प्रासादिक सिद्ध स्तोत्रे

श्री नारद रचित दत्तात्रय स्तोत्र

नारदपुराणांतर्गत श्री दत्तात्रेय स्तोत्र देत आहे. रोज संध्याकाळी देवघरात किंवा दत्तप्रतिमेसमोर गायीच्या तुपाचे निरांजन लावून, अत्यंत श्रद्धेने स्तोत्रवाचन करावे. या स्तोत्राचे १, ३, ११, २१ पाठ वाचू शकता. अतिशय प्रभावी, मन:शांतीदायक व समृद्धीकारक असे हे स्तोत्र असून, याचा पाठ अवश्य करावा ही दत्तभक्तांना विनंती आहे.
॥श्रीगुरुचरणार्पणमस्तु ॥

॥श्रीदत्तात्रेयस्तोत्रम् ॥ (नारदपुराण)

जटाधरं पाण्डुराङ्गं शूलहस्तं कृपानिधिम् । सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ॥

अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमन्त्रस्य भगवान् नारदऋषिः ।
अनुष्टुप् छन्दः । श्रीदत्तपरमात्मा देवता । श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥

जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहार हेतवे ।
भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥१॥

जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च ।
दिगम्बरदयामूर्ते दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥२॥

कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च ।
वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥३॥

र्हस्वदीर्घकृशस्थूल-नामगोत्र-विवर्जित ।
पञ्चभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥४॥

यज्ञभोक्ते च यज्ञाय यज्ञरूपधराय च ।
यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥५॥

आदौ ब्रह्मा मध्य विष्णुरन्ते देवः सदाशिवः । 
मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥६॥

भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे ।
जितेन्द्रियजितज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥७॥

दिगम्बराय दिव्याय दिव्यरूपध्राय च ।
सदोदितपरब्रह्म दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥८॥

जम्बुद्वीपमहाक्षेत्रमातापुरनिवासिने ।
जयमानसतां देव दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥९॥

भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे ।
नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥१०॥

ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले । 
प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥११॥

अवधूतसदानन्दपरब्रह्मस्वरूपिणे ।
विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥१२॥

सत्यंरूपसदाचारसत्यधर्मपरायण ।
सत्याश्रयपरोक्षाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥१३॥

शूलहस्तगदापाणे वनमालासुकन्धर ।
यज्ञसूत्रधरब्रह्मन् दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥१४॥

क्षराक्षरस्वरूपाय परात्परतराय च ।
दत्तमुक्तिपरस्तोत्र दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥१५॥

दत्त विद्याढ्यलक्ष्मीश दत्त स्वात्मस्वरूपिणे ।
गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥१६॥

शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकम् ।
सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥१७॥ 

इदं स्तोत्रं महद्दिव्यं दत्तप्रत्यक्षकारकम् । 
दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम् ॥१८॥

॥ इति श्रीनारदपुराणे नारदविरचितं दत्तात्रेयस्तोत्रं सुसम्पूर्णम् ॥


श्लोकमंत्र

श्री भृगू ऋषींच्या एका दत्तस्तोत्रातील हा श्लोकमंत्र आहे. हा श्लोक किमान पाच ते अकरा वेळा (सवडीनुसार) वाचावा आणि डोळे मिटून जमेल तसे श्रीदत्तमूर्तींचे ध्यान करावे, प्रार्थना करावी. हे करत असताना तुमची एखादी खूप दिवसांपासून अपूर्ण राहिलेली शुभ इच्छा पूर्ण व्हावी अशी दत्तमहाराजांकडे प्रार्थना करावी. 

दिगम्बरं भस्मविलेपितांगं 

चक्रं त्रिशूलं डमरुं गदां च ।

पद्मासनस्थं शशिसूर्यनेत्रं दत्तात्रेयं ध्येयमभीष्टसिद्ध्यै ॥

ॐ नमः श्रीगुरुं दत्तं दत्तदेवं जगद्गुरुम् ।

निष्कलं निर्गुणं वन्दे दत्तात्रेयं नमाम्यहम्


दत्तात्रय गायत्री

ॐ दत्तात्रेयाय विद्महे अवधूताय धीमहि. तन्नो दत्त: प्रचोदयात्‌

ॐ दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि. तन्नो दत्त: प्रचोदयात्‌

ॐ दिगम्बराय विद्महे योगीश्वराय धीमहि. तन्नो दत्त: प्रचोदयात

ॐ दत्तात्रेयाय विद्महे दिगम्बराय धीमहि. तन्नो दत्त: प्रचोदयात्‌

ॐ दत्तात्रेयाय विद्महे अत्रीपुत्राय धीमहि. तन्नो दत्त: प्रचोदयात


श्री दत्तात्रेयस्तोत्रम्

जटाधरं पाण्डुरंगं शूलहस्तं दयानिधिम्। सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ॥१॥

जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहारहेतवे। भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते॥२॥

जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च। दिगंबर दयामूर्ते दत्तात्रेय नमोस्तुते॥३॥

कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च । वेदशास्स्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते॥४॥

ह्रस्वदीर्घकृशस्थूलनामगोत्रविवर्जित! पञ्चभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोस्तुते॥५॥

यज्ञभोक्त्रे च यज्ञेय यज्ञरूपधराय च। यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोस्तुते॥६॥

आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुरन्ते देवः सदाशिवः। मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते॥७॥

भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे। जितेन्द्रिय जितज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते॥८॥

दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय च। सदोदितपरब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते॥९॥

जंबूद्वीप महाक्षेत्र मातापुरनिवासिने। भजमान सतां देव दत्तात्रेय नमोस्तुते॥१०॥

भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे। नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोस्तुते॥११॥

ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले। प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोस्तुते॥१२॥

अवधूत सदानन्द परब्रह्मस्वरूपिणे । विदेह देहरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते॥१३॥

सत्यरूप! सदाचार! सत्यधर्मपरायण! सत्याश्रय परोक्षाय दत्तात्रेय नमोस्तुते॥१४॥

शूलहस्त! गदापाणे! वनमाला सुकन्धर!। यज्ञसूत्रधर ब्रह्मन् दत्तात्रेय नमोस्तुते॥१५॥

क्षराक्षरस्वरूपाय परात्परतराय च। दत्तमुक्तिपरस्तोत्र! दत्तात्रेय नमोस्तुते॥१६॥

दत्तविद्याड्यलक्ष्मीश दत्तस्वात्मस्वरूपिणे। गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते॥१७॥

शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकम्। आश्च सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोस्तुते॥१८॥

इदं स्तोत्रं महद्दिव्यं दत्तप्रत्यक्षकारकम्। दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम् ॥१९॥

इति श्रीनारदपुराणे नारदविरचितं श्रीदत्तात्रेय स्तोत्रं संपुर्णमं।।


दत्तात्रेय स्तोत्र- चित्तस्थैर्यकरं स्तोत्रं 

अनसूया त्रिसंभुत दत्तात्रेय महामते | 
सर्व देवाधिदेव त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ||१||

शरणागत दीनार्त तारकाSखिलकारक |
सर्वचालक देव त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ||२||

सर्वमंगल मांगल्य सर्वाधिव्याधि भेषज | 
सर्व संकट हारिन त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ||३||

स्मर्तृगामी स्व भक्तानां कामदो रिपुनाशन: | 
भुक्तिमुक्ति प्रद: स त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ||४||

सर्वपापक्षय  करस्तापदैन्य निवारण: | 
योSभिष्ट द: प्रभु: स त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ||५||

य एतत्प्रयत: श्लोक पंचक प्रपठेत्सुधी: | 
स्थिरचित्त : स भगवत्कृपापात्रं भविष्यति ||६||

|| इति श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितं चित्तस्थैर्यकरं स्तोत्रं संपूर्णम् ||


प. पू. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराजांनी अनेक मंत्र अणि स्तोत्ररचना अनेक प्रकारच्या उपायांवर केलेली आहे. त्यातलेच हे एक स्तोत्र आहे त्याला श्रीदत्तस्तवस्तोत्रं म्हणजेच रोगनाशस्तोत्र म्हणतात.

श्रीदत्तस्तवस्तोत्रं

भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः ||
दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामि तं || १ ||

यन्नामस्मरणाद्-दैन्यं पापं तापश्च नश्यति ||
भीतिग्रहार्तिदु:स्वप्नं दत्तात्रेयं नमामि तम् || २ ||

दद्रुस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका ||
नश्यन्ति अन्येSपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामि तम् || ३ ||

संगजा देशकालोत्था अपि सांक्रमिका गदा: ||
शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामि तम् || ४ ||

सर्पवृश्चिकदष्टानां विषार्तानां शरीरिणाम् ||
यन्नाम शान्तिदं शीघ्रं दत्तात्रेयं नमामि तम्|| ५ ||

त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनम् ||
यन्नाम क्रूरभीतिघ्नं दत्तात्रेयं नमामि तम् || ६ ||

वैर्यादिकृतमन्त्रादिप्रयोगा यस्य कीर्तनात ||
नश्यन्ति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामि तम् || ७ ||

यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते ||
य ईश: सर्वतस्त्रांता दत्तात्रेयं नमामि तम् || ८ ||

जयलाभयशःकामदातुर्दत्तस्य यः स्तवम् ||
भोगमोक्षप्रदस्येमं पठेद्-दत्तप्रियो भवेत् || ९ ||

इति श्रीवासुदेवानन्दसरस्वती विरचितं श्रीदत्तस्तवस्तोत्रं संपूर्णम् ||

श्रीदत्तस्तवस्तोत्रातील ऋचा क्र. ३ आणि ४ ह्या प्रकारे आहे

|| दद्गुस्फोटक कुष्ठादी, महामारी विषुचिका |
नश्यन्त्यनेपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामी तं ||

संगजा देशकालोत्था, अपिसांक्रमिका गदा: |
शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामी तं ||

या दोन्ही ऋचांचा अर्थ असा आहे

अंगावर उठणारे फोड, चट्टे, त्वचारोग हे दत्तस्मरणाने दूर होतात,  साथीचे विकारही दत्ताचे नामस्मरण केल्याने दूर होतात असा या मंत्राचा अर्थ आहे.


