नर्मदापुरम येथील पद्मासन धारी दत्त मुर्ती

या मुर्तीची स्थापना स्वतः टेंब्ये स्वामींनी केली आहे
25 मुखी दत्त महाराजांची मूर्ती

श्री स्वामी समर्थांच्या नित्यपूजेतील दत्तप्रभूंची दिव्य मूर्ती

सदर दत्त मूर्ती 350 वर्षापूर्वीची आहे. दत्त मूर्ती हि स्वामी समर्थच्या पूजेत होती. नंतर त्यानी त्याचे शिष्य चिदंबर दिक्षित यांना दिली. पूढे चिंदबर दिक्षित यांनी हि मूर्ती त्याचे शिष्य नागलिंग स्वामी (कर्नाटक) यांना दिली. पूढे नागलिंग स्वामी यांनी मूर्ती नामदेव महाराज चहाण यांना दिली व करवीर क्षेत्री जाण्यास सांगितले व साक्षात दत्त भेटेल म्हणाले. हि मूर्ती घेऊन श्री नामदेव महाराज करवीर क्षेत्री (कोल्हापूर) आले तिथ त्यांना गंगावेशेत शेषनारायण मंदिराजवळ दत्त अवतारी श्री कृष्ण सरस्वती महाराजाची गाठ पडली.
या मूर्तीचे वैशिष्ठ म्हणजे दत्ताची मूर्ती किंवा फोटो हे ब्रम्हा विष्णू महेश असे असतात पण मूर्तीत महेश मध्ये आहे म्हणजे ब्रम्हा महेश विष्णू अशी एकमेव गुरु शिष्य पंरमपरतील आहे. सदर मूर्ती दोनदा चोरीला गेली होती. तेव्हा दत्त महाराजानी श्री नामदेव महाराजाच्या स्वप्नात दृष्टात देऊन अंबाबाई मंदिरा जवळील जुने वणक्रूद्रेचे भांडयाच्या दुकानातून घेऊन जायला सांगितले. तेव्हा दोनशे रू. देऊन हि मूर्ती श्री नामदेव महाराजानी परत घेतली.
आज हि मूर्ती कोल्हापूरात शुक्रवार पेठेत पंचगंगा रोड येथे श्री नामदेव महाराज मठी येथे पहायला मिळते.

चिकोडी दत्त मंदिर (प्रति नुर्सिहवाडी)
ओम श्रीगुरुपरात्परगुरू पादुकाभ्यो नामोनम:
पुण्याचे रघुनाथ नरसिंह मामलेदार हे चिकोडी (बेळगांव) येथे मामलेदार होते, ते चिकोडी न्यायालयात नोकरीस होते, निस्सीम श्री दत्त भक्त असल्याने दर पौर्णिमेस घोड्यावरून श्रीक्षेत्र नुर्सिह वाडीस दर्शनासाठी जात असत. एका पौर्णिमेला दानवाड येथील दुधगंगा नदीला पूर आल्याने त्यांना घोड्यावरून नदी पार करता आली नाही. त्यामुळे पौर्णिमेची वारी खंडित झाली. त्यांना अतीव दुःख झाले. त्यावेळी त्यांनी नदीकाठीच विश्रांती घेतली असता त्यांना महाराजांचा दृष्टांत झाला. इथून पुढे तू माझ्याकडे येऊ नकोस, मीच तुला दर्शन देण्यासाठी तुझ्या गावामध्ये प्रकट झालो आहे. ओढ्याशेजारी औदुंबर वृक्ष आहे, तिथे माझ्या पादुका आहेत त्या शोधून त्यांची प्रतिष्ठापना करावी. ह्यानंतर मामलेदारांनी चिकोडीत येऊन अशी जागा कुठे आहे ह्याची चाचपणी केली असता चिकोत्रा नदी मानल्या जाणाऱ्या मोठ्या ओढ्याकाठी औदुंबराच्या वृक्षाजवळ पादुका मिळाल्या. ह्या पादुका घेऊन जेष्ठ वद्य तृतीयेस शके १७७७ ला त्यांची स्थापना करून मंदिर बांधले. काही काळ त्यांनी नित्य सेवा केली. नंतर बदली झाल्याने त्यांनी काही पुजाऱ्यांची नियुक्ती केली.
ह्या मंदिरात नित्य रुद्राभिषेक आदी विधी होतात. ह्या मंदिरात -श्रीधरस्वामी, थोरले महाराज, त्यांचे सहपाठी दीक्षित स्वामी, कांचीकामकोटीचे शंकराचार्य आदी सिद्ध येऊन गेल्याचा उल्लेख आहे.
पादुका पाषाणाच्या असून साडेचारशे किलो वजनाच्या आहेत. सोन्याच्या कासवावर त्या प्रतिष्ठापित करण्यात आल्या आहेत. अतिशय पवित्र, सुंदर असे हे मंदिर आहे. चिकोडी येथील मुख्य पुजारी श्री रामचंद्र पुजारी, ह्यांच्यामुळे आमचे दर्शन झाले, योगायोग ! आधी औदुंबर, मग नुर्सिहवाडी, श्री स्वामी समर्थ पादुका कार्यक्रम, आणि हे दर्शन झाले.

