स्थान: श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे समोरचे कृष्ण तीरावर.
सत्पुरूष: श्री.नृसिंहसरस्वती, श्री दीक्षित स्वामी, श्री दत्तमहाराज कविश्वर.
विशेष: श्री गुरुचरित्रातील ६४ योगिनी मंदिर, गुरुपादुका, घेवडा वेल प्रसंगाचे स्थान.
अमरापूर क्षेत्र पुण्यपावन कृष्णा नदीच्या पलीकडील किनाऱ्यावर वसलेले आहे. हे स्थान चौसष्ठ योगीनींचे निवासस्थान असलेल्या शक्ती तीर्थाजवळ आहे. श्रीगुरुची सेवा त्या अदृश्य रूपाने करीत असत. अमरेश्वरजवळच पापविनाशी तीर्थ व इतर तीर्थे आहेत. नृसिंहसरस्वती यांनी १२ वर्षे येथे वास केला. नृसिंहसरस्वतीच्या वास्तव्याने पूनीत झालेले ग्राम पुढे नृसिंहवाडी म्हणून ओळखले जाऊ लागले.
अमरापूर हे नृसिंहवाडीपासून फक्त १ कि.मी अंतरावर आहे. श्रीगुरुंच्या काळात हे दोन्हीही एकच असावे. नृसिंहवाडीपासून अमरेश्र्वर मंदिर दिसते. श्रीगुरूचरित्रात १८ व्या अध्यायात श्रीगुरुचे पंचगंगा व कृष्णेच्या संगमस्थानी आल्याचा उल्लेख आढळतो. श्रीगुरुंची दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेल्याचा व घेवड्याच्या शेंगांचा वेल उपटून त्याचे दरिद्र हरण केल्याचा उल्लेख आहे. ही जागा अमरेश्वर मंदिराजवळच आहे. या अध्यायाचे रोजचे वाचन दरिद्र हरण्यासाठी एक हमखास सिद्ध उपाय आहे.
श्रीगुरुचरित्रात १९ व्या अध्यायात ६४ योगिनी नृसिंहसरस्वतींना पाण्याखाली असलेल्या त्यांच्या स्थानी नेऊन त्यांची पूजा अर्चा व आरती करुन विशेष पूजा माध्यान्ही करत असत. याचठिकाणी गंगानुजावर, श्रीगुरुंनी कृपा केली. त्यास त्रिस्थळी यात्रा घडवली.
श्रीगुरुंनी नंतर आपण गाणगापूरी जाण्याचा निश्चय चौसष्ट योगीनींना व भक्तास सांगितले त्यांना अतिशय दु:ख झाले.
श्रीगुरुंनी त्यांना सांगितले, मी अदृष्य रुपात येथेच वास करुन भक्तांची मनोरथे पूर्ण करणार आहे. याठिकाणी मनोहर पादूकांचा वास असेल, अन्नपूर्णा असेल. अमरेश्र्वर येथे चौसष्ट योगिनींचे मंदीर आहे. तेथे पादूका आहेत. तेथील झरोक्यातून पाहिल्यास नृसिंहवाडीचे मंदीर दिसते. या क्षेत्राच्या जीर्णोद्धाराचे कार्य प. पू. दत्तमहाराज कविश्र्वर यांनी केले आहे.
अमरापूर म्हणजे ग्राम । स्थान असे अनुपम्य ।
जैसा प्रयाग संगम । तैसे स्थान मनोहर ॥
वृक्ष असे औदुंबर । प्रत्यक्ष जाणा कल्पतरू ॥
देव असे अमरेश्वर । तया संगमा षटकूळी ॥ (गुरुचरित्र अध्याय १८)
श्री अमरेश्वरांचे हे स्थान फार युगांपूर्वीचे आहे. इ. स. १४ व्या शतकामध्ये "श्री नृसिंह सरस्वती महाराज "लाड कारंजा, जिल्हा वाशीम येथून या भागात आले. त्यांचे बरोबर श्री क्षेत्र काशी-मणिकर्णीके जवळ असलेल्या ६४ योगिनी आल्या. प्रथम त्यांनी "औदुंबर-भुवनेश्वरी" (गुरुचरित्र १७ वा अध्याय) जि. सांगली येथे दर्शन घेतले. नंतर अमरापुरी येऊन श्री अमरेश्वर लिंगाचे दर्शन घेतले व नंतर महाराज तपश्चर्येसाठी नृसिंह वाडीला गेले. त्यांचे सोबत आलेल्या योगिनी अमरापुरीच राहिल्या. श्री महाराजांनी नृसिंह वाडी येथे १२ वर्षे तपश्चर्या केली. त्यावेळी अमरापुरी राहिलेल्या योगिनी मध्यांन्ह काळीं सेवेला म्हणून वाडीला जातात. त्यांची पूजा करावी, आरती करावी व भिक्षेला घेऊन जातात तेच हे स्थान. (गुरुचरित्र १९वा अध्याय) श्री अमेरेश्वरांचे दर्शन श्री काशी विश्वेश्वरासमान आहे.
प. प. दीक्षित स्वामी महाराजांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या मूर्ती,
१) महागणपती
२) एकमुखी सहाभुजा मूर्ती उजवे बाजूस श्री टेंबे स्वामींच्या सर्व चिन्हांकित पादुका
३) अमरेश्वर लिंग
४) चौसष्ठ योगिनी ८ मूर्ती ८ प्रतिकात्मक-मूर्तस्वरूप
५) श्री वासुदेव पीठ एकमुखी दत्त (सत्यदत्त), उभी मूर्ती
६) पादुका दर्शन- टेम्बे स्वामी, दीक्षित स्वामी, दत्त प्रभू
७) व्यास यंत्र
या अमरापूर क्षेत्रात कृष्णा पंचगंगा संगम म्हणजे प्रयाग आहे. ही अमरापुरी म्हणजेच काशी होय. गोपुर हीच गया होय अशीही दक्षिणेकडील त्रिस्थळी मानलेली आहे.