श्रीदत्तात्रेय कवचम् 

श्रीपादः पातु मे पादावूरु सिद्धासनस्थितः ।
पायाद्दिगंबरो गुह्यं नृहरिः पातु मे कटिं ॥ १ ॥

नाभिं पातु जगतस्त्रष्टोदरं पातु दलोदरः ।
कृपालुः पातु हृदयं षड्भुजः पातु मे भुजौ ॥ २ ॥

स्त्रक्कुंडी-शूल-डमरु शंख-चक्र-धरः करान् ।
पातु कंठं कंबुकंठः सुमुखः पातु मे मुखम् ॥ ३ ॥

जिह्वां मे वेदवाक् पातु नेत्रे मे पातु मे दिव्यदृक् ।
नासिकां पातु गंधात्मा पातु पुण्यश्रवाः श्रुती ॥ ४ ॥

ललाटं पातु हंसात्मा शिरः पातु जटाधरः ।
कर्मेन्द्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेन्द्रियाण्यजः ॥ ५ ॥

सर्वान्तरोन्तः करणं प्राणान्मे पातु योगिराट् ।
उपरिष्टादधस्ताच्च पृष्ठतः पार्श्वतोऽग्रतः ॥ ६ ॥

अन्तर्बहिश्च मां नित्यं नानारुप धरोऽवतु ।
वर्जितं कवचेनाव्यात्स्थानं मे दिव्यदर्शनः ॥ ७ ॥

राजतः शत्रुतो हिंस्त्राद्दुष्प्रयोगादितोऽघतः ।
आधि-व्याधि-भयार्तिभ्यो दत्तात्रेयः सदावतु ॥ ८ ॥

धन-धान्य-गृह-क्षेत्र-स्त्री-पुत्र-पशु-किंकरान् ।
ज्ञातींश्च पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः ॥ ९ ॥

बालोन्मत्त पिशाचाभोद्युनिट्संधिषु पातु माम् ।
भूत-भौतिक-मृत्युभ्यो हरिः पातु दिगंबरः ॥ १० ॥

य एतद्दत्तकवचं संनह्याद्भक्तिभावितः ।
सर्वानर्थविनिर्मुक्तो ग्रहपीडाविवर्जितः ॥ ११ ॥

भूतप्रेतपिशाचद्यैर्देवैरप्यपराजितः ।
भुक्त्वात्र दिव्य भोगान् स देहांतेतत्पदंव्रजेत् ॥ १२ ॥

॥ इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं श्रीदत्तात्रेय कवचं संपूर्णम् ॥


श्री दत्तस्तुति

यतीरूप दत्तात्रया दंडधारी । पदीं पादुका शोभती सौख्यकारी ॥
दयासिंधु ज्याचीं पदें दुःखहारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥१॥

पदें पुष्करा लाजवीती जयाचीं । मुखाच्या प्रभे चंद्र मोहूनि याची ॥
घडो वास येथें सदा निर्विकारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥२॥

सुनीटा असती पोटर्‍या गुल्प जानू । कटीं मौंजि कौपीन ते काय वानूं ॥
गळां मालिका ब्रह्मसूत्रासि धारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥३॥

गळां वासुकीभूषणें रुडमाळा । टिळा कस्तुरी केशरी गंध भाळा ॥
जयाची प्रभा कोटिसूर्यांसी हारी । तुम्हांवीण दत्ता० ॥४॥

जटाभार माथां प्रभा कुडलांची । त्रयास्यें भुजा शास्त्र सायूध साची ॥
त्रिशूळमाळादिक छटिधारी । तुम्हांवीण दत्ता० ॥५॥

कली पातला पातका वाढवाया । तयानें जना मोहिलें गाढ वायां ॥
जगीं अवतरें दुःखहारा असुरारी । तुम्हांवीण दत्ता० ॥६॥

अनूसयासत्त्व हरावयासी । त्रिमूर्ती जातां करि बाळ त्यांसी ॥
निजे पालखीं सर्वदा सौख्यकारी । तुम्हांवीण दत्ता० ॥७॥

प्रसिद्ध असती क्षेत्रतीर्थें तयांचा । कली पातल्या जाहला लोप साचा ॥
करी पत्प्रसिद्धी भिषें ब्रह्मचारी । तुम्हांवीण दत्ता० ॥८॥

मुखें वेद नीचाचिया बोलविले । क्षिशैल्या क्षणें तंतुकालागिं नेलें ॥
सुदेही करी विप्रकुष्ठा निवारीं । तुम्हांवीण दत्ता० ॥९॥