श्री दत्तमहाराजांची सुवर्ण मूर्ती, कणकवली जनवळ

ही मूर्ती कणकवली जानवल, कृष्णनगरी येथे बंगला नं 31 श्री मोहिते, यांना खोदकाम करताना 3.5 फुटावर जमिनीत सापडली. पूर्ण पाने सोन्याची असलेली ही स्वयंभू दत्तात्रयांची मूर्ती एका हाताने उचलत नाही एवढी जड आहे, आणि वजन काट्यावर ठेवली तर तिचे वजन *0* येते. दर गुरुवारी अभिषेक आणि दर्शनाला गेलेल्या सर्व भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेता येतो, तसेच भक्तांच्या ज्या काही मनोकामना असतील त्या तिथे पूर्ण होतात व त्याची सर्वांना प्रचिती आहे आणि ख्याती ही आहे.
एकमुखी दत्तामुर्ती श्री क्षेत्र झिरी

येथे सर्वात खाली श्री सीताराम महाराज मुर्ती आणि लगतच तीन संगमरमरी स्टेपस् आहेत. त्या तीन सत्पुरूषांची समाधी आहे
1) श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज नाम समाधी
2) श्री दिक्षीत स्वामीची वस्त्र समाधी
3) श्री सीताराम महाराज प्रत्यक्ष देह समाधी
किर्तीवल्लभा दत्तमंदिर, राजमहेंद्री
शृंगेरी मठात राहणारे ब्रम्हानंद सरस्वतींच्या (रामप्पा हे मंगळगिरी गावातले गोविंदराजु घराण्यातील) ह्यांनी पूर्वी स्वामी महाराजां शी नरसोवाडी व कोगुरगावी भेट झाली असता राजमहेंद्रीस येण्यास विनंती केली होती. पुष्कळ वर्षांनी मुक्त्यालयाहुन चातुर्मास सम्पन्न करून स्वामी महाराज संचार करत कबुली केल्या प्रमाणे राजमहेंद्रीस आले. तिथे स्वामी महाराजां च्या हातुन ब्रम्हानंद सरस्वतींनी त्रिमुखी दत्त मूर्ति व दत्त पादुकांची स्थापना करविली. तेव्हा स्वामी महाराज म्हणाले आजवर अनेकदा निरनिराळ्या ठिकाणी एकमुखी दत्त मूर्ति ची स्थापना केली पण आज पहिल्यांदाच ब्रम्हानंदांच्या आग्रहा खातर त्रिमुखी दत्त मूर्ति ची स्थापना केली.

बेळगाव येथील त्रिपुरीसुंदरी मठ येथील दत्तमूर्ती

याच वैशिष्ट्य अस, या मठाचे मठपती श्री किरण स्वामी यांचे पूर्वज हे स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त होते. त्यांना श्री स्वामी समर्थांनी स्वतः जवळ असलेला निलमणी दिला होता. मात्र त्या नंतर कालांतराने हा मणी कुठे आहे हे कुणालाही माहित नव्हते. आता चार पाच पिढ्यानंतर सध्याचे किरण स्वामी यांना श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष स्वप्नात येवून तो मणी तुमचे जुने घराचे भिंतीमध्ये आहे असे सांगीतले. त्या प्रमाणे त्यांनी भिंत पाडून पाहिले असता हा मणी सापडला. हा अक्कलकोट स्वामींचा मणी आहे. यास निलमणी म्हणतात. नंतर पुन्हा स्वामींनी स्वप्नात येवून किरण स्वामी यांना दत्त मंदिर बांधण्यास सांगीतले व त्या मध्ये दत्त मूर्ती कशी असावी हे सुध्दा सांगीतले त्या प्रमाणे किरण स्वामी यांनी दत्त मंदिर (मठ) बांधला. यालाच 'त्रिपुरीसुंदरी मठ' असे म्हणतात. हा स्वामींचा निलमणी बेळगाव मध्ये आहे हे अक्कलकोट मंदिर संस्थानालाही माहीत आहे.

प्रासादिक एक मूखी दत्त मंदीर, श्री दत्तक्षेत्र हूशंगाबाद

श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांना गंगा मातेने स्वयः दर्शन देऊन त्यांना नर्मदा मातेची ऊपासना करण्याची प्रेरणा दिली. महाराजांनी ह्या स्थळी साधना, तपश्चर्या केली तदनंतर त्यांनी आपले आराध्य दैवत श्री दत्तात्रयाच्या एक मूखी मूर्तीची स्थापना केली. मूर्ती अत्यंत सुंदर असून परिसर अत्यंत पवित्र आहे. शंभर वर्ष प्राचीन असे हे मंदीर व सदगुरू श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज यांच्या वास्तव्याने पवित्र झालेला परिसर भाविकांना एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. दत्तभक्तांनी नक्कीच दर्शन घेऊन येथील प्रासादिक अनुभूती घ्यावी.
।। श्री गुरूदेव दत्त ।।
।। नमो गुरवे वासुदेवाय ।।
पापविनाशी तीर्थ बिदर, कर्नाटक राज्य


श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज स्थापीत दत्त मूर्ती

श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांनी कै. पुरूषोत्तम भा. नारायण सदाशिव पारखी यांच्या स्मरणार्थ दत्तात्रयाची मुर्ती व विघ्नेश्वराचे लिंग स्थापून अगस्तेश्वराला अर्पण केले.