प. पु. दीक्षित स्वामींचा उपदेश
"आमच्या गुरु महाराजांनी जे केले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हीही अखंड आचरले, तेच हितकारक आहे "
"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा " हा श्री दत्त नाममंत्र अखंड जपत राहावे म्हणजे सर्व मंगलमय होईल.
श्रीदत्त अमरेश्वर मंदीर
श्रीवासुदेवानंद सरस्वती पीठ ट्रस्ट
अमरेश्वर ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
पिन. ४१६१०४. फोन. ०२३२२ २७०४४१
श्री वासुदेवानंद सरस्वती पीठ औरवाड (अमरापूर)...
भिलवडी प्रमाणेच अमरापूर व नृसिंहवाडी येथे दोन्ही तीरांवर श्रीगुरुंचे वास्तव्य होते. प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांना हे स्थान अतिशय प्रिय होते. स्वामी महाराजांचे परमशिष्य श्री दिक्षीतमहाराजांवर विशेष प्रेम होते. स्वामी महाराज येणार्या भक्तांना नेहमी म्हणत की दिक्षीत महाराजांचा अधिकार खुप मोठा आहे श्री नृसिंहसरस्वती दिक्षित स्वामी यांनी स्वामी महाराजांच्या समाधी नंतर अमरापूर येथे श्री वासुदेवानंद सरस्वती पीठाची स्थापना केली आहे. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विविध ठिकाणी भ्रमंती आणि चातुर्मास करीत असताना जे लिखाण करीत ते अमरापूरला दिक्षितस्वामींकडे पाठवून देत असे. त्यांनीच ते सर्व साहित्य संकलित केले आहे. दिक्षीत स्वामींचा अधिकार खूप मोठा आहे असे प. प. टेंबे स्वामी नेहमी म्हणत असत. अमरापूर महात्म्य सांगताना श्रीनृसिंहसरस्वती स्वामी म्हणाले आहेत.
प्रयाग: संगम: ख्यात: काशिकात्वमरापुरी ॥
गया तु गोपुरी ज्ञेया दक्षिणी त्रिस्थली स्मृता ॥
याठिकाणी श्रीदत्त पादुका, प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या पादुका आणि प. प. दिक्षितस्वामी महाराजांच्या पादुका आहेत. तसेच व्यासयंत्र आहे. दिक्षीत स्वामी महाराजांनी अमरेश्वर माहात्मावर बारा श्लोकी स्तोत्र लिहले आहे
अमरेश्वर माहात्म स्तोत्र
प्रयागः संगमः ख्यातः l काशिकात्वमरापुरी ll
गयातु गोपुरी ज्ञेया l त्रिस्थली दाक्षिणी स्मृता ll १ ll
वास्वादिदेवाः पितरोर्यमाद्या l रुद्रादि देवा निवसंति सर्वे l
शुक्लात्परं गोपुरि तार्थराजं l गोतीर्थमेतत्वपरं च रुद्रं ll २ ll
तीर्थं पितृणां च हि तत्र दान l स्नानादि पुण्यं हयमितं च नित्यं ll
तीर्थेश्वराणा मुपचार युक्तं l पुजाफलं सत्सकलार्थवित्वं ll ३ ll
गोविंदगोपालकगोविलासी l गोपुण्यतीर्थे च वसत्यकामः
गोलोक गोभिः सहितो विलासं l नित्यं स राधारति कृन्मुकुंदः ll ४ ll
एवं देवाश्वामरेशस्य नित्यं l पूजां कृत्वा सर्वतीर्थे वसंति ll
सर्वेशं तं सच्चिदानंद पूर्णं l नित्यं वंदे स्वेष्टदं चामरेशं ll ५ ll
सर्वतीर्थात्परं तीर्थं l नामरेशात्परो गुरूः l
नान्नपूर्णा योगिनोभ्यो l भुक्तिमुक्तिविरागदाः ll ६ ll
अखिलानि च तीर्थानि l ब्रहमाण्डान्तर्गतानि च l
देव सिध्देश्वरादीनि l संति तान्यमरापुरे ll ७ ll
कैलासवासी गिरिजाविलासी l काशीनिवासी मरेश्वरो S सौ l
श्री काशिगंगामाणिकर्णिकाश्वा S मरापुरे सर्वतीर्थे वसंति ll ८ ll
श्रीशान्नपूर्णेश योगिनीयुक् l स तिष्ठतीहामरपुर्यजस्त्रं l
श्रीदत्त देवोह्युभयर्द्धिसिध्या S मरापुरे काशिपुरेश देवः ll ९ ll
अनाद्यनंतः श्रुतिशास्त्रसारो l महात्परानंद चिदेक कंदः l
श्रीकाशिनाथो ह्य मरेश्वरो यो S मरापुरे देव गणान्वितोस्ति ll १० ll
करीश पन्नगांगो S सौ l हारी कमल लोचनः l
कमलामलपादाब्ज l श्रीहरिर्गिरिजापतिः ll ११ ll
नीलांगो गिरिगोगोप गोपी चंदनगोप्रियः l
सुनंदनंदी गाणेश कुमारतनयप्रियः l
गंगाशशिवरांगः श्रीमोक्षलक्ष्मीपदप्रदः ll १२
अमरापूर या महाक्षेत्राला श्री वासुदेवानंदसरस्वतीपीठ असे नांव दिले.