दरिद्र बहू कष्टला विप्र त्यासी । क्षणें द्रव्य देऊनि संतोषवीसी ॥
दिला पुत्र वंध्या असुनी वृद्ध नारी । तुम्हांवीण दत्ता० ॥१०॥

मनीं इच्छि विप्रैक व्हाया अन्नदान । असें जाणुनी कौतुका दावी पूर्ण ॥
करी तृप्त लेशान्निं जो वर्ण चारी । तुम्हांवीण दत्ता० ॥११॥

विलोकूनिया शूद्रभक्ती मनीं ती । कृपें दीधलें पीक अत्यंत शेतीं ॥
करी काशियात्रा कुमारा अधारी । तुम्हांवीण दत्ता० ॥१२॥

नृपस्थानिं रंकासही स्थापियेलें । मदें व्यापिले विप्र निर्गर्व केले ॥
कृपादृष्टीनें स्फोटकातें निवारी । तुम्हांवीण दत्ता० ॥१३॥

द्विजाच्या घरीं घेवडा वेल ज्यानें । मुळापासुनी तोडिला तो तयानें ॥
दिली संतती संपदा दुःखहारी । तुम्हांवीण दत्ता० ॥१४॥

शुष्कासुनी काष्ठही वृक्ष केला । गतप्राण तो पुत्र सजीव केला ॥
औदुंबरीं आवडे वास भारी । तुम्हांवीण दत्ता० ॥१५॥

अशीं कीर्ति केली अगण्य । अगम्यागमा खातिही ज्याचि धन्य ॥
स्मरें भक्तिनें तद्भवदुःखहारी । तुम्हांवीण दत्ता० ॥१६॥

अनंतावधी जाहले अवतार । परी श्रीगुरूदत्त सर्वांत थोर ॥
त्वरें कामना कामिकां पुर्णकारी । तुम्हांवीण दत्ता० ॥१७॥

तपें तीर्थ दानें जपादी करिती । स्वहीतार्थ ते दैवताला स्तवीती ॥
परी केलिं कर्में वृथा होति सारीं । तुम्हांवीण दत्ता० ॥१८॥

सदा आससी दत्ता सर्वार्थकामा । त्वरें भेतसी टाकुनी सर्व कामा ॥
मना माझिया आवरीं दैन्यहारी । तुम्हांवीण दत्ता० ॥१९॥

मनीं आवडी गायनाची प्रभूला । करी सुस्वरें नित्य जो गायनाला ॥
तयाच्या त्वरें संकटांतें निवारी । तुम्हांवीण दत्ता० ॥२०॥

असे क्षेत्र काशी शिवाची पुरी ते । प्रभातीं करी स्नान गंगातिरीं तें ॥
करी कर्विरीं अह्रिं भिक्षार्थ फेरी । तुम्हांवीण दत्ता० ॥२१॥

निशीं जाय निद्रार्थ मातापुरासी । सवें कामधेनू वसे तेजाराशी ॥
तसे श्वानरूपी सवें देव चारी । तुम्हांवीण दत्ता० ॥२२॥

जनां मुक्तिचा मार्ग दावावयासी । कळाया स्वरूपप्रचीती तयांसी ॥
त्रिलोकीं करी जो निमिषार्धिं फेरी । तुम्हावीण दत्ता० ॥२३॥

असें रूप ठावें तुझें आसतांना । वृथा हिंडलों दैवतें तीर्थ नाना ॥
परी शेवटीं पायिं आलों भवारी । तुम्हांवीण दत्ता० ॥२४॥

जधीं जन्मलों नेणुं दुःखासुखाला । अयुर्दाय अज्ञानिं तो व्यर्थ गेला ॥
कळूं लागतां खेळलों खेळ भारी । तुम्हांवीण दत्ता० ॥२५॥

तृतीयांश आयुष्य ऐसेंचि गेलें । परी नाहीं त्वन्नाम मीं आठवीलें ॥
अतां यौवन प्राप्त झालें अपारी । तुम्हांवीण दत्ता० ॥२६॥

परद्रव्य कांता पराची पाहातां । स्परादी रिपू ओढिती मानसाऽतां ॥
कसा ध्यावुं तूतें मधूकैटभारी । तुम्हांवीण दत्ता० ॥२७॥

पुढें वृद्धता प्राप्त होईल वाटे । तिच्या यातना देखतां चित्त फाटे ॥
कधीं भेटसी केविं हो चक्रधारी । तुम्हांवीण दत्ता० ॥२८॥

अयुष्यार्ध निद्रार्णवामाजि गेलें । पणा तीन शेषांत ते जाण केले ॥
तयांनी मना गोविलें दुःख भारी । तुम्हांवीण दत्ता० ॥२९॥

अशा घोर मायासमुद्रा पहातां । भिवोनी पदीं पातलों तूमच्याऽतां ॥
तरी क्लेशचिंतादि दुःखासि हारीं । तुम्हांवीण दत्ता० ॥३०॥

