   विज्ञानाच्या पलीकडे काही क्षेत्रे आहेत हे शास्त्रज्ञ नम्रपणे कबुल करू लागले आहेत. परंतु विज्ञानच न समजलेले काही शहाणे मात्र अध्यात्म व अध्यात्मिक साधना यांना मेंदूवर झालेला परिणाम संमोहन वगैरे नाव देवून खोट्या ठरवू पाहत असतात. असो, तांदळामध्ये नाही का खडे असतात. जग हे असेच आहे व ते असेच राहणार. आपण मात्र आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करू या.

प्रख्यात वैज्ञानिक एडिसन म्हणतो की कोणतीतरी अज्ञात अव्यक्त शक्ती कारणरूपाने कार्य करत आहे. आम्ही त्या तत्वाबद्दल त्या शक्तीबद्दल काही जाणत नाही. भौतिक जगाच्या पलीकडे काही अज्ञात अव्यक्त तत्वाशी सामना करावा लागतो हेही सत्य शास्त्रज्ञांनी आता कबुल केलं आहे. आपल्या सर्वांना मन आहे. अहो मन आहे म्हणून कॉलेजमध्ये आपण मानसशास्त्र शिकतो ना! आपल्याला फक्त मन आहे एवढंच नाही तर या मनाला काही रोग सुद्धा आहेत असं आपण मानतो म्हणून  सुद्धा आहेत. परंतु मन कोठे आहे? मेंदू डोक्यात असल्यामुळे व त्याची शंभर टक्के खात्री असल्यामुळे मन मेंदूतच आहे. असा चुकीचा गैर समज आपला झाला आहे. भौतिक शास्त्रज्ञांनी मेंदूच्या कार्याचे वर्णन केले असले तरी अमुक एक भाग म्हणजे मन असा उल्लेख कोठेही केला नाही. तसेच मेंदूलाच कोणी मन म्हणत नाही. मेंदू हा जड तत्वांचा बनला असल्यामुळे त्याला चैतन्याचे गुण नाहीत. असले तरी कुणी मनावर शस्त्रक्रिया केल्याचे अगर मनाला इंजेक्शन मारल्याचे ऐकिवात नाही. कारण मन अदृश्य आहे. म्हणजे विज्ञानाच्या मर्यादित साधनांनी व उपकरणांनी त्याच अस्तित्व सिद्ध करता येत नाही. प्रत्येक क्षणाला ज्याच अस्तित्व आपण मान्य करतो ते मन जर विज्ञानाला दाखवता येत नाही तर मनाला चेतना देणारी शक्ती भगवती कुंडलिनी शक्ती ती विज्ञानाच्या मर्यादित उपकरणांनी कशी बरे दाखवता येईल. कुंडलिनी शक्तीचा प्रत्यक्ष अनुभव न घेता तिच्या विषयी बोलणारे धर्माचार्य व विज्ञानवादी या दोघांमध्ये काहीही फरक नाही. कुंडलिनी शक्तीचा ज्यांना साक्षात्कार झाला आहे ते छातीठोकपणे सांगतात कुंडलिनी शक्ती, चैतन्यशक्ती ही आपल्या आत मध्ये विराजमान आहे. तिला जागृत करून मनुष्य चैतन्यरूप होऊ शकतो.

भारतीय संस्कृती व भारतीय तत्वज्ञानाची ओळख ज्यांनी संपूर्ण जगाला दिली ते विश्वविजेते स्वामी विवेकानंद राजयोग ग्रंथाच्या चौथ्या प्रकरणात असे म्हणतात की संपूर्ण ज्ञान व संपूर्ण चैतन्य यांची प्राप्ती करून घेण्याकरिता कुंडलिनी जागृत करणे हा एकच उपाय उपलब्ध आहे. सर्व सुखाची जननी प्राणशक्ती कुंडलिनी तुमच्या जवळच आहे. तिची आराधना करा तिला आळवा तिचे दुध तुम्हांस मिळाले तर अनंत काळापासून तुम्हांस लागलेली क्षुधा व तृष्णा तत्क्षणीच शांत होईल. विज्ञान या बद्दल अज्ञान आहे. व आपल अज्ञान विज्ञानाने कबूल केलं आहे. भावी काळात ही आनंदाची गोष्ट आहे. चला आपण विज्ञानातून अध्यात्माकडे वाटचाल करूया.

