आरत्या

दत्तात्रय आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥

जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।  आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥धृ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥२॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥३॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण । एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥४॥

|| अवधुत चिंतन गुरुदेव दत्त ||


श्री स्वामी समर्थांची आरती

|| जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थां 
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा || जयदेव जयदेव ||

|| छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी ||

|| त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार, तेथे जडमूढ कैसा करु विस्तार ||

|| देवाधिदेव तू स्वामीराया, निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया 
तुजसी अर्पण केली आपली ही काया, शरणागता तारी  तू स्वामीराया ||

|| अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले, किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे. 
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सूता नलगे चरणावेगळे ||

|| अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ||


शेज आरती

आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधुता ।
स्वामी अवधुता ।
चिन्मय, सुखधामी जाऊनी, पहुडा एकांता ।।

वैराग्याचा कुंचा घेऊनी चौक झाडीला ।
गुरु हा चौक झाडीला ।।
तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला ।।१।।

पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती ।
सुंदर नवविधा भक्ती ।।
ज्ञानाच्या समया उजळुनी लाविल्या ज्योति ।।२।।

भावार्थाचा मंचक ह्रदयाकाशीं टांगिला ।
ह्रदयाकाशीं टांगिला ।।
मनाची सुमनें करूनी केलें शेजेला ।।३।।

द्वैताचे कपाट लोटुनी एकत्र केले ।
गुरु हे एकत्र केले ।।
दुर्बुध्दीच्या गांठी सोडुनी पडदे सोडीयले ।।४।।

आशा तृष्णा कल्पनेचा सांडुनी
गलबला ।गुरु हा सांडुनी गलबला ।।
दया क्षमा शांती दासी उभ्या शेजेला ।।५।।

अलक्ष उन्मनी घेउनी नाजुकसा शेला ।
गुरु हा नाजुकसा शेला ।।
निरजंनी सदगुरु माझा निजे शेजेला ।।६।।


अपराध क्षमा आता केला पाहिजे

अपराध क्षमा आता केला पाहिजे
गुरू हा केला पाहिजे ।
अबध्द सुबध्द गुण वर्णियले तुझे ।।ध्रु।।

नकळेची टाळविणा वाजला कैसा
गुरू हा वाजला कैसा
अस्ताव्यस्त पडे नाद झाला भल तैसा ।। १ ।।

नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर
गुरू हा कंठ सुस्वर ।
बरा नाही झाला वाचे वर्ण उच्चार ।। २ ।।

निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे 
गुरू हे वेडे वाकुडे 
गुणदोष नसावा हा सेविका कडे।। ३ ।|

अपराध क्षमा आता केला पाहिजे
गुरू हा केला पाहिजे ।
अबध्द सुबध्द गुण वर्णियले तुझे ।।


श्री गुरुचरित्राची आरती

मूर्तित्रयगुणसारं निर्गुणविस्तारं ।
षडभुजपारावारं दुर्जनसंहारं ।
भक्तप्रियदातारं कल्पितपरिपारं ।
मुनिजनमानसहारं निगमागमसारं ॥ १ ॥

जय देव जय देव वंदे गुरुचरितं ।
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥

श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं ।
नरहरि भारति लीला ब्रह्मादिकस्तुत्यं ।
कलिमलदाहक मंगलदायक फलनित्यं ।
पारायण देहि मे पुस्तकमपि चित्यं ॥ २ ॥

जय देव जय देव वंदे गुरुचरितं ।
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥

त्वद्गतलीलासारं श्रृतिसकलाकारं ।
कांडत्रयविस्तारं प्रत्ययलघुकारं ।
कल्पद्रुमफलभारं कल्पित्तदातारं ।
पठणामृतरसधारं भवभयपरिहारं ॥ ३ ॥

जय देव जय देव वंदे गुरुचरितं ।
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥

अगाध श्रीगुरुचरणं भूइच्छातरणं ।
ज्ञानामृतरसभरणं जडजीवोद्धारणं ।
भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रयहरणं ।
निगमारहित महिमा मोक्षश्रीवर्णं ॥ ४ ॥

जय देव जय देव वंदे गुरुचरितं ।
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥

श्रीगुरुकरुणाकृत्यं सिद्धेश्र्वरगीतं ।
शारदागंगाधरसुतमथितं नवनीतं ।
भाविकभक्तप्रियकर कृतलौकिकदत्तंम ।
तद्रेतशेषं वांछित सुख हरिहरचित्तं ॥ ५ ॥

जय देव जय देव वंदे गुरुचरितं ।
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥


श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींची आरती

आरती सद्गुरूरायाची।
करिता सद्भावे साची।।धृ।।
तनमन अर्पूनी हो गुरूला।
प्रेमे ओवाळू त्याला।
पंचप्राणांच्या वाती।
लावूनी नेत्रांच्या पाती।
मन हे स्थिर करुनि पहा।
रेवा तिरी सद्गुरू हा।
"चाल" दुसरा देव नसे ऐसा।
भक्तजनांच्या पुरवुनी आशा।
सोडूनि जाती संस्कृती पाशा।
धरू हो कास आम्ही त्याची।
असे ही कामधेनु आमुची।।१।।
ध्यान हे रम्य किती दिसते।
धरी हो हाती दंडा ते।
भाळी भस्माच्या रेषा।
शोभती तीन पहा कैशा।
कटी पदी पर तो झळकतसे।
कौपिन रम्य किती भासे।
कमंडलू तो वंशाचा।
हाती शोभतसे साचा।
" चाल " विधीहरिहर हे त्रयमूर्ती।
दत्तची ऐसे, मजला भासे, मन्मनिच वसे।
मूर्ती मनहरणी साची।
असे ही कामधेनू आमुची।।२।।
दयाळू कितीतरी मी सांगू।
वाणी होत असे पंगू।
केवळ ज्ञानाचा भानू।
तियेचे गुण किती वर्णू।
स्वामी वासुदेवराया।
सतत मी शरण तुझे पाया।
वासुदेव करी आरती।
दिधली सद्गुरूंने स्फूर्ती।
"चाल" स्वामी सद्गुरूरायाची।
करिता आरती, दूर्दिन जाती, सुदिन भासती, पहा प्रचीती।
सत्ता सर्व ही सद्गुरूंची।
असे ही कामधेनू आमुची।।३।।
श्रीगुरूदेव दत्त.


श्री. प. प. नृसिंहसरस्वती (दीक्षित) स्वामी कृत

।। श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांची आरती ।।

जय जय श्रीमद्गुरुवर स्वामिन् परमात्मन् हंसा ।।
वासुदेवानंद सरस्वती आरती तद हंसा ।। धृ. ।।
सोऽहं हंस: पक्ष्याभ्यां संचरसि ह्याकाशे ।।
वासस्ते खलु लोके सत्ये क्रीडा तव मनसे ।। जय जय ।। १ ।।
मुक्ताहारो ब्रह्म्वाह्को वैराडरूपधर ।। 
भक्तराज हृद्ध्वांत तमोहृत स्वीकुरु मां च हर ।। जय जय ।। २ ।।
पक्षस्यैके वातेनैते भीता: काकाद्य: ।। 
पलायितास्ते द्रुतं प्रभावात् भवंति चादृश्या: ।। जय जय ।। ३ ।।
एवं सति खलु बालस्तेहं ग्रसित: कामाद्यै: ।
मातस्त्वरया चोध्दर कृपया प्रेषितशांत्याद्यै: ।। जय जय ।। ४ ।।
दासस्ते नरसिंहसरस्वती याचे श्रीचरणम् ।।
भक्तिश्रद्धे वासस्ते हृदि सततं मे शरणम् ।। जय जय ।। ५ ।।


।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

श्री गुरु दत्तराज मूूर्ती, ओवाळितो प्रेमे आरती 
ब्रम्हा, विष्णू, शंकराचा, असे अवतार श्रीगुरुचा
कराया उद्धार जगाचा जाहला बाळ अत्रि ऋषिचा 
धरीला वेष असे यतिचा मस्तकी मुकुट शोभे जटिचा
कंठी रुद्राक्ष माळ धरुनी 
हातामधे आयुध बहुध धरुनी 
तेणे भक्तांचे क्लेश हरुनी
त्यासी करुनी नमन, अथ शमन होईल रिपु दमन,
गमन असे त्रैलोक्या वरती । ओवाळितो प्रेमे आरती ।। १ ।।
गाणगापुरी वस्ती ज्याची, प्रीति औदुंबर छायेसी 
भीमा अमर संगमाची भक्ति असे बहुत सुशिष्यांची 
वाट दावूनिया योगाची, ठेव देत असे निज मुक्तिची
काशी क्षेत्री स्नान करितो 
करविर भिक्षेला जातो 
माहुरी निद्रेला वरितो
तरतरीत छाटी झरझरीत नेत्र गरगरीत शोभतो 
त्रिशुळ जया हाती, ओवाळितो प्रेमे आरती ।। २ ।।
अवधूत स्वामी सुखानंदा, ओवाळितो सौख्यकंदा
तारी हा दास रूदनकंदा, सोडवी विषय मोह छंदा
आलो शरण अत्रिनंदा, दावि सद्गुरू ब्रह्मानंदा
चुकवी चौऱ्यांशीचा फेरा 
घालिती षडरिपु मज घेरा 
गांजिती पुत्र पौत्र दारा
वदवी भजन मुखी तव पुजन करितसे
सुजन ज्यांचे बलवंतावरती, ओवाळितो प्रेमे आरती ।। ३ ।।