त्यजा मत्त पाखंड ते सज्जनाहो । धरा मानसीं भक्ति निष्ठा दृढा हो ॥
भवांबूधिच्या नेइ तो पैलपारीं । तुम्हांवीण दत्ता मला ० ॥३१॥

स्वतां घेतला दाखला सद्गुरूंचा । तसा घेति ते आणि घेतील साचा ॥
मनःकामना होतसे पूर्ण सारी । तुम्हांवीण दत्ता० ॥३२॥

करी पाठ जो कां स्तुती ही त्रिकाळा । तयाच्या प्रतापें पडे भीति काळा ॥
गुरू सर्व दारिद्रदुखां निवारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥३३॥

॥ शार्दूलविक्रीडित ॥

काया व्यर्थ तपादि यज्ञिं हवनीं स्वाध्यायिं तीर्थाटनीं ॥
शास्त्राच्या पठनीं जनीं वनिं गिरीघोरांदरीं जाउनी ॥
अज्ञानें भिवुनी अरीसि नयनीं काळासही पाहुनी ॥
द्वैवर्णाक्षर "दत्त" घ्या तरि सुखीं कां शीणवावी कुणी ॥१॥


टेंबे स्वामी कृत औदुंबर पादुकास्तोत्रम्

वन्दे वाङ्मनसातीतं निर्गुणं सगुणं गुरुम् । दत्तमात्रेयमानन्दकन्दं भक्तेष्टपूरकम् ।।१।।
नमामि सततं दत्तमौदुम्बरनिवासिनम् । यतीन्द्ररूपं च सदा निजानन्दप्रबोधनम् ।।२।।
कृष्णा यदग्रे भुवनेशानी विद्यानिधिस्तथा । औदुम्बराः कल्पवृक्षाः सर्वतः सुखदा सदा ।।३।।
भक्तवृन्दान्दर्शनतः पुरुषार्थचतुष्टयम् । ददाति भगवान् भूमा सच्चिदानन्दविग्रहः ।।४।।
जागर्ति गुप्तरूपेण गोप्ता ध्यानसमाधितः। ब्रह्मवृन्दं ब्रह्मसुखं ददाति समदृष्टितः ।।५।।
कृष्णा तृष्णाहरा यत्र सुखदा भुवनेश्वरी । यत्र मोक्षदराड्दत्तपादुका तां नमाम्यहम् ।।६।।
पादुकारूपियतिराण्नरसिंहसरस्वती । राजते राजराजश्रीदत्तश्रीपादवल्लभः ।।७।।
नमामि गुरुमूर्ते तं तापत्रयहरं हरिम् । आनंदमयमात्मानं नवभक्त्या सुखप्रदम् ।।८।।
करवीरस्थविदुषमूढपुत्रं विनिन्दितम् । छिन्नजिह्वं बुधं चक्रे तद्वन्मयि कृपां कुरु ।।९।। 

।। इति श्री. प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं औदुम्बरपादुकास्तोत्रं संपूर्णम् ।।


|| श्रीगुरुपादुकाष्टम् ||  

ज्या संगतीनेंच विराग झाला । मनोदरीचा जडभास गेला ॥
साक्षात्परमात्मा मज भेटवीला ॥
  विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥१॥

सद्योगपंथे घरिं आणियेलें । 
     अंगेच मातें परब्रह्म केलें ॥
प्रचंड तो बोधरवी उदेला ॥
     विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥२॥

चराचरीं व्यापकता जयाची । 
      अखंडभेटी मजला तयाची ॥
परंपदी संगम पूर्ण झाला ॥
      विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥३॥

जो सर्वदा गुप्त जनांत वागे ।  
      प्रसन्नभक्ता निजबोध सांगे ॥
सद्भक्तिभावा करितां भुकेला ॥ 
  विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥४॥

अनंत माझे अपराध कोटी ।
     नाणी मनीं घालूनि सर्व पोटीं ॥
प्रबोधकरितां श्रम फ़ार झाला ॥ 
     विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥५॥

कांही मला सेवनही न झालें ।
     तथापि तेणे मज उद्धरीलें ॥
आता तरी अर्पिन प्राण त्याला ॥ 
     विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥६॥

माझा अहंभाव वसे शरीरीं ।
     तथापि तो सद्गुरु अंगिकारी ॥
नाही मनी अल्प विकार ज्यालां । 
     विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥७॥

आतां कसा मी उपकार फ़ेडूं । 
     हा देह ओवाळून दूर सांडू ॥
म्यां एकभावें प्रणिपात केला । 
     विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥८॥

जयां वानिता वानिता वेदवाणी । 
     म्हणे नेति नेती ति लाजे दुरुनी ॥
नव्हे अंत ना पार ज्याच्या रुपाला ॥ 
     विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥९॥

जो साधुचा अंकित जीव जाला । 
     त्याचा असे भार निरंजनाला ॥
नारायणाचा भ्रम दूर केला ॥ 
     विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥१०॥