गुरु व गुरुमंत्र किंवा गुरुदिक्षा 

सामान्यपणे अध्यात्मीक क्षेत्रातला प्रत्येकजण गुरुमंत्र मिळाला म्हणजे काहीतरी फार मोठे साधन झाले असे समजतात. अनेक जण असे आहेत ज्यांनी तो घेतला आहे तर अनेक जणांना तो घ्यायचा आहे. पण या गुरुमंत्राच्या बाबतीत काही तरी गोड गैरसमज किंवा गोंधळ झाला आहे असे वाटते. कारण बरेच जण आपल्या कार्यसिद्धीसाठी जसे, नोकरी मिळावी, विवाह व्हावा, संतती व्हावी, घर व्हावे, रोग बरे व्हावेत यासाठी गुरुमंत्र मागत असतात. पण एक लक्षात घ्या की अशा कामना पूर्तीसाठी घेतलेला मंत्र हा गुरुमंत्र होत नाही तर ते कामना सिद्धीमंत्र होतात. गुरुमंत्र किंवा दीक्षामंत्र हा तुम्ही, गुरु आणि ते परमेश्वरी तत्व यांना सांधणारा सांधा असतो. त्यामध्ये कुठलीही कामना, इच्छा किंवा मागणे याचा अडथळा नसतो. 

गुरुमंत्र म्हणजे एक अभिवचन असते, गुरुला दिलेले वचन असते, गुरुप्रति काया, वाचा, मनाने, तनमनधनाने, सर्वार्थाने केलेले निःसंशय समर्पण असते. 'उतणार नाही मातणार नाही घेतला वसा (मंत्र ) टाकणार नाही'  मग काय वाटेल होवो असा ठाम निश्चय असतो. स्वेच्छेने पण पुर्ण विचारपूर्वक स्वीकारलेले बंधन असते. गुरुमंत्र घेईपर्यंतच तुम्हाला गुरुमंत्र घ्यायचा की नाही  या स्वयंनिर्णयाचा अधिकार असतो. ज्याक्षणी तुम्ही गुरुमंत्र घेता त्याच क्षणी तुमची सर्व सुत्रे गुरुकडे जातात. तुमचा स्वयंनिर्णयाचा अधिकार संपतो. फक्त 'गुरुर्वाक्यं प्रमाणं' असे व्हावे लागते. म्हणूनच तर 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु..' असे म्हटले आहे. गुरुसाठी सर्व समर्पित करण्याची तयारी ठेवावी लागते. गुरुमंत्र म्हणजे गुरुप्रती संपूर्ण समर्पण, गुरुप्रती अढळ निष्ठा आणि गुरुवर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास. 

पण एक लक्षात घ्या की गुरुमंत्र घेतल्याने तुमच्या कुठल्याही भौतिक समस्या सुटणार नाहीत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव वगैरे कुणाच्याही समस्या सुटल्या नाहीत, उलटपक्षी त्या वाढल्या. गुरुमंत्र म्हणजे समस्या मुक्तिचे साधन नव्हे. तर आध्यात्मिक वाटचालीचा खडतर मार्ग आहे. गुरु आणि गुरुमंत्र तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे, जसजसे तुम्ही पक्व होत जाल त्याप्रमाणे तुमची आध्यात्मिक प्रगती करत असतो. तुमची जन्म जन्मांतरीची भवबीजे,  संस्कारबीजे, कर्मबीजे हळूहळू जाळून टाकत असतो. शुद्ध करत असतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी करत असतो. 

आणखी एक गोष्ट म्हणजे, कुणीही कधीही उठतो आणि गुरुमंत्र मागत सुटतो, गुरुमंत्र काय बाजारातला भाजीपाला आहे कां ??? कुणीही उठावे आणि कधीही मागावा ??? गुरुमंत्र मिळण्यासाठी सुद्धा तपश्चर्या करावी लागते तेव्हा त्याचे महत्त्व कळते. पूर्वीच्या काळी तर अगदी बारा-पंधरा वर्षे गुरुगृही राहून गुरुची सर्व प्रकारे कायावाचामनाने, तनमनधनाने सेवा करुन त्याला प्रसन्न करावे लागे. कुंतीने अशीच दुर्वासांची सेवा केली, उमाने शिवाची केली, लक्ष्मीने विष्णूची, सरस्वतीने ब्रम्हदेवांची तर अनुसयेने अत्री ऋषींची ! त्यानंतरच गुरु अशा लायक शिष्यांची अगदी कठोर परीक्षा निष्ठुरपणे घेत असतात. अगदी सहनशीलतेचा अंत पहाणारी, मोडून टाकणारी, सगळा अहंकार धुळीस मिळवणारी, अगदी लाचार बनवणारी, हीन दीन लीन करून टाकणारी, मनाचा आणि शरीराचा कस पहाणारी परीक्षा घेतात, तुकामाऊलींनी गोंदवलेकर महाराजांची घेतली, रामानंदांनी कबीराची घेतली, बाबाजींनी तुकाराम महाराजांची घेतली. थोडा जरी अभिमान वाटला तरी श्रीगुरु असे काही करतात की तुमच्या अहंकाराचा पालापाचोळा होऊन जातो. गलितगात्र होऊन जातो. आपण पोचलो असे वाटता वाटता धाडकन खाली फेकून देतात, जणू सापशिडीचा खेळच सुरू असतो. एवढे भोग  भोगल्यावर मग तेव्हा कुठे शिष्याला ला गुरुमंत्रदीक्षा प्राप्त होते. गुरुमंत्रासाठी सुद्धा शिष्याची लायकी असावी लागते. गुरुमंत्रं अशिष्याय न देयं । 