नर्मदाष्टकम्

सबिन्दुसिन्धुसुस्खलत् तरङ्ग भङ्गरञ्जितं 
द्विषत्सुपापजातजातकारिवारिसंयुतम् । 
कृतान्तदूत कालभूत भीतिहारि वर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ १ ॥ 

त्वदम्बुलीन दीन मीन दिव्य सम्प्रदायकं 
कलौमलौघ भारहारि सर्वतीर्थनायकम् । 
सुमत्स्यकच्छ नक्रचक्र चक्रवाक शर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ २ ॥ 

महागभीर नीरपूर पापधूत भूतलं 
ध्वनत्ससमस्त पातकारि दारितापदाचलम् । 
जगल्लये महाभये मृकण्डुसुनूहर्म्यदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ३ ॥ 

गतं तदैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यदा 
मृकण्डुसूनुशौनका सुरारिसेविसर्वदा । 
पुनर्भवाब्धि जन्मजंभवाब्धि दुःखवर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ४ ॥ 

अलक्षलक्ष किन्नरामरासुरादिपूजितं 
सुलक्षनीर तीरधीर पक्षिलक्षकूजितम् । 
वसिष्ठसिष्ट पिप्पलादि कर्दमादिशर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ५ ॥ 

सनत्कुमार नाचिकेत कश्यपादिषट्पदैः 
धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदैः । 
रवीन्दुरन्तिदेवदेवराजकर्मशर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ६ ॥ 

अलक्षलक्ष लक्षपापलक्ष सायरसायुधं 
ततस्तु जीवजन्तुतन्तु भुक्तिमुक्तिदायकम् । 
विरश्र्चिविष्णुशङ्कर स्वकीय धामवर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ७ ॥ 

अहोऽमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे 
किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे । 
दुरन्तपापतापहारि सर्वजन्तुशर्मदे 
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ८ ॥ 

इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा 
पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा । 
सुलभ्य देहदुर्लभं महेंशधाम गौरवम् 
पुनर्भवा न वै नरा विलोकयन्ति रौरवम् ॥ ९ ॥ 

॥ इति श्रीमत् आद्यशङ्कराचार्यविरचितं 

नर्मदाष्टकं सम्पूर्णम् ॥ 

नर्मदाष्टकं मराठी अर्थ

१) बिंदूपासून सिंधूपर्यंत अखंड तरंगाकार विनटलेल्या आणि दुष्ट प्रवृत्तीमुळे प्राप्त होणार्‍या जन्मपरंपरेचा नाश करणार्‍या जलाने युक्त अशा तुझ्या चरणकमलांना, कालस्वरुप यमदूतांची भीती हरण करुन रक्षण करणार्‍या देवी नर्मदे, मी नमन करतो. 
२) तुझ्या जलामध्ये विहरणार्‍या दीनदुबळ्या मत्स्यांना, कासवांना आणि जलावर भरारी मारणार्‍या चकवा, घडियाल तसेच हंसआदि पक्षांना दिव्यता प्रदान करणार्‍या, कलियुगांतील महादोषांचा परिहार करणार्‍या सकलतीर्थामध्ये वरिष्ठ अशा तुझ्या पदकमलांना, पुष्कळ मासे, कासवे आणि मगरींच्या समुदायांचे, तसेच चक्रवाक पक्ष्यांचे कल्याण करणार्‍या देवी नर्मदे मी नमन करतो. 
३) महाप्रचंड पुराने भूतलावरील सारी पापे धुऊन काढणार्‍या आणि घनगंभीर नादाने पातकांच्या राशी आणि पर्वतप्राय संकटे यांचा चक्काचूर करणार्‍या तुझ्या चरणांबुजांना, प्रलयकालीन महाभयाच्यावेळी मार्कण्डेयऋषींना आपल्या ठायी आश्रय देणार्‍या देवी नर्मदे मी नमस्कार करतो. 
४) मार्कण्डेय, शौनक, देवेन्द्र ज्यांचे सदैव सेवन करतात, त्या तुझ्या जलाचे नुसते दर्शन होताच माझे भय कुठल्या कुठे पळून गेले. पुनर्जन्म तसेच संसारसागरांतील दुःखांपासून कवचाप्रमाणे रक्षण करणार्‍या देवी नर्मदे, तुझ्या पदकमलांना मी नमस्कार करतो. 
५) अगणित किन्नर, देव, आणि असुर ज्यांची पूजा करतात आणि ज्यांच्या तीरावरील लक्षावधी पक्षिगण जलाशय निरखीत धीटपणे अखंड कूजन करीत असतात, त्या तुझ्या चरणकमलांना, मुनीश्रेष्ठ वसिष्ठ, पिप्पलाद, कर्दमप्रभृतींचे कल्याण करणार्‍या देवी नर्मदे, तुझ्या पदकमलांना मी वंदन करतो. 
६) सनत्कुमार, नचिकेत, कश्यप, अत्रि नारदादींनी ज्यांना आपल्या अंतःकरणांत साठविले आहे, त्या तुझ्या सूर्य, चंद्र, अन्तिदेव आणि देवरज इंद्र यांच्या सत्कर्मांना विश्र्वांत प्रतिष्ठित करणार्‍या देवी नर्मदे, तुझ्या पादकमलांना मी नमस्कार करतो. 
७) दृष्टादृष्ट लक्षावधी पातकांच्या राशींचा भेद करणार्‍या, तसेच जीवजंतूंना भोग व मोक्ष देणार्‍या, ब्रह्माविष्णुमहेशांना आपापल्या ठायी सुप्रतिष्ठित करणार्‍या देवी नर्मदे तुझ्या चरणांना मी नमस्कार करतो. 
८) भगवान शंकरांच्या जटेतून निघालेल्या तुझ्या तटावरील किरात, सूत, वाडव, पंडित, शट, नट अशा समस्त जनांच्या मुखी अमृतोपम संजीवक असे नर्मदेचेच नांव ऐकू येते. दुस्तर पापतापांचा नाश करुन सकल जीवांचे कल्याण करणार्‍या देवी नर्मदे, मी तुझ्या चरणकमलांना नमस्कार करतो. 
९) हे नर्मदाष्टक नेहमी त्रिकाळी जे निरंतर पठण करतात त्यांना कधीही दुर्गति प्राप्त होत नाही. तसेच त्यांना मानवी जन्मांतील अतिदुर्लभ आणि गौरव देणारे महेशधाम प्राप्त झाल्याने ते जन्ममृत्युच्या बंधनांतून मुक्त होतात व रौरवादी नरकाचे दर्शनही त्यांना होत नाही. अशा रीतीने परम पूज्य श्रीमद् आद्यशंकराचार्यांनी रचिलेले हे नर्मदाष्टक येथे पुरे झाले. 


|| जय गजानन ||

।। श्री गजानन बावन्नी ।। 

जय जय सद्गुरु गजानना । रक्षक तूची भक्तांना ।।१।।
निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रुपात गजानन तू ।।२।।
सदेह तु परि विदेह तू । देह असुनी देहातीत तू ।।३।।
माघ वद्य सप्तमी दिनी । शेगांवात प्रगटोनी ।।४।।
उष्ट्या पत्रावळी निमीत्त । विदेहत्व तव हो प्रकट ।।५।।
बंकटलाला वरी तुझी । कृपा जाहली ती साची ।।६।।
गोसाव्याच्या नवसासाठी । गांजा घेसी लाऊनी ओठी ।।७।।
तव पदतीर्थे वाचविला । जानराव तो भक्त भला ।।८।।
जानकीरामा चिंचवणे । नासवूनी स्वरुपी आणणे ।।९।।
मुकीन चंदुचे कानवले । खाऊनी कृतार्थ त्या केले ।।१०।।
विहरीमाजी जलविहिना । केले देवा जलभरणा ।।११।।
मधमाश्याचे डंख तुवा । सहन सुखे केले देवा ।।१२।।
त्यांचे काटे योगबले । काढुनि सहजी दाखवले ।।१३।।
कुस्ती हरिशी खेळोनी । शक्तीदर्शन घडवोनी ।।१४।।
वेद म्हणूनी दाखवला । चकीत द्रवीड ब्राम्हण झाला ।।१५।।
जळत्या पर्यंकावरती । ब्रम्हगिरीला ये प्रचिती ।।१६।।
टाकळीकर हरिदासाचा । अश्व शांत केला साचा ।।१७।।
बाळकृष्ण बाळापुरचा । समर्थ भक्तचि जो होता ।।१८।।
रामदास रुपे त्याला । दर्शन देवुनि तोषविला ।।१९।।
सुकलालाची गोमाता । द्वाड बहु होती ताता ।।२०।।
कृपा तुझी होताच क्षणी । शांत जाहली ती जननी ।।२१।।
घुडे लक्ष्मण शेंगावी । येता व्याधी तू निरवी ।।२२।।
दांभिकता परि ती त्याची । तू न चालवुनि घे साची ।।२३।।
भास्कर पाटील तव भक्त । उद्धरिलासी तूं त्वरीत ।।२४।।
आज्ञा तव शिरसावंद्य । काकहि मानती तुज वंद्य ।।२५।।
विहरीमाजी रक्षियला । देवा तु गणू जवर्याला ।।२६।।
पिंताबरा करवी लीला । वठला आंबा पल्लविला ।।२७।।
सुबुद्धी देशी जोश्याला । माफ करी तो दंडाला ।।२८।।
सवडद येथील गंगाभारती । थुंकुनि वारली रक्तपिती ।।२९।।
पुंडलिकाचे गंडातर । निष्ठा जाणुनि केले दुर ।।३०।।
ओकांरेश्वरी फुटली नौका । तारी नर्मदा क्षणात एका ।।३१।।
माधवनाथा समवेत । केले भोजन अद्यष्ट ।।३२।।
लोकमान्य त्या टिळकांना । प्रसाद तूचि पाठविला ।।३३।।
कवरसुताची कांदा भाकर । भक्षिलीस त्या प्रेमाखातर ।।३४।।
नग्न बैसुनि गाडीत । लीला दाविली विपरीत ।।३५।।
बायजे चित्ती तव भक्ती । पुंडलिकावर विरक्त प्रिती ।।३६।।
बापूना मनी विठ्ठल भक्ती । स्वये होशी तु विठ्ठल मुर्ती ।।३७।।
कवठ्याच्या वारकर्याला । मरीपासुनी वाचविला ।।३८।।
वासुदेव यति तुज भेटे । प्रेमाची ती खूण पटे ।।३९।।
उद्धट झाला हवालदार । भस्मिभूत झाले घरदार ।।४०।।
देहांताच्या नंतरही । कितीजणा अनुभव येई ।।४१।।
पडत्या मजुरा झेलीयले । बघति जन आश्चर्य भले ।।४२।।
अंगावरती खांब पडे । स्त्री वाचे आश्चर्य घडे ।।४३।।
गजाननाच्या अद्भुत लिला । अनुभव येती आज मितीला ।।४४।।
शरण जाऊनी गजानना । दुःख तयाते करी कथना ।।४५।।
कृपा करी तो भक्तांसी । धावूनि येतो वेगेसी ।।४६।।
गजाननाची बावन्नी । नित्य असावी ध्यानीमनी ।।४७।।
बावन्न गुरवारी नेमे । करा पाठ बहुभक्तीने ।।४८।।
विघ्ने सारी पळती दुर । सर्व सुखांचा येई पूर ।।४९।।
चिंता सार्या दुर करी । संकटातूनि पार करी ।।५०।।
सदाचार रत् सदभक्ता । फळ लाभे बघता बघता । 
सुरेश बोले जय बोला । गजाननाची जय बोला ।।५२।।
जय बोला हो जय बोला गजाननाची जय बोला