गमतीने सांगायचं तर कधीही जिवंत गुरुपेक्षा फोटोतले गुरु केव्हाही चांगले. फोटोतल्या गुरुंना तुम्ही गुलाम बनवून ठेऊ शकता. पुजा केली नाही केली तरी ते काही बोलत नाहीत. भूक लागली,  तहान लागली असे सांगू शकत नाहीत, तुम्ही तुमच्या सवडीने त्याची सेवा करा, न करा. वाटेल तो नैवेद्य दाखवा न दाखवा. त्यांच्या मुर्तीवर फोटोवर १०००/- ₹चा हार घाला की १/- ₹ चा घाला.  त्यांचेसमोर काहीही बोला, करा. भ्रष्टाचार करा. ते काही बोलत नाहीत  बोलू शकत नाहीत. मुर्ती आणि फोटो तुमच्या गुलाम असतात. तुमच्या इच्छेनुसार जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याची दोन फुले वाहून, साखर समोर ठेवून, नमस्कार करुन एक दिनचर्येचा उपचार केला की मग तुम्ही वाटेल ते करायला मोकळे. या फोटोतल्या गुरुंना तुम्ही तुमचे वाटेल ते काम करायला सांगत असता.  दानपेटीत लाच म्हणून काही नोटा टाकून त्यांना लालूच दाखवू शकता. पण जिवंत गुरूंचे तसं नाही. त्यांना चोवीस तास झेलावे लागते. त्यांच्या आज्ञा पाळाव्याच लागतात. 

‌जिवंत गुरु म्हणजे धगधगता निखारा आहे.  ते तुमच्या आवाक्यात नाही येणार. ते तुमचे गुलाम नाहीत होणार. त्यांना जे हवे तेच ते करणार. चुकलं तर फटके लगावणार. ते तुमच्यावर कधी प्रेम करील तर कधी कान उपटील. ते त्यांच्या मर्जीनुसार वागण्यास स्वतंत्र असतात.  त्यांच्यावर जे कार्य जन्म जन्मांतरीच्या ऋणानुबंधांने सोपवलेले असते तेच ते करत असतात. ते निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळे भावाविष्कार दाखवून, कुणाशी असे तर कुणाशी तसे वागून आपले नियोजित कार्य पुर्ण करत असतात. तुम्ही त्यांच्या विषयी काय बोलता, काय अर्थ काढता याची त्यांना पर्वा नसते. पण गुरूच्या बाह्य वर्णनावरून, वर्तनावरून त्यांची योग्यता कळत नाही. त्यांना खरे ज्ञानी लोकच ओळखू शकतात.ते कुणाचे मिंधे  नसतात. त्यांना जे हवे तेच ते करतात. त्यांना जे हवे तेच घडवून आणतात.  सामान्य संसारी लोकांना सद्गुरु म्हणून त्यांचं काम करणारा हरकाम्या गुलाम हवा असतो. साधकाच्या बाबतीत असे आहे की गुरू मंत्र घेण्या आधी त्या साधकाने आपली शिष्य होण्याची पात्रता सिद्ध करावी, आपली आध्यात्मिक बैठक तयार करावी आणि मग गुरुची परीक्षा घ्यावी की आपली होडी पैलतीरावर नेण्यास खरच या गुरूंचे गलबत सक्षम आहे कां ??? कारण गुरुमंत्र घेणे किंवा दीक्षा प्राप्त करणे म्हणजे समस्यांचा किंवा  अपेक्षांचा कटोरा घेऊन उभे राहणे नव्हे तर गुरूंच्या एका शब्दा बरोबर सर्व काही सोडून त्यांच्या शब्दानुसार त्या परमेश्वराशी अनुसंधान साधण्यासाठी तयार होणे आणि मुख्य म्हणजे " आने की बाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्माकां कपाट कौन, कौनमे कौन समायां, काहे को नर देह आया" या नाथ पंथीय कोडयाचे उत्तर शोधण्यास सक्षम होणे म्हणजे गुरू दीक्षा होय. सारांश गुरू म्हणजे प्रत्यक्ष आग त्याच्याशी मुळीच खेळू नये.