अनंतकोटी ब्रम्ह़ांडनायक महाराजाधीराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतीपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्रीगजानन महाराज की जय |
जय गजानन जय गजानन


।। पुष्पांजली ।।

पुष्पांजली ही तुला अर्पितो दत्तगुरु सदया
तव पदी वंदन करण्या स्फूर्ति द्यावी या हृदया
तुलसी, बेल आणि फुले सुवासिक नानाविध माला
अर्पितसो बहु प्रेमभरे आम्ही श्रीप्रभुचरणाला 
किंचित सेवा भजन पुजन हे घडले या चरणी 
गोड करुनी घ्या प्रेमे आमुची भक्तांची करणी 
दीनदयाळा भक्तवत्सला श्रीगुरु यति राया
पुष्पयुक्त अक्षता अर्पितो प्रेमे तव पाया
साधुसंत, ऋषि देवादिक हे नमिती तव पायी 
धन्य मानिती ते आपुल्याला संशय मुळी नाही 
अत्रिऋषि अनसुयासुता तू अवतरला कलीया
उध्दरण्याला  भक्तजनांना हरुनी पापभया
दीनदयाळा आम्ही लेकरे शरण तुला आलो 
भक्ति प्रेमे पुष्पांजली ही वाहण्याला सजलो


।। श्रीदत्तात्रेय स्तोत्रम् ।।

दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलम् ।। 
प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी स माsवतु ।।१।।
दीनबन्धुं कृपासिन्धुं सर्वकारणकारणम् । 
सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी स माsवतु ।।२।।
शरणागतदीनार्तपरित्राणपरायणं । 
नारायणं विभुं वन्दे स्मर्तृगामी स माsवतु ।।३।।
सर्वानर्थहरं देवं सर्वमंगलमंगलम् । 
सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तृगामी स माsवतु ।।४।।
शोषणं पापपंकस्य दीपनं ज्ञानतेजसः । 
भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी स माsवतु ।।५।
सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणम् । 
तापप्रशमनं वन्दे स्मर्तृगामी स माsवतु ।।६।।
ब्रह्मण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनम् । 
आपदुद्धरणं वन्दे स्मर्तृगामी स मावतु ।।७।।
जन्मसंसारबंधघ्नं स्वरूपानन्ददायकम् । 
निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामी सा माsवतु ।।८।।
जयलाभयशःकामदातुर्दत्तस्य यः स्तवम् । 
भोगमोक्षप्रदस्येमं प्रपठेत्स कृती भवेत् ।।९।।

।। इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं श्रीदत्तात्रेयस्तोत्रं संपूर्णम् ।।

।। श्रीदत्ताचे ध्यान ।।

दिगंबरं भस्मविलेपितांगं ।
बोधात्मकं मुक्तिकरं प्रसन्नं ।।
निर्मानसं श्यामतनुं भजेऽहं
दत्तात्रेयं ब्रह्म समाधियुक्तम